पुण्यातली खादाडी - पर्वती , सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज

Submitted by Diet Consultant on 25 June, 2013 - 12:08

पुण्यातली खादाडी - पर्वती , सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. . शिंदे हायस्कूल - सहकार नगर - दारासमोरची गाडी - मसाला पाव , पुलाव , पाव भाजी - झकास आणि स्वस्त फिदीफिदी

२. सहकार नगर - सारंग चौपाटी . Dr . कसबेकर क्लिनिक समोर ची गाडी - भेळ A 1 ! SPDP पण !

सारंग चं रीलॅक्स.रीलॅक्स ची पावभाजी आणि कॉफी. सारंग ची कल्पना भेळ,पाणीपुरी, सारंग चौपाटी वरचं स्वामी समर्थ क्लब sandwich, कृष्णा चा वडापाव, धनकवडी ला रामनाथ कडचे सगळे चाट प्रकार, बिबवेवाडी -कोंढवा रोड ला गगन विहार च्या इथे सोलंकी पाणीपुरी, आदिनाथ मध्ये मानकर चा साधा डोसा, वानवडी ची खाऊ गल्ली..

बिब्वेवाडी कोन्ढवा रोड वर - कल्याण भेळ पुरी ...यम्म्मी

जरा अलिकडे ---- मार्केट यार्ड रोड वर --- वाडेश्वर....मस्त मजा येते ..गर्दी नाही

बिबेवाडी : विवेकांनद पुतळ्याच्या आतल्या जणार्या लेन मध्ये आता नवे नाटय गृह होत आहे . त्याच्या च इथे … गाड्या लागलेल्या आहेत . SPDP छान आहे. पा. भा , फ्रुट ज्यूस , क.दा. , डोसे वगरे पण आहेत.
महत्वाची काळजी : हाय वे - बस लेन वगरे नीट बघून गाड्या चालवणे आणि वळवणे . जीवाची काळजी घ्या बाई ! जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जीव महत्वाचा !

कृष्णा बेकरी : पाव Pattice मस्त ! चिंचेचे लाल पाणी असते न , ते तिखटाचे असते ! हॉट ! चव येते तोंडाला !

>>विवेकांनद पुतळ्याच्या आतल्या जणार्या लेन मध्ये आता नवे नाटय गृह होत आहे
होत आहे काय ? होऊन जुने पण झाले असेल आता. शाहिर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह.

भगली हॉस्पिटल पासून रम्यनगरीकडे जाणार्या रस्त्यावर अनेक खाऊ स्पॉट्स तयार झाले आहेत. कसे आहेत ते ?

रीलॅक्स पावभाजीच्या गल्लीतर पुढे बर्याच गाड्या लागतात.त्यातली मोठ्या झाडाखाली असलेली एक सॅन्डवीच ची गाडी,सहकारनगर च्या गेट च्या अपोझिट , कायम ४-५ माणस अशकय स्पीड ने सॅन्डवीच बनवत असतात अशी गर्दी असते.सगळेच प्रकार भारी. हिरवी चटणी बहुधा ते त्यांचीच बनवतात.त्यामुळे वेगळी चव येत असेन.

नवरत्न हॉटेल : पनीर पराठा झ्क्क्क !
सारंग हॉटेल : पनीर पराठा + पंजाबी भाज्या
वेदांत हॉटेल : पनीर राजवाडी veg झकास

>>काम अजूनही चालू आहे त्याचे
मेन्टेनन्स काम असेल काहीतरी, आम्ही मागच्या वर्षी एका प्रोग्रामला गेलो होतो तिथे.

महर्षीनगरमधे एक लहान दुकान आहे, मोरबीवाला स्वीट्स का असे कायसेसे नाव आहे. सकाळी सकाळी सुंदर असा अस्सल गुजराथी स्टाईल फाफडा, गरमागरम जिलेबी, ढोकळा वगैरे मिळतो. अशक्य सुंदर चव आहे.
सकाळी ७.३०-८.०० वाजता पण २०-२५ मिनीटे लायनीत उभं रहायची तयारी असेल तर नक्की जाऊन बघा.

बिबवेवाडी-कोंढवा रोडवर माऊली डोसा सेंटर.. तिथले डोसे, सँडविच आणि पिझ्झा अप्रतीम..
थोडं पुढे गंगाधाम चौपाटी.. याबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. कुठेही काहीही खा.. निव्वळ अप्रतीम.. स्लर्प !!!

आदिनथ च्या अलिकडे मुकुन्दनगरकडे जणार्या रस्त्यावर नागब्रम्हांबा नावाचे हॉटेल आहे. तिथे डोसा , आप्पे सुन्दर मिळतात. आणी फिल्टेर कॉ फी तर अप्रतीम असते.

आणी पन्जाबी भाजी खावी तर ती पन्चमीचीच.

कल्याण भेळ वरिजिनल म्हणे भारी आहे या भागातली (ऐकलंय असं).
गंगाधाम रस्त्यावर खादाड लोकांसाठी बरेच प्रकारची जेवणं, मिष्टान्नं, चटकदार पदार्थ मिळणारी उपाहारगृहे असल्याचं ऐकलंय.

मित्रमंडळच्या इथलं हॉटेल राजमहाल चालू आहे का अजून?
पंचमी हॉटेलात सौदिंडियन पदार्थ चांगले मिळतात.

अप्रतिम फुडस आहे का अजून?
चपाती खरच अप्रतिम असायची त्याची.. >>> हो आहे , संगम हॉ. च्या समोरील बंगल्याच्या ओउअट हाउअस मधे आहे. पोळ्या छान असतात ...

Pages