Submitted by Diet Consultant on 25 June, 2013 - 12:08
पुण्यातली खादाडी - पर्वती , सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यातली खादाडी - पर्वती , सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज
गंगाधाम रोडवर देव अंकल्स किचन
गंगाधाम रोडवर देव अंकल्स किचन मधली मक्के की रोटी आनि सरसो का साग....यम्म्म्म.....
बाकीचे टीपिकल पंजाबी पदार्थ्,पंजाबी लोणची,लस्सी सगळेच आयटम खास इथले.
देव अंकल स्वर्गवासी झाले...ते असताना त्यांच व्यकिमत्व ,ते किचन्,खास पंजाबी पदार्थ सगळच पंजाबी फिल द्यायच.
आणि त्याच लाईनमधे एक आहे
आणि त्याच लाईनमधे एक आहे मेघदूत, ते कसे आहे ?
गंगाधाम रोडवरच , फलाहर मधे़
गंगाधाम रोडवरच , फलाहर मधे़ जामुन शॉट (जांभळाचा ज्युस) छान आहे
गंगाधाम चौकात मेघदूत हॉटेल ला
गंगाधाम चौकात मेघदूत हॉटेल ला कढाई मसाला पापड मिळायचा.खरं तर पोळीच, पण ती कढईवर भाजून खाकर्यासारखा कढई आकार आणि त्यावर मसाला पापडाचा मसाला..एकदम जबरदस्त प्रकार होता.
सिरवी ब्रदर्स चा माहिम हलवा(ते चपटं एकावर एक लेयर असलेलं फ्लॉपी डिस्क..त्यालाच म्हणतात ना?) पण छान असायचा.
आमची खास म्हणजे बिबवेवाडी च्या रिलॅक्स बाहेरची पाणीपुरी गाडी.
सहकारनगर चा श्रीकृष्ण.हे काका सुटे न देता वडे किंवा पाव संख्या राऊंड ऑफ करुन द्यायचे.आता गंगाधाम रोड वर चा श्रीकृष्ण वाला काही वर्षापूर्वी उघडलाय तो सुटे द्यायचा.
कल्याण भेळ फारशी आवडली नाही,फारच गोडगोड असायची तिखी चटणी घालून पण.
महर्षीनगरमधे एक लहान दुकान
महर्षीनगरमधे एक लहान दुकान आहे, मोरबीवाला स्वीट्स का असे कायसेसे नाव आहे. सकाळी सकाळी सुंदर असा अस्सल गुजराथी स्टाईल फाफडा, गरमागरम जिलेबी, ढोकळा वगैरे मिळतो. अशक्य सुंदर चव आहे.
सकाळी ७.३०-८.०० वाजता पण २०-२५ मिनीटे लायनीत उभं रहायची तयारी असेल तर नक्की जाऊन बघा.>>>>> अहो गिरीकंद, हे दुकान नक्की कुठल्या साईडने आहे? मुकुंद नगर ला लागुन की पुढे गुलटेकडीकडे जाताना लागते हे दुकान? जवळची खूण सांगा की.
रश्मी, सातारा रोडवर पंचमी
रश्मी, सातारा रोडवर पंचमी हॉटेलला डायगोनली आपोझिट गल्ली आहे त्या गल्लीतुन जायचे, जाताना डाव्या हाताला लागेल ते दुकान.
धन्यवाद गिरीकंद. तो सगळा
धन्यवाद गिरीकंद.:स्मित: तो सगळा परीसर अदिनाथ सोसायटी व मार्केटयार्ड मुळे गुज्जु लोकांचाच आहे.
ह्या दुकानाचा पत्ता पण मला
ह्या दुकानाचा पत्ता पण मला एका गुजराथी मित्रानेच सांगितला.
फलाहारच्या जामुन शॉटबद्दल
फलाहारच्या जामुन शॉटबद्दल बरंच ऐकलं आहे. जायला हवं एकदा. गंगाधामच्या समोर आहे ना ते?
फलाहारच्या जामुन शॉटबद्दल
फलाहारच्या जामुन शॉटबद्दल बरंच ऐकलं आहे. जायला हवं एकदा. गंगाधामच्या समोर आहे ना ते? > हो, बरोबर
गंगाधाम चौकात मेघदूत हॉटेल ला
गंगाधाम चौकात मेघदूत हॉटेल ला कढाई मसाला पापड मिळायचा.खरं तर पोळीच, पण ती कढईवर भाजून खाकर्यासारखा कढई आकार आणि त्यावर मसाला पापडाचा मसाला..एकदम जबरदस्त प्रकार होता.
>> अजूनही मिळतो.. रुमाली मसाला पापड म्हणून.. मला फार आवडतो..
मेघदूत जरा महाग आहे पण चवीला छान आहे.
आमची खास म्हणजे बिबवेवाडी
आमची खास म्हणजे बिबवेवाडी च्या रिलॅक्स बाहेरची पाणीपुरी गाडी.
>> म्हणजे आताची सुदामा भेळ का?
आता काये माहित नाय..गेल्या ७
आता काये माहित नाय..गेल्या ७ वर्षात तिथे गेले नाही.
भगली हॉ. समोर आता मानकर
भगली हॉ. समोर आता मानकर डोसा चालु होत आहे
गंगाधाम रोडला जायला हवं.
गंगाधाम रोडला जायला हवं.
काही नवीन ठिकाणे
काही नवीन ठिकाणे
1. बालाजी नगर - रोहित वडे वाले - वडापाव (सिद्धार्थ फर्निचर समोर)
2. बालाजी नगर - साई कॅफे कट्टा - शेवपाव (एलोरा पॅलेस शेजारी)
3. भारती विद्यापीठ खाउगल्ली - राजू अंकल के छोले भटुरे - छोले भटुरे आणि/ किंवा छोले राईस
आता बाहेर खाण्याच्या सवयींवर
आता बाहेर खाण्याच्या सवयींवर नियंत्रण आणणे योग्य राहील.
गेल्या विकेंडला आमच्या गांवात
गेल्या विकेंडला आमच्या गांवात फक्त मराठी क्विझिन असलेलं पूर्णब्रह्म या चेनचं रेस्टराँ सुरु झालं. सध्यातरी आमचा फिडबॅक मिक्स्ड आहे, अगदिच नाक मुरडण्यासारखा नाहि. शिवाय, नविनंच असल्याने थोडि सूट द्यायला हरकत नाहि.
त्यांच्या वेबसाइटवरुन सातारा रोड - बिबवेवाडि आणि इतर ३-४ ठिकाणी त्यांचीच रेस्टराँ, बर्यापैकि एस्टॅब्लिश्ड आहेत असं दिसतंय. तिथल्या लोकांचे फिडबॅक्स वाचायला आवडतील...
स्पाईस स्टोरीज -
स्पाईस स्टोरीज - महाराष्ट्रीयन पण वेगळया प्रकारची थाळी/भाज्या.
हॉटेल मध्ये पंजाबी/ साऊथ इंडियन खाऊन कंटाळा आला असेल तर उत्तम पर्याय.
गंगा धाम चौक ते गगन गलॅक्सी रोड, पेट्रोल पंपाच्या थोडं पुढे, मेघदूत च्या अलीकडे..
बिबवेवाडी - कों ढवा रोडवर
बिबवेवाडी - कों ढवा रोडवर सुरुवातीलाच डाविकडे क्रूष्णाई नावाचे हॉटेल झाली आहे २ वर्षांपोर्वी. उत्तम वातावरण आहे. पदार्थांची चवही छान वाटली.
कोणाचा उतर फीडबॅक ?
उतर फीडबॅक म्हणजे निगेटिव्ह
उतर फीडबॅक म्हणजे निगेटिव्ह का?
माझा फीडबॅक चांगला आहे. सगळे पदार्थ उत्तम आहेत.
पण छज्जा म्हणाले तसं आता पुढचे वर्षभर तरी बाहेरचे खाणे टाळणे हेच भल्याचं राहील सगळ्यांच्या.
पियु , मला चांगला वाइट दोनही
पियु , मला चांगला वाइट दोनही मते ऐकायची आहेत.
आणि खरंच आता वर्षभर तरी इथल्या आठवणींवरच काढाव्या लागणार.
भापकर पंपाच्या अलिकडे नवीन झालेल्या सांबार बद्दल कोणी लिहिले नाही. तिथली साइ थाली इंटरेस्टिन्ग असते. तांदळाचा शिरा , उप्पीट , एकेक इडली - वडा आणि एक म डोसा येतो यात. आणि सुंदर कॉफी ! मला तो शिरा आणि कॉफी फार आवडते. !
कात्रज आंबेगाव परिसरात
कात्रज आंबेगाव परिसरात पाणीपुरी कुठे चांगली मिळते?
कल्याण भेळ बिबवेवाडी ची पाणीपुरी मला आवडतेच पण कात्रज मध्ये कुठे चांगली पाणीपुरी मिळते ते हवं होतं!
मुळात या धाग्याचे नाव बदलून
मुळात या धाग्याचे नाव बदलून पुण्याजवळचे खादाडी असे ठेवावे. सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज हे पुणे नव्हे !!!
फक्त पेठा आणि कोथरूड एव्हडेच पुणे आहे
महानगरपालिका तर या भागांना
महानगरपालिका तर या भागांना पुणे समजते. त्यांचा गैरसमज झालाय की काय?
Pages