'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...
हा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...
लहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.
खळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...
मनाच्या एकांती तुझी याद येते
कानात गुंजते नाव तुझे ||
स्वप्नाचे आकाश भरून मानस
तुझा सहवास अनुभवे ||
कधी येता जाग कुण्या मध्यरात्री
तुझे भास गात्री जाणवती ||
तुझे वेड तूच देवून जागवी
भ्रमिष्ट चाळवी जन्म माझा ||
आता हरू द्यावे हे माझे मी पण
जगण्या कारण तूच होई ||
विक्रांत विज्ञानी झाला दत्तखुळा
म्हणे गोतवळा शिकलेला ||
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
बोलव रे दत्ता चालव रे आता
घालव रे दत्ता मी पण हे ||
जाहलो उर्मट करी कटकट
करावा ना वीट परी माझा
घालवू नकोस धुत्कारू नकोस
अडाणी भक्तास रित्या हाती
असशी दयाळू तू माय कृपाळू
प्रीत आळूमाळू असो द्यावी
वर्षून कृपेसी घेई हृदयाशी
ठाव पायाशी देईं मज
कधी रागावसी तू फटकारशी
धरुनी प्रेमासी मी चुकता |
राहीन दारात तुझिया पथात
घेवूनि हातात प्राण माझे |
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ
मन होते कासावीस लागुनिया वेड
काम करता लक्ष नाही कामामधे चूक
नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक
घर नाही दार नाही विसरतो संसार
जीवनात सार सारे वाटू लागते असार
नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग
डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग
करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे
एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे
नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत
इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . .
.