नकटीच्या लग्नाला यायचं हं... - झी मराठीवरील नवी मलिका
नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा...
नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा...
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
हाऊस एम डी मला खूप आवडायची. हाऊसचे एकंदर पात्र आणि त्याला कायम चिमटे काढत असूनही कठीण प्रसंगी त्याला आधार देणारी आणि त्याच्या बुद्धीला कायम मानणारी टिम पण.
मालिका आता स्टार वर्ल्ड वर संपली पण त्याच्या आठवणी जागवण्यासाठी हा धागा.
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन
आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
आजकालच्या मालिकांचे काय चालू आहे ते माहितीच आहे सर्वांना........नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे सरळ मुद्द्यालाच हात घालते......काय आहे, आजच्या मालिका, सिनेमे हे आपल्या जीवनावर,मानसिकतेवर किती प्रभाव टाकतात हे मी माझ्या रोजच्या जीवनात अनुभवल आहे. आणि अश्या साठी मला वाटत कि या मालिकेतील पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेली नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केल तरी आपल्या हृदयाच्या खूप जवळची असतात.
तशी माझी मीच रिक्षा फ़िरवतच असतो म्हणा. मी गेली अनेक वर्षे टिव्हीवरच्या मालिकाच काय, टिव्हीच बघणं सोडून दिलय. त्यामूळे वाचनाला, मित्रांच्या संपर्कात रहायला, इतर छंदांना भरपूर वेळ मिळतो.
श्रीयुत गंगाधर टिपरे हि मन लावून बघितलेली शेवटची मालिका. त्या आधी, तू तू मै मै पण बघितली होती. भारत एक खोज ची तर वाट बघत असायचो.
यावेळच्या भारतवारीत, पावसामूळे कधी कधी घरी बसावे लागायचे. आई कुठलीतरी मालिका बघत बसलेली असायची. त्यावेळी जाणवलेले हे काही.
अर्थात मला हे माहित आहे, कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि. त्यमूळे हे स्वगतच समजायचे.
१) विषय
'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने केलेल्या १२ भूमिका व 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात राजेश शृंगारपुरेने केलेल्या १२ भूमिका याविषयी बातम्या वाचनात आल्या. त्या अनुषंगाने मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी चित्रपट विभागात नवीन धागा सुरू केला.
त्याच्या प्रतिसादात काही जणांनी मराठी नाटकातीलही दुहेरी / विविध भूमिका कळवल्या. मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी नाटक विभागात नवीन धागा सुरू केला.
मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.