नकटीच्या लग्नाला यायचं हं... - झी मराठीवरील नवी मलिका

Submitted by योकु on 1 January, 2017 - 21:26

नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच वेळेत ( ९ आणी ९.३० ) कलर्सवर सुद्धा दोन नविन मालीका येतायेत, त्यांचे प्रोमो मलातरी यांच्यापेक्शा जास्त चांगले वाटतायेत.

मानिनी, ९ ला सुरु होतेय मालिका कलर्सवर आणि साडेनऊला डान्स riality शो आहे तीन दिवस, अमेय वाघ anchor आहे.

प्राजक्ता माळी अश्या रोल साठी बेस्ट आहे. सतत उदास /रडत राहायची अ‍ॅक्टीग तिला छान जमते.
>>

प्रोमो मध्ये तर चांगली हसताना दाखविली आहे की. Uhoh

मी ही काल पाहिला प्रोमो Happy प्राजक्ता माळी लीड असेल तर सध्या तरी मालिकेला माझा पास.आता बघु हिरो कोण असेल ?? त्यावर किमान पहिले ४० एपि पाहता येतील.

एकच प्रोमो दाखवताहेत आणि त्यात नकटा अजून तरी कोणी दाखवलेला नाहीये. नकटा नकटीला मिळाला कि मालिका संपेल . माहित नाही त्यांना कदाचित गुलदस्त्यात ठेवायचा असेल नकटा Happy

लंबी चवडी टीम आहेच यात...परिवार म्हणून.
त्यामुळे पाणी घालणं सोपं!

लंबी चवडी टीम आहेच यात...परिवार म्हणून.>> ती तर पाहिजेच पाहिजेच मालीका बराच काळ चालली तर पाहिजेना. मुख्य कथानकाच्या भोवती याच प्रकरण त्याच प्रकरण. मग चिक्कार वेळ लागतो संपायला Happy

झी च्या सगळ्या संपलेल्या सिरेलीतल्या दोन दोन पात्रांना घेऊन ही सिरियल बनवलेली दिसतेय. अगदी होसुमीयाघ च्या बेबी आत्या, राखेचा ची आई, नांसौ ची आज्जी पण आहेत यात

योकु तुम्ही झी channel मध्ये काम करता का? झीच्या मालिका सुरु व्हायच्या आधीच तुम्ही त्याचे धागे काढून मोकळे होता आणि त्या त्या धाग्यावर तुमचे स्वत:चे प्रतिसाद मात्र बघितल्याचे आठवत नाही...

तुम्ही जर झीवर काम करत असाल तर प्लीजच सध्या चालू असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको आणि खुलता कळी खुलेना बंद करावयाची सुचना पोहोचवा.

माझ्या मते योकु प्रोमो बघतात आणि ताबडतोब ( दुसरा कोणी काढायच्या आधीच ) धागे काढतात .
भाषा पण सेम असते चला पिस काढायला अशी . योकु खरंच तुम्ही झी वर काम करता कि काय ?

झी च्या सगळ्या संपलेल्या सिरेलीतल्या दोन दोन पात्रांना घेऊन ही सिरियल बनवलेली दिसतेय. अगदी होसुमीयाघ च्या बेबी आत्या, राखेचा ची आई, नांसौ ची आज्जी पण आहेत यात>>>> कित्ती छान. झी कित्ती काळजी करतं सगळ्यांच्या पोटापाण्याची Wink .

पिसं काढायला पाहिन म्हणते >>> Lol

धागाकर्त्याने हेडरमध्ये आमंत्रण दिलंच आहे पिसं आणि वाभाडे काढण्यासाठी Wink .

योकु खरंच तुम्ही झी वर काम करता कि काय ?>>पोटापाण्याच्या ठिकाणाची कुणि पिस काढेल का? काहितरच तुमच, योकु, मन लावुन सिरियली बघतो किवा पिस काढण्यात मजा वाटत असावी.

Pages