धार्मिक-साहित्य

पळस

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 11:00

पळस
*****
भर उन्हाळ्यात
रणरणत्या उन्हात
जात असता
उजाड रानावनातून
अचानक
त्या तपकिरी सुकलेल्या
हिरवट पिवळट झाडीमध्ये
दिसतो उठून..
पळस !
अरण्यातील संन्याशागत
स्थिरपणे उभा स्तब्ध
जणू साधनामस्त
आपल्यातच मग्न
अंगावरील काट्याचे
जीवनातील ओरखड्यांचे
हरवून भान
लावून ध्यान
प्रखर उन्हात
जणू तळपत
तपस्येच्या तेजानं
सारे आसमंत
विखुरल्या पानांचे
निष्पर्ण देहाचे
हरलेल्या लढ्याचे
असते अगतिक मूक मलुल
सारे काही हरवून
सारे काही टाकून .

कापुराची माया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 10:58

कापुराची माया
************
कापुराची माया
आगीला कळावी
समरस व्हावी
मिठी मग ॥

तैसी घडो भेटी
देवा तुझी माझी
हौस नसण्याची
पुरवावी ॥

मिठाची बाहुली
भेटावी सागरा
भेदाचा पसारा
नुरुनिया ॥

तैसे घडो काही
जिवलगा नेई
आणुनिया पाही
प्राण डोळा ॥

सरो देह भाव
जळो मन राव
निरंजनी ठाव
देई मज ॥

दत्ताचे घर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 10:55

दत्ताचे घर!
**********
माझिया दत्ताचे
घर किती न्यारें
चंद्र सूर्य तारे
छपराला ॥
माझिया दत्ताचे
दार किती न्यारे
जगताचे वारे
वाहे त्यात ॥
माझिया दत्ताचे
अंगण विश्वाचे
आकाशगंगेचे
विलक्षण ॥
माझिया दत्ताच्या
गूढ माळ्यावर
अद्भूत विवर
कृष्णमेघी ॥
माझेया दत्ताच्या
रंग तो भिंतीचा
नित्य नाविन्याचा
क्षणोक्षणी ॥
दत्ताच्या घरात
दत्ताला शोधत
राहतो फिरत
तरीसुद्धा ॥

**

राम - साहित्य : श्रवणभक्ति

Submitted by प्रगल्भ on 17 July, 2020 - 12:13

मी किंवा मनुष्यप्राण्याने धार्मिक असणं नसणं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरण दिलयं
इतर धर्माचे लोक हे त्या विशिष्ट धर्माचे कधी ठरतात तर,
त्या व्यक्ति त्या त्या धर्माचं धार्मिक कार्य करतात.
त्यांच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींच पालन करतात.
त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन त्यांच्या धर्मात देवाचं ज्या प्रकारचं स्वरूप आहे त्याची प्रार्थना करतात.

शब्दखुणा: 

वारकरी संप्रदायाचे महत्त्व

Submitted by Asu on 30 June, 2020 - 15:08

वारकरी संप्रदायाचे महत्त्व
वारी आणि वारकरी-
वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एकादशीला किंवा इतर पवित्र दिवशी जो नियमित वारी करतो, त्याला ‘वारकरी’ किंवा ‘माळकरी’ म्हणतात. आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ किंवा ‘भागवत धर्म’ म्हणतात.
वारकऱ्यांची लक्षणे-

श्री दत्त सोनार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2020 - 11:33

*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥

वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥

करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥

जय गिरिनारी - प्रवासवर्णन भाग १

Submitted by salgaonkar.anup on 14 June, 2020 - 03:13

" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे  ईश्वरी शक्तींचा स्तोत  आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.

विठु-रखमाई

Submitted by चंद्रमा on 13 June, 2020 - 03:23

विठु-रखमाई रूप तुझे,
गोजिरवाणे छान!
पाहता तुम्हा मिटे;
व्याकुळ झालेल्यांची तहान!

होता विठु-रखमाई,
नामाचा गजर!
संचारते भक्ती भक्तांमध्ये;
नाम जपी अष्टप्रहर!!

विठु-रखमाई तुझ्या चरणी,
जीवन माझे अर्पण!
भाग्य उजळले माझे;
जेव्हा झाले तुझे दर्शन!!

जयघोष होता तुझ्या नामाचा,
उजळल्या दाहू दिशा;
वाट ही आनंदाची आहे;
संपली सारी दुःखे-निराशा!!

डोळियाचा डोळा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 June, 2020 - 03:38

डोळियाचा डोळा
****************

डोळियाचा डोळा
कुणी पाहियला
कळला कुणाला
कधी काय? ॥

शब्दाचा आकार
ध्वनित साकार
येई वाऱ्यावर
पाहिला का ? ॥

चित्र उमटते
डोळात उलटे
परंतु सुलटे
कैसे गमे ?॥

स्पर्श त्वचेवर
विजेची लहर
वाचुनिया तार
धावत असे !॥

घडते घटना
मोडून तर्कांना
शोधुनिया खुणा
सापडेना ॥

तिथे जोडे हात
म्हणून विक्रांत
सर्वज्ञ श्री दत्त
दिगंबर ॥

शब्दखुणा: 

श्रीकृष्ण यांचे आराध्य

Submitted by मुक्ता.... on 13 April, 2020 - 12:31

श्रीकृष्णाचे कुणी आराध्य दैवत होते का? जसे श्रीरामाचे महादेव होते.
श्रीकृष्ण स्वतः कुणा आराध्याचे पूजन करत असावेत असं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही.
याबद्दल काही अधिक माहिती असल्यास जेष्ठ आणि जाणकार मित्रांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
हा प्रश्न सहज जन्मला आहे....केवळ ज्ञानहेतुसाठी...बाकी काही उद्देश नाही...

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य