रघुवीर सहाय यांच्या हिंदी कवितेचा मराठी भावानुवाद
मीही रडलो आहे पुस्तक वाचून
पण आता आठवत नाही... की कुठलं
बहुदा तो कुठलासा वृत्तांत होता
पात्र ज्यात अनेको होती..
चारी बाजूंनी भिरभिरत यायची
वाचत जायचो अन् रडत रहायचो मी.
क्षणभरात साहजिक समजलं की वाचतो काही वेगळं
रडतो काही वेगळं...
दोन्ही जुळून गेलंय.
वाचणं पुस्तकाचं
अन् रडणं माझ्या व्यक्तित्त्वाचं!
पण मी जे वाचलं होतं त्यावर नव्हतो रडलो
वाचण्याने तर मला रडण्याची ताकत दिली!
मी दु:ख मिळवलं होतं बाहेर... पुस्तकी जीवनाच्या...
वाचत जायचो अन् रडत जायचो मी!