ती निघून गेली बाथरूममध्ये. शांतपणे. दार लावून. गप्प.
तो तणतणत बाथरूमच्या दाराबाहेर. उद्विग्न. संतप्त. उदास.’
चिडचिडत. काहीबाही रागानं बडबडत.
’काय आवडतं तरी काय तुला? सांगून टाक एकदाच...’
आणि....
आणि ती खरंच सांगू लागली.
मला ना... तळहातावर निळ्या गर्द शाईचा एक ठिपका काढून थंड पाण्यात तो हात टाकल्यावर
संथपणे पाण्यात विरघळणारे निळे तरंग पहायला फार आवडतात.
किंवा मग साबणाने तो हात धुताना आलेला फिकट निळा फेस!
हाताच्या बोटांनी साबणाचे बुडबुडे बनवायला आवडतात.
कोरड्या फरशीवर ओले पाय उमटवून त्यांचा आकार निरखायला आवडतं.
आणि मला आवडतं गडद रात्री अंधाराचे कुजबुज आवाज ऐकायला.
निजलेल्या झाडांचे वास. अन् त्यांचं संथ घोरणंही.
मला गजांच्या कडेला साचून अगतिकतेनं निथळणारे थेंब निरखत रहायला फार आवडतं....
आणि पाऊस. आणि त्या आधीचं आभाळ.
आणि त्याही आधीचा हवेचा हळवा रंग.
मला माझ्याच खळखळून हसण्याचा आवाज फार फार आवडतो.
आणि माझं गाणं. सुरांशी बेपर्वा.
मला झटपट पायर्या उतरतानाचा माझा पायरव फार आवडतो.
आणि लसणीच्या फोडणीचा वास. आवाज. अहाहा!
मला आवडतं जाई-जुईचे गजरे गुंफायला. हुंगायला.
तण काढायला. चिखल खेळायला. आवडतं.
मला संथ जळणारा दिवा आवडतो. आणि भिंतीवर हलणार्या सावल्या.
मला वाळक्या पानांना पायाखाली चुरडतानाचा आवाज आवडतो.
मला समुद्र आवडतो. नदी आवडते. तळं आवडतं. डबकंसुद्धा.
आणि आवडतं निवडुंगसुद्धा.
मला आवडतं कवितेची एखादी ओळ अशी सहज कानावर पडणं,
आणि पुस्तकातलं एखादं वाक्य वाचून प्रचंड अवाक होणं!
अंगावर उमटणारे शहारे खूप आवडतात मला.
अवचित काही असंबद्ध बघून डोळ्यांत येणारं पाणी...
डोक्यात चोविस तास रेंगाळणारी गाणी...
असं कुठं इतकं वेडं वागायचं असतं का राणी....?
स्वत:ला विचारणं... निरुत्तर होणं... आवडतं मला.’
दाराबाहेर नसतं कुणीच.
आणि ती असते आत. खूप आत.
पाण्यात विरघळत असतात असे कित्येक निळेशार तरंग.
उगाच.
सुंदर जमलंय. तुमची शैली
सुंदर जमलंय. तुमची शैली मुग्धावणारी आहे.
काय सुंदर कविता.
काय सुंदर कविता.
मोहक आहे. किती तरल.
मोहक आहे. किती तरल.
अर्थात तो ही बिचारा तिचीच स्वप्ने साकारण्याकरता, ऑफिसला निघून गेलेला असणार. तो काव्यात न बोलता कॄतीतून बोलणारा. आणि हे कळायला तिला काही वर्षे लागतील.
"तिला" भेटायला आवडेल मला..
"तिला" भेटायला आवडेल मला..
बरेचसे धागे जुळतीलसे वाटून गेले कुठेतरी..
किती मनस्वी लिहीतेस तू...
कळल्यासारखे वाटता वाटता क्षणात ते निसटून जाते ..
पुन्हा पुन्हा वाचले जाणार हे आता...
तरल.. सुरेख तुमची पंखा आहे मी
तरल.. सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमची पंखा आहे मी
सुंदर, तरल!
सुंदर, तरल!
धन्यवाद सर्व अभिप्रायांकरिता.
धन्यवाद सर्व अभिप्रायांकरिता. धनवन्ती - कधी भेटताय?
काय सुरेख लिहिलंय! पोचलं!!
काय सुरेख लिहिलंय! पोचलं!!
सुंदर लिखाण.
सुंदर लिखाण.
मलाही हेच सगळे आवडते...