Submitted by मुग्धमानसी on 10 October, 2023 - 06:41
ऐक ना...
ते भिशी, सहल, संकिर्तन, प्रवचन, गरबा,
सत्संग, महोत्सव, लेझिम, श्रावण, शिमगा,
ते भू-संवर्धन, जनप्रबोधन, समाजसेवावर्तन,
ते सहभोजन, सहवाचन अन् ते सहस्त्रनामावर्तन...
वा समारंभ, प्रारंभ, दंभ-आरंभ,
वा शेवट श्राद्ध श्रद्धांजली फुटका कुंभ,
कुणीही काही सांगावे न् मनास पटावे
प्रश्नांचे कुठले-कसले फाटे न फुटावे...
हे असले असणे शिकव मला बा राया...
मग नंतर जा तू.... जा सोडून ही काया
कळणारही नाही मजला की....
मी उरले नाही...
तू गेला अन् मी निव्वळ गेले वाया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा!!! निव्वळ अप्रतिम!!
व्वा!!!
निव्वळ अप्रतिम!!
धन्यवाद आबा
धन्यवाद आबा