वॅलेण्टाईन डे पाठोपाठ आता हॅलोवीन डे ने भारतातील मुंबई पुणे अश्या प्रमुख शहरात शिरकाव केला आहे.
आजवर फक्त अमेरीकेतल्या वा तिथून रिटर्न आलेल्या फेसबूक मित्रांच्याच वॉलवर हेलोवीन साजरा केल्याचे फोटो बघत होतो. पण आता त्याने मुलीच्या शाळेद्वारे आमच्या घरातही प्रवेश केला आहे. कालच मुलीच्या शाळेत ऑनलाईन हॅलोवीन डे साजरा झाला. म्हणजे फार काही नाही तर भूताच्या वेशभूषेची स्पर्धा झाली. आता तिला जेव्हा समजले की खरा हॅलोवीन डे तर ३१ ऑक्टोबरला आहे तर तिला ख्रिसमस प्रमाणेच आता हे देखील सेलिब्रेट करायचे आहे.
कालपरवा हॅलोवीन बद्दल बरीच सगळीकडे चर्चा सुरु होती .आजकाल मुंबई पुण्यात काही कॉन्व्हेन्ट आणि इन्टरनॅशनल स्कूल्स मध्ये हालोवीन साजरा होवू लागला आहे...घोर कलयुग!
सकाळीच पोरांना विचारलं ( यंग जनरेशन ला इंग्रजी नावं असलेल्या रुढी जास्त छान आणि मॉडर्न वाटतात)
"अरे भुतं / पितरं यांच्याबाबत असतो तो " असं मोघम उत्तर आलं.. सोबत काय या जुन्या लोकांना का sssss ही माहीत नसतं असे भाव सुद्धा...
मलाही या हॅलोवीन बद्दल फार काही माहीत नाही, पण मी त्याची खिल्लीही उडवत नाही... कुठल्याही प्रकारे का असेना ते पुर्वजांचं या निमित्ताने स्मरण करतात एवढंच मी ग्रास्प केलं.
हॅलोवीन नेहमीच्या सणांपेक्षा हा सण जरा वेगळा, ईतर सणांत जे असतं हे सगळं ह्या सणांत पण आहे, पण यात आहे थरार जो इतर सणांमध्ये नसतो....नानावीध रुपं करुन एकमेकांना घाबरवायचं...
३१ ऑक्टोबरला Hallowween (A Hallows Eve) सण साजरा झाला.
यंदाच्या हॅलोवीन पार्टीसाठी मी या फिंगर कुकीज केल्या. लाल रंग दिसतोय तो जॅम वापरला.
खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले. थोडक्यात प्रयोग यशस्वी झाला असे समजायला हरकत नाही.
कृती इथे बघून केली
Happy Halloween!!! Boo!!!
आज हॅलोवीन. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा भुताटकीचा आगळावेगळा आनंदी आणि कलात्मक सण अनेक देशांमधे साजरा होतो. सर्वच सणांप्रमाणे आता त्याची धार्मिक पाळंमुळं फारशी उरली नाहीयेत. आणि ती जाणून घेण्यात फार इंटरेस्ट पण नाही. पण हिंदू धर्मात जसं पक्ष-पंधरवडा केला जातो त्याच धर्तीवर इथे पितरांसाठी हॅलोवीन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली (एका अमेरिकन मैत्रिणीच्या सांगण्यावरून :))