Happy Halloween!!! Boo!!!
आज हॅलोवीन. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा भुताटकीचा आगळावेगळा आनंदी आणि कलात्मक सण अनेक देशांमधे साजरा होतो. सर्वच सणांप्रमाणे आता त्याची धार्मिक पाळंमुळं फारशी उरली नाहीयेत. आणि ती जाणून घेण्यात फार इंटरेस्ट पण नाही. पण हिंदू धर्मात जसं पक्ष-पंधरवडा केला जातो त्याच धर्तीवर इथे पितरांसाठी हॅलोवीन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली (एका अमेरिकन मैत्रिणीच्या सांगण्यावरून :))
आम्ही आपला एक इव्हेंट म्हणून साजरा करतो. गेल्या काही वर्षांपासून आम्ही भोपळा कोरून त्याची आरास मांडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नुसताच भोपळा दारात मांडून येणार्या बालगोपाळांना चॉकलेटस देत असू. नंतर मुलगी, स्वरा ३-४ वर्षांची झाली तेव्हा तिने आपण स्मायली फेस का नाही करत असे विचारले. तेव्हा पेंट करून समाधान केले. मग नंतरच्या वर्षी नवर्याने नीट अभ्यास करून ऑनलाईन माहिती वाचून चांगली कार्व्हिंग करण्यास सुरुवात केली. आता अलीकडे तो यामधे "माहीर" होऊ लागला आहे असे म्हणल्यास हरकत नाही.
भोपळ्याच्या जाडजूड सालीमुळे थोडी जास्त ताकद लागते. पण एकदा टेक्नीक जमलं की छान कलाकृती बनू शकते. आतल्या बिया/शिरा काढणं, इतर साफसफाई, मदत अर्थात मुलगी हौसेने करते. ही गेल्यावर्षीची काही डिझाईन्स आणि या वर्षीची सजावट सुद्धा. कशी वाटली ते सांगा.
प्रचि १ यावर्षी मुलीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. तिला पहिल्यांदा स्वतंत्रपणे एक भोपळा करायची परवानगी मिळाली होती. (८वर्षांची आहे ती आता. सो बिग गर्ल ना!!) तेव्हा तिची कल्पना होती २ डोकी असलेला राक्षस. एकाच भोपळ्यावर एका बाजूला हे चित्र कोरले आणि पुढचे चित्र दुसरी बाजू. हे कोरीवकाम संपूर्णपणे तिचे आहे.
प्रचि २
प्रचि ३
ही उलट्या डोळ्यांची हडळ.
प्रचि ४ हे चित्र स्वरानेच काढले असून कोरीवकामासाठी मी थोडी मदत केली आहे. अमेरिकन इंडीयनचे टिकी डिझाईन.
प्रचि ५ "सगळी सजावट भुताटकीची केली तर छोटी मुले आपल्या घरी यायला घाबरतात. तेव्हा काहीतरी क्युट कर." इति स्वरा. ही मुलीची फर्माईश मी पूर्ण केलीय.
प्रचि ६ हा डॉल्फिन जरा आग ओकतोय असं समजायचं बरं का!! डिझाईन आंतरजालावरून साभार.
प्रचि ७ ही चिल्लीपिल्ली गेल्या वर्षी मांडली होती.
प्रचि ८ अजून एक हडळ. कलाकार - अस्मादीक. मला खरंच अजून खूप शिकायचंय पण प्रयत्न म्हणून ठीक आहे असं वाटलं.
प्रचि ९ गेल्या वर्षी केलेली टिकी आकृती.
प्रचि १० यापुढची सगळी डिझाईन्स आंतरजालावरून घेतली आहेत पण कोरीवकाम अर्थात नवरोबांनी केलंय.
प्रचि ११ ही सुधा त्याचीच.
प्रचि १२ हा "बीटलज्युस" बघा कसा खदाखदा हसतोय.
प्रचि १३ हॅरी पॉटर मधला मॅड आय मूडी.
प्रचि १४ माझ्यामते ही सर्वात छान जमून आलेली कलाकृती. लॉर्ड ऑफ द रिंग मधला माय प्रेशश वाला घोलूम!!
मस्त..
मस्त..
मस्त आहे सजावट
मस्त आहे सजावट
सही!
सही!
छानच जमलेत! हॅपी हॅलोवीन..
छानच जमलेत!
हॅपी हॅलोवीन..
हडळ खरच भयंकर आहे जबरी कोरीव
हडळ खरच भयंकर आहे
जबरी कोरीव काम आहे
सह्हीच आहे. क्लास्स एकदम
सह्हीच आहे. क्लास्स एकदम
हॅप्पी हॅलोवीन!!!!
इथे पण तिच कमेंट लिहीते "महान
इथे पण तिच कमेंट लिहीते "महान आहात तुम्ही!"
बंधू इतका कलाकार आहे माहीत नव्हतं मला!
सगळीच कार्व्हींग्ज बेस्ट आहेत पण दादाने केलेली खरंच मस्त जमून आली आहेत! किती वेळ लागतो पूर्ण करायला?
छान जमलं आहे भोपळ्यांचे
छान जमलं आहे
भोपळ्यांचे कंदिल दिवाळीत पण खपून जातील
धनश्री (किंवा अजून कुणी हॅलोविन साजरा करणारी मंडळी), अजून माहिती देता आली तर पहा. जसे की, पितरांसाठी हा सण असेल तर त्या निमित्ताने भुतं, हडळी अँड कंपनी का बनवतात? पितरं म्हणजे आपले परलोकवासी झालेले आप्त. त्यांच्यासाठीचा हा दिवस, सण म्हणून का साजरा केला जातो? नक्की हॅलोविनमागचा कन्सेप्ट काय आहे? इकडे जसं पितृपक्षात कावळ्यांना खा खा खायला घालतात ते पितरांपर्यंत पोहोचतं या कल्पनेने! पण कावळ्यांनी खाल्लेलं पितरांपर्यंत पोहोचवायचं तर पितरांनी कावळ्यांना स्वाहा केलं पाहिजे... पण तसं नसतं. तरीही कावळा आणि पितरांचा संबंध लावला जातो. तसा हॅलोविन एकंदरीतच कसा साजरा केला जातो, का केला जातो आणि त्या मागचा कन्सेप्ट काय?
मी फक्त उत्कंठा म्हणून विचारते आहे योग्य न वाटल्यास उर्वरित पोस्ट उडवून टाकते
कसले मस्त केलेत! बीटल्ज्यूस
कसले मस्त केलेत!
बीटल्ज्यूस आणि मॅड आय मूडी फारच सही!
>>>किती वेळ लागतो पूर्ण
>>>किती वेळ लागतो पूर्ण करायल>>>>> हे डिझाईनवर अवलंबून असतं बर्यापैकी. उदय प्रिंट केलेलं चित्र मार्करने भोपळ्यावर काढतो. भोपळ्याचा आकार, त्यावर असलेले डाग, त्याच्या सालीचा पोत याचा विचार करत काही वेळा चित्र अॅडजस्ट करावे लागते. तसे तो फ्रीहँड डिझाईन्स चांगली काढतो. मग कोरीवकाम सुरु करताना आधी जिथे कोन असतात तिथे दाभणाने भोक करुन घ्यायची. म्हणजे सुरी खोचून रेषेवरून तासत जाता येते. मला बॅटरी वर चालणारी सुरी आवडते कारण कष्ट कमी पडतात. पण उदय साधी बारीक सुरीच वापरतो. त्याच्यामते मॅन्युअल कटिंगमधे कंट्रोल चांगला असतो. त्यामुळे बारीक काम पण न चुकता जमते.
त्याला साधारण २० मिनीटे लागतात एका भोपळ्याला मोठ्या डिझाईनसाठी. अर्थात चित्र आधीच काढलेले असेल तर. नाहीतर चित्रामधे +१५ मि लागतात. आम्ही आदल्या दिवशी (शक्यतो शुक्रवारी संध्याकाळी) ७-८ भोपळे शेतातून आणून चित्र काढून ठेवतो. मग शनिवारी सकाळपासून बिया वगैरे स्वच्छ करुन कोरीवकाम सुरु होते. सगळी साफसफाई धरून साधारण ६ तास लागतात आम्हाला तिघांना मिळून.
पण एक सुंदर काम झाल्याचे समाधान असते आणि नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद.
अश्विनीके, मला स्वतःलाच
अश्विनीके, मला स्वतःलाच यामागची कन्सेप्ट नीट माहीत नाही. विकिपिडिया वर बरीच माहिती आहे. पण आम्ही शेजारपाजारी बघूनच भोपळा करायला लागलो. पण खरंच कुणाला माहिती असेल तर सांगा.
आणि मला नाही वाटत की तुमची पोस्ट चुकिची आहे. असु देत.
अग हे सगळ खरच कसलं डेंजर
अग हे सगळ खरच कसलं डेंजर दिसतय
मला उगाच डोळ्यासमोर यायला लागलीत ही भूत
कशाला पाहिल मी आता
पण मस्त जमलय
थँक्स धनश्री मी विकीवर
थँक्स धनश्री मी विकीवर आत्ताच पाहिलं पण सेल्टिक (?) आणि ख्रिश्चन इन्फ्ल्युएन्सखाली दिलेली खूपशी माहिती बाउन्सर गेली त्यामुळे पुढे वाचलंच नाही
इथे कुणी सुटसुटीत सोप्या शब्दांत माहिती दिली तर कळेल.
मस्त आहेत तुझे सगळेच
मस्त आहेत तुझे सगळेच भोपळे...
आम्ही अजून फक्त भोपळे मांडण्यात आहोत आणि नवर्^याने मनावर घेईस्तोवर कुठल्याही कलाकारी बिलाकारीच्या फंदात मी पडत नाही....सो माहीत नाही कधी करु का ते? केलेच तर कचरा उचलायचं काम मी करेन ..;)
माझ्या छोटा मुलगा सरसकट सगळ्या घरांच्या डेकोरेशन्सना पंपकिन प्~अच म्हणतो नशीब अजून शेजार्^यांनी ऐकलं नाहीये ते...
इथे पूर्वी वाचले होते
इथे पूर्वी वाचले होते
http://www.maayboli.com/node/11716
मस्त आहेत सगळे भोपळे
मस्त आहेत सगळे भोपळे
हीच लालूची कृती सेम टु सेम
हीच लालूची कृती सेम टु सेम आम्ही करतो. तिथे खरंच नीट स्टेप्स लिहिल्या आहेत.
मस्त झालेत!
मस्त झालेत!
आत्ताच लंच अवरमधे एका कलिगचं
आत्ताच लंच अवरमधे एका कलिगचं डोकं खाऊन आले मी.
त्याचं हॅलोवीनचं स्पष्टीकरण होतं. - फार पूर्वी अतृप्त आत्मे वेगवेगळ्या रुपात येऊन आपल्या इच्छा पूर्ण करून घेतात असं मानलं जायचं. काही चांगले तर काही भयावह आत्मे असणार त्याचं प्रतिक म्हणून लहान मुल कॉश्चुम घालून येतात. त्या रुपात आपले पितर असतील असं मानून त्यांना कँडी, फळे असं काहीतरी देण्याची पद्धत असावी. (आता सनातनी लोकांनी याची नाळ श्राद्ध-पक्षाच्या प्रसादाशी कृपया जोडू नये नाहीतर मुलांनी गोळा केलेली चॉकलेट्स पितरांचा वाटा म्हणून फेकून द्याल!!! त्यापेक्षा डोनेट करा. )
भोपळा, मक्याची कणसं हे सुगीचे प्रतिक. आपल्या पितरांना आपण सुखी आहोत हे दाखवण्यासाठी आणि त्यांना आपल्या घरी येताना वाट दाखवण्यासाठी भोपळ्यात दिवा. असं असू शकेल हे त्याचं मत. अर्थात हा कलिग खरंच अनेक संस्कृतींचा मनापासून आदर करणारा आहे. हे मत त्याचं वैयक्तिक आहे. तो कोणताही धर्म मानत नाही. सगळे सण त्याला वाटेल तसे साजरे करतो. तो दिवाळी पण त्याचा सण असल्यासारखा करतो.
सहीच झालय. आवडलं. हॅप्पी
सहीच झालय. आवडलं. हॅप्पी हॅलोवीन!!
रच्याकने ह्यांच नंतर करता काय? इतकी मेहेनत टाकून द्यायला कसतरीच वाटेल ना...
आमच्याकडे हे भोपळे कचरा कंपनी
आमच्याकडे हे भोपळे कचरा कंपनी कडून Garden debris म्हणून उचलले जातात. नेहमीच्या कचर्यामधे नाही. नंतर ते खतासाठी वगैरे वापरतात बहुतेक. खाण्यालायक असतात की नाही कुणास ठाऊक पण आम्ही कोरीवकाम करुन ३-४ दिवस तरी बाहेर डेकोरेशन साठी ठेवतो. या काळात त्यामधे कीडे जातातच. कधी कधी तर मेणबत्ती लावताना एखादा चिकट स्लग, वळवळं गांडूळ आत असतंच. आमच्याकडे या दिवसात थोडा थोडा का होइना पण पाऊस असतो. त्यामुळे नंतर टाकूनच द्यावे लागतात.
फारच छान!
फारच छान!
मस्त ! सुंदर दिसताहेत भोपळे.
मस्त ! सुंदर दिसताहेत भोपळे.
मस्त कोरीवकाम , बराच पेशन्स
मस्त कोरीवकाम , बराच पेशन्स आहे तुमच्यात.
मस्तच आहे भोपळ्यांची सजावट!
मस्तच आहे भोपळ्यांची सजावट! लेकीला दाखवते. ती पुढच्या वर्षी नक्की मागे लागेल करु म्हणुन!
इथे अजुन मोठ्या प्रमाणावर हॅलोवीन साजरा करत नाहीत. आमच्या गावांत तर मागची २ दोन वर्षे मुलं ट्रीक ऑर ट्रीट करु लागली आहेत. युरोपात पण साजरा करतात का हॅलोवीन ?
मस्त आहेत
मस्त आहेत
वा!! मस्तच्......कलाकार लोक
वा!! मस्तच्......कलाकार लोक आहात तुम्ही....आमची मजल बेसिक पर्यंतच्..या वर्षी तर baloons वर भागवले.मग लेकाने ते वटवाघूळ वगैरे काय काय जेली पेस्टींग्ज लावले होते खिड्क्यांवर..
मस्त जमलयं !!!!
मस्त जमलयं !!!!
आता सनातनी लोकांनी याची नाळ
आता सनातनी लोकांनी याची नाळ श्राद्ध-पक्षाच्या प्रसादाशी कृपया जोडू नये स्मित नाहीतर मुलांनी गोळा केलेली चॉकलेट्स पितरांचा वाटा म्हणून फेकून द्याल!!! >> चॉकलेट्स काय फेकायची वस्तू आहे का? तसा कुठलाही खाद्यपदार्थ (तो खराब झाल्याशिवाय) फेकायची वस्तू नाही, मग तो श्राद्ध-पक्षाचा असला तरी
धनश्री, मुद्दाम एफर्ट्स घेऊन ही माहिती काढून आणलीस त्याबद्दल धन्यवाद
मस्तच.. मॅड आय मुडी छान
मस्तच..
मॅड आय मुडी छान जमलाय...
Pages