आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मी त्याची पाँटींग बरोबर झालेली इंटरअ‍ॅक्शन वाचली होती तो दिल्ली मधे असताना. त्याने काही तरी दोन कॅचेस पकडले नि मॅच फिरली होती. टीम मिटींगमधे पाँटींग त्याचा फक्त एका वाक्यात उल्लेख केला नि पुढे सरकला. त्याने पाँटींग ला अडवून सुनावले होते - इंग्लिश मोडके तोडके असताना ही कुठे कचरला नाही. असा अ‍ॅट्यीट्यूड नि आत्मविश्वास हवा.

भन्नाट मॅच कालची! उमरान, तेवाटिया, रशीद! यांनी शेवटच्या ओव्हर मधे २५ मारले, त्यांनी २२!

कोणा बद्दल बोलतोयस असामी? टेवाटिया? तो रॉयल्स कडे होता ना आधी? >> हो, त्याधी पंजाब नि कॅपीटल्स मधे पण होता. बराच फिरलाय.

मोस्ट विकेटवर नजर टाकली सहज
कुलचा टॉपला आहेत.
कुलदीप यादवचा हा कमबॅक सीजन आहे. आधी ईंटरनॅशनलमध्ये रोहीत शर्माने कप्तान होताच त्यावर विश्वास दाखवून त्याला बॅक करायला सुरुवात केले. आता दिल्लीत पंत त्यावर भरवसा टाकून त्याला क्रुशिअल मोमेंटला त्याच्या हातात चेंडू देतोय. अन्यथा कलकत्यात बेंच ऊबवून त्याचा आत्मविश्वास संपलेला..

राहूल आत येणार्या बॉलवर चकतोय. शर्मा आणि कोहली स्पिनर्स समोर चाचपडतायत हे बघताना फारच त्रास होतो. हे भारताचे प्राईम बॅट्समेन आहेत.

सिलेक्टर लोकांनी बोल्ड (खरं तर ऑब्वियस) निर्णय घ्यायला हवे. बसवा त्यांना. सुर्या, टेवाटिया, के एल राहूल, पंड्या, उमरान, नटराजन, शॉ वगैरे येऊ द्यात म्हणा आता. बहोत हो गया.

पंत ने काल कुलदीप च्या चार ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत. राहुल बरोबर पंत चे पण गणीत कच्चे आहे असे दिसतय.

कुलदीपने चौदावी ओवर टाकली. मग स्ट्रॅटेजिक टाईम ऑट आला. त्यात ठरले की कुलदीप बस झाला आता. असे माझा एक मित्र म्हणाला. मी सामना पाहिला नाही. पण स्ट्रॅटेजिक टाईम ऑट नंतर बरेचदा काही तरी अनाकलनीय होते. पंतने कॅच मात्र एक चुम्मा पकडली. ती हायलाईटसमध्ये पाहिली.

शर्मा आणि कोहलीला एकत्र खेळवणे खरेच आता भितीदायक वाटू लागलेय. ते दोघे असताना ईशान किशनलाही एक्स्ट्रा टॉप ऑर्डर फलंदाज म्हणून सोबत नेले तर १५ च्या संघातली आणखी एक जागा वाया.
मग टॉप ऑर्डर फलंदाज कोण?
पडीकल वा गायकवाड सुद्धा यंदा काही स्पेशल करत नाहीयेत.
धवनने सलग तीन शतके मारली तरी त्याला या फॉर्मेटमध्ये आता खूप मागे सोडून आलेत असे वाटते.
पृथ्वी शॉ बाबत सुद्धा लोकं त्याची फटकेबाजी न बघता आधी त्याचे सदोष तंत्र हाय बॅकलिफ्ट वगैरे बघून त्यावर काट मारतात वाटते.
निवडसमितीने निवड न करता पब्लिक पोल काढायला हवे असे वाटते.
राहुलला मात्र तेवढे सिलेक्ट करावे.

"सिलेक्टर लोकांनी बोल्ड (खरं तर ऑब्वियस) निर्णय घ्यायला हवे. " - आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुभवानं बराच फरक पडतो. जरी ही लोकं आयपीएलमधे आऊट ऑफ फॉर्म आहेत ती लोकं आंतरराष्ट्रीय मॅचेसपर्यंत फॉर्ममधे येतील अशी आशा करू या. उदा. जो तिवातिया (सॉरी असामी Happy ) आयपीएलमधेच हिट अँड मिस आहे, तो आंतरराष्ट्रीय मॅचेसमधे यशस्वी होण्याचे चान्सेस अजून कमी आहेत असं मला वाटतं. शॉ चा टॅलेंट चा प्रश्न नाही पण इनकन्सिस्टन्सी आणि फिटनेस चा नक्कीच आहे. (तो चौथ्या ओव्हरला धापा टाकत पळतो). नटराजन आणी पंड्या फिटनेसमुळे बाहेर आहेत. ते परत येतील अशी आशा आहे. सूर्या, राहूल तर टीममधे आहेतच. उम्रान ला मागच्या वर्षी नेट्स बॉलर म्हणून घेतलं होतं. बहूदा तो सुद्धा लाँग टर्म प्लॅनिंगमधे असावा.

हार्दिक पांड्या तर येणारच परत.
तो संतुलन साधतो. आता फिट दिसतोय. गेल्या ऑस्ट्रेलियातील २०-२० मालिकेत मालिकावीर होता. आयपीएलमध्येही पुन्हा फॉर्मात आलाय.
जडेजाला मात्र अकरातून नारळ मिळू शकतो.
डावखुऱ्या फलंदाजांचा बाकी दुष्काळ आहे.

- आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुभवानं बराच फरक पडतो. >> मान्य पण मूळात सिलेक्ट च नाही केलं तर तो अनुभव कसा मिळणार हे सांग आधी Happy

टेवाटियाला आयपिएल मध्ये अजून हिट ऑर मिस म्हणाल तुम्ही फेफ? एक तर तो खुप खाली येतो ऑर्डर मध्ये. त्या मानाने त्यानी सध्या कमाल केली आहे.
नटराजन आणि पंड्याला नुकतच काही झालय का? रशिद कॅप्टन होता दोन मॅच पुर्वी पण मागच्या मॅच ला खेळला की पंड्या? नाही? नटराजनचे माहित नाही.
उम्रन यायलाच हवा.... दुसर्‍या देशाच्या प्लेयरांच्या फर्निचरच्या चिंध्या उडवताना मला बघायचय. त्यात ओवर्सीज मेनली! उडादो सालोंको इन ब्लेझिंग फास्ट यॉर्करोंसे!! Lol

“ मूळात सिलेक्ट च नाही केलं तर तो अनुभव कसा मिळणार” - ते वाक्य शर्मा, कोहलीला काढून अननुभवी लोकांना खेळवण्याच्या संदर्भात होतं. जनरली अनुभवी आणि नवख्या खेळाडूंचा चांगला मिक्स करतात, आणि ते मला योग्य वाटतं. उदा. नविन प्लेयर्स ना स्क्वाडमधे घेणं / नेट्समधे खेळवणं / काही मॅचेसमधे खेळवणं ह्यातून त्यांना ते प्रेशर हँडल करायची सवय होते. काही प्रॉडिजीज असतात ते अपवादात्मक.

“ टेवाटियाला आयपिएल मध्ये अजून हिट ऑर मिस म्हणाल तुम्ही फेफ?” - त्याला मागच्या वर्षी राजस्थानने फिनीशर च्या रोल मधे खेळवलं होतं. दोन मॅचेस चा अपवाद वगळता उरलेल्या १२ मॅचेस मधे त्याने फारशी चमक दाखवली नव्हती असं मला आठवत असल्यामुळे मला असं वाटत असेल. I’d be happy if proven wrong. यंदा त्याला मिळालेल्या दोन संधींचं मात्र त्याने सोनं केलंय. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गुजराथ च्या स्ट्राँग बॉलिंग अ‍ॅटॅकमुळे त्याला फारशी बॉलिंग करावी लागली नाहीये. पण भारतीय संघात त्या पोझिशनला त्याच्याकडून बॉलिंगची अपेक्षा असेल आणि त्या बाबतीत जडेजा आणि अक्षर त्याच्यापेक्षा सरस ठरतात.

तसं नाही फेफ. त्याने आत्तापर्यंत तीनदा असे काही केले आहे जे भल्या भल्यांना एकदाही जमले नाहीये. त्याने ठोकलेले बॉलर्स ही आलतूफालतू नक्कीच नव्हते. मोजक्या शॉट्स च्या जोरावर तो खेळतो हे माहित असूनही लोकांना आवरता येत आला नाहिये. हा एक प्रकारचा एक्स फॅक्टर आहे असे म्हणू एकवेळ . तो नेहमीच्या स्टॅट्स मधे किंवा ठोकताळ्यामधे अजमावता येणे कठीण आहे. म्हणून एक चान्स तरी हवा असे म्हणत होतो.

आलं लक्षात. गुजरातच्या बॉलिंग मध्ये शमी मस्त टाकतोय सध्या. बाकी मला वाटतं बॅटिंग प्रॉवेस वर जिंकत आहेत. त्यांचा लो स्कोअर होऊन डिफेंड करायची वेळ येइल तेव्हा कस लागेल बॉलिंगचा खरा.
झालय का तसं आत्ता पर्यंत? मला आता मॅचेस मध्ये गड्बड होतेय.

अग्री ऑन अक्षर! खुपच उपयोगाचा प्लेयर आहे. बॉलिंग अर्थात सरस.

अनुमोदन असामी.

“ हा एक प्रकारचा एक्स फॅक्टर आहे असे म्हणू एकवेळ . तो नेहमीच्या स्टॅट्स मधे किंवा ठोकताळ्यामधे अजमावता येणे कठीण आहे. म्हणून एक चान्स तरी हवा असे म्हणत होतो.” - this makes sense. मला वाटतं कि आयपीएल नंतर द. अफ्रिकेचा भारत दौरा आहे (वन-डे आणि टी-ट्वेंटी). तश्या दौर्यात आजमावून बघता येईल आणि तू म्हणतोस तसा एक्स फॅक्टर असेल आणि तो कॅश करू शकत असेल तर इंडियन टीमला एक तडाखेबंद लोअर ऑर्डर बॅट्समन मिळेल.

>>दोन मॅचेस चा अपवाद वगळता उरलेल्या १२ मॅचेस मधे त्याने फारशी चमक दाखवली नव्हती
माझ्याही डोक्यामध्ये त्याची तीच इमेज फीट्ट बसलीय त्यामुळे गुजरात त्याला प्युअर बॅट्समन म्हणून खेळवतेय याचे आश्चर्य वाटले .... आणि यावर्षी त्याने फिनिश केलेल्या दोन्ही तीन्ही मॅचेस live बघितल्या नाहीत त्यामुळेही असेल कदाचित त्याच्याबद्दल तितका आत्मविश्वास वाटत नाही आणि भारतीय टीममध्ये प्युअर बॅट्समन म्हणून त्याच्यापेक्षा तंत्रात उजवे असणारे कित्त्येक जण ऑलरेडी रांगेत उभे आहेत!!

>>जनरली अनुभवी आणि नवख्या खेळाडूंचा चांगला मिक्स करतात, आणि ते मला योग्य वाटतं.
हे जरी खरे असले तरी सध्याच्या फॉर्मनुसार भारतीय संघातच काय तर त्यांच्या त्यांच्या IPL संघातही रोहित आणि कोहलीची जागा त्यांनी गृहीत धरु नये!!
भारतीय २०-२० संघाला खरच revamp ची गरज आहे आणि इतके नवनवीन तरुण गुणी खेळाडू रोज स्वताला सिद्ध करत असताना त्यांना त्यांच्या पीक फॉर्म मध्ये संधी नाकारणे जरा अन्यायकारक वाटते!!
(खर म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन तीन २०-२० टीम्स उतरवू शकतो)

>>राहुल बरोबर पंत चे पण गणीत कच्चे आहे असे दिसतय.
पंत, राहुल, श्रेयस तिघांचेही बॉलिंग चेंजेस गंडलेले वाटतात!!
परवाच्या KKR विरुद्धच्या सामन्यात कुलदीप आणि सकारियाची एक एक ओव्हर शिल्लक ठेवून मार पडणाऱ्या शार्दूल ठाकूर ला आणि कामचलाऊ ललित यादवला ३-३ ओव्हर देण्याच्या निर्णयाचे काय स्पष्टीकरण देणार??
त्याच सामन्यात बाकीच्या कामचलाऊ बॉलरना एकेका ओव्हरमध्ये इतका मार पडलेला बघून श्रेयसने स्वताच हातात चेंडू घेतला Proud
बाय द वे, त्यावरुन आठवले की त्याच्या ओव्हरचे पहीले काही बॉल ठाकूरने नुसते तटवून काढले.... इतके काही अनप्लेयेबल वगैरे वाटत नव्हते ते!! मॅच जरी दिल्लीच्या आवाक्यात होती तरी नेट रनरेटचा विचार का करत नाहीत अश्यावेळी?

>>त्याने पाँटींग ला अडवून सुनावले होते - इंग्लिश मोडके तोडके असताना ही कुठे कचरला नाही. असा अ‍ॅट्यीट्यूड नि आत्मविश्वास हवा.

होय काय?
अरे हा किस्सा कसा आठवत नाहिये मला? Uhoh

>>पराग विषयी एक आर्टिकल आलंय क्रिकइन्फोवर ते वाच.
हो वाचले आत्ता!!
इंटरेस्टींग कॅरेक्टर आहे खरा हा रियान पराग!!

Pages