Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिकेटचा धागा वर काढा आता...
क्रिकेटचा धागा वर काढा आता...
तरी हा धागा ईथून पळवायचा असल्यास ट्विटरवर चर्चा आहे.. गुजरात .. मोदी.. शहा.. अहमदाबाद .. फायनल तेच पोहोचणार आणि जिंकणार वगैरे.. त्या पोस्ट आणून ईथे टाकू का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यामुळे २०११ च्या विश्वचषकातील
यामुळे २०११ च्या विश्वचषकातील धोनी आठवला Happy
अजुन म्हणजे जिंकणाऱ्या तंबूत गॅरी कर्स्टन होता आणि हारणाऱ्या तंबूत संगा आणि मलिंगा!! >>> हो. मला केवळ त्या सिक्स मुळे नाही पण पंड्या बॅटिंगलाही वरती आला म्हणूनही ते आठवले. कदाचित आधीही येत असेल तो पण मला इतके लक्षात नाही.
कर्स्टनला पाहिल्यावर छान वाटले. हे इतके चांगले का जिंकत आहे हे लक्षात आले असेच वाटले त्याला बघून. तो तेव्हाही असाच अगदी शेवटी फक्त स्क्रीनवर दिसला होता. जॉन राइटही तसाच होता. चॅपेल टोटली उलटा.
हो, कर्स्टन जेव्हा मॅच
हो, कर्स्टन जेव्हा मॅच संपण्याआधी पांड्याशी बोलत होता, तेव्हाच मला कळलं की तो त्यांच्या सेटपमध्ये आहे.
सोमिवर नारीयल पाणी पिणारा
सोमिवर नारीयल पाणी पिणारा नेहराच जास्त फेमस होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याचीही गेमची समज चांगली वाटते. त्या गौरव कपूरच्या चॅम्पियन विथ ब्रेकफास्टच्या फेमस एपिसोडने त्याला स्पेशल ओळख दिली. त्या सिरीजचा एकमेव एपिसोड जो मी दोनदा पाहिला आहे.
हो, नेहरा ऑक्शनमध्ये व्हायटल
हो, नेहरा ऑक्शनमध्ये व्हायटल माणूस वाटला.
मायबोलीवर नेहराचे नाव घेतले
मायबोलीवर नेहराचे नाव घेतले
आणि तिथे फेसबूकवर नेहराबद्दल हि बातमी आली.
आशीष नेहरा ने बदल दिया आइपीएल का इतिहास, बने ट्राफी जीतने वाले पहले भारतीय कोच
Pages