आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंत टिकला असता तर मजा आली असती. धनश्रीचा चेहरा बघवत नव्हता चहल ने घोळ घातल्यावर. रियान पराग काय टाकत होता राव. ठाकूर खेळेल का आज ?

ठाकूर एक नंबर रत्न आहे लोअर ऑर्डर मध्ये पण आता हे हाताबाहेर गेलय. टू मच प्रेशर. थोडं कमी प्रेशर असताना आला तर नक्की फिरवू शकतो तो. बघू आता. पॅट कमिंग्स वगैरे सारखी झंझावती इनिंग खेळला बायचान्स तर.

ओह! ती धनश्री त्याची बायको आहे का? तेच मला कळायचं नाही हिच्यावर का सारखा कॅमेरा मारतात. मला वाटलं ओनर लोकांची कोणी असेल. ती काव्या की ओण सनराईजर्स च्या ओनरची मुलगी असते नेहमी मॅचेस ला.

धनश्री भारी पॉप्युलर आहे बुवा. डान्सर आहे ती . युजीशिवाय बरेच जण नाचतात तिच्याबरोबर सोमि वर.

पंत आणि दिल्ली कँपचा शेवटचा गोंधळ अ‍ॅबसोल्यूटली थर्ड क्लास होता. खेळापेक्षा कुणीही मोठा नाही आणि हा तमाशा (खेळाडूंना परत बोलावणं,
कुणाला तरी अंपायरशी वाद घालायला आत पाठवणं) ह्यांना क्रिकेटमधे कुठलंही स्थान नाही. पंतला जर भविष्यातला कॅप्टन म्हणून बघितलं जात असेल, तर आज तो त्या पदाच्या डिग्निटीपासून कित्येक योजने दूर गेलाय.

आयपीएल मध्ये रिॲलिटी शो टाईप्स ड्रामा अलाऊड असतो
म्हणून अंपायरने सुद्धा हट्टीपणाने थर्ड अंपायरला शेवटपर्यंत विचारले नाही Happy

बाकी दादा गांगुली आपला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम कर्णधार होता. नडणे हा त्याचा स्वभाव होता.
पहिल्या क्रमांकाचा धोनी आयपीएलमध्ये च एकदा मैदानावरही भांडायला गेलेला.
आणि कोहलीचे तर विचारायलाच नको.. तो काही न करताही एका राड्याच्या मूडमध्येच असतो..

मॉरल - पंत कप्तानीपासून कुठेही दूर गेला नाही. झालेच तर जवळ येईल Happy

@ असामी सिलेक्टेड बॉल आणू नका.
लास्ट ओवरच घ्या.
उनाडकटचा पहिला बॉल पर्रफेक्ट यॉर्कर होता. सेट बॅटसमन प्रीटिरीयसला त्यावर काहीच करता आले नाही आणि एलबीडब्ल्यू बाद झाला.
दुसरा बॉल सुद्धा ठिकाणेपे होता. सिंगल से ऊपर काही मिळणे अवघड असा होता.
तिसऱ्या बॉलला धोनी समोर आला आणि त्याच्या दहशतीने सेम बॉल उनाडकटला टाकायचा नव्हता कारण विकेटमधील यॉर्कर जरा जरी चुकला तर धोनीचे हेलिकॉप्टर येते आणि चेंडूला ढगात घेऊन जाते हे त्याच्या डोक्यात होते.
त्यामुळे त्याने घाबरून वाईड यॉर्कर टाकायचे ठरवले. त्यात लेंथ थोडी चुकली आणि धोनीने चेंडू सरळ समोर साईट स्क्रीनवर आदळला.
पुढचा बॉल मग कुठलाही यॉर्कर टाकायची त्याची हिंमतच झाली नाही. वेरीएशन करायला गेला. पण धोनीने हा माईण्डगेम वर्षानुवर्षे खेळला आहे. तो लास्ट ओवरला बॉलरला दबावात घेतोच. तो एक गचाळ बॉलवर चौकार कमावला.
उनाडकट पुन्हा फिरुन यॉर्कर लाईनवर गेला. पाचवा बॉलही चांगला पडला होता. पण धोनी दोन धावा काढून पुन्हा स्ट्राईक आपल्याकडेच ठेवण्यात एक्स्पर्ट आहे. हे सुद्धा आपण वर्षानुवर्षे बघतोय.
आणि लास्ट बॉल यॉर्करवर हवा तसा पडला होता. पण धोनी शांतपणे खेळत असल्याने उगाच जीव न काढत त्याने बरोबर लेग साईडला गॅपमध्ये खेळले आणि विजयी चौकार वसूल केला.

“ आयपीएल मध्ये रिॲलिटी शो टाईप्स ड्रामा अलाऊड असतो” - तू तुझ्या शब्दिक बुडबुड्यांनी तुला हवं ते डिस्ट्रॅक्शन तयार करायचा प्रयत्न कर, पण झाला प्रकार कुठल्याच पातळीवर स्वीकारार्ह नाही. गांगुली आणि कोहलीने असा कधी क्रिकेटचा अपमान केल्याचं आठवत नाही. केलं असल्यास त्याचाही निषेध आणि धोनीने तमाशा केल्यावर त्याच्याही विरुद्ध हीच भावना मी मांडली होती. कुठलाही फॉर्म असो, क्रिकेटपेक्षा कुणी मोठं नाही.

छे. मी सुद्धा बिलकुल समर्थन करत नाही अश्या प्रकाराचे. मला तर डिवचायला केलेली स्लेजिंग हा सुद्धा वाह्यात प्रकार वाटतो. भले तुम्हाला त्यात क्रिकेटचा अपमान दिसत नसेल. मला त्यातही क्रिकेटचा अपमानच दिसतो. तुमच्या हातात बॉल बॅट आहे ना. त्याने खेळा. शिव्या कसल्या देता. मी मागेही म्हटलेले की याबाबत माझे आदर्श सचिन द्रविड आहेत.
फक्त पंत यामुळे कप्तानपदाच्या शर्यतीतून मागे पडला हे काही पटले नाही. त्यावर असहमती दर्शवली आहे.

“ फक्त पंत यामुळे कप्तानपदाच्या शर्यतीतून मागे पडला हे काही पटले नाही.” - मी कप्तानपदाच्या डिग्निटीपासून लांब गेला असं म्हटलंय. ह्या वागणुकीचा सिलेक्शन कमिटीच्या निर्णयांशी काही संबंध नाही हे माहित आहेच.

डिग्निटी वगैरे कोहलीच्या शिव्या आणि स्लेजिंगमध्ये होती वा गांगुलीच्या शर्ट फिरवण्यामध्ये असे आपल्याला वाटतेय ते ही काही मग पटत नाही.

पंत विचित्रपणे वागला आज असे वाटले. मुख्य म्हणजे त्याने मोमेंटम घालवला हा सगळ्यात मोठ फाऊल होता.

@ असामी सिलेक्टेड बॉल आणू नका. >> सिलेक्टेड बॉल ह्यासाठी लिहिले कारण "काल उनाडकट घाबरलेला तरी जीवतोड मेहनत करत होता. यॉर्कर ठिकाणेपे टाकत होता" हे तुझे वाक्य होते. अर्थात ह्यावर तू अजून दोन पाने लिहिशील म्हणून मी घाबरून २० ओव्हर्स उनाडकट् ने च टाकल्या नि त्या सगळ्या स्टार्क - मलिंगाच्या लेव्हल च्या यॉर्कर्स च होत्या, धोनी नि प्रेटोरियस ने पटापट पिच मागे पुढे हलवून काही यॉर्कर्स शॉर्ट बॉल्स, फुल लेंग्थ बॉल्स मधे बदलले नि फटके मारले असे मानूया असे म्हणतो.

डिग्निटी वगैरे कोहलीच्या शिव्या आणि स्लेजिंगमध्ये होती वा गांगुलीच्या शर्ट फिरवण्यामध्ये असे आपल्याला वाटतेय ते ही काही मग पटत नाही. >> फे फ च्या पोस्ट मधे कोहली गांगूली कुठे दिसले तुला ? तू लिहिलेयस त्यांच्याबद्दल

गांगुली आणि कोहलीने असा कधी क्रिकेटचा अपमान केल्याचं आठवत नाही.
>>>>>

हे लिहिले आहे ना
जर पंतचे आजचे वागणे क्रिकेटचा अपमान होता तर जे कोहली कर्णधार असतानाही प्रतिस्पर्ध्यांना स्लेजिंग वा शिवीगाळ करतो वा दादा शर्ट काढून उघडा होत ते फिरवतो ते सुद्धा क्रिकेटचा अपमानच म्हणायला हवे ना.
मला तरी हे सारे असमर्थनीय वाटते. भले दादाने जे केले ते तेव्हा फार आवडलेले वा आजही त्याचा चाहता म्हणून कुठेतरी आवडतेच तरीही तटस्थपणे विचार करता मी नाही करू शकत त्याचे समर्थन.

असो. मुद्दा हा आहे की एक कप्तान म्हणून असे काही वागल्याने डिग्निटी जात असेल तर आपल्या सर्व नामांकित कर्णधारांनी ती गमावली आहे Happy

पंत आणि विराट तुलना नकोच... विराट म्हणजे ब्रॅडमन,सचिन,कपिल लेव्हल आहे.. पंत फार फार तर विनोद कांबळी किंवा मनोज प्रभाकर लेव्हल...

असो. मुद्दा हा आहे की एक कप्तान म्हणून असे काही वागल्याने डिग्निटी जात असेल तर आपल्या सर्व नामांकित कर्णधारांनी ती गमावली आहे >> आलं लक्षात पण त्याचा आयपीएल मध्ये रिॲलिटी शो टाईप्स ड्रामा कुठून घुसडलास ? हे मॅच फ्किसिंग सारखेच का ?

मॅच फिक्सिंग नाही वा स्क्रिप्टेडही नाही. पण आयपीएलमध्ये ड्रामा केल्यास चालतो, अशी एक मेंटेलिटी वाटते स्टार खेळाडूंची. या खेळाडूंचे हेच वागणे ईंटरनॅशनलमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसून येणार नाही. भले फ्रॅंचायझी क्रिकेटमध्येही हे समर्थनीय नसले तरी आयपीएल फीव्हरमध्ये हे होत असावे. स्पर्धेचे स्वरुप आणि माहौल याला बरेपैकी कारणीभूत असावा.

अरे गावस्कर ने एंशीच्या दशकात टेस्ट मधे प्लेयर्स ना परत बोलवले होते. रणतुंगाने मुरली प्रकरणात ९५-९६ मधे तसे केले होते. हा काही नवीन प्रकार नाहिये. ह्यापेक्षाही अश्लाघ्य प्रकार इंटरनॅशनल क्रिकेट मधे पण झालेले आहेतच. आजच्या सारखे पॅशन नि भावनेच्या भरात हे होत असावे. पंत ने सुद्धा मॅच संपल्यावर दिलगिरीचा सूर लावला होता. ड्रामेबाजी करून मॅच जिंकता येणार नाही इतपत भान त्यालाही असेलच ना रे.

आजच्या सारखे पॅशन नि भावनेच्या भरात हे होत असावे. पंत ने सुद्धा मॅच संपल्यावर दिलगिरीचा सूर लावला होता.
>>>>

एक्झॅक्टली. पॅशन भावना ऊफाळून येतात आयपीएलमध्ये.
तो भर ओसरल्यावर दिलगिरीचा सूर त्याने लावणे स्वाभाविक आहे. ते मी पाहिले नाही. पण मध्ये पाहिलेले तेव्हा बटलर आणि सॅमसनशी छानपैकी बोलणे चालू होते.

बाकी अंपायरने का हट्टीपणा दाखवला ते समजले नाही. मॅच सिच्युएशन आणि क्लोज कॉल पाहता डिसीजनसाठी थर्ड अंपायरकडे जायलाच हवे होते. निदान दिल्लीकरांनी रिक्वेस्ट केल्यावर तरी. उगाच बोल दिया ना बस्स बोल दिया म्हणत ईगो आडवा आणला..

काय गावठीपणा लावलाय रियॉन पराग नी! Uhoh फेकी बॉलिंग. एकदम मस्त प्रसाद दिला पंत नी त्या बॉल वर. साजेसा.
>>>

त्या रियान परागला अजून स्थिरावायचे आहे. चमकायचे आहे. पण त्याआधीच चमकोगिरी फार करतो. जणू गरीबांचा विराट कोहलीच आहे. नुकतेच त्याने स्टेटमेंट दिले की मी ईंडियासाठी फिनिशर बनू शकतो. ती क्षमता आहे माझ्याकडे. हसावे की रडावे समजत नाही.

“ गांगुली आणि कोहलीने असा कधी क्रिकेटचा अपमान केल्याचं आठवत नाही.
>>>>>
हे लिहिले आहे ना”

संपूर्ण वाक्य वाचत जा रे . हे घे, “ गांगुली आणि कोहलीने असा कधी क्रिकेटचा अपमान केल्याचं आठवत नाही. केलं असल्यास त्याचाही निषेध”.

उगाच फाटे फोडू नकोस.

हो, मग मी देखील पंतच्या कृत्याचे समर्थन केलेच नाही. फक्त तुम्ही लिहिले की भविष्यातील कप्तान म्हणून तो त्या पदाच्या डिग्निटीपासून कित्येक योजने दूर गेलाय. तर एवढेच म्हणने होते की आधीच्या कप्तानांनीही राडे केलेत. त्यामुळे या पदाच्या डिग्निटीचा फार काही ऊच्च बेंचमार्क असा सेट नाहीये जो त्यापासून तो लगेच दूर जाईल.

असो. चला शुभरात्री..
पाच वाजले ईथे. उजाडले तर मग झोप उडते. त्याआधी झोपूया..

नुकतेच त्याने स्टेटमेंट दिले की मी ईंडियासाठी फिनिशर बनू शकतो. ती क्षमता आहे माझ्याकडे. हसावे की रडावे समजत नाही.>>>> लोल!!

“ मग मी देखील पंतच्या कृत्याचे समर्थन केलेच नाही” - असं कुणी म्हटलेलंच नाहीये. तू उगाचंच भुईला साप म्हणून का धोपटतोस?

आणि माझ्या मनात एखाद्याची कृती undignified असेल, तर तू व्हॉट अबाऊट्री केल्यामुळे ते बदलणार नाहीये.

>>पंत आणि दिल्ली कँपचा शेवटचा गोंधळ अ‍ॅबसोल्यूटली थर्ड क्लास होता.
100% सहमत फेफ!!
डिग्निटीबद्दल तर अगदी अगदी!! अरे काय करतोय हा असे झालेले!!

मला बघताना तो "नो बॉल" वाटलेला आणि on field umpires नी तो "नो बॉल" द्यायला हवा होता पण त्यांना जर तसे वाटले नसेल तर त्याविरूद्ध अपील नाही.
हाईटच्या नो बॉल साठी third umpire कडे जाण्याची तरतूद बहुदा क्रिकेटच्या सध्याच्या नियमात नाही..... हां आता जर एखादा खेळाडू त्या बॉलवर आउट झाला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असली असती आणि जर क्रिकेटच्या नियमात ऑन फील्ड अंपायरना याबाबतीत थर्ड अंपायरचे मत घेण्याची किंवा थर्ड अंपायरने अश्या बाबतीत आपणहून मत देण्याची तरतूद नसेल तर मग त्या निर्णयाविरुद्ध इतका थयथयाट करण्याचे कारण नव्हते.
त्या निर्णयाने कदाचित सामन्याचा निकाल बदललाही असता त्यामुळे पंत आणि दिल्ली टीमने नापसंती दर्शवणे समजूच शकतो पण ती पध्दत पूर्णतः चुकीचीच होती.
गल्लीत खेळत नाही आहात.... एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या स्पर्धेत तुम्ही प्रतिनिधित्व करताय..... पंतचे ज्याप्रकारे हातवारे चाललेले ते बघता he has a long way to go as a cricketer.

अणि वरील वर्तणुकीबरोबरच अजुनही बऱ्याच चुका त्याने एक कॅप्टन म्हणून कालच्या सामन्यात केल्या.
शार्दुलला ज्या प्रकारे पहील्या ओव्हरला स्विंग मिळत होता ते बघता त्याला पुढच्या सलग ओव्हर द्यायलाच पाहिजे होत्या ते तर केलेच नाही पण त्याचा कोटाही पूर्ण केला नाही..... तुमचा सगळ्यात इकॉनॉमिक बॉलर फक्त तीनच ओव्हर टाकतो म्हणजे कॅप्टन नक्कीच झोपला असावा!!
पॉवेलला इतक्या खाली पाठवणे ही अजुन एक चुक!! अक्षरला पाठवले ते एक लेफ्टी राईटी कॉंबिनेशनसाठी केले असेल ते समजू शकतो पण ठाकूरला पण पॉवेलच्या आधी पाठवले ते अनाकलनीय होते!!
आणि वरतून सेट झालेला असताना स्वताची विकेट ज्या बेजबाबदारपणे टाकली (तेही त्याच ओव्हर मध्ये एक जीवदान मिळालेले असताना) ते बघता पंतला कॅप्टन म्हणून अजुन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.

काल मुरली कार्तिकने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सवंग पत्रकारांसारखे झाल्या प्रकारातुन गॉसिप बाहेर काढण्याच्या उद्देशाने बाकी मॅचवर बोलण्याआधीच संजूला त्या नो बॉल प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली आणि संजूने अतिशय इनोसंटली त्याला तोंडावर पाडले.

या सगळ्या "नो बॉल" राड्यामध्ये जो वेळ मिळाला त्याचा योग्य उपयोग करत संजूने आणि इतर टीममेट्सनी मॅकॉयला calm down केले आणि उरलेल्या तीन बॉल मध्ये दिसलेला मॅकॉय आधीच्या तीन बॉलपेक्षा वेगळा होता.
त्या राड्यामुळे जसा पॉवेलचा मोमेंटम गेला तसेच बॉलरला आणि पूर्ण राजस्थान टीमला ब्रिदींग स्पेस मिळाली आणि त्याचा राजस्थानने योग्य उपयोग केला.

राजस्थान जरी टॉप ऑफ द टेबल असली तरी त्यांना त्यांच्या improvement areas वर काम करावे लागेल.
त्यांच्या एकूण रन्सपैकी अंदाजे ९०% रन्स टॉप फोर नी काढलेल्या असाव्या आणि साधारणतः ४०% एकट्या बटलरने...... हे चौघे जेंव्हा एखादी मॅच चालणार नाहीत तेंव्हा खाली कुणी खेळेल हा भरवसा वाटत नाही.
खुप मोठी धावसंख्या चेस करताना त्यांच्या बॅटींगचा आणि छोटी धावसंख्या डिफेंड करताना त्यांच्या बॉलिंगचा अजुनही कस लागलेला नाहिये.
जसे चार पाच नंबरच्या खाली त्यांची बॅटींग टेस्ट झालेली नाही तसेच पाचव्या बॉलरचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.
कुल्टिअर नाईल, सैनी, कुलदीप सेन, नीशम, मॅकॉय सगळ्यांना खेळवून झाले पण अजुनही त्यांना तो अचूक पर्याय सापडलेला नाहिये.
कालच्या मॅचमध्ये पाचव्या बॉलरने (म्हणजे पराग आणि मॅकॉयने मिळून) ४ ओव्हरमध्ये ७४ रन्स दिल्या..... कमी धावसंख्येच्या सामन्यात हा पाचव्या बॉलरचा प्रयोग महागात पडू शकतो.
काल प्रसिध कृष्णाने १९वी ओव्हर विकेट मेडन टाकली नसती तर १५-२० धावा मॅकॉय डिफेंड करु शकला असता का याचा राजस्थान मॅनेजमेन्टने विचार करण्याची आवश्यकता आहे.

बोल्टला शेवटी न ठेवता त्याला सलग सुरुवातीच्या तीन आणि शेवटी फारफारतर एखादी ओव्हर द्यावी.... बोल्ट स्लॉग ओव्हरमध्ये म्हणाव तितका चालत नाही. याउलट प्रसिध कृष्णाच्या किमान तीन तरी ओव्हर शेवटी ठेवाव्यात. आणि चहलला मध्ये दोन आणि शेवटी दोन असे वापरावे. अश्विनला पॉवरप्ले मध्ये वापरावे. म्हणजे मॅच बघुन थोडाफर बदल करावा पण बेसिक प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे.

Its big time for Riyan Parag to prove his mettle.

आज बॉल थांबून येतोय बॅट वर. पंड्या छान खेळतोय पण त्यामानाने स्कोअर फार नाही. टायटन्स चांगले चेझर्स आहेत, का पहिली बॅटिंग घेतली काय माहित.
गेला आता पंड्या. सुरवात बघता २०० आरामात होतील वाटत होतं.
पॉवर प्ले नंतर काही फ्लो जमला नाही रन्सचा.

हो १५७ टारगेट आहे फक्त. पण पिच नंतर स्लो झालेला. हार्दिक टिकला म्हणून स्कोअर झाला. नवीन येणाऱ्यांना जमत नव्हते. असाच पिच राहिला तर सोपे नाही हे टारगेट. गुजरातची बॉलिंग चांगली आहे. कलकत्याकडे बॅटींग डेप्थ आहे. क्लोज मॅच होईलसे वाटतेय..

अय्यर शॉर्ट बॉल प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला क्रीजमध्ये नाचून खेळतो. काही शॉट मारतोही. पण हे त्याच्या क्लासच्या फलंदाजाला लाँग टर्म उपयोगी पडणार नाही हे त्याला कळायला हवे. या कारणामुळे त्याचे येत्या ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपला प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळणे अवघड वाटतेय. मागेही हे बोललेलो जेव्हा त्याला या पद्धतीने सक्सेस मिळत होते. हल्ली अडचणीत वाटू लागलाय..

मगाशी आयपीएलची जाहीरात पाहिली. रोजच क्लोज फिनिशची ग्यारटी देत रोज देखिए आयपीएल बोलत होते Proud
पण हल्ली छान होत आहेत सामने

Pages