Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला
उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला नावं ठेवल्यामुळे धोनीचं महत्व कमी होत नाही.
>>>>
तेच तर सांगतोय, नका ठेऊ प्लीज. दुर्दैवाने त्याच्यासमोर दैत्यासारखा शक्तीमान तरीही देवासमान शांत धोनी होता. भल्याभल्यांची गाळण उडते, तिथे त्याचे काय..
बुवा फक्त तसच नाही. आयपील टीम
बुवा फक्त तसच नाही. आयपील टीम हे एक मिश्रण आहे जे भारतीय पिचेस बघून बनवलेले आहे. चार ओव्हरसीज प्लेयर्स आणून भारतीञ कमकुवत दुवे भक्कम करायचा प्रयत्न केलेला आहे. नुसत्या भारतीय खेळाडूंच्या संघात ह्या सगळ्या मोकळ्या जागा तेव्हढ्याच चपखल पणे भरल्या जात नात्यातलत्यामूळे निव्वळ फॉर्म हा बेस लावून निवड केलेली अंगाशी येऊ शकते असे मलाही वाटते.
उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला नावं ठेवल्यामुळे धोनीचं महत्व कमी होत नाही >> +१ आजचे टास्क मूळातच कठीण होते नि रिशी धवन नक्कीच डोकेबाज माणूस आहे हे त्याने आधी पण बरेचदा दाखवून दिले आहे. अर्शदीप तर तीन सीझन्स शेवटच्या ओव्हर्स चांगल्या टाकतोय. (अपवाद वगळता).
तेच तर सांगतोय, नका ठेऊ प्लीज. >> दोन दिवसापूर्वी तू माझ्याशी हे म्हणून "काल उनाडकट घाबरलेला तरी जीवतोड मेहनत करत होता. यॉर्कर ठिकाणेपे टाकत होता." हा वाद घालत होतास.
देव काय , दैत्य काय ? धोनीने आज रानोमाळ फिरवलाय तुला . हवे असेल तर डीस्कशन बदलायला अजून एक मुद्दा देतो - संदीप शर्माने मॅच फिक्स केली होती नि रायडूने स्पॉट फिक्स. नाक्यावरच्या पानवाल्याकडे लोक बोलत होते कि त्यां ना व्हऑट्सॅप वर आले की फेबु वर आलय तसे म्हणून. होउन जाऊ दे. हाय काय नि नाय काय !
असामी, आलं लक्षात. ओवरसीज
असामी, आलं लक्षात. ओवरसीज प्लेयर आपल्या सेकंड बेस्ट नी रिप्लेस करावे लागतील हे खरं आहे. पण आयपिएल मध्ये तुफान खेळलेल्या भारतीय प्लेयरला त्याच फॉरमॅट मध्ये भारताकडून न खेळू द्यायला असा काय कारण असू शकेल ह्याचा विचार करतोय मी.
परत सेकंड बेस्टकरता सुद्धा आयपिएल मध्येच बघणे सहाजिक आहे.
पण आयपिएल मध्ये तुफान
पण आयपिएल मध्ये तुफान खेळलेल्या भारतीय प्लेयरला त्याच फॉरमॅट मध्ये भारताकडून न खेळू द्यायला असा काय कारण असू शकेल ह्याचा विचार करतोय मी. >> त्यात त्यांना कुठे संधी दिली नि किती दिली हे पण मह्त्वाचे ठरते. इथे स्पिनर चालला म्हणून तसाच इंग्लंड मधे चालणे जरुरी नाही पण नेमके तिथेच २ सामने खेळवून त्याच्यावर काट मारली गेलेली असू शकते. येत्या आफिक्रेच्या दौर्यामधे आयपील च्या जोरावर काही अधिक नवीन चेहरे चाचपडून बघितले जातीलच.
सहज फेसबूक सर्फ करताना ही
सहज फेसबूक सर्फ करताना ही जुनी बातमी नजरेस पडली.
दोन सामने हरले तेव्हा हैदराबादची मालकीण ट्रोल होत होती तेव्हाची
आणि आता बघा.. सलग पाच जिंकले आहेत.
गेमप्लान आणि डिसीप्लीन. विल्यमसनने जे त्यांच्या राष्ट्रीय संघासोबत केले तेच हैदराबाद सोबत करतोय. कप्तान आणि लीडर म्हणून हा माणूस नेहमीच ग्रेट वाटतो. फलंदाज म्हणून आहेच.
https://zeenews.india.com/cricket/ipl-2022-srh-ceo-kaviya-maran-brutally...
दोन दिवसापूर्वी तू माझ्याशी
दोन दिवसापूर्वी तू माझ्याशी हे म्हणून "काल उनाडकट घाबरलेला तरी जीवतोड मेहनत करत होता. यॉर्कर ठिकाणेपे टाकत होता." हा वाद घालत होतास.
>>>>
धोनीच्या दहशतीने घाबरलेला हे उघड दिसत होते त्याच्या चेहर्यावर पण त्याच्या परीने प्रयत्न करत होताच. काही बॉल चांगलेही पडत होतेच. स्पेशली धोनी स्ट्राईकला नसताना. कारण भिती नव्हती, प्रेशर नव्हते
आणि हो, जेव्हा संशय येतो काही स्क्रिप्टेड शिजतेय तेव्हा मी शंका व्यक्त करतोच. त्यादिवशी का नाही असेही कोणीतरी म्हटलेले. त्यावरही ते उत्तर होते.
उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला
उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला नावं ठेवल्यामुळे धोनीचं महत्व कमी होत नाही. >>> MSD बस नाम हि काफी है.त्याने जे काही केलं आहे ते भूतो ना भविष्यती आहे, म्हणून त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. त्याचा इतका डोक्याने क्रिकेट खेळणारा क्वचित दुसरा कोणी खेळाडू असेल.
अपेक्षा धोनीकडून नाहीतर मग काय ईशान कडून ठेवायच्या ?????
“ असो, तुम्ही मला धोनीचे
“ असो, तुम्ही मला धोनीचे पराक्रम आणण्यास भाग पाडणारच तर.” - अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?
धोनीच्या दहशतीने घाबरलेला हे
धोनीच्या दहशतीने घाबरलेला हे उघड दिसत होते त्याच्या चेहर्यावर पण त्याच्या परीने प्रयत्न करत होताच. काही बॉल चांगलेही पडत होतेच. स्पेशली धोनी स्ट्राईकला नसताना. कारण भिती नव्हती, प्रेशर नव्हते >> अरे इतका सहज स्वतःच्याच शब्दांमधे कसा अडकतोस ? बघ तूच म्हणतोयस की "उनाडकट धोनीच्या दहशतीमूळे खराब बॉलिंग करत होता त्याला. म्हणजे त्याने खराब बॉलिंग केली नि धोनी खेळून जिंकून देऊ शकला. आज रबाडा, धवन नि अर्शदीप धोनीला घाबरले नाहीत नि धोनी ला जिंकून देता आले नाही. " उनाडकट बिनडोक बॉलिंग करून राहिला हे दिसत नाही का त्याच्यातून ? "उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला नावं ठेवल्यामुळे धोनीचं महत्व कमी होत नाही. " हे म्हणणे जास्त योग्य वाटत नाही का ?
तुझ्या ह्या असल्या आरत्यांमूळे तो ह्या चांगल्या गुणी खेळाडूंछ्या कामगिरीची किम्मत कमी करतोस असा विचार एकदा प्रामाणिकपणे स्वतःशी करून पाहा.
असामी फेफ बुवा। ___/\___
असामी फेफ बुवा। ___/\___
संयम आणि सहनशीलता याला नमन
क्लास घेत असला तर सांगा
https://youtu.be/LeFy-6vJSko
https://youtu.be/LeFy-6vJSko
राजस्थान रॉयल्सचे असे बरेच व्हिडीओज आहेत..... मजा येते बघायला
बटलर आणि अश्विनचा पण एक व्हिडिओ आहे (मंकडींग incident वर खुप हसतखेळत बोलले आहेत दोघेही)
त्या चहलनेही आपल्या सोबत
त्या चहलनेही आपल्या सोबत मुंबई ईंडियन्समध्ये घडलेला किस्सा अश्याच विडिओमध्ये सांगितलेला का?
त्याचे पुढे काय झाले कळलेच नाही. खरे असेल तर चौकशी व्हायला हवी होती. डेंजर होते ते. आणि खोटे असेल तर मुंबईने चहलला बांबू लावायला हवा होता. बदनामी होती ती. पण पुढे काही कानावर आलेच नाही.
स्वरूप, मस्त आहे व्हिडीओ
स्वरूप, मस्त आहे व्हिडीओ
‘शॉर्ट पॉईंट’ 
स्वरुप मी काही व्हिडियो
स्वरुप मी काही व्हिडियो पाहिलेले आधी पण हा नव्हता पाहिला. गम्मत वाटली. वॉर्नरचे फॅमिली व्हिडियो पण मस्त असतात. त्याची पोरे देसी होणार आहेत पक्की
कोहली सध्या फारच वाईट फेजमधून
कोहली सध्या फारच वाईट फेजमधून जातोय, कॉन्फिडन्स पार डाऊन वाटतोय. आजही वाचत वाचतच खेळत होता. आणि गेला...
दुसरीकडे तो रियान परागही आज खेळला.. आता फक्त विजय शंकर खेळायचे बाकी आहे..
कालची मॅच राजस्थान ने मस्त
कालची मॅच राजस्थान ने मस्त खेचली. स्मार्ट बॉलिंग!! स्पेशल मेन्शन टू रियान पराग. खूप मॅच्युरिटीने खेळला.
>> हे चौघे जेंव्हा एखादी मॅच
>> हे चौघे जेंव्हा एखादी मॅच चालणार नाहीत तेंव्हा खाली कुणी खेळेल हा भरवसा वाटत नाही.
खुप मोठी धावसंख्या चेस करताना त्यांच्या बॅटींगचा आणि छोटी धावसंख्या डिफेंड करताना त्यांच्या बॉलिंगचा अजुनही कस लागलेला नाहिये.
चला यातले एकतरी झाले..... छोटी धावसंख्या यशस्वीरित्या डिफेंड करुन दाखवली राजस्थानच्या बॉलर्सनी!!
कुलदीप सेन ने पाचव्या बॉलरचा प्रश्न सध्यातरी सोडवलेला दिसतोय..... त्याचा पेस जबरदस्त आहे पण त्याला पण इनिंगच्या सुरुवातीला वापरुन घेतले पाहिजे..... शेवटी त्याच्या पेसवर नुसती बॅट लावून चौके छक्के जाऊ शकतात!
सॅमसन काल अतिशय अवसानघातकी फटका मारुन आऊट झाला..... व्ही मध्ये त्याचे इतके छान शॉट बसत होते तर उगाच स्वीप वगैरेच्या नादाला कशाला लागायचे??
रियान पराग खेळला एकदाचा.... त्याला सेट व्हायला थोडा वेळ लागतो का? तसे असेल तर त्याला थोडे वर खेळवून बघायला हरकत नाही!
चारपैकी दोन कॅचेस कम्माल घेतले त्याने!!
अश्विनला पिंच हिटर म्हणून पाठवायचा प्रयोग अनाठायी वाटतो!!
बटलर आणि चहलच्या योगदानाशिवाय (अर्थात चहलला विकेट नसल्यातरी बॉलिंग चांगलीच टाकली म्हणा त्याने) जिंकलेले बघून राजस्थानचा कॉन्फिडन्स वाढला असणार!!
कोहलीबद्दल इतके सगळे इतके कायकाय बोलतायत त्यात आपण अजुन काय बोलावे!!
कोहली आणि रोहितशिवाय २०२२ वर्ल्डकप टीमच्या चर्चा भलेभले करु लागलेत..... २००८ च्या पहील्या २०-२० वर्ल्डकपसारखे major revamp करुन पूर्णतः तरुण टीम उतरवायचीही चर्चा आहे!!
“ शेवटी त्याच्या पेसवर नुसती
“ शेवटी त्याच्या पेसवर नुसती बॅट लावून चौके छक्के जाऊ शकतात!” - त्याने लखनौच्या विरूद्ध स्टॉयनिस ला शेवटची ओव्हर मस्त टाकली होती रे. कदाचित तो डेथ ओव्हर्समधे पण चांगली बॉलिंग करू शकेल. अर्थात अगदी दोन मॅचेसच्या अनुभवावर काही मत व्यक्त करता येणार नाही.
पराग विषयी एक आर्टिकल आलंय क्रिकइन्फोवर ते वाच. सिच्युएशनप्रमाणे क्विकफायर १५-२० रन्स करणे किंवा कालच्याप्रमाणे बाजू लावून धरून शेवटी मोठे शॉट्स खेळणे अशा फ्लेक्झिबल रोलमधे आहे तो. २० च वर्षाचा आहे. जर ह्या रोलमधे तयार झाला तर इंडियासाठी गूड न्यूज ठरेल.
बटलर आणि चहल बद्दलच्या तुझ्या मुद्द्यांना अनुमोदन. मिचेल, ड्यूसेन पैकी एक फॉर्ममधे आला तर बरं होईल.
स्वरुप पोस्ट ला अनुमोदन .
स्वरुप पोस्ट ला अनुमोदन . फक्त जे कोहलीबद्दल बोललास तेच संजूला पण लागू होते. अजून काय नि का बोलायचे
फे फ पराग बद्दल अनुमोदन. त्याच्या फिनिशर कमेंट वरून त्याची बरीच चेष्टा केली गेली आहे. पण तसे बनायला वेळ लागणार हे साहजिकच आहे ना.
राजस्थान नि दोन नव्या टीम्स , टीम तो बीट वाटू लागल्या आहेत. सन्रायझर्स बद्दल थोडी वाट पाहायला हवी. त्यांची बॉलिंग दमदार आहे. बॅटींग चा कस अजून लागायचा आहे.
अरे शमीची पहिली ओवर काय डेडली
अरे शमीची पहिली ओवर काय डेडली होती बॉस! कसला आत येत होता होता बॉल. वाहव करे पर्यंत काढलच दांडकं त्यानी. सुपर बॉल होता!
नंतर चांगलेच रिकवर झाले हैद्राबादी. शेवटी तर तौबा! जॅन्सन सुटला आहे बॅटिंग अन बॉलिंग मध्ये! १६० वगैरे पर्यंत आवरतील म्हणता म्हणता शेवटी चौके छक्क्यांचा पाऊस!
बुवा तुम्ही दोन तीन
बुवा तुम्ही दोन तीन दिवसांपूर्वी कॅप्टन्सी बद्दल लिहिले होते. अजून तरी कोणी देसी कॅप्टन म्हणून जबरदस्त छाप पाडून गेलय असे नाही
हार्दिक एकदम मॅच्युअर बॅटिंग करतोय एव्हढेच. मयांक धवन ला मार पडत होता तेंव्हा त्याला मस्त पणे शांत करून गेला. संजू चे काही चेंजेस आवडले. श्रेयस रोटेट चांगले करतो बॉलर्स. पंत ठिकठाक वाटलाय. राहुल कॅप्टन म्हणून मला कधीच इंप्रेस करत नाही. सगळ्यात अपेक्षाभंग आहे रोहित कडून. सामने हरणे हा एक भाग झाला पण त्याची एकंदर वक्त्यव्ये एकदम गिव्ह अप केल्यासारखी होत गेली आहेत जी नक्कीच अपेक्षित नव्हती.
उमरान मलिक आज सुद्धा.. आणि एक
उमरान मलिक आज सुद्धा.. आणि एक लेव्हल आणखी वर.. मजा आली जाम
तयार वाटतोय भारतीय संघात यायला. उचला याला वर्ल्डकपला याच.. चलो ऑस्ट्रेलिया
जब्बरदस्त मॅच झाली.. अमेझिंग.
जब्बरदस्त मॅच झाली.. अमेझिंग.. चार सिक्स आले लास्ट ओवरला.. जब्बर्रदस्त.. राशीद खान पुन्हा एकदा.. तेवातिया सुद्धा.. वेगळेच शॉट मारू शकतात दोघे.. विल्यमसन सुद्धा क्ल्यूलेस दिसला शेवटी
रशिद आणि तेवातिया मस्त खेळले.
रशिद आणि तेवातिया मस्त खेळले. Jensen ने सहातले चार बॉल अगदीच स्लॉटमधे टाकले. प्रेशरखाली आलेल्या येन्सेन/जेन्सेन च्या जवळ भुवनेश सारखा अनुभवी बॉलर दिसला नाही हे जरा खटकलं.
आज साहा ची बॅटसुद्धा लागून गेली. उम्रान मलिक जर हा स्पीड कायम ठेवत बाकीची स्किल्स शिकत गेला तर कमाल करेल.
असामी, कॅप्टन्सविषयी तुला अनुमोदन!
अबाबाबाबा! काय मॅच. सॉलिड मजा
अबाबाबाबा! काय मॅच. सॉलिड मजा आली! सलग अशी बघता नाही येत ऑफिस वर्क सुरु असल्यामुळे पण नेमके शेवटच्या काही ओवर ला वेळ होता. टेवाटिया तर आहेच मास्टर पण रशिद is becoming a force to reckon with! कैच्या कै थंपिंग अशी स्टाईल आहे! इकडे एका साईडला उमरान नी गळती लावलेली असताना दुसर्या बाजूला येऊन हे असलं काही करणं म्हणजे कमाल आहे. अर्थात ह्यात बोलर्सच्या चुका आहेतच. फुल टॉस वगैरे दिले राव टेवाटियाला! मान गये उस्तादों!
बाकी उमरान मलिक ला स्पेशल मानाचा मुजरा! तुफान तुफान बॉलिंगे बॉस! १५० गाठले आज त्याने एक बोल्ड च्या वेळी. इतका खत्रा पेस बघून हेवा वगैरे वाटायचा पुर्वी वकार, मलिकची बॉलिंग बघून. एक समिकरणच बनलं होतं की अल्ट्रा फास्ट बोलर हे पाकिस्तानातच तयार होऊ शकतात. आजकाल सगळेच पुश करत आहेत स्पीड लिमिट्स पण आज म्हणजे अॅक्युरसी खत्तरनाक होती त्याची. काय सुटत होता बॉल परफेक्ट सीम दाखवत हातातून. अप्रतिम!
कॅप्टनसी बद्दल, आय अंडरस्टँड असामी. म्हणजे व्यु लक्षात आला. काईंड ऑफ अग्री. डेमोक्रॅटिक पक्षा सारखे इथेही मला ठाम आणि विनर असा कँडिडेट दिसतच नाहीये कोणी.
उम्रान मलिक जर हा स्पीड कायम
उम्रान मलिक जर हा स्पीड कायम ठेवत बाकीची स्किल्स शिकत गेला तर कमाल करेल. >> +१ निव्वळ त्याला बघायला मिळावे म्हणून हैद्राबादला सपोर्ट.
तेवाटिया खरा विनर आहे राव ! नेव्हर गिव्ह्स अप. डज नीड टू बी इन ईंडीअयन टीम. फेल गेला तरी चालेल.
आजचा दिवस काव्या ऐवजी नताशाचा होता. मुरलीला एव्ह्ढा फुटलेला खेळताना पण पाहिलेला नाही. मॅच संपल्यावर डग आऊट मधे नेहरा नि पांड्या एकमेकांकडे बघून काय हसलेत
पैसा वसूल मॅच होती... उमरण
पैसा वसूल मॅच होती... उमरण मलिक ची बॉलिंग आणि नंतर गुजरातचे शेपूट.. खतरनाक शेपूट आहे तेवतीया आणि राशिद ...
टीव्ही सब्स्क्रिबशन पैसे फुल वसूल...
टीव्ही सब्स्क्रिबशन पैसे फुल
टीव्ही सब्स्क्रिबशन पैसे फुल वसूल... >>>>> सत्यवचन!
तुफान केली बाकी बॉलिंग खरच! एकदम वसूल!
उमरान सोडून बाकी लोकांना काय झालं काय माहित पण? कंट्रोल मध्ये होते खरं. असं काय अचानक ढिसाळ बॉलिंग केली काय माहित. त्यांच्या पट्ट्यात होते बॉल. मागच्या वेळी तरी टेवाटिया आधीच त्याच्या ऑफला सरकला अँटिसिपेट करुन. ह्यावेळी ते पण नाही.
मागच्या मॅच ला त्यानी सिक्स लावले तेव्हा बहुतेक मॉरिसन होता कमेंटेटर, त्यानी जो दंगा केला तो सिक्स बसल्यावर, फार फार मजा आली एकायला! एकदम जुन्या टोनी ग्रेग वगैरेच्या उस्फुर्त रियॅक्शन्सची आठवण आली. अशा लाईवली कॉमेंटरी मुळे मजा द्विगुणीत होते अगदी.
आज गावस्कर पण जबरी इम्प्रेस्ड होता तो १५० केपीएच चा बॉल आणि दांडकं बघून. कौतूक किती वेळ सुरु होतं.
पंड्या लकी आहे.. हारली मॅच
पंड्या लकी आहे.. हारली मॅच समजून चेहरा पडलेलाaअसतो तर असे काहीतरी होते.. ते तेवतीया दोन बॉल 12 रन तर पंड्यालाच विश्वास बसत नव्हता जिंकली म्हणून...
“ डज नीड टू बी इन ईंडीअयन टीम
“ डज नीड टू बी इन ईंडीअयन टीम.” - हे तू गेल्या दोन आयपीएल्सपासून म्हणतोयस.
Pages