Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोहली पुन्हा गोल्डन डक
कोहली पुन्हा गोल्डन डक
पहिल्या बॉलला स्लिपमध्ये कॅच.
आज चेहरा फार ऊतरलेला त्याचा..
स्वरूप, तुझ्या सगळ्या पोस्ट्स
स्वरूप, तुझ्या सगळ्या पोस्ट्स ना अनुमोदन. परागने फॉर्म मधे येणे आणि मकॉयने पाचव्या बॉलरच्या रोलमधे स्थिरावणे ह्याच राजस्थानसाठी दोन चांगल्या गोष्टी घडू शकतात (their best bet).
रसेल ने एकहाती (ऑल्मोस्ट) खेचली होती मॅच. पण अल्झारी ने डोकं ताळ्यावर ठेवून बॉलिंग केली. फर्ग्युसन चा कॅचही मस्त होता.
कोहली आणि दिनेश स्वॅप हवा...
कोहली आणि दिनेश स्वॅप हवा...
कोहली आऊट झाल्यावर हताश, भकास
कोहली आऊट झाल्यावर हताश, भकास, उध्वस्त, हादरलेल्या, भांबावलेल्या ,निराश नजरेने बघत होता. रोहित आणि विराट ची कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून एक्स्पर्ट ओपिनियन देयाची वेळ आली आहे. रोहित, विराट आणि ईशान ला जर भारतीय संघात संधी मिळाली तर 3 फॉर्म असलेल्या खेळाडूंवर अन्याय होईल.
जसा अन्याय दिनेश कार्तिक वर
जसा अन्याय दिनेश कार्तिक वर झाला इतकी वर्षे... धोनी मुळे ..
अरे काय चाललय काय?
अरे काय चाललय काय?
टि२० मध्ये टेस्ट सारखं बॅट अगदी खाली ठेवून खेळायची वेळ आली प्लेरांवर!
हो.. आणि प्लेस करताना आऊट
हो.. आणि प्लेस करताना आऊट होतात...
छे च्रप्स. धोनीमुळे कसला
छे च्रप्स. धोनीमुळे कसला कुणावर अन्याय झाला. ते दुर्दैव होते त्यांचे की त्यांनी धोनीयुगात जन्म घेतला.
कार्थिक टेस्टमधे (खेळाडू
कार्थिक टेस्टमधे (खेळाडू म्हणून) नक्कीच खेळायला हवा होता. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे धोनी जितका चांगला प्लेयर आणि कॅप्टन होता, तितकाच तो टेस्टमधे क्लूलेस होता. अर्थात त्यावेळी कार्थिक सुद्धा काही फार मोठा पराक्रम गाजवत नव्हता. मधला एक काळ धोनी टेस्टमधे लोअर ऑर्डर बॅट्समन म्हणून चांगला खेळला सुद्धा. पण स्विंगिंग विकेट्सवर विकेटकीपर म्हणून तो कमी पडायचा आणि कॅप्टन म्हणून त्याचा टेस्टमधे वकूब कमी होता. असो. झाली ह्या सगळ्यांची करियर्स. आता चर्चेचं गुर्हाळ लावण्यात अर्थ नाही.
आजची दुसरी मॅच अगदीच रटाळ होणार असं दिसतंय. काहीतरी वेगळं करून वेळ सत्कारणी लावावा.
फेरफटका - पराक्रम
फेरफटका - पराक्रम गाजवण्यासाठी कंटिन्यूस टीम मध्ये संधी मिळायला हवी...
दिनेश कार्तिक २६ कसोटी खेळला.
दिनेश कार्तिक २६ कसोटी खेळला. एखाद्या खेळाडूना जोखायला बरेपैकी मोठा आहे हा आकडा.
त्यात २५ ची सरासरी आहे त्याची.
धोनी कप्तान होता ते एकवेळ सोडूया, पण धोनीची वर्ल्डक्लास किपींग पाहता त्याला रिप्लेस करायला कार्तिकला वा कोणालाही फलंदाहीत काही स्पेशल करणे गरजेचे होते जे त्याला आजवर मिळालेल्या संधीत त्याने केलेले दिसत नाही.
हेच पार्थिव पटेललाही लागू. किंबहुना धोनी पश्चात पटेल, कार्तिक, साहा, पंत या सर्वांची संगीतखुर्ची सुरू झाली. गाब्बानंतर पंतवर येऊन ती थांबली. लिमिटेडमध्ये तर आणखी राहुल, ईशान किशन, सॅमसन वगैरे मंडळी आहेत स्पर्धेला.
धोनीकाळात स्थिरता होती संघात. कारण त्याने हा प्रश्न कैक वर्षांसाठी सोडवला होता.
ॲक्चुअली मला धोनीबाबत ही
ॲक्चुअली मला धोनीबाबत ही चर्चा करणेही विचित्र वाटतेय. समकालीन यष्टीरक्षक त्याच्या स्पर्धेतही नव्हते. सचिन कोणाचीतरी जागा अडवून चोवीसेक वर्ष क्रिकेट खेळला असे म्हटल्यासारखे वाटतेय.
पण ते ही सोडा..
आजवर भारताच्या क्रिकेट ईतिहासातले ग्रेट प्लेअर काढायचे झाल्यास गेल्या तीनेक दशकात पहिली दोन नावे सचिन-धोनी असतील.. आणि आपण काय चर्चा करतोय
“ पराक्रम गाजवण्यासाठी
“ पराक्रम गाजवण्यासाठी कंटिन्यूस टीम मध्ये संधी मिळायला हवी” - च्रप्स, तो त्यावेळी डोमेस्टीकमधे फार काही पराक्रम गाजवत नव्हता.
“ पण धोनीची वर्ल्डक्लास किपींग पाहता” - त्याने विकेटकिपींग बरीच सुधारली. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मधे त्याने बरच स्ट्रगल केलं. किंबहूना इंग्लंडमधे स्विंग कव्हर करायला तो खूप मागे उभा रहायचा, ज्यामुळे स्लिप फिल्डर्स मागे जायचे आणि स्लिप कॅचेस कॅरी व्हायचे नाहीत. तो बॉल च्या लाईनमधे बॉल कॅच करायचा नाही असे अनेक कच्चे दुवे त्याच्या किपींग मधे होते. पटेल किंवा कार्थिक सुद्धा फारसे कंपेलिंग ऑप्शन्स देऊ शकले नाहीत.
“ तीनेक दशकात पहिली दोन नावे
“ तीनेक दशकात पहिली दोन नावे सचिन-धोनी असतील“ - अत्यंत इथळ विधान!! परत ‘सरकी’ वर घसरलाच. चला, सिरियस प्रतिसादांची वेळ संपली.
>>सिरियस प्रतिसादांची वेळ
>>सिरियस प्रतिसादांची वेळ संपली.
आजकाल ती वेळ कायमची संपलेलीच असते
तीनेक दशकात पहिली दोन नावे
तीनेक दशकात पहिली दोन नावे सचिन-धोनी असतील“
>> सचिन विराट
“ आजकाल ती वेळ कायमची
“ आजकाल ती वेळ कायमची संपलेलीच असते ” - सिरियसली
लोकांनी ठरवले तर ते
लोकांनी ठरवले तर ते रहाणेलासुद्धा धोनीपेक्षा भारी ठरवतील. क्रिकेट हा विषयच असा आहे

हातच्या कंकणाला आरसा कश्याला तसे धोनीची महानता बिलकुल सिद्ध करायची गरज नाही. गेल्या दोन दशकातले क्रिकेट ऊचलून पाहिले तर धोनी नावाचा रुदबा. त्याचा ऑरा कुठल्याही प्लेअरचा नाही हे सहज जाणवते. आणि हा कुठल्या ब्रांडींग वा मार्केटींगने आला नाहीये. कोणी कबूल करो न करो. त्याचे पराक्रमच बोलके आहेत. फलंदाजी-कप्तानी-किपींग असे पॅकेज जगात नाही दुसरे. विषयच निघाला आहे तर त्याचे मोजकेच पराक्रम लिहायला आवडतील.. सावकाश आणतो रात्री
“ हा कुठल्या ब्रांडींग वा
“ हा कुठल्या ब्रांडींग वा मार्केटींगने आला नाहीये.” -
मागे इथेच एकदा सरांनी जाहिरातदारांमुळेच धोनी कसा अजूनही खेळतोय हे छातीठोकपणे सांगितलं होतं. सर, आप इतने महान इस लिये हैं, क्यूंकि आप खुद नही जानते कि आप महान हैं|
“ धोनीची महानता बिलकुल सिद्ध
“ धोनीची महानता बिलकुल सिद्ध करायची गरज नाही.” - मग कशाला ते पान-पानभर पोस्ट्स आणि फोटोज टाकत असता सर? वर परत “ त्याचे मोजकेच पराक्रम लिहायला आवडतील” हे आहेच.
मागे इथेच एकदा सरांनी
मागे इथेच एकदा सरांनी जाहिरातदारांमुळेच धोनी कसा अजूनही खेळतोय हे छातीठोकपणे सांगितलं होतं.
>>>>>
गल्लत होतेय का?
तो प्रचंड लोकप्रिय आहे आहे म्हणून आता तो आयपीएलचा ब्रांड झालाय हे तुम्ही दिलेल्या माझ्या वरच्या वाक्याचा अर्थ.
आणि तो लोकांना ईतका आवडतो ते त्याच्यातील कर्तुत्वामुळे हे माझ्या वरच्या पोस्टमधील वाक्याचा अर्थ. त्यासाठी त्याची कसली ब्रांडींग करत लोकांवर तो आवडावा म्हणून थोपवला नाहीये. आणि तो का आवडतो, तर धोनी म्हणजे विश्वास! आणि हे त्याने मागच्याच मॅचला सिद्ध केले.
आमच्या घरचेच घ्या, सारे मुंबई ईंडियन्स समर्थक आहेत. मुंबई हरल्याचे दु:ख सर्वांना भारत हरल्यासारखे होते. फायनली मुंबई जिंकतेय या आनंदात होते. काम करता करता मॅच बघत होते. मी एकटाच टीव्हीसमोर चिकटून होतो. ४ बॉल १६ ला धोनीने सिक्स मारल्यावर मी सर्वांना हाक मारून बोलावले. आणि मॅचची परिस्थिती समजवली. धोनी म्हटल्यावर तो ऊरलेले ३ बॉल १० सुद्धा मा र णा र च हे सारे समजून चुकले आणि तिथेच मुंबई मॅच हरल्याच्या दु:खात बुडाले. पण गंमत म्हणजे धोनीने ते मारल्यावर त्यांना आनंदही झाला. कारण त्यांचा धोनीवरचा विश्वास कायम राहिला.. तो दंगलमधील आमीर खानचा डायलॉग आठवतो ना.. दिल छोटा मत कर पगले, नॅशनल चॅम्पियन से हारा है तू.... असे झाले सर्वांचे
मग कशाला ते पान-पानभर पोस्ट्स
मग कशाला ते पान-पानभर पोस्ट्स आणि फोटोज टाकत असता सर?
>>>>>>
प्रेम..
धोनीवरचे प्रेम..
ते कोणाला काही सिद्ध करायला लिहीत नाही तर धोनीवरचे माझे प्रेम बोलत असते.
आणि असे प्रेम करोडो चाहते करतात त्यावर
“ ते कोणाला काही सिद्ध करायला
“ ते कोणाला काही सिद्ध करायला लिहीत नाही तर धोनीवरचे माझे प्रेम बोलत असते.” - सर, खरंच गेट वेल सून!
साहा हा धोनीपेक्षा चांगला
साहा हा धोनीपेक्षा चांगला कीपर होता हे मी बर्याच कीपर्स च्या मुलाखतींमधे वाचले-ऐकले आहे. धोनीचा लिमिटेड क्रिकेट मधला दणकाच असा होता की टेस्ट मधेही कीपर कोण हा प्रश्नच आपोआप मिटून गेला होता. परत कॅप्ट्न झाल्यावर नि २००७ चा कप खिशात घातल्यावर बाकीच्यांच्या नावावर काट मारली जाणे साहजिक होते. अॅस अॅ पॅकेज म्हणून धोनी नक्कीच इतर ऑप्शन्स पेक्षा उजवा होता ह्यात शंकाच नसावी. पण २०११ च्या आधीचा कप्तान धोनी नंतर टीपीकल बचावात्मक कप्तान झाला असे मला वाटते.
आज दुसर्या मॅच च्या वेळी
आज दुसर्या मॅच च्या वेळी समजा भारतीय टीम फक्त सद्यकालीन फॉर्म वर निवडायची झाली तर कोण येतील हे बघत होतो.
राहुल, शॉ, सूर्या, कार्थिक, पंत, पांड्या, चहल, अश्विन, नटराजन, भुवी, आवेश ? (बॅकप : गिल ? तेवाटीया ? श्रेयस ?)
एकदमच शामळू टीम वाटते.
साहा हा धोनीपेक्षा चांगला
साहा हा धोनीपेक्षा चांगला कीपर होता हे मी बर्याच कीपर्स च्या मुलाखतींमधे वाचले-ऐकले आहे
>>>>>
विनोद कांबळी हा सचिनपेक्षा चांगला फलंदाज होता हे मी बर्याच मुलाखतींमधे वाचले-ऐकले आहे
हे असे ऐकावाचायला मिळतेच
@ असामी,
@ असामी,
फॉर्मवरही काढायचे झाल्यास बुमराहला बाहेर ठेऊ नका. तो बिचारा एकटा पडल्यासारखे झाला. हेच आर्चर असता सोबतीला तर मात्र दोघांचे एकत्रित घातकता अजून वाढली असती. आणि बुमराह लगेच वरच्या लिस्टमध्ये आला असता.
तसेच दिपक चहर नाहीये सध्या. पण त्यालाही वर्ल्डकपचे तिकीट मिळेलच. त्याची फलंदाजी देखील जमेची बाजू आहे.
>>राहुल, शॉ, सूर्या, कार्थिक,
>>राहुल, शॉ, सूर्या, कार्थिक, पंत, पांड्या, चहल, अश्विन, नटराजन, भुवी, आवेश ? (बॅकप : गिल ? तेवाटीया ? श्रेयस ?)
मी पंत ऐवजी सॅमसनला घेईन आणि भुवी ऐवजी प्रसिध कृष्णाला!!
पण इथेपण ६व्या नंबर नंतर शेपूट सुरु होईल कारण एक अश्विन सोडला तर बाकी कुणाचाच बॅटींगमध्ये शून्य उपयोग आहे!!
त्यामुळे फक्त तेव्हढ्यासाठी शार्दूल ठाकूरला घ्यायला लागेल.
रिषभ पंत ला १००% आणि शार्दूल
रिषभ पंत ला १००% आणि शार्दूल ठाकूरला ५०% मॅच फी चा फाईन..... थोडक्यावर बचावले!!!
प्रवीण आम्रे ला मात्र १००% मॅच फी फाईन आणि एका मॅच चा बॅन!!
(मराठी माणसावर अन्याय होतोय..... यात केंद्राचा हात असेल काय?
)
कारण एक अश्विन सोडला तर बाकी
कारण एक अश्विन सोडला तर बाकी कुणाचाच बॅटींगमध्ये शून्य उपयोग आहे!!
>>>>
आश्विनचाही या फॉर्मेटमध्ये फलंदाज म्हणून तसा शून्य पॉईंट एक ईतकाच ऊपयोग आहे.
त्यापेक्षा दिपक चहरच्या फलंदाजीला मी जास्त वेटेज देईन. शार्दुलऐवजी त्याला खेळवता येईल. त्याची बॉलिंग जास्त चांगली आहे. तो पॉजिटीव्ह ॲप्रोच राहील.
पण यासाठी पांड्या त्याच्या गोलंदाजीसह संघात हवाच. थोडक्यात फिट हवा. बाकी त्याच्या क्षमतेबद्दल शंकाच नाही. अन्यथा संतुलन साधणे अवघड होईल. आणि जडेजाला देखील कंपलसरी खेळवावेच लागेल.
पण सध्या सचिन सेहवाग दादा युवी असे गोलंदाजी करू शकणारे फलंदाज भारतातून नष्टच का झालेत समजत नाही. जर नवीन फलंदाज शिकले गोलंदाजी तर डिमांड येईल त्यांना. जसे केदार जाधवला मधल्या काळात आलेला. त्यामागे आपल्या धोनीचा मोठा हात होता.
मला तर वाटते कोहलीनेच आता हात फिरवायला सुरुवात करावे. तो तसे करणार नाही ती गोष्ट वेगळी..
Pages