आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि भुवी ऐवजी प्रसिध कृष्णाला!!
>>>
ईथे शंकाच नाही. सध्या भुवीपेक्षा प्रसिद्ध कृष्णा कधीही पहिली पसंती. तो मिडल ओवरलाही येऊन विकेट काढायची क्षमता राखतो. या क्षमतेबाबत तो मला त्या फर्ग्युसनसारखा वाटतो. बॅटसमनला सरप्राईज करणारे दोन बॉल हमखास उसळवतोच तो..

अरे हो, आज क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस आहे. हॅपी बड्डे सचिन. बालपणीच्या ८०-९० टक्के क्रिकेटच्या आठवणी तुझ्यामुळेच आहेत Happy

विनोद कांबळी हा सचिनपेक्षा चांगला फलंदाज होता हे मी बर्‍याच मुलाखतींमधे वाचले-ऐकले आहे
हे असे ऐकावाचायला मिळतेच >> तुला ह्यात नि माझ्या वाक्यांमधे काय साम्य दिसले हे तुझे तुलाही माहिती.

“ उपेक्षितांचे अंतरंग” - आपण काही वाचत नाही असं सांगणार्या माणसाने एकदम श्री. म. माट्यांच्या पुस्तकाचा दाखला देणं म्हणजे हिंदी सिनेमातल्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या हीरोने अचानक इंपोर्टेड गाड्या चालवून, पियानो वाजवत सुरेल गाणं म्हणून, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं टेनिस पदक जिंकून दाखवण्यासारखं आहे. ‘हीच तर (सरांची) लीला आहे साहेब‘ Happy

मला अ‍ॅक्चुअली पियानो वाजवता येतो आणि मी वालचंदला असताना टेबलटेनिसमध्ये जिंकलो आहे.. त्यामुळे हा विषय नाट्यमय वळणावर संपला असे म्हणू शकतो Happy

एवढे हरूनही मुंबईच्या मॅचेस झटपट सोल्ड आऊट होतात च्यायला.
>>>>
मॅच बघायला जाणारे पब्लिक वेगळे असते आणि घरी टीव्हीवर आनंद लुटणारे वेगळे.
स्टेडियमची मौज घ्यायला जाणार्‍यांना फरक पडत नाही याचा. ते माहौल एंजॉय करायला जातात. टीव्हीवर बघणारे माझ्यासारख्या कैक जणांनी मुंबईच्या मॅचेस आवर्जून बघणे सोडले असावे. आजही या सामन्यासाठी माझा रविवारचा प्लान मध्ये काही बदल केला नाही. जेव्हा बाहेरून फिरून घरी आलो तेव्हा सामन्यात काही शिल्लकच नव्हते. पोलार्डला एक सतरावी की अठरावी ओवर चाचपडताना पाहिले आणि आत निघून गेलो.

राहुल, शॉ, सूर्या, कार्थिक, पंत, पांड्या, चहल, अश्विन, नटराजन, भुवी, आवेश ? (बॅकप : गिल ? तेवाटीया ? श्रेयस ?)
>>>१. रोहित (फुकट जागा खाऊ),२. राहुल, ३. विराट (फुजाखा ),४. श्रेयस ५. सूर्यकुमार ६. हार्दिक ७. शार्दूल ८. दीपक चाहर ९. कार्तिक १०. बुमराह ११. चहल १२. शमी १३. अय्यर १४. जडेजा १५. नट्टू /आवेश / उमरान / दुबे / पन्त इ.
आऊट ऑफ फॉर्म असल्येल्या रोहित आणि विराट ला डच्चू दिल्यास जिंकण्याची संधी अजून वाढेल.

त्या लिस्ट मधे गडबडी मधे हर्शल पटेल राहून गेला होता. आवेशच्या जागी पटेल. लोकहो माझी लिस्ट फक्त आयपील च्या फॉर्म वर आहे.

आज धोनीचा ओव्हरकॉन्फिडेन्स नडला ..त्याला वाटलं पुन्हा उनाडकट असेल. उनाडकट एकाच आहे जो मुंबईला हरवू शकतो.

खरंय.. अश्या परीस्थितीतही फिनिश करायचा कॉन्फिडन्स ओवरकॉन्फिडन्स धोनीच दाखवू शकतो Happy
आयपीएलमध्ये लास्ट ओवर २४ चा सर्वात मोठा फिनिश धोनीचाच आहे हे आज या मॅचच्या निमित्ताने समजले

बुमराह ह्यावेळी विशेष नाही खेळत आहे. उमरान एक नंबर. चान्स द्यायला हवा त्याला. आवेश पण चांगला आहे. हाऊ अबाऊट खलिल आणि नटराजन?
शिवम दुबे पण भारी आहे बॅट्समन पण आज फारच बोअर आउट झाला. आधीच्या बॉल्स ना अगदी जाणवत होतं फूटवर्क नाही म्हणून. गेलाच लगेच.
बटलर ला घ्या रे आपल्यात ब्राऊनवॉश करुन. Lol ही सगळी ओवरसीज मंडळी आता आपलीच वाटतात. Happy

आणि हो, कॅप्टन कोणच्या बोल्या लावल्या की नाही? मला तर कोणी कॅप्टन मट्रेल दिसत नाही. श्रेयस?

येता २०-२० आणि ५०-५० वर्ल्डकप कप्तान शर्माच..
मग तो निवृत्त होईल.
कदाचित कोहली सुद्धा..
त्याआधीच दोघांवर बाहेर जायची वेळ येऊ नये..
या दिडदोन वर्षात कप्तानपदाच्या शर्यतीत अजून समीकरणे बदललेली असतील.
कदाचित तीन फॉर्मेट प्लेअर म्हणून राहुल पुन्हा सगळ्यात पुढे ऊभा असेल.

आयपीएल च्या फॉर्मवर टीम निवडण्याचा प्रकार एकदा केला होता सिलेक्शन कमिटीने (युसूफ पठाण, सौरभ तिवारी वगैरे खेळले होते). पण ते बॅकफायर झालं होतं.

आज सीएसके ला १२ बॉल्स मधे ३५ रन्स हवे होते. पण समोर उनाडकट नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. (डिफेन्स रेस्ट्स इट्स केस! Happy )

१२ बॉल ३५ रोज रोज होत नाहीत Happy
आणि झाले असते तर आज रिशी धवनला शिव्या होत्या Happy
बाकी जडेजाने स्वत: न येता धोनीला का नाही पाठवले ?

“ आणि झाले असते तर आज रिशी धवनला शिव्या होत्या” - अच्छा, म्हणून नाही केले होय? मग बरोबर आहे. Proud

“ बाकी जडेजाने स्वत: न येता धोनीला का नाही पाठवले ?” - कात्रज चा घाट झिंदाबाद!! Lol

अरे काय उनडकटचे रॅगिंग सुरु आहे इथे Lol मी चुकून बोललो होतो की त्याला घ्यायला पाहिजे पण ते ह्या डिबाकल च्या आधी होते हे नमूद करु इच्छितो. Lol

बॅकफायर का झालं फेफ? ओन्ली क्युरियस.

“ बॅकफायर का झालं फेफ? ओन्ली क्युरियस.” - डिटेल्स शोधायला लागतील बुवा, पण आयपीएलच्या सुरूवातीच्या काळात सुदीप त्यागी, अशोक दिंडा, सौरभ तिवारी वगैरे पब्लिक ला टीममधे खेळवलं होतं आणि कुणीच आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी चमक दाखवू शकलं नव्हतं.

“ अपेक्षा आवडल्या” - ना, मुन्ना ना! असं नाही घसरायचं. मुद्दा नाही भरकटवायचा.

उनाडकटच्या बिनडोक बॉलिंग ला नावं ठेवल्यामुळे धोनीचं महत्व कमी होत नाही.

ओ ओके. फॉर्म शेवटी फॉर्म असतो आणि आयपिएल चा स्तर कुठल्याही दृष्टिनी कमी नाही एक खेळपट्टी/वातावरण हा मुद्दा सोडून.
ट२० स्क्वाडला तरी चाललं पाहिजे आयपिएल फॉर्म बघून निवड केलेली. बाकी फॉरमॅट वेगळे आहेत आणि त्याला लागणार्‍रा स्ट्रेंत्स पण वेगळ्या, त्यामुळे समजू शकतो.

ईतर कोणी एकदा असा काही पराक्रम केला की ते लक्षात राहते.
धोनीबाबत जेव्हा जमत नाही तेव्हा ते लक्षात राहते.. आणि अपेक्षाही किती तर त्याने स्वतःचाच लास्ट ओवर सर्वाधिक (२४) धावा विक्रम मोडावा..
असो, तुम्ही मला धोनीचे पराक्रम आणण्यास भाग पाडणारच तर...
पण ते आता विकेंडलाच शक्य होईल.. आणि झाल्यास वेगळाच धागा काढूया.. तिथे सारे मुद्दे कव्हर केले जातीलच. तसेही चार प्रतिसाद मावणारा विषय नाही धोनी Happy

Pages