Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटते आयपीएल समितीने
मला वाटते आयपीएल समितीने मुंबई चेन्नई व्यतिरिक्त इतर सर्व संघाना सांगितले नाही दिसत की ह्यावेळी तळाच्या चार संघात प्लेऑफ होणार आहे.
दोन्ही संघ तळाचा पहिला संघ होण्याच्या स्पर्धेत दिसले काल!
पंजाबची टीम कागदावर मजबूत
पंजाबची टीम कागदावर मजबूत दिसते. अग्रवाल, बेअरस्ट्रो अश्या टॉप ऑर्डर बॅटसमनच्या फॉर्मचा फटका बसलाय असे वाटते. पण आज जिंकायला हवी. पॉईंटटेबल रोचक होईल.
बेअरस्ट्रो चिडला १० बॉल ३३
बेअरस्ट्रो चिडला
१० बॉल ३३
अरे खत्तरनाक पिक करत आहे बॉल
अरे खत्तरनाक पिक करत आहे बॉल बेअरस्टो!
फुल्ल धोपटरिये रे बाबा! २००
फुल्ल धोपटरिये रे बाबा! २०० च्या पुढे गेले तर जड जाणार आहे आर सिबि ला. आधीच कोहली वगैरे डाऊन इन द डंप्स आहेत.
गेला! अगरवाल गेला.
हसरंगाने गेममध्ये ठेवला
हसरंगाने गेममध्ये ठेवला बेंगलोरला..
लिव्हिंगस्टन अफाट आहे!!
लिव्हिंगस्टन अफाट आहे!!
बटलरला काय झाले एकदम.
बटलरला काय झाले एकदम. क्लासिकल खेळत होता तोपर्यंत खतरनाक होता. गेल्या काही गेम्स मधे क्यूटबाजी करायला जात होता खूप. आणि लौकर आउट झाला.
परवा तो पोलार्ड कॅच सुटल्यावर रन आउट झाला ती विकेट इंटरेस्टिंग वाटली. पण हायलाइट्स मधे नीट कळाले नाही.
आजकाल किमान हायलाइट्स मधे तरी बाउण्ड्रीला लोकांनी बॉल अडवलेत वगैरे फारसे दिसत नाही. फारसे अॅण्टिक्स न करता फोर कशी अडवायची याचे पाजी साहेबांनी अनेकदा प्रात्यक्षिक ८० च्या दशकात दाखवलेले आहे. इथे पाहा. ३० यार्डच्या आतून पळत सुटला आहे तो आणि "इंटेण्ट" स्पष्ट आहे. एकदम बॉस लेव्हल फिल्डिंग आहे. अजून आहेत क्लिप्स अशा. सापडल्या की देइन. एक तर बहुधा स्क्वेअर लेग वरून पार मिड ऑन पर्यंत सीमारेषेवरून पळत पळत बॉल बाउण्ड्रीच्या जस्ट आधी उचलून एकाच अॅक्शन मधे थेट बोलरच्या हातात थ्रो केल्याची क्लिप आहे. ते ही दुसर्या बाजूने स्वतःचा स्पेल सुरू असताना. शोधतो.
बाय द वे ही वरच्या क्लिप मधली मॅच भन्नाट आहे. चार स्लिप्स लावून कपिल ने बोलिंग केली होती. टोटल तंतरली होती किवीज ची.
लिव्हिंगस्टन ची करईयरमधली
लिव्हिंगस्टन ची करईयरमधली दुसरी इनिंग खतरनाक आहे. आधीच्या काही लीग मधे बघितलेला - गाईल नि बटलर ला लाज वाटेल असा मारत होता. आयपील मधे बराच उशिरा जागा झालाय.
तिलक वर्मा भयंकर इंप्रेसीव्ह आहे. कसला पॉईज होता काल, सगळे प्रेशर सोक केले. १९ वर्षांसाठी भयंकर मॅच्युअरीटी आहे.
भारी फा. बघतो नक्की. अजून
भारी फा. बघतो नक्की. अजून लिंका दिल्यास तर ब्रेकफास्ट स्पोन्सर करेन.
_+१ असामी, तिलक वर्मा बद्दल! मला वाटलं आता गडगडले एम आय वाले म्हणून बंद केले मॅच. पण छान खेळला. ओवरॉलच भारी, नॉन रिस्की टाईप गेम आहे त्याचा.
कोहली इज स्ट्रगलिंग लाईक हेल!!!
गडगडगडगडगड.......
गडगडगडगडगड.......
तिलक वर्मावर विश्वास होताच,
तिलक वर्मावर विश्वास होताच, त्याच्या दुसर्याच सामन्याला म्हटलेले हे ईंडियाच्या टीममध्ये येणारे टॅलेंट दिसतेय. काल रोहीत शर्माही बहुधा म्हणाला की हा पोरगा भारतासाठी लवकरच खेळेल.
बटलर हा संजूसारखा आहे. किंवा संजू हा बटलरसारखाही बोलू शकतो. बॉल बॅटवर जेव्हा सप्पकन येतो तेव्हा हे दोघे रपकन बॉल सीमापार धाडतात. बॉल टाईम होत असताना हे कमालीचे अविश्वसनीय खेळतात. स्लो पिचवर मात्र ते तितके घातक राहत नाहीत किंबहुना तो एक्स फॅक्टर तितका प्रभावी राहत नाही. संजूचे तर स्लो पिचवर पेशन्सही कमी पडतात. आयपीएल जशी पुढे सरकत जाते तसे पिच तुलनेत स्लो होतात. संजूला तर बरेचदा धमाकेदार सुरुवात करून नंतर मागे पडताना पाहिलेय ते याच कारणामुळे. त्यात तो अॅडजस्ट करायला मागत नाही. बटलर मात्र बॉल टाईम होत नसेल तर जुळवून घ्यायला वेळ देतो.
असो, या शेवटच्या टप्यात आता कोणत्या टीम लय पकडतात हे बघणे रोचक.
वर म्हटल्याप्रमाणे पंजाब भले या सामन्याआधी आठव्या क्रमांकावर होती आणि कोणाच्या गिणतीतही नसली तरीही तो संघ कागदावर मजबूत आहे. डार्क हॉर्स ठरू शकतात.
बाई दवे,
या अर्शदीपला न्या वर्ल्डकपला. बुमराह अर्शदीप मजा येईल डेथ ओवर बघायला
आर्षदिप भारी आहे...
आर्षदिप भारी आहे...
उमरान मलिक तिसरी विकेट
उमरान मलिक तिसरी विकेट
त्याच्या पेसला घाबरून बिलकुल कंट्रोल नसल्यासारखे हवेत मारत आहेत.
आजही बटलर लवकर गेला.
आजही बटलर लवकर गेला.
आश्विनला मात्र आज पुढे पाठवले नाही. गेल्या सामन्यात त्याने तिसऱ्या नंबरवर येत अर्धशतक झळकावले होते तरीही. कारण त्यात फायरपॉवर नसल्याने ते रन्स पुरले नव्हते. आश्विनचे काम मारायचे म्हणून समोरचाही निवांत राहीलेला.
वर्ल्ड कपमधे रोहित ला बोल्ट
वर्ल्ड कपमधे रोहित ला बोल्ट पासून वाचवायचे म्हणून ओपन करू दिले नव्हते - आज राहुल ने तसेच केले नॉन स्ट्राईकिंग ला राहून. तेंव्हा नि आताच्या रीअॅक्शन केव्हढ्या वेगळ्या होत्या
आज जैस्वाल, संजू नि पड्डीकल ला खेळताना बघणे आनंद होता. पॉवर गेम न खेळताही केव्हढ्या सहजपणे रन्स निघत होते.
राहुल डीकॉक वगळता आज लखनऊ कडे
राहुल डीकॉक वगळता आज लखनऊ कडे नऊ जण बॉलिंग करणारे होते. याच टीममध्ये कदाचित ते एखादा बॅटसमन वाढवू शकतात. बॅटींगला डेप्थ कमी वाटली. होल्डर सातवा होता आणि तो ही या फॉर्मेटचा भारी फलंदाज नाहीये. मागच्या चौघा बॉलरमध्ये तेही नव्हते.
अर्थात राहुल नाही खेळला तर हे जाणवते. त्यात वन डाऊनला बदानीला उतरवून त्याचा बोल्टसमोर बळी दिला असे आज वाटले. हूडाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यानेच वन डाऊन यायला हवे होते.
एखादे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही आधी जिंकता तेच कॉम्बिमेशन अखेरपर्यंत ठेवायला हवे हे गरजेचे नाही. तेव्हाच्या फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे फॉर्म बदलले तर त्यानुसार संतुलन साधायला बदल करायला हवेत.
राजस्थानने आज बटलर गेल्यावरही आणि ठराविक अंतराने विकेट जात असूनही आक्रमक खेळणे कायम ठेवल्याचा फायदा झाला. शेवटी फलंदाजी संपूनही आश्विन बोल्टने हातपाय झाडून पुरेश्या धावा मिळवल्याच. पुन्हा आश्विन वन डाऊनचा प्रयोग न करतील तरच चांगले.
उद्या आयपीएलचा लास्ट वीक सुरू
उद्या आयपीएलचा लास्ट वीक सुरू होईल.
गुजरात पहिल्या नंबरवर फिक्स झाली आहे.
सोबत राजस्थान आणि लखनऊ या टीम पहिल्या चारात म्हणजे प्लेऑफला जवळपास फिक्स झाल्यात. कारण त्यांचा रनरेट पाहता आता कुठल्या दोन टीमने त्यांना मागे टाकणे फार अवघड आहे.
त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जाणारी चौथी टीम कोण हे बघणे शिल्लक आहे. तसेच पहिल्या दोनात गुजरातसोबत कोण हे ठरायचे आहे.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीलाही अजून झेप घेत थेट पहिल्या दोनात येण्याची संधी आहे. त्याचवेळी उद्या पंजाबशी हरल्यास त्यांच्या प्लेऑफला जायच्याही आशा कमी होतील.
लास्ट वीक रोचक होणार आहे.
नेहमीसारखा....
दिल्ली पंजाब करो मरो सामना
दिल्ली पंजाब करो मरो सामना
वॉर्नर पहिल्याच बॉलला बाद
मार्शचे रबाडाला दोन उत्तुंग षटकार
येडे चाले खेळणाऱ्या. डोमेस्टीक गाजवणाऱ्या आणि आयपीएलला गडबडणाऱ्या सरफराजचा अचानक काऊंटर अटेक. ५ ओवर ५० धावा..
पण अर्शदीपच्या लागोपाठ दोन विकेट
त्यातला दुसरा नो बॉल असल्याने ललितला जीवदान..
आता आज चुम्मा खेळायला हवा.. १७० पर्यंत स्कोअर झाल्यास धमाल सामना होणार..
पुढच्या सिरीजमधे रोहित, राहुल
पुढच्या सिरीजमधे रोहित, राहुल, कोहली, पंत नि बुमरा ला विश्रांती देणार असे सर्वत्र वाचायला मिळतेय. त्या जागी धवन नि पांड्या ह्यांना कप्तान बनवल जाईल असेही अंदाज वाचले. हे खरे असेल तर उरलेल्या चार जणांसाठी गायकवाड, सॅमसन, अय्यर नि कार्थिक असतील असे वाटतेय. ते फॉर्ममधेही आहेत नि आधी ईयरमार्क केले गेले आहेत. बॉलिंङ मधे मात्र उमरान, अर्शदीप नि मोहसीन ह्यांना संधी मिळते का बघायला हवे. विशेषतः शेवटच्या दोघांना तरी नक्की च मिळायला हवी.
पॉवरप्लेच्या धडाक्यानंतर
पॉवरप्लेच्या धडाक्यानंतर पंतचे चौथे न येणे दिल्लीला नडले. १०-१५ रन्स कमी पडले.
तरीही पिच असाच स्लो राहिला आणि दव किडे करायला नाही आले तर गेम क्लोज जाणार..
फनी, मला तर वाटलं आता सगळे
फनी, मला तर वाटलं आता सगळे गेम क्लोजच जाणार फॅक्टर्स काहीही असले तरी.
सगळ्याच टीम्स स्पर्धेच्या या
सगळ्याच टीम्स स्पर्धेच्या या टप्प्यावर बॅटींग ऑर्डर मध्ये प्रयोग का करतायत?
काल पण हुडाला सोडून बदोनीला वन डाउन पाठवण्यावर पण फारच टीका झाली..... आता आज मयंक कुठल्या नंबरवर येतोय ते बघू!!
फनी, मला तर वाटलं आता सगळे
फनी, मला तर वाटलं आता सगळे गेम क्लोजच जाणार फॅक्टर्स काहीही असले तरी
>>>>
नाही, काही गेम मोठ्या फरकाचेही होतात, जेणेकरून रनरेटची दरी मिटेल. असे सामने नुकतेच दोनेक झाले आहेत
"काल पण हुडाला सोडून बदोनीला
"काल पण हुडाला सोडून बदोनीला वन डाउन पाठवण्यावर पण फारच टीका झाली.." - मला वाटलं की हुड्डाला स्पिनर्ससाठी राखून ठेवण्याचा प्लॅन असावा. पण एनीवे, तो फसला. मला वाटतं आज मयंक चौथाच येईल.
मला वाटतं आज मयंक चौथाच येईल.
मला वाटतं आज मयंक चौथाच येईल. >> तो गेले एक दोन सामेन खालीयेतोय. कारण बेअर स्ट्रो वर चांगला सुटतोय खालच्या पेक्षा. पंजाब सेल्फ डीस्ट्र्कट मोड मधे आहे.
मयंक कुठेही आला तरी यंदा
मयंक कुठेही आला तरी यंदा फ्लॉपच आहे. फक्त तो शर्मा कोहली नसल्याने त्याची तितकी चर्चा नाही.
आयपीएल स्पेशल रन वाटप चालू
आयपीएल स्पेशल रन वाटप चालू आहे. राहुल चहरला सगळे एकसारखेच बॉल देत फोर सिक्स मारायला देत आहेत. कुलदीपची नेहमीसारखी एक बाकी ठेवलीय.
"पंजाब सेल्फ डीस्ट्र्कट मोड
"पंजाब सेल्फ डीस्ट्र्कट मोड मधे आहे." - पंजाब नेहमीच सेल्फ-डिस्ट्रक्ट मोडमधेच असतात. नेहमीच सगळं असून, काहीतरी राहून गेल्यासारखे टूर्नामेंट खेळतात.
चला जिंकली दिल्ली फायनली!
चला जिंकली दिल्ली फायनली!
सुरुवातीला लक दिल्लीच्या फेव्हरमध्ये नव्हते. पण शांत डोके ठेऊन काढली मॅच चुम्माने! (असे फलंदाजीलाही ठेवेल तर बरे होईल.. नाहीतर जाऊ दे.. आहे तसाच मनोरंजक)
पॉवरप्लेनंतर सलग सात ओवर त्याने अक्षर-कुलदीप जोडीला दिल्या. दोघांच्या ओवरही संपवून टाकल्या आणि सोबत गेमही संपवून टाकला.
Pages