जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
मुळात रजिस्ट्रेशन करताना
मुळात रजिस्ट्रेशन करताना ओटीपी , चित्र , केपचा , पिन इतका गोंधळ का तेच समजेना
रजिस्ट्रेशन केल्यावर सुई टोचताना आयडी बघून कळेलच ना
हे सर्व बहुधा कोणी स्क्रिप्ट
हे सर्व बहुधा कोणी स्क्रिप्ट रन करून स्लॉट घेऊन ते बेकायदेशीर रित्या महागात विकू नये म्हणून असावे.
म्हणजे रॅमिडिसीवीर 1700 चे 45000 ला गेले तसे फुकटचे स्लॉट कोणी 10000 ला विकू नये म्हणून असेल.
पण कॅपचा आणि ओटीपी दोन्हीची गरज नव्हती.नुसता ओटीपी चालला असता.
स्क्रोल म्हणतंय - केंद्र
स्क्रोल म्हणतंय - केंद्र सरकारने लसीकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण लस उत्पादनातला ५० % वाटा केंद्रासाठी असेल तसंच प्राधान्याने केंद्राला मिळेल.
उरलेल्या ५०% तलेही अर्धेच राज्य सरकारला आणि अर्धे खाजगी इस्पितळांना.
म्हणजे एकूण उत्पादनातला २५% इतकाच वाटा राज्यांना १८-४५ साठी मिळणार आहे. १९ एप्रिलच्या सूचनेत ही २५% बाब नव्हती.
Out of the 50% quota allotted to each state, the division is made on 50%/50% basis. In other words, from out of the 50% allotted to the state, 50% will go to the State…and the balance 50% will go to the private sector based upon the contracts between private sector and vaccine manufacturers.”
ही तरतुद लस निर्मात्यांच्या फायद्यासाठी असेल का? पूनावाला म्हणाले होते - राज्यसरकारे किंमतींबाबत एवढा कालवा का करताहेत? त्यांना लस विकत घेणं अनिवार्य नाही. त्यांना नको असेल (परवडत नसेल्?) तर त्यांनी लस घेतली नाही तरी चालेलच की. लोकांची काळजी घ्यायला प्रत्येक राज्यातली पुरेशी खाजगी इस्पितळं आहेत.
सेरमचे दर केंद्रासाठी १५० राज्यासाठी ३०० (४०० चे उदार अंतःकरणाने कमी केलेले) आणि खाजगी इस्पितळांसाठी ६००
भारत बायोटेक हेच दर १५० -६०० -१२००.
आतापर्यंत ज्या राज्यांनी १८-४५ साठी लसीकरण सुरू केलं होतं ते केंद्राकडून ४५+ साठी मिळणार्या कोट्यातून वापरून केलं असावं. अनेक राज्यांनी अद्याप हे सुरूही केलेलं नाही.
याबद्दलचा हा एक ट्विटर
याबद्दलचा हा एक ट्विटर थ्रेड
https://threader.app/thread/1391811766112464900
स्लॉट कसाविकणार ?
स्लॉट कसाविकणार ?
मी रजिस्ट्रेशन केले
तर मीच डोस टोचून घ्यायला जाणार ना ?
माझे हॅकिंग ज्ञान फार नाही
माझे हॅकिंग ज्ञान फार नाही
पण इ-सिम्स किंवा काही सॉफ्टवेअर ने हे करणे थोड्या ज्ञानासह शक्य आहे.
काळजी करू नका... केंद्र सरकार
काळजी करू नका... केंद्र सरकार नावारुपाला जागुन अजुन बर्याच कोलांटउड्या मारून आधिचे नियम बदलून नागरिकांचे गळे कापले जातील असे नवे नियाम जारी करत राहील.
बाकी ज्यांना स्लॉट मिळाला त्यांनी आपणाला नक्की लस टोचली आहे का याची खातरजमा करावी... नाहीतर नुसती सुई टोचून लस मिळाली असं असं व्हायला नको.... काही जणांना लस न मिळताच मोदीचा फोटो असलेलं लस मिळाली असं सर्टिफिकेट आलं असं ऐकलं. कुणाला असा अनुभव असेल तर जरूर सांगा.
ते वाक्य "मोदीजीने किया है तो
ते वाक्य "मोदीजीने किया है तो कुछ सोच के ही किया होगा" या चालीवर वाचता येतंय
माझं वाक्य तसं वाटतंय? तश्या
iमाझं वाक्य तसं वाटतंय? तश्या सुरात लिहिलेलं नाही.
हॅकिंग शक्य खरोखरच आहे हो.
आता सरकार ने इतका विचार करून हजार ओटीपी नि कॅपचे टाकले की कोणतं रेडीमेड मॉड्युल पटकन विकत घेतल्याने हे सर्व आपोआप आलं माहीत नाही. बऱ्याच सरकारी साईट आणि अगदी महत्वाच्या साईट टार्गेट युजर चा विचार न करता आहे ते कुठूनतरी उचलून अतिशय चक्रम सारख्या बनवलेल्या असतात.हे त्यातलंच एक असेल.
हो. असू शकेल.
हो. असू शकेल.
लस न घेताच लस मिळाल्याचं मार्क होऊ नये म्हणून 4 digit security code introduce केला आहे. Urban clap, ola वाल्यांना द्यावा लागतो तसा .
महाराष्ट्रातील तरुण
महाराष्ट्रातील तरुण सेलिब्रिटी व इतर माणणीय लोकांनी लस घेऊन झाली असावी बहुधा. मग 18 -44 ग्रुपचे लसीकरण थांबून ठेवायला हरकत नाही.
आता पुरवठा होईल त्याप्रमाणे वयस्कर व दुसरा डोस असलेल्यांकडे लक्ष देतील.
त्यातही सर्व पक्षांतील खास खास लोकांसाठी वेगळी सोय असेल हे निश्चित.
https://www.punekarnews.in
https://www.punekarnews.in/pune-no-slot-booking-for-18-44-years-group-at...
केरळने केली कमाल जेवढ्या लसी
केरळने केली कमाल, जेवढ्या लसी मिळाल्या त्यापेक्षा ८७ हजार अधिक लोकांना दिले डोस
मोदी जबाबदार आहेतच कधीतरी
मोदी जबाबदार आहेतच कधीतरी तुमची जबाबदारी सुध्दा सांगाल की नाही ? | Bhau Torsekar | Pratipaksha : https://www.youtube.com/watch?v=sValfnA--h0
आरोग्य सेतु मध्ये फुल रेड
आरोग्य सेतु मध्ये फुल बुक झालेले स्लॉट लाल कलर मध्ये दिसतात का ?
मी आज आरोग्य सेतु पहिल्यांदा वापरले .
तर त्यामध्ये cowin मध्ये फुल झालेले स्लॉट ग्रीन दिसत आहेत फक्त capacity च्या तिथे 0 आहे आणी बूकिन्ग साठी proceed करा असे केल्या वर पुढचे confirm appointment असे ही येत आहे.
तर जर अशी appointment घेतली तर ती valid होइल का? कारण cowin मध्ये तर फुल रेड दाखवत आहे?
रंगाला फार अर्थ नाही.
रंगाला फार अर्थ नाही.
आकड्याला अर्थ आहे.
कोविन साईटवर असलेल्या जागा पिवळ्या दिसतात.
आरोग्य सेतुवर 0 जागांना पण कन्फर्म बुकिंग ला पुढे जाऊन अगदी शेवटच्या टप्प्यात एरर येते.हा बग आहे.
मी पण बरेच दिवस असे शून्य वाले स्लॉट बुक करायला जाऊन वेळ घालवलाय.
मुंबैत नगरसेवकांच्या
मुंबैत नगरसेवकांच्या हट्टासाठी वॉर्डा वॉर्डात उघडलेली लसीकरण केंद्रं चालवणं पहिल्याच आठवड्यात कठीण होतंय.
या केंद्रांसाठीही ऑनलाइन बुकिंगच करायचंय, त्यामुळे स्थानिक लोकांना ते मिळेलच असं नाही. जास्त केंद्र उघडल्याने प्रत्येक ठिकाणी सेट अप चा खर्च इत्यादीने नक्की काय साध्य होईल?
ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनिवार्य असूनही आमच्या नगरसेवकाचा माणूस विभागातील लोकांच्या लशीकरणाचे तपशील गोळा करतोय.
सेलिब्रिटीज व लक्ष्मीपुत्रांनी सहकुटुंब सह परिवार + नोकरवर्ग लशी घेतल्यात. लसीकरण केंद्रातल्या ऑपरेटर्सना लोकांना मध्ये घुसवायची सोय असावी. आधीही २५% वॉक इन होतंच.
ओके धन्यवाद mi_anu . मी पुढे
ओके धन्यवाद mi_anu . मी पुढे बूकिन्ग पुढे कन्फर्म केले नाही त्यामूळे error चे काही कळले नाही.
आरोग्य सेतु मध्ये बूकिन्ग available झाले कसे कळते.? कारण cowin मध्ये असलेली काही केंद्रे आरोग्य सेतु मध्ये दिसत नाही आहे म जेंव्हा स्लॉट open होतात तेंव्हाच ती दिसतात का?
लसीकरण केंद्रातल्या
लसीकरण केंद्रातल्या ऑपरेटर्सना लोकांना मध्ये घुसवायची सोय असावी>>> हे बघितले आहे मावशीला लस द्यायला गेलेलो तेव्हा. ऑपरेटर लोक स्वतःच्या माहितीतरील लोकांना प्राधान्य देत होते.
लसीकरण केंद्रे उघडतील पण लसी कुठून आणतील नगरसेवक ?
आजच्या मटात 45 प्लस च लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देणार अस सांगितले आहे.
अमुपरी, 18-44 ची केंद्रे करंट
अमुपरी, 18-44 ची केंद्रे करंट दिवस पूर्ण बुक असल्याने आणि उद्याचे बुकिंग उघडले नसल्याने दिवसभर आरोग्य सेतुवर दिसणार नाहीत उद्या च्या तारखेला.ही बुकिंग दिसायला चालू संध्याकाळी होते, जेव्हा करंट डे चे लसीकरण पूर्ण होऊन उद्या चे स्लॉट उघडायला लागतात.सकाळ 10 नंतर आणि दुपार चा व्ह्यू अत्यंत नीरस दिसेल.करंट बुकिंग ची वेळ चालू असताना स्लॉट कॅन्सल करणारे अगदीच कमी.
संध्याकाळी 7 ला पाहिल्यास कोविन आणि आरोग्य सेतुवर हालचाल दिसेल.जिल्हा आणि पुणे ने सर्व केंद्र जागा पाहत राहा.
आपल्याला जिथे पटकन बुकिंग चा कम्फर्ट आहे ते माध्यम वापरा, काही जणांना मोबाईल ऍप वरून पटकन जमेल काहींना थेट कोविन साईट डेस्कटॉप वरून.
(सध्याच्या महाराष्ट्र घडामोडींनुसार 18-44 बॅक सीट ला आहे.त्यामुळेही कदाचित केंद्रे कमी दिसत असतील.)
मी वाचलं त्यानुसार १८-४५ साठी
मी वाचलं त्यानुसार १८-४५ साठी कोवॅक्सीन नाही. तो हिस्सा ४५+ दुसरा डोस पूर्ण् करण्यासाठी.
कोव्हिशील्ड १८-४५ . मुंबैत आता १० केंद्रे आहेत. मालाड गोरेगावमध्ये एकेक केंद्र आहे.
ओके धन्यवाद अनु . आमचे पुणे
ओके धन्यवाद अनु . आमचे पुणे केंद्र नाहिये. आमच्या कडे स्लॉट ओपन होण्याची ठराविक वेळ नाहीये हाच मेन मुद्दा आहे बूकिन्ग न होण्याचा.
एके दिवशी सकाळी 10 एके दिवशी दुपारी 12 2 कधी संध्या कळी 4 कधी रात्री 8.45 कधी ही open हौतात. मी रोज कैलेंडर वर लिहुन ठेवत आहे साधारण कधी open झाली असतिल. प्रत्येक दिवसाची वेळ वेगळी आहे
मुंबै मनपाच्या ट्विटरवर काल
मुंबै मनपाच्या ट्विटरवर काल व परवा रात्री १ , २ वाजता अपडेट येत होते. यांचं बॅक ऑफिस रात्रीही काम करतंय.
ओह.कोणता एरिया आहे?
ओह.कोणता एरिया आहे?
कदाचित आजचे लसीकरण शेवटचा स्लॉट संपल्यावर नो शो वाल्या लस चा ताळेबंद करून त्यानुसार नेक्स्ट डे चे उघडत असतील.
नोटिफिकेशन वाल्या साईट वर पण नाव टाकून ठेवा.बऱ्याच नोटिफिकेशन साईट आहेय सध्या.
ही एक
vaccinehunt.in
कोव्हिशील्ड १८-४५ >>> ज्या 45
कोव्हिशील्ड १८-४५ >>> ज्या 45 प्लस लोकांनी कोव्हीशिल्ड घेतलीये पहिल्या डोस साठी त्यांना दुसरा डोस पण कोव्हीशिल्डचा घ्यावा लागणार . त्याच काय ?
हे दिवसेंदिवस फार गोंधळाच होऊ लागलंय.
नोटिफिकेशन वाल्या साईट वर पण
नोटिफिकेशन वाल्या साईट वर पण नाव टाकून ठेवा.बऱ्याच नोटिफिकेशन साईट आहेय सध्या >>
ही सर्व्हिस PAYTM ची पण आहे. बऱ्यापैकी accurate आहे..
कदाचित आजचे लसीकरण शेवटचा
कदाचित आजचे लसीकरण शेवटचा स्लॉट संपल्यावर नो शो वाल्या लस चा ताळेबंद करून त्यानुसार नेक्स्ट डे चे उघडत असतील. ((((
असे नाहिये एका दिवशी 2 दिवसाचे ही स्लॉट open होतात. म्हणजे आज 11 तारीख आहे तर आजच 12 तारखचे बूकिन्ग येते आणी 13 तारखे चे ही. काल तर नेक्स्ट डे चे बूकिन्ग सकाळी 10 वाजता ओपन झाले.
कधी कधी मला वाटते ओळखीच्या लोकाना सांगून मग बूकिन्ग ओपन करतात.
Vaccinehunt etc सेफ आहे का?
पेटीएम वाल्यानी ही सेवा चालू
पेटीएम वाल्यानी ही सेवा चालू करणं 'आमच्याकडे नारळ, कोकमे, परकर व साबण मिळतील' या पाटीईतकंच विनोदी आहे
पण त्यांना काही न काही करावं लागणार होतंच परत वर यायला.
(मला माहित नाही अमुपरी, सध्या सगळंच केव्हाही कसंही उघडतंय असं दिसतं.स्थानिक पेपरवर लक्ष ठेवा.)
ओके anu . जास्त केंद्रे
ओके anu . जास्त केंद्रे उघडल्यावरच आता ट्राई करणार आहे. पण काल divya ने टिप्स दिल्या होत्या म्हणून आज aarogyasetu ट्राई करत आहे
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/technology/news/story/changes-in-cowin-app-gov...
Changes in CoWin app, govt restricts vaccine slot info to fight bots and alert services
The government of India has put a restriction for third parties on the access to real-time data on vaccine slots across the country. The move comes as several new portals make use of this data to notify users of vaccine slot availability
Pages