भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.

."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.

....

Group content visibility: 
Use group defaults

हो अनु मी पण आई चे मागच्या वीक मध्ये बूकिन्ग केले तेंव्हा captcha नव्हता. वेळ जातो त्यामूळे आणी मोबाइल मध्ये टाइप करणे अवघड.
197 जागा शिल्लक होत्या आणी मला बूकिन्ग मिळवता नाही आले.
आपल्या कडे असलेल्या मदतनीस ना किन्वा आपल्या आजुबाजू च्या लोकाना ज्याना ऑनलाइन बूकिन्ग करता येत नाही त्याना मदत केली पाहिजे बूकिन्ग ला.
पण बूकिन्ग easily available नसल्या मुळे हे अवघड आहे. कारण दरवेळी बूकिन्ग करताना अर्धा दिवस वाया घालवावा लागतो तरी मिळेल का नाही काही सांगता येत नाही.

अमुपरी , captcha भरता न येणे माझ्या बाबतीत पण झालं . मी तर लॅपटॉपवरून करत होते. भरता न येणे , भरला तरीही चूक दाखवणं असे प्रकार झाले. फायनली झालं तेव्हा this vaccination center is already booked अशी पाटी झळकली Angry
Give up करण्यामागे हे ही कारण आहे Sad
18 ते 44 लोकांनी आरामात जून जुलैची वाट बघावी लसीकरणसाठी

हो ही कॅपचा भानगड नव्हती डायरेक्ट कन्फर्म बटन क्लिक करायचं होतं . त्यातही नंबर लागला नाही ही वेगळी गोष्ट Happy

Captcha टाइप करताना माझा हातच चालत नाही Sad
मी पण आज पुर्ण दिवस बूकिन्ग मध्ये वाया घालवला.
आमच्या कडे ठराविक वेळ पण नाहिये बूकिन्ग स्लॉट open होण्याची एक दिवस सकाळी 9 वाजता होतो एक दिवस 12 ला एक दिवस रात्री 8.45 ला आज तर दुपारी 2 ला झाला. एक दिवस 2 दिवसाचे बूकिन्ग एका दिवशी open होते आणी दुसर्या दिवशी स्लॉट ओपनिंग ला सुटी सारखे बदलत राहते.
मी खर तर जुन मध्ये आरामात प्रयत्न करणार होते.
पण असे वाटले एक दिवस फक्त ट्राई करुन बघुया. पण fail. Proud

मी काही news नाही बघत आहे सध्या पण आपल्याकडे pfizer का मागवत नाही आहेत.
म्हणजे ज्याना परवडेल ते ती घेतील.
आणी covaxin covishield शिल्लक राहतील ना बाकीच्यांसाठी.

माझा कॅपचा बँक साईट वर चुकतो बरेच वेळा.
कॅपिटल स्मॉल लेटर आणि आकडे यात गोंधळ होतो. मग सरळ ऑडिओ असला तर ऑडिओ ऐकते.
कॅपचा बुकिंग ला ठेवणे म्हणजे महान अडथळा शर्यत आहे ☺️☺️
ते अगदी साध्या साध्या जागी पण गोंधळात पाडते.
लोकांना लवकर या सगळ्यातून पार पडून डोस मिळोत.
जमल्यास हे फीडबॅक साईटवर कळवत राहू.खरोखर कोणी वाचत असेल तर परिणाम होईलही
लस भरपूर प्रमाणात उपलब्ध होणे हे खरे उत्तर आहे.

फायजर चे स्टोरेज जमेल का माहीत नाही आपल्या इथे सहज प्रत्येक केंद्रावर, पण स्फुटनिक (नाव लिहायला चुकले) 15 दिवसात केंद्रांवर उपलब्ध होईल
कोव्हॅकसीन साठी पाठपुरावा चालू आहेच.

अवांतर ऑन.
मी पण कॅप्चा चॅलेज्ड. ट्रॅफिक सिग्नल दाखवा, कार दाखवा, सायकल दाखवा, झेब्रा क्रॉसिंग दाखवा, मोटारसायकल दाखवा इ. मला जिकडे दिसतं तिकडे एकतर नसतंच, किंवा त्या कॅप्चा करणार्‍या/ रीका ते दिसलेलं नसतं. मग परत मोपेडला मोटार सायकल म्हणायचं का? कारच्या ट्रंक वर लटकलेली सायकल पकडायची का? झेब्रा क्रॉसिंगचा थोडा भाग एका चौकोनात शिरलेला आहे तो धरायचा का काणाडोळा करायचा? ट्रॅफिक लाईट मध्ये पादचार्‍यांचा लाईट फक्त असेल तर तो धरायचा का नाही? असे अगदी मूलभूत प्रश्न पडतात.
मग परत दुसरा कॅप्चा. शेवटी मग हाताला चिमटा घेऊन खात्री करा म्हटल्यावर नशिब चिमटीतुन सोडवते.
ऑफ

एरवी आपल्याला captcha टाइप करायचा असतो तेंव्हा आपण रेस मध्ये नसतो. हे बूकिन्ग करताना रेस मध्ये असल्याने इतर वेळी चुकत नसेल तरी टेंशन ने चुकते किन्वा घाई मध्ये चुकते.
फक्त 200 जागा..

मूर्खपणा आहे हा सगळा कॅपचा काय अन् काय काय आणि ते दर १५ मि. ने लॉग आऊट परत लॉग-इन ही आणखी एक कटकट. मी तर ब्लॅंक होते कॅपचा आला की Lol किंवा रागाने बघत बसते त्याच्याकडे कारण त्या नादात टाईम सिलेक्ट करायचा राहून जात होता आधी. आणि हे सगळं पार पाडून कन्फर्म केलं की बुकिंग फुल्ल पण नाही डायरेक्ट हॅंग सगळं Uhoh काहीच होत नाही पुढे. परत पहीले पाढे पंचावन्न. मलाही वाटतंय आता काही दिवस गप बसावं ते बघूच नये.

हे बूकिन्ग करताना रेस मध्ये असल्याने >>> अगं रेस सुरू व्हायच्या आधीच संपलेली असते, रीफ्रेश केलं की ऑलरेडी फुल दिसतात.

लोकांनी पहिली लस कधी घेतली आहे हे यांच्याकडे रेकॉर्डेड आहे. तर ज्यांना पहिला डोस घेऊन ६-८ आठवडे झालेत त्यांनाच आता लसीकरणासाठी बोलावणं यांना का शक्य होऊ नये? कोविनवर शेड्युलिंग करताना घालायच्या अटींत आणखी एक अट. किंवा फ्रंट लाइन वर्कर्सना जसं निवडून टाइम अलॉट करून बोलावलं जायचं तसं. यामुळे आमचा पहिला डोस वाया जाईल यामुळे येणारा ताण तरी जाईल.

फायझरने डिसेंबरमध्ये म्हणजे सगळ्यात आधी सरकारकडे अ‍ॅप्लाय केलं होतं. पण त्यांनी इथे लोकल ट्रायल घेऊन डेटा द्यायला हवा, असं सरकारचं म्हणणं होतं. त्यामुळे का माहीत नाही, पण त्यांनी फेब्रुवारीत अर्ज मागे घेतला. आता पुन्हा पाठपुरावा करत होते. (म्हणजे इथल्या कंडिशन्समध्ये आपली लस लोकांपर्यंत कशी पोचवायची, स्टोरेजचं काय हे त्यांना माहीत आहे). इन्डेमिनिटीचाही मुद्दा आहे.

बाकी विदेशी लशींसाठी जलद मान्यता देऊ असं सरकारने सांगितलं होतं. यात १०० लोकांना डोस देऊन त्यांचं ७ दिवस निरीक्षण अशी अट होती. हे कोणी करतंय का माहीत नाही.

जाई ,लंपन ,amupari करोडो अनुमोदन...अत्यंत frustrating procedure आहे सगळी :(मी पण जून मध्येच ट्राय करणार आता..परवा captcha आणि पासवर्ड च्या नादात २०० slots book झाले डोळ्यासमोर...helpless situation.. जाऊ दे झालं..

आमच्या ज्येनाचा पहिला डोस झालाय. दुसरा बाकी आहे.
इथलं वाचून १८ ते ४४ मधल्या वयोगटातील बाकीच्या मेम्बर्सच जूनमध्ये करून घेऊ. गर्दीची भीती वाटते.

फायजर आणि इतर लसीत काय फरक आहे की ते लोकं लोकल ट्रायलला तयार होत नाही आहेत ? मी अस वाचलंय की अमेरिकेत लोक लस घ्यायला तयार होत नाहीयेत . तिथे वेगवेगळे प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवले जात आहेत लोकांनी लस घ्यावी म्हणून.

जी मिळेल ती लस घ्यावी असे वाटते. अगदीच काही गंभीर आजार असल्यास डॉ च्या सल्ल्यासहित.
फायजर चे माहित नाही, पण बर्‍याच लोकांनी घेतली आहे ना ती अलरेडी?
लोकांना आपल्या कोव्हिशिल्ड उर्फ अस्ट्राझेनेका बद्दल शंका होती, अगदी सुरुवातीला १-२ क्लॉटिंग चे मामले झाल्यावर.
पण तेही त्या मण्डळींना काही प्रि कंडीशन्स असू शकतील लक्षात न आलेल्या.

ओके धन्यवाद सगळ्याना जी मिळेल तिच घेणार आहे पहिल्यांदा.
तसे मी हा प्रश्न इथे विचारायला नको होता. काढणार होते तोपर्यंत नेट गेले.

I took Covishield vaccine yesterday in Nashik. Was trying since 1st May and was really frustrated. So yesterday I login from my laptop as well as mobile. Kept gap of 10 minutes in both logins and keep logging in to both after every 15 minutes because last time when I was about to book I get logged out so used both devices and because of 10 minutes gap it's sure that I will have atleast one device active and not get logged out. Also on mobile I used Arogyasetu with pincode search and on laptop searched using district and city so I will not miss anything. I noticed that slots got active on Arogyasetu first and then on laptop cowin website, so I immediately selected slot and confirmed no captcha and within a second I got message that slot booked. So I will advice use Arogyasetu to book appointment it don't ask captcha. Use 2 devices and 2 people's, and click on search after every 10 seconds, slots open slowly for each centre and when you will start slots opening for other center's then refresh frequently to see your center's open slots and as soon as you see green colour click and book using Arogyasetu to avoid captcha mess.

Hope this will help. Also check your Municipal Twitter and the comments on vaccine updates, it also help to know the exact time of slot opening.

On the centre there is no rush for 18+ people's because everyone is coming on given time so no waiting and no crowd. I went and within 15 minutes the process completed. But the staff was very rude, I didn't realise when they made and given vaccine, process is very fast. When I asked do I need to take any medicine? Take now or if symptoms occur? The nurse who was very rude told ask the Sir and went out, her sir who was sitting there with his phone and he was also rude, told take paracetamol looking in his phone. no one told to wait after vaccine or anything.

>>फायजर आणि इतर लसीत काय फरक आहे की ते लोकं लोकल ट्रायलला तयार होत नाही आहेत ? मी अस वाचलंय की अमेरिकेत लोक लस घ्यायला तयार होत नाहीयेत . तिथे वेगवेगळे प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवले जात आहेत लोकांनी लस घ्यावी म्हणून.>>

फायझर ही mRNA आहे. कोविशिल्ड viral vector आणि कोवॅक्सिन inactivated virus .
अमेरीकेत अँटी वॅक्सर ग्रुप्स आहेत. ते एकंदरीतच वॅक्सिन्सच्याच विरोधात आहेत. नेहमीच्या इतर वॅक्सिन्सही ते नाकारतात. इथे प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे कायदे आहेत. त्यातले अपवादाचे मुद्दे वापरुन अँटी वॅक्सर लोकं लहान बाळांनाही वॅक्सिन देत नाहीत. त्यातून ती बाळं आजारी पडणे, काही ठिकाणी गोवर, गालगुंड वगैरेची साथ असे ही होते. आमच्या इथे कुटुंबातील दोन भावंडांनी वॅक्सिन घेतली आणि एक भावंड अँटी वॅक्सर ग्रुपमधे , वॅक्सिन घेत नाही म्हणून म्हातारे आईबाप काळजीत, सणावाराला फॅमिलीने एकत्र येण्यावरुन वाद असे प्रकार सुरु झालेत.

बरं होईल.. अधी ४५ च्या वरचे दोन्ही डोस द्या म्हणावं आणि मग १८ च्या वरचे घ्या.

मला तर वाटतं थोडं थांबलं तर स्पुटनिक लाईट मिळेल Wink एकाच डोसात काम तमाम...

ओके स्वातीताई.

डिजे, हो तसच केलं पाहिजे आता. रोज रोज निराशा पदरी पडण्याचीपेक्षा ते बरे. निदान ४५ प्लस वाल्याना तरी व्यवस्थित लस मिळतील.

18 ते 44 च लसीकरण करायचा निर्णय चमकोगिरीचाच ठरला अखेर . नेहमीप्रमाणेच निर्णय घाईघाईने घेऊन गोंधळ घालायची परंपरा जपली गेली या निमित्ताने एवढंच.

सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असंच या सावळ्या गोंधळाकडे बघुन वाटतं. मोदी तर बंगाल मधे सुपडा साफ झाल्यापासून एक शब्द सुद्धा बोलेनासे झालेत. निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यात एवढं मनाला लाऊन कानकोंडं होऊन बसण्यासारखं काय आहे..? ४५ च्या वरच्या केवळ २% लोकांना दोन्ही लशी मिळालेल्या असताना मागचा-पुढचा कसलाही विचार न करता १८ च्या पुढील लोकांना लस देण्याचा निर्णय एकदम मुर्खपणाचाच होता असं आता लक्षात येत आहे. कदाचित बंगालातील हाराकीरी जनतेच्या लक्षात राहु नये म्हणुन सर्वांना कोविन अ‍ॅपवर धडपडायला लावलं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आली आहे Biggrin

Pages