जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
धन्यवाद मामी!
धन्यवाद मामी!
https://www.punekarnews.in
https://www.punekarnews.in/pune-111-vaccination-centres-for-above-45-yea...
पुण्यात १८-४४ चे ६ केंद्र स्लॉट आज ८ ला उघडतील.
इच्छुकांनी ७.५५ ला कोविन लॉगिन करुन तयार रहा.
पिंपरी चिंचवड चे स्लॉट 7.30
पिंपरी चिंचवड चे स्लॉट 7.30 ला म्हणजे पुण्याच्या अर्धा तास आधी उघडतील
https://www.punekarnews.in/pcmc-59-vaccination-centres-for-above-45-year...
(No subject)
बजेटमध्ये लसीकरणासाठी ३५०००
बजेटमध्ये लसीकरणासाठी ३५००० कोटी रुपयांची तरतूद केली होती.
केंद्राला एक डोस १५० रु ना पडतो. लॉजिस्टिक्स साठी ५० रुपये धरू. (लशींची ऑर्डर देणं ,पैसे देणं , कोणत्या राज्याला किती द्यायचे हे सांगणं , कोविनचं पोर्टल आणि एसेमेस इ. ) लसीकरणाची सोय राज्येच करतात. त्यांना येणारा खर्च जास्त आहे.
३५००० कोटी भागिले २०० = १७५ कोटी.
इतक्यांत ८७.५ कोटी लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था होऊ शकते. गणित चुकतंय का माझं?
अनु, तुमचे आभार. तुम्ही
अनु, तुमचे आभार. तुम्ही दिलेल्या लिंक मुळे दीर आणि जाऊ बाईंना पुण्यात उद्या साठी चा स्लॉट मिळू शकला . thank you
आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद.
आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद.
म्हणजे आता रोज ७.३० आणि ८ ला फिल्डिंग लावून बसायला हरकत नाही इच्छुक मंडळींना.
सगळ्यांचे होईलच, सगळ्यांना पुरेलच अशी आशा ठेवत नाही. आय अॅम टू नाईव्ह टू नो इन डिटेल.
जास्तीत जास्त ना पुरावे,मिळावे.
इतकं कठीण आहे माहिती समजून
इतकं कठीण आहे माहिती समजून घेणं आणि गणित करणं?
बरं. जोवर जास्तीत जास्त लोकांचं जलद लसीकरण होतं नाही तोवर व्हायरस म्युटेट होऊन परत परत लाटा येत राहणार. लस घेतलेले ही सुरक्षित राहतीलच याची खात्री नाही.
मुंबईत 45 + चे बूकिन्ग करण्या
जोवर जास्तीत जास्त लोकांचं जलद लसीकरण होतं नाही तोवर व्हायरस म्युटेट होऊन परत परत लाटा येत राहणार. लस घेतलेले ही सुरक्षित राहतीलच याची खात्री नाही. ++ 1
मुंबईत 45 + चे बूकिन्ग करण्या साठी काही ठराविक वेळ आहे का ?
हे खरं आहे. सध्याचे सगळेच
हे खरं आहे. सध्याचे सगळेच उपाय 'त्यातल्यात्यात' या सदरात मोडणारे आहेत.
जे गणित मी बदलू शकत नाही, ते करण्यात सध्या तरी डोकं आणि शक्ती वाया घालवणार नाहीये.
(हे वाक्य कोणालाही, कोणत्याही पोस्ट ला टोमणा म्हणून लिहीलेलं नाही. अगदी अर्नेस्टली, खूप डिटेलात आकडेमोड, माहिती आणि प्रतिसाद जायला लागले की माझं डोकं आणि आकलनशक्ती हँग होते.)
@भरत:
@भरत:
The Rs 35,000-crore allocation made in Budget 2021 for the Covid-19 vaccination programme will cover the full cost of vaccinating 50 crore Indians, T.V. Somanathan, expenditure secretary in the finance ministry, has said.
https://theprint.in/economy/rs-35000-cr-covid-vaccine-allocation-in-budg...
मानव, वाचलं. ४५+ अधिक फ्रंट
मानव, वाचलं. ४५+ अधिक फ्रंट लाइन वर्कर्स लोकांची संख्या ५० कोटी असेल का पाहतो.
या सगळ्याची एक टाइमलाइन बनवायला हवी. बघू वेळ मिळतो का.
काल ४५+लोकांसाठी मुंबै मनपाचं
काल ४५+लोकांसाठी मुंबै मनपाचं ट्विटर अपडेट रात्री दीडच्या सुमारास आलं.
आज जंबोसेंटर्सवर लसीकरण झालं नाही.
वरळीला आणखी एक ड्राईव्ह इन सुविधा.
कालचा भारतातला लसीकरणाचा आकडा
कालचा भारतातला लसीकरणाचा आकडा ६ ,८९ ,६५२
आज सर्वोच्च न्यायालयात लसीकरणाबद्दल सुनावणी सुरू आहे.
उत्तर प्रदेश सरकारने आदेश दिले आहेत - ७०० हेल्प डेस्क, मास्क अनिवार्य. ऑक्सिमिटर आणि थर्मल स्कॅनर्सचा नियमित वापर.
फक्त हे सगळं गाईंसाठी आहे.
अगले जनम मोहे गैया ही कीजो.
दबा धरून बसणे मेथड वापरून
दबा धरून बसणे मेथड वापरून गेल्या दोन-तीन दिवसात मी रोज फोर्टी फाईव्ह प्लस साठीचे स्लॉट बुक करू शकले आहे
काल ४५+ स्लॉट रात्री साडे नऊ च्या सुमाराला रिलीज व्हायला सुरुवात झाली
१८-४४ स्लॉट रात्री आठ वाजेच्या सुमारास रिलीज व्हायला सुरुवात झाली होती
संध्याकाळी सात नंतर रोज लॅपटॉप वर वेळ काढणे हा एकच हुकमी रस्ता मला मिळालेला आहे, पेशंटली शोधत राहिलं तर स्लॉट मुंबईत तरी नक्की मिळत आहेत
कुणी आपले स्लॉट री शेड्युल केले तर दिवसभर सुद्धा स्लॉट मिळू शकतात मात्र त्यात नशिबाचा भाग अधिक आहे
चीन से आया है कोरोना
चीन से आया है कोरोना
लाया है दुःख की आंधी,
अबकी बार फिर मोदी
भूल जाओ राहुल गांधी.
तालिया बजती रहनी चाहिए
तालिया बजती रहनी चाहिए
बोलता तोह है रेल्वे स्टेशन पे
बोलता तोह है रेल्वे स्टेशन पे चाय बेचता था...
लेकिन इसके कर्तुते देखके तो लगता है येह रेलवेस्टेशन पे जरूर जेब कतरा रहा होगा..!!
रात को देखा था सपना
रात को देखा था सपना
इस देश का बनने का पंतप्रधान,
सुबह चायवाले ने चुराया उसे
कड़ी से कड़ी सजा दे उसे संविधान .
तालिया बजती रहनी चाहिए
आजच्या ET मध्ये बातमी आहे की
आजच्या ET मध्ये बातमी आहे की आता राज्यांनी दुसरा डोस घेण्याऱ्याना प्राधान्य द्यायला सुरुवात केलीये . १८ ते ४४ च्या वयोगटासाठी तसेही लसपूरवठा कमी आहे. त्यामुळे 45 प्लस ना प्राधान्य आहे.
प्रत्यक्षात कधी येतं पाहू.
प्रत्यक्षात कधी येतं पाहू. काल ४.०५ लाख पहिला डोस. २.८४ लाख दुसरा डोस.
बुरा मत बोलो मोदीजी को
बुरा मत बोलो मोदीजी को
ते आहेत सर्वांचे लाडके,
मम्मीला भाजी करायला सांगतो
आवडतात मला दोडके
तालिया बजती रहनी चाहिए
हनुमानजी ने जलाई थी लंका
हनुमानजी ने जलाई थी लंका
पूछ में लगाकर आग,
बताओ मायबोलीकर
कैसा लगा मेरा स्वैग.
तालिया बजती रहनी चाहिए.
तालिया बजती रहनी चाहिए.
मुंबईत बरीच नवीन लसीकरण
मुंबईत बरीच नवीन लसीकरण केंद्रं उघडलेली दिसताहेत.
भरत, ती बहुतेक करून 45 प्लस
भरत, ती बहुतेक करून 45 प्लस साठी आहेत ना ?
हो.
हो.
१८-४५ साठी ५ होती ती ७ की ८ केली.
12 new centres will open for
12 new centres will open for the 45+ age group starting Monday. These include MCGM Welfare Centre (Chakala), Shri Gurunanak Gurudwara (Andheri), Squatters Colony Welfare Center (Jogeshwari), Jain Mandir (Andheri), Shastri Nagar Health Post (Borivali), Navagaon Health Post (Borivali), St Michael Church (Mahim), Riddhi Garden (Malad), Shardaben Patel Ground Hall (Malad), Municipal Eye Hospital (Kamathipura), St Isabel School Hall (Reay Road) and Atal Smriti Udyan (Borivali).
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/mumbai-vaccination-dri...
ओके भरत.
ओके भरत.
मला एक प्रश्न आहे . ज्या
मला एक प्रश्न आहे . ज्या केंद्रावर कोव्हीशिल्ड / कोवक्सिन लसीचा पहिला डोस घेतलाय त्याच केंद्रावर दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे का ?
Pages