भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.

."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.

....

Group content visibility: 
Use group defaults

हो, पण त्यांचा पहिला डोस त्यांच्या फोन नंबर वरून बूक झालाय, दुसरा बूक करायला तोच नंबर हवा असं त्यांचं म्हणणं.

एक करून बघता येईल. पहिल्या डोस साठी त्यांनी जे ओळखपत्र वापरलं तेच वापरून अमुपरी यांचा किंवा अजून कुणाचा फोन नंबरने कोविनला लॉग इन करुन त्यांच नाव ऍड करायचं. तिथे ओळखपत्रावरून यांचा पहिला डोस झालाय आई दिसते का पहावे असल्यास उत्तमच, दुसरा डोस तिथून बुक करता येईल.
नसेल तरी पहिला डोस म्हणुन बुक करावा आणि व्हक्सीन घेताना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र दाखवून हा दुसरा आहे असे सांगावे, म्हणजे ते तशी नोंद करतील.

Civil Aviation Ministry permits Telangana govt to use #drones for experimental delivery of COVID vaccines beyond visual line of sight >> Lol इतक्या लसी उपलब्ध आहेत, की त्या केंद्रावर त्वरीत पोचवायच्या कशा हा प्रश्न आहे. तो सोडवला की झाले.

मानव लसी चा डोस आपल्या फोन नंबर शी आणी ref id जो मिळतो register केल्या वर त्याच्याशी लिंक होतो. त्या मुळे माझ्या मामा चा पहिला डोस त्याच्या मोबाइल नंबर शी लिंक आहे. म्हणजे त्याचा नंबर टाकुन cowin वर लॉग इन केले की त्याच्या पहिल्या डोस ची माहिती दिसते. आणी दुसर्या डोस साठी बूकिन्ग करायचा ऑप्शन ही येतो. दुसर्या नंबर वरुन त्याच्या डोस 2 चे बूकिन्ग करणे पॉसिबल नाही.
बघू मी प्रयत्न करते आहे . पण अजुन स्लॉट ओपन नाही झालेत आमच्या कडचे.
आमच्या कडे सुरवातीला सगळी लोक लस घ्यायला जाताना आधार कार्ड च घेउन जायचे.

अखेरीस लॉगिन प्रयत्न यशस्वी होऊन बिकेसी सेंटर सिलेक्ट केलं तेव्हा उपलब्ध आहे अस दाखवत होतं , वेळ सिलेक्ट केली आणि captcha भरला त्याचक्षणी this center is fully booked for vaccination असा मेसेज आला. काय गौडबंगाल आहे देव जाणे Sad
डोळ्याच पात लवत न लवत त्याक्षणिच सगळे स्लॉट fully booked अस दाखवतात. >> जाई, हे माझ अस ३ दिवस होत आहे. तुम्हाला पण होइल सवय ह्याची हळूहळू Happy मग वाईट वाटणार नाही आणि हा प्रश्न पण पडणार नाही. आज तर ओ टी पी च आला नाही. पावणे आठला आला तेन्व्हा २ ठिकाणी अयशस्वि प्रयत्न केला.

कोशिश साइटवर मामाचा फोन नंबर द्यायचा‌ त्याला ओटीपी येईल. तो द्यायचा. हे तुमच्या स्मार्टफोन, पीसीवरून होऊ शकेल.

हो भरत मी असेच करणार आहे.
पण मला तसे करे पर्यंत जागा फुल होतिल ही भिती आहे फक्त. कारण स्लॉट 2 मीन मध्ये फुल होतात. आणी आमच्या कडे स्लॉट ओपन ची ठराविक वेळ नाहिये. त्याचे already 2 महिने होतिल म्हणून घाई आहे नाहितर निवांत केले असते तरी चालले असते.
आई चे बूकिन्ग मी माझ्या नंबर वरुन केले होते. तिचे 3 मे चे बूकिन्ग केले आणी लस केंद्रा वर गेल्या वर कळले की लस संपल्या आहेत. आल्या वर फोन करतो बोलले आणी अजुन फोन आला नाही.
केंद्रा चा नंबर घेउन ठेवला आहे तिथे फोन केल्या वर बूकिन्ग केले आहे ना म फोन येइल असे सांगतात. एकुण लसीकारणा चा सगळा गोंधळ आहे.
माझे ही otp आज येत नव्हते.
माझे तर बूकिन्ग मी आरामात करणार आहे . म तेंव्हा आणी वेगळेच प्रॉब्लेम नसू दे म्हणजे झाले Wink

कोव्हिड लशी खरेदी करताना राज्यांना जी एस टी द्यावा लागतोय.
नोट - कोव्हिड लशींचा भाव राज्यांसाठी केंद्रापेक्षा अधिक आहे.

सगळ्यांनी स्लॉट चेक करताना login करुनच चेक करा.
आज मी without login सारखे चेक करत होते तर स्लॉट open च झाले नव्हते. नंतर लगेच लॉगिन करुन चेक केले तर 9 ते 15 तारखचे स्लॉट open झाले होते आणी बरेच जवळ जवळ बुक ही झाले होते.
आणी नंतर मामा चे बुक करताना त्याचा नंबर टाकला तर 5 मीन otp आला नाही भरपूर प्रयत्न केला. शेवटी otp आला आणी login केले तर जवळ ची केंद्रे संपली होती. म एका ठिकानी खुप लांबचे केंद्र बुक केले. त्याचा पण बुक झाल्याचा sms आलाच नाही.
Otp न आल्या मुळे स्लॉट पटकन बुक होतात.

ऑनलाइन बूकिन्ग करुन लस केंद्रा वर गेले असता काय चेक करतात?
बूकिन्ग झाल्याचा sms नाही आला आहे.

एस एम एस आला नाही तरी हरकत नसावी.
बुक केल्यावर कोविन वर बुकिंग ची पी डी एफ असते, किंवा आरोग्य सेतूवर वगैरे पण. ती डाऊनलोड करुन मोबाईलवर ठेवून दाखवली तरी पुरे.
जे प्रूफ रजिस्टर करताना निवडले असेल ते घेऊन जावे. शक्यतो आधार कार्ड.

हे माझ अस ३ दिवस होत आहे. तुम्हाला पण होइल सवय ह्याची हळूहळू Happy मग वाईट वाटणार नाही आणि हा प्रश्न पण पडणार नाही>>>> Sad but true Sad

लोकसत्ताच्या वार्ताहराला बातमी कशी लिहू नये याचं प्रशिक्षण द्यायची गरज आहे.

---
अभिनंदन . सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या योग्य वाटपाची पद्धत निश्चित करण्यासाठी एक टास्क फोर्स नेमला आहे.
लशींबाबतही ते काही निर्णय घेतील अशी आशा ठेवूया.

कोहीनूर, दादर येथिल ड्राईव थ्रू लसीकरण केंद्र

आत्ताच आईबाबांना दुसरा डोस देऊन आणला. कोहीनूरच्या ड्राईव थ्रू मधून वॉक इन ( ड्राईव इन) मधून. अडिचला आत प्रवेश केला आणि ४.४० ला बाहेर आलो. अ‍ॅक्च्युअल रजिस्ट्रेशन आणि लस देण्यास दहा मिनिटे आणि अर्धा तास लसीकरणानंतरचे वेटिंग. बाकी वेळ नुसताच ट्रॅफिक जॅम झाल्यासारखं बसून. बर्‍यापैकी कार्स होत्या - मला वाटतं ६० तरी असतील. दोनच बुथ असल्यामुळे असा बॉटलनेक निर्माण झाला होता. सिस्टिम जरा एफिशिएंट करता आली असती असं वाटलं. सिनियर सिटिझन्स (८०+) असल्याने कुठेही उतरावे लागले नाही हाच काय तो प्लस पॉइंट.

बाथरूमची सोय केलेली आहे. आम्ही वापरलं नाही त्यामुळे आत किती स्वच्छता याची कल्पना नाही. पण गरज लागल्यास आहे.

https://twitter.com/ANI/status/1390931093344325641
For last 7 days, 180 districts in the country have not seen a single new case of COVID-19. 18 districts have not recorded any cases in last 14 days. 54 districts have not witnessed any new case in last 21 days: Union Health Minister Harsh Vardhan
ही आकडेवारी वाचुन भर मे महिन्यात किती गारगार वाटतंय नाही? लव अगरवालच्या प्रे कॉ मध्ये असलाच कचरा असायचा. नाहीतर मग देशातल्या ७० % केसेस दोनच राज्यांत आहेत.

या असल्या फॉल्स अ‍ॅशुअरन्सचा लोकांना निष्काळजी करण्यात आणि रोग प्रसार वाढवण्यात किती वाटा?

अगरवाल साहेबांनी पण मुंबईत लस घेतली म्हणे. तेव्हा ड्राईव्ह इन पद्धत नव्हती अन्यथा लस घेऊन वर "ह्या वेडेपणाला काय अर्थ आहे" अशी बोंब ठोकली अस्ती Wink

मामी ह्या वॉक इन ड्राइव लसी करणासाठी आधी नंबर etc लावावा लागतो का? नेमकी काय procedure करावी लागते. >> वॉक इन होते. डायरेक्ट जायचे. आधार कार्ड कॉपी घेऊन जा. सध्या दुसरा डोसच देत आहेत. दुपारनंतर २ नंतर गेले तर गर्दी त्यातल्यात्यात कमी. आज शनिवार असल्याने जरा होती बहुतेक.

गाडीत प्रचंड उकाडा झाला असेल. >> एसी लावून बसावं लागलं.

व्हॅलिड सिक्युरिटी कोड टाका ही नवीन एरर आज वाचायला मिळाली. अजून काय काय एरर येणारेत , गेस करा. दोन अयशस्वी प्रयत्न आज Sad आज ओ टी पी मात्र लगेच मिळाले कारण ही एरर येणार/ तयार होती.

Pages