जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
नाही जाई दुसरा डोस कुठेही घेऊ
नाही जाई दुसरा डोस कुठेही घेऊ शकतो.
अच्छा , हे बेस्ट आहे. थँक्स
अच्छा , हे बेस्ट आहे. थँक्स अमुपरी
>>>>
>>>>
मला एक प्रश्न आहे . ज्या केंद्रावर कोव्हीशिल्ड / कोवक्सिन लसीचा पहिला डोस घेतलाय त्याच केंद्रावर दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे का ?
>>>>
नाही
त्याच vaccine चा दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे - कोणतं केंद्र यावर कोणतेही निर्बंध नाहीत. आमच्या घरात अनेकांनी दोन डोस दोन वेगळ्या केंद्रातून घेतले आहेत.
होय, पहिला डोस कोव्हीशिल्डचा
होय, पहिला डोस कोव्हीशिल्डचा घेतला तर दुसरा डोस कोव्हीशिल्डचाच घ्यावा लागेल हे लसीकरण केंद्रावर सांगितले होते , लिहूनही दिले होते तसे.
माझा प्रश्न स्पेसफिक केंद्राचा होता.
भविष्यवाणी: या फोटोमुळे काही
भविष्यवाणी: या फोटोमुळे काही लोकांच्या बुडाला आग लागेल

सुप्रीम कोर्टाने सुनवल्यामुळे
सुप्रीम कोर्टाने सुनवल्यामुळे म्हणावे लागले. लसीच्या किमतीवरून सुप्रीम कोर्टाने खुलासा मागितला म्हणून नमलेत. आज तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे पुढील सुनावणी गुरुवारी होईल.
तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी
तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी बोबड्यासारखी भविष्यात खासदारकी, मंत्रीपद, राज्यपाल अशी बोली लावली नाही म्हणजे मिळवली..
BMC कमिश्नर ने Mumbai Model
BMC कमिश्नर ने Mumbai Model और Narendra Modi की सच्चाई सबको बता दी : https://www.youtube.com/watch?v=sCjMADvU_2A
सगळे अमराठी उच अधिकारी राज्य
सगळे अमराठी उच अधिकारी राज्य सरकारला शिव्या देतात व मोदीगीत गातात
लंपन, तुम्ही मागच्या पानावर
लंपन, तुम्ही मागच्या पानावर लिहिल्यासारखंच वाटू लागलंय. आता लसीकरणाच्या अयशस्वी प्रयत्नांच काहीही वाटेनासे झालेय

पुणे पी सी एम सी चे स्लॉट 7
पुणे पी सी एम सी चे स्लॉट संध्याकाळी 7.25 पासून लॉगिन करून बघायला चालू करा, यश नक्की मिळेल.
पीसीएमसी ला 8 केंद्रे असल्याने चान्स बरेच वाढतात.
जाई आज अजिबात इच्छाच नाही
जाई आज अजिबात इच्छाच नाही झाली. आता २/३ आठवडे वाट बघेन
२०० डोस आहेत फक्त त्यात कधी नंबर लाग्णार? पॅटर्न लक्षात आला आहे पण त्या ए रर च गणित अजून समज्ले नाहिये.
युट्युब वर राहुल व्होराचा मरण्याचा आधीचा व्हिडिओ आहे. त्यात तो सांगत आहे की ऑक्सिजन मिळत नाहीये. खुपच पेनफुल आहे. एकदम फेल झालय सरकार ह्या लाटेत. ह्या महाशयांना कोणी प्रश्न विचारु शकत नाही ( ना विरोधक ना ह्यांचे स्वकीय) हे अजून एक दुर्दैव.
अनु त्या अनाकलनीय एररने
अनु त्या अनाकलनीय एररने अजिबात इच्छा नाही आता. मी हे ५/६ दिवस केलय ७.२५ पासून.
एकदा ब्राउजर्स बदलून/हिस्टरी
एकदा ब्राउजर्स बदलून/हिस्टरी खोडून पाहिले का?
अर्थात हे सर्व करून झालंच असेल आधी.
एकदा मशीनच बदलून बघा.दुसरा एखादा लॅपटॉप/डेस्कटॉप असेल तर.
क्रोम खूप शहाण्या मुलासारखा वागतो.प्रोग्रामर्स फायरफॉक्स आणि क्रोम वर आपली जास्तीत जास्त कामं टेस्ट करतात.
अगदी खरेय लंपन . मी तर आता
अगदी खरेय लंपन . मी तर आता जूनमध्ये प्रयत्न करेन . कधी otp येत नाही, otp आला तर captcha चा प्रॉब्लेम. तर कधी साईटच चालत नाही.
आपल्या हातात स्वतःची काळजी घेणे एवढंच उरलेय .
इथे मुंबईत जी पेड सेंटर आहेत ( जसे की रिलायन्स , नानावटी हॉस्पिटल) ती आधीच बुक झालेली असतात . बाकीची डोळ्यासमोर booked होतात. काहीच करू शकत नाही
राहुल व्होराच ट्विट बघितलं होतं ट्विटरवर. एकदम हेल्पलेस फिलिंग आलेलं .मध्ये बीबीसीचा व्हिडीओ बघितला होता यूपीतला. भयानक परिस्थिती आहे तिथे.
एकदम फेल झालय सरकार ह्या लाटेत. ह्या महाशयांना कोणी प्रश्न विचारु शकत नाही ( ना विरोधक ना ह्यांचे स्वकीय) हे अजून एक दुर्दैव.>>> याबद्दल न बोललेलं बर . डायरेक्ट देशद्रोही लेबल लागत. जाऊ देत .
आमच्या नगरसेवकाने एरियातल्या
आमच्या नगरसेवकाने एरियातल्या सोसायट्यांकडून सगळ्यांच्या लसीकरणाचे डिटेल्स मागवलेत. उद्या उद्घाटन आहे सुरुवातीला तरी दिवसाला १०० डोस. Online registration must.
वयोगट सांगितलेला नाही. पण ट्रे़ंड पाहता ४५+ असायला हवा.
कदा ब्राउजर्स बदलून/हिस्टरी
कदा ब्राउजर्स बदलून/हिस्टरी खोडून पाहिले का?
अर्थात हे सर्व करून झालंच असेल आधी.
एकदा मशीनच बदलून बघा.दुसरा एखादा लॅपटॉप/डेस्कटॉप असेल तर.
क्रोम खूप शहाण्या मुलासारखा वागतो.प्रोग्रामर्स फायरफॉक्स आणि क्रोम वर आपली जास्तीत जास्त कामं टेस्ट करतात >> हे सगळ करुन झालय. ह्यात उगाच अर्धा पाउण तास वाया जातो म्हणून आता बास.
मी तर आता जूनमध्ये प्रयत्न करेन . >> सेम.
ग्लोबल टेंडरचं घोडं कुठे
ग्लोबल टेंडरचं घोडं कुठे अडलंय काही कळत नाही.
अजून राज्य सरकारं निर्णयच घेताहेत का?
ज्यांना परवडेल त्यांना तरी घेता येवो मिळेल ती लस.
Looking at the need for
Looking at the need for adequate vaccines to ensure that vaccination is swift & efficient, after discussing the issue with CM Uddhav Thackeray ji, as guardian minister of Mumbai, we have asked @mybmc to explore possibilities of global procurement of vaccines. (1/n)
We are also working on a method to ensure that the non tech savvy citizens and those who can’t operate the CoWin app with ease, and for their access to vaccines in time. (2/n)
Our efforts to increase vaccination centres are constantly on going and the @mybmc shall be having a centre in every municipal ward, along with a drive in vaccination centre across all zones of Mumbai, on my humble request to @mayor_mumbai @KishoriPednekar ji and MC Chahal ji
Today the @mybmc has also issued guidelines for vaccination policy of housing societies partnering with hospitals for vaccination within society complexes. (4/n)
I request all other cities in Maharashtra to also have the drive in vaccination for citizens above the age of 65 for their ease and comfort.
आदित्य ठाकरे
एक गंमत नोंदवते. इथे आपल्या
एक गंमत नोंदवते. इथे आपल्या सगळ्यांना रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतोय आणि तिथे इन्स्टाग्रामवर झाडून सगळ्या सेलिब्रिटी , बॉलिवूड नट्याचे , एलिट लोकांचे jabbed /लस घेतली वगैरे स्टेटस असतात. ह्या लोकांना कशी काय मिळते लस पटकन ? स्पेशल ट्रीटमेंट आहे वाटतं ह्यांना
प्रत्येक ठिकाणी स्पेशल
प्रत्येक ठिकाणी स्पेशल लोकांसाठी स्पेशल कोटा असतोच.
सेंटरवर ओळख असेल तर रांग टाळता येते.
कठीण आहे. २०१२ सिनेमाची आठवण
कठीण आहे. २०१२ सिनेमाची आठवण झाली.
सेलिब्रिटी, राजकारणी इ. नी
सेलिब्रिटी, राजकारणी इ. नी लशी घेण्याला देशाप्रमाणे टॅबू फीलिंग बदलतं.
अमेरिकेत वयाच्या क्रायटेरिआ बायपास करुन राजकारण्यांनी लस घेतली तर ते इनिशिएटिव्ह, लोकांत कॉन्फिडन्स वाढवण्याची क्रिया मानले जाते.
कॅनडात सेलिब्रिटीने रांग सोडून लस घेतली तर गदारोळ होऊन दंड/ जेल जे असेल ते होतं. राजकारणी स्पेशल ट्रिटमेंटचा/ क्यू जंपचा विचारही करू शकत नाहीत. नाहीतर अगदी सरकार नाही पडलं तरी पुढच्यावेळी नुकसानीची शक्यता खूपच वाढते. पैसे असतील तरी कॅनडात लस काही मिळत नाही. मग पैसेवाले अमेरिकेत जाऊन, युकेत जाऊन लस घेतात. तरी त्याच्या टॅबू बातम्या होतात.
युके मध्ये वेगळा पूल करुन स्पेशल लोकांनी क्यू जंप केली तरी सामान्यांना काही फरक पडणार नाही अशी मखलाशी करतात.
भारतात ट्विस्ट करकरून बातम्या मॅनेज करुन मोदी कसे महान आहेत सांगत मूळ बातमी लोकं विसरुन जातात.
रिलायंस आणी नानावटि कायम बुक
रिलायंस आणी नानावटि कायम बुक दाखवते कधी चेक केले तरी.
काल मी मुंबई चे 45+ चे स्लॉट ओपन झाल्यावर दादाला कळवले होते . त्याला kem मध्ये मिळाले बूकिन्ग आज जाऊन आला 3 वाजता गेलेला 5 वाजता परत आला.
जस्ट आज मी असेच चेक करत होते तर kem etc पटकन बुक झाले होते. आणी काल मी स्वत बघितले मग त्याला फोन केला तरिही शिल्लक होते.
यावरुन मला वाटतय नशिबात असेल तेंव्हाच मिळते लस
यावर चांगला तोडगा निघावा,
यावर चांगला तोडगा निघावा, इतके सर्व पवित्रे आणि दबा धरून न बसता टेक्निकल नसलेल्यानाही बुकिंग आणि लस मिळावी असं नक्की वाटतं.हे कधी साधणार माहीत नाही.
यावरून सोसायटी स्टाफ आणि स्वतःच्या घरातील मदतनिस यांना बुकिंग साठी मदत करावी, एरिया नगरसेवकाला या गरजू लोकांसाठी स्पेशल वेगळे केंद्र ठेव, ज्यात बुकिंग ची मारामारी नसेल यासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा करावा इतकेच स्वतःकडून आता सुचते आहे.
अमुपरी, ४५ प्लस साठी सेंटर्स
अमुपरी, ४५ प्लस साठी सेंटर्स वाढवली आहेत मुंबईत.
१८ ते ४४ वाल्याना प्रॉब्लेम आहे ठराविकच सेंटर्स आहेत , ती ही फुल .
>>> मला एक प्रश्न आहे . ज्या
>>> मला एक प्रश्न आहे . ज्या केंद्रावर कोव्हीशिल्ड / कोवक्सिन लसीचा पहिला डोस घेतलाय त्याच केंद्रावर दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे का ?>>> ना ,,,,,,, ही..... स्वानुभव
दुसरा डोस कुठूनही घ्या,
दुसरा डोस कुठूनही घ्या, शक्यतो जिथे घेतला तिथून दुसऱ्या डोस साठी फोन येतो.
पण हेही पुरवठ्यावर अवलंबून.
सध्या साईट च्या तांत्रिक मर्यादा असल्याने ज्याचा पहिला घेतला त्याचाच दुसरा डोस घ्या असे आहे.
पण दुसऱ्या डोस च्या ड्यु 5 लाख लोकांना कोव्हॅकसीन पुरवठा वेळेत न झाल्यास डॉक्टरी सल्ल्याने कोव्हीशिल्ड किंवा स्फुटनिक पण घेता येईल असा अंदाज आहे.
हो जाई सेंटर्स वाढवली आहेत
हो जाई सेंटर्स वाढवली आहेत तरी पण काल जवळ जवळ 20 मीन तरी बूकिन्ग फुल झाले नव्हते 45+ चे रात्री 10.20 पर्यंत स्लॉट available होते. आणी आज 10 वाजताच 45+ चे सगळे स्लॉट फुल होते.
18-44 चे बूकिन्ग मिळणे कठिण च आहे.
आज मला मिळता मिळता माझ्या मूर्ख पणा मुळे राहिले मोबाइल वर मला captcha type करता येइना आणी बूकिन्ग फुल झाले.
बूकिन्ग मिळावे म्हणून मी 15 15 मीन लॉग इन करत होते .
मला मागच्या आठवड्यात कॅपचा
मला मागच्या आठवड्यात कॅपचा नव्हते.
थेट ओटीपी ने लॉगिन होत होते
आता अजून 1 लेयर ऍड केलेला दिसतोय.
Pages