जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
आज सकाळी मुलाला covishield च
आज सकाळी मुलाला covishield च पहिलं vaccine मिळालं. अगदी लकीली सकाळी स्लॉट (१० ते १ ) मिळाला माण - मुळशी येथे....चांगली सोय होती... ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्यांसाठी वेगळा विभाग होता...मात्र डायरेक्ट walk-in (४५+)जे आले होते ते सकाळी ८ वाजल्यापासून टोकन घेऊन उभे होते. बराच गोंधळ होता तिथे.....
माझ्या बहिणीचा वेगळाच
माझ्या बहिणीचा वेगळाच प्रॉब्लेम झालाय..ती ४५ रनिंग आहे..त्यामुळे १८ ते ४४ वयोगटात तीच रजिस्ट्रेशन होत नाहीये...आणि ४५ पूर्ण नाही म्हणून vaccination center वर vaccine मिळत नाहीये.
बाँड्री वॅल्यु टेस्टिंग
बाँड्री वॅल्यु टेस्टिंग केलेलं दिसत नाही. भंपक अॅप आहे हे कोविन.
धन्य आहे कोविन
धन्य आहे कोविन
मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर
मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर वाल्या लोकांनी बॉट लिहिले आहेत. तेच स्लॉट बुक करतात. मंडळी कुणाला माहित असेल तर आपलाल्या पण एक कॉपी द्या ना राव !
Press Trust of India
Press Trust of India
@PTI_News
If we take strong measures, third wave of COVID-19 may not happen at all places or even anywhere: Govt
डोकं आपटायला भिंत शोधा
लोकांकडे स्लॉट उघडल्यावर एस
लोकांकडे स्लॉट उघडल्यावर एस एम एस किंवा व्हॉटसप किंवा मेल नोटिफिकेशन देणारे बॉट खूप आहेत.पण तुम्हाला मेसेज आला, तुम्ही कोविन उघडलं, लॉगिन केलं यात तितकाच वेळ जातो.
बंगलोर मध्ये एकाने स्क्रिप्ट लिहीली आहे ज्याने स्लॉट उघडला की लॉगिन होतं, ओटीपी कॉपी होतो आणि बुक होतो.
पण अश्या स्क्रिप्ट वापरणं अत्यंत घातक ठरु शकतं. शिवाय हे कायदेशीर नाही. या डेव्हलपर ला उद्या हॅकिंग साठी अटक होऊ शकते.(उद्या हा ओटीपी वाचायचं अॅप बनवणारा गंमत म्हणून तुमचे बँकींगचे ओटीपी वाचेल आणि वापरेल.)
https://www.moneycontrol.com/news/business/api-scripts-messaging-groups-...
कोणत्याही स्क्रिप्ट न वापरता २-३ दिवस कोविन वरचे वागणे तपासा त्या शहराचे. स्लॉट कधी दिसतात, कधी एन ए दिसते, कधी बुक होते.
एकदा ठराविक वेळ कळली तर थोडे लक्ष ठेवून बुक करता येते.
तसेच संख्या वाढेल, केंद्र वाढतील तशी ही लढाई सोपी होत जाणार आहे.२-३ आठवडे लागतील.
मी स्वतः पी सी एम सी मध्ये ३ दिवसात ७ नवी केंद्र उघडलेली पाहिली आहेत. १८-४४ ला.जसा पुरवठा येईल तसे चित्र सुधारत जाईल.
आमची मु़ंबै मनपा आता स्लॉट्स
आमची मु़ंबै मनपा आता स्लॉट्स उघडणार अशी शिट्टी ट्विटर आणि ईन्स्टावर वाजवते. वेळ अजूनतरी संध्याकाळी ७:३०ते ८ ची आहे.
मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर
मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर वाल्या लोकांनी बॉट लिहिले आहेत. तेच स्लॉट बुक करतात. मंडळी कुणाला माहित असेल तर आपलाल्या पण एक कॉपी द्या ना राव !>>
रजिस्ट्रेशन करताना मागे कुणाला तरी थाळी वाजवत उभे करा. मग गुप्त स्लॉट ओपन होतात.
पण आधी अॅप ला ऑडियो-व्हिडिओ परमिशन द्यायला लागेल.
अनु ला अनुमोदन. . थोडा धीर
अनु ला अनुमोदन. . थोडा धीर ठेवला तर 8-10 दिवसात परिस्थिती बरी झाली असेल. .
https://twitter.com/PTI_News
https://twitter.com/PTI_News/status/1390629529459191816 आता काय 4 digit security code येणार.
कमेंट्स वाचा
कमेंट्स येस वाचल्या. माय
कमेंट्स येस वाचल्या. माय डिजिटल इंडिया
कोविन साईटवर टाईमपास करता
कोविन साईटवर टाईमपास करता करता एकदा राज्य तेलंगणा आणि जिल्हा हैद्राबाद निवडून बघा.
येणाऱ्या केंद्रांची संख्या बघून थक्क व्हाल.
केंद्रे लाख असतील.. लशींचं
केंद्रे लाख असतील.. लशींचं काय..?
तुमचा अंदाज २५ हजार पटींनी
तुमचा अंदाज २५ हजार पटींनी चुकलाय.
कय झाल? तेलंगाणा अन हैद्राबाद
काय झाल? तेलंगाणा अन हैद्राबाद भरपूर केंद्रं अन मुबलक लशींमुळे १००% दोन्ही लशी देणारं पहिलं राज्य/जिल्हा ठरलं का मानवजी..??
चक्क चार केंद्र आहेत.
चक्क चार केंद्र आहेत.
अहमदाबाद पण चेक करुन बघा.
अहमदाबाद पण चेक करुन बघा.
आताही ओटीपी येत नव्हता.
आताही ओटीपी येत नव्हता. ट्विटरवर वाचलेला उपाय केला. फ्लाइट मोड ऑन - ऑफ. पुढच्या क्षणी ओटीपी आला. पण स्लॉट्स बुक झालेत ४५+
>>मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर
>>मी ऐकले आहे की सॉफ्टवेअर वाल्या लोकांनी बॉट लिहिले आहेत. तेच स्लॉट बुक करतात.<<
याची शक्यता कमी वाटतेय. शिवाय अश्या रीतीने घाउक बुक केलेल्या स्लॉटस्चं पुढे करणार काय? ते अॅलकेट करायला वेगळी सिस्टम बनवणार? असो. मूळात हा होल त्या अॅपमधे अतिशय सोप्या पद्धतीने टाळला गेला असता - कॅप्चा (आयॅम नॉट ए रोबाट) वापरुन. थोडक्यात निलेकेणी यांचं बारीक लक्ष यावर नाहि, अन्यथा आतापर्यंत ट्विट यायला हवं होतं. कदाचित, डिजिटायझेशनमधे भारत अमेरिकेच्याहि पुढे आहे, हे त्यांचंच गेल्या महिन्यातलं ट्विट तपासुन घेत असावेत...
कॅपचा बद्दल ये दुःख काही खतम
कॅपचा बद्दल ये दुःख काही खतम नही होता लेखात वाचलं होतं की ते सगळ्यांना पटकन कळत नाही.म्हणजे चित्रात पार्किंग मीटर, फायरहोज शोधा वगैरे टाईप चे चित्र कॅपचा.नुसते नंबर किंवा नंबरची बेरीज वाले कॅपचा ठीक आहे.
ओटीपी तसा बरोबर पर्याय वाटतो.
फ्लाइट मोड ऑन - ऑफ. पुढच्या
फ्लाइट मोड ऑन - ऑफ. पुढच्या क्षणी ओटीपी आला>> tried but not received OTP
फ्लाइट मोड बदलूनही एसेमेस आला
फ्लाइट मोड बदलूनही एसेमेस आला नाही. रिसेंड करायला सांगितल्यावर आला. तोवर फुल्ली बुक्ड.
लॉगिन न करता जवळच्या सेंटरवर १५७ जागा दिसताहेत तर लॉगिन करून फुल्ली बुक्ड.
पहिल्या टॅब मध्ये रिफ्रेश केलं तरी तेवढ्याच जागा दिसताहेत.
फ्लाईट मोड ऑन/ ऑफ ने वर्क होत
फ्लाईट मोड ऑन/ ऑफ ने वर्क होत असेल तर कोड मध्ये एसएमएसची डिलिवरी रिलायबल करायला सांगितली आहे, आणि मोड ऑफ झाल्याने अॅक जात नाही त्यामुळे मल्टिपल टेक्स्ट पाठवले जातात आणि मिळण्याची प्रोबॅलिटी वाढते असं असणार. पण मग मुळात अॅक जातेच आहे कशी? बहुतेक टाईम आऊट होत असणार. आणि टाईम आऊट नीट हाताळले नसणार.
इकडे बँकिंग इ. प्रणालीत ओटीपी टेक्स्ट हवा का कॉलवर हवा ही सोय असते तशी काही सोय नाही का? (अमेरिकेतुन एका बँकेच्या प्रणालीत कॅनडात टेक्स्ट का कोण जाणे येत नाही, पण कॉल येतो. ती सोय फार उपयोगी पडते)
लॉगिन होऊन बिकेसी सेंटर
अखेरीस लॉगिन प्रयत्न यशस्वी होऊन बिकेसी सेंटर सिलेक्ट केलं तेव्हा उपलब्ध आहे अस दाखवत होतं , वेळ सिलेक्ट केली आणि captcha भरला त्याचक्षणी this center is fully booked for vaccination असा मेसेज आला. काय गौडबंगाल आहे देव जाणे
डोळ्याच पात लवत न लवत त्याक्षणिच सगळे स्लॉट fully booked अस दाखवतात.
130 कोटी लोकसंख्या
130 कोटी लोकसंख्या
अकेला मोदी क्या करेगा ?
बहुतेक सॉफ्टवेअर कम्पनीचे बिल
बहुतेक सॉफ्टवेअर कम्पनीचे बिल भाजपने बुडवले असणार
त्याचा साधा फोन आहे आणी
त्याचा साधा फोन आहे आणी त्याला ऑनलाइन बूकिन्ग etc करता येत नाही 75 वर्षा चा आहे तो. आणी दुसर्या डोस साठी बूकिन्ग त्याला त्याचा च नंबर वापरुन करावे लागणार.>>>>>@आमूपरी आरोग्य सेतु अॅप वरून एकाच मोबाईल नंबर वर पाच जणांच रजिस्टेशन करता येत ....
मानव, तुमच्यासाठी खुशखबर
मानव, तुमच्यासाठी खुशखबर
Press Trust of India
@PTI_News
Civil Aviation Ministry permits Telangana govt to use #drones for experimental delivery of COVID vaccines beyond visual line of sight
हो, पण त्यांचा पहिला डोस
हो, पण त्यांचा पहिला डोस त्यांच्या फोन नंबर वरून बूक झालाय, दुसरा बूक करायला तोच नंबर हवा असं त्यांचं म्हणणं.
एक करून बघता येईल. पहिल्या डोस साठी त्यांनी जे ओळखपत्र वापरलं तेच वापरून अमुपरी यांचा किंवा अजून कुणाचा फोन नंबरने कोविनला लॉग इन करुन त्यांच नाव ऍड करायचं. तिथे ओळखपत्रावरून यांचा पहिला डोस झालाय आई दिसते का पहावे असल्यास उत्तमच, दुसरा डोस तिथून बुक करता येईल.
नसेल तरी पहिला डोस म्हणुन बुक करावा आणि व्हक्सीन घेताना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र दाखवून हा दुसरा आहे असे सांगावे, म्हणजे ते तशी नोंद करतील.
Pages