आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो धावा करण्यात तिसरा होता आणि सचिन वगळता सेंच्युरी मारणारा एकटाच होता!>>> आणि त्या विंडिज विरूद्ध च्या मॅच मधे सचिन व्यतिरिक्त एक कांबळीच ठामपणे उभा होता अ‍ॅम्ब्रोज विरूद्ध आणि हाणलाही त्याला. सचिन व कांबळी दोघांनीच फक्त अ‍ॅम्ब्रोजचा सामना चांगला केला होता. त्याने सिद्धू व जडेजाला नुसत्या वेगावर जसे काढले होते ते पाहिले तर पूर्वीच्या भारतीय टीम मधे गळतीच लागली असती. मला आठवते त्या गेम मधे सचिन स्ट्राइक घ्यायला आतुर होता इतका आत्मविश्वास होता त्याच्याकडे. कांबळी थोडा नंतर आला. नंतर सचिन आणि प्रभाकर पाठोपाठ आउट झाल्यावर अजून पन्नास रन्स हवे होते आणि ५ विकेट्स गेलेल्या होत्या. पण ज्या स्टाइलने त्याने अ‍ॅम्ब्रोज वर प्रतिहल्ला चढवला, त्यावरून कोलॅप्स वगैरे काही चान्स उरला नाही.

अ‍ॅम्ब्रोजचा सुरूवातीचा टेरर पाहा इथे, सुमारे दोन मिनीटे इथून
https://www.youtube.com/watch?v=Wk8k4mBsESo&t=385s

बाय द वे या कप मधे सचिन इतका प्रचंड फॉर्मात होता. पण तीन मुख्य मॅच मधे दोनदा स्टंपिंग आणि एकदा रन आउट झाला. तीन्ही वेळा शतक सहज होउ शकले असते आणि ते झाले असते तर तिन्ही वेळा भारत जिंकला असता. यापैकी ही एक, इथे कांबळी मुळे तरीही जिंकलो आपण. पण ऑस्ट्रेलिया विरूद्ध आणि सेमीज मधे लंकेविरूद्ध पुढचे ढेपाळले.

आयकॉन येस... खेळाडू नोप... कोहली बेटर खेळाडू आहे... फिटनेस, बॅटिंग स्किल्स, फॉर्म ,पॅशन बघता...
तेंडुलकर फेडरर आहे तर कोहली जोकोविच...
>>>>>>>>

मी टेनिस खेळतो पण बघण्यात रस नाही, त्यामुळे मला फेडरर जोकोविच तुलना काही समजू शकत नाही.
मात्र ओवरऑल फलंदाज म्हणून सचिन कोहलीपेक्षा भारी आहे. तो काळ, तेव्हाचे नियम, तेव्हाचे गोलंदाज सारेच वेगळे असल्याने ते समजू शकत नाही. पण कोहली लिमिटेड फॉर्मेटमध्ये जे अफलातून चेस करतो ते एक सोडल्यास फलंदाजीत सगळीकडे सचिन बीस आणि कोहली उन्नीस आहे.
फिटनेस म्हणाल तर कोहली भारी आहे, पण पंचवीस वर्षे क्रिकेट खेळणे, ते सुद्धा जड बॅटने हाच मुळात एक अचाट पराक्रम आहे. त्यामुळे तिथेही सचिन ऊन्नीसच म्हणून शकतो, फार फरक नाही.
खरे तर ती जड बॅट सचिनच्या शैलीला साजेशीही नव्हती. जर डॉन ब्रॅडमन म्हणतो की हा पोरगा माझ्यासारखा खेळतो तर सचिनची बॅटही त्यासारखीच हलकी हवी होती, आणि ती तशी असती तर सचिनची काही शतके जास्त असती, किंबहुना त्रिशतके बघायला मिळाली असती जे जड बॅटने खेळताना त्याचे कधी झाले नाही..

आयकॉन म्हणून म्हणाल तर कोहली हा सचिनची ऊंची कधी गाठू शकत नाही. जे दैवत्व सचिनला लाभलेय, तशी करीश्माई ईमेज दुसर्‍या कुठलयही खेळाडूची कधीच होणार नाही. कोहली फक्त त्याचे रेकॉर्ड तोडू शकतो.
याऊलट धोनी म्हणाल तर येस्स, कारण त्याच्या चाहत्यांचा बेसच वेगळा आहे, त्याची कामगिरी त्याचे योगदानच वेगळे आहे. एक वर्ल्ड बेस्ट सुपरफास्ट कीपर, आणि ग्रेटेस्ट फिनिशर हे विक्रमी बिरुद तर त्यापुढे आहेतच. पण त्याचा नावलौकिक आहे तो लीडर म्हणून. त्यातही त्याचे छोट्या शहरातून येत हि मजल गाठणे यामुळे गावस्कर म्हणतो त्याप्रमाणेच त्याला भारतभरातील छोट्या छोट्या शहरातील क्रिकेटप्रेमींशी जोडते.

थोडक्यात कोहली हा कधी दुसरा सचिन होणार नाही. त्याला आयुष्यभर पहिला कोहली म्हणून स्वतःला सिद्ध करायलाच झगडावे लागणार. जे तो नुसते सचिनचे रेकॉर्ड मोडून करू शकत नाही.
धोनीबाबत मात्र सचिन हा सचिन असेल तर धोनी हा धोनी आहे..

परत एकदा - पुस्तक वाच नि मगच बोल. तोवर जे काही लिहितो आहेस ते फक्त खयाली पुलाव आहेत तुझे (मॅच न बघता बघितलेले -
>>>>>>>
ओके आपण थांबूया असामी, आपण काही पुस्तक वाच हा हट्ट सोडायला तयार नाही. जसे काही जे आम्ही पाहिले ऐकले ते सारे झूठ आणि जगातले सारे सत्य त्या पुस्तकातच दडले आहे.
आणि हो, दहा वेळा हेच म्हणून की मी तो सामना पाहिलाच नाही असे म्हणून काही ते सिद्ध होणार नाही. तरी निव्वळ याच गृहीतकावर आपल्याला निष्कर्श काढायचा असेल तर आपली मर्जी.
माझा मुद्दा स्पष्ट झाला आहे.
नंतर मी सचिनने वैयक्तिक विक्रमांसाठी कारकिर्द लांबवल्यानंतरची त्याची कामगिरी काय होती ते सुद्धा घेऊन येतो. आपण ते कसे डिफेन्ड करता हे बघणे रोचक असेल Happy

आयपील जिकंला तर धोनी ने अरे तो रैना काय नव्हता मागच्या वर्षी तर चेन्नई शेवटुन पहिल्या दोन मध्ये.
Submitted by pravintherider on 7 May, 2021 - 21:4
>>>>>

बर्र यावेळी रैना परत आला. काय कामगिरी होती त्याची?
रैना आहे म्हणूनच चेन्नई आहे किबहुना धोनी आहे असे म्हणायचे आहे का?
मग धोनीने जे सारे आयसीसी चषक, २०-२०, ५०-५० चॅप्मियन ट्रॉफी वगैरे आणि ईतर जे मानाच्या स्पर्धा जिंकला आहे, भारत त्याच्या काळात कसोटी क्रमांक १ झाला आहे, या सगळ्यात रैनाच होता का?

बरं पाक ला फलंदाजी देऊन ही त्याच दिवशी पाक फलंदाज बाद झालं का ? तर नाही... 23 व्या ओवर ला पहिली विकेट आहे...
>>>>>
@ प्रविण
उल्त यातूनच कळते की त्या खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजांना जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे होते. तुम्ही माझाच मुद्दा सपोर्ट करत आहात Happy

तरी बरं Australia मध्ये अचानक कप्तानी सोडुन दिली हा पळपुटेपणा तुम्ही विसरला आहात.
>>>>>>>>>
मैदानाबाहेर काय राजकारण चालते याचा अंदाज लावायला एक वेगळे ज्ञान लागते, जे पुस्तके वाचून मिळत नाही Happy
कोहली आधी कसोटीत कर्णधार झाला. मग त्यानंतर तो एकाच मालिकेत कसोटीत भारी खेळायचा पण वनडेमध्ये अचानक पाट्या टाकू लागला. अगदी बांग्लादेशसोबतही आपण एकदिवसीय मालिका हरलो. त्या मालिकेचे स्कोअरकार्ड शोधले तरी मुद्दा क्लीअर होईल. आणि मग धोनीने एकदिवसीयचेही कर्णधारपद सोडले आणि तिथेही कोहली आला Happy

ते पुस्तकात रीडींद बीटवीन द लाइन्स असते ना, तेच क्रिकेट बघतानाही एक असते. ज्याला समजते त्याला समजते. ज्याला नाही समजत त्याची गाडी पुरावे द्या वर अडकते Happy

@ रडका कांबळी
हे तर दादाने फिरवलेल्या शर्टसारखेच फेमस आहे Happy

मध्यंतरी एका सचिनद्वेष्ट्या मित्राने कांबळी हा सचिनपेक्षा भारी आहे म्हणत जसे अर्जुनाने एकलव्यचा गेम केला तसे सचिनने कांबळीचा केला वा त्याला सपोर्ट केला नाही असा ठपका ठेवलेला.

प्रत्यक्षात कांबळी त्याच्या वर्तणूकीमुळे तर हिटलिस्टवर आलेलाच, पण त्याचा परफॉर्मन्सही अगदीच घसरलेला. त्याच्या कारकिर्दीचे दोन भाग केले तर हे सहज लक्षात येईल.
मी त्या मित्राच्या तोंडावर मारायला एक व्हॉटसप पोस्ट लिहिलेली ज्यात असे कांबळीचे करीअरचे आकडे दोन भाग करून आणलेले. मिळाली तर ईथे चिपकवतो..

नंतर मी सचिनने वैयक्तिक विक्रमांसाठी कारकिर्द लांबवल्यानंतरची त्याची कामगिरी काय होती ते सुद्धा घेऊन येतो. आपण ते कसे डिफेन्ड करता हे बघणे रोचक असेल ... ते पुस्तकात रीडींद बीटवीन द लाइन्स असते ना >> तुझ्यासाठी रीडींग बीटवीन द लाइन्स च काय नसलेल्या लाईन्स सुद्धा तू लाईन न वाचताच ठरवू शकणारा बाबा तू ! . पुस्तकात खरे आहे कि नाही ह्याचा निर्णय तू पुस्तक वाचल्याशिवाय घेणारा महामानव तू. तू रिकामटेकडा असशील रे नसलेले हि तयार करायला, आम्हाला कामधंदे आहेत. तू पुस्तक वाचेतो तुझ्या सचिनबद्द्लच्या पोस्ट ना मी शून्य किम्मत देणार. तुझे असे अनाकलनीय निष्कर्ष तुझ्यापुरतेच सिमीत ठेवलेस तरी चालतील.

खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजांना जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे होते... निकाल तर बघ बाबा एक डाव आणि रन्स ने जिकंलो त्यामुळे गोलंदाजांना वेळ देण्याचा मुद्दा चिपकवुन तुमच्या शी सहमत आहे असं नाही.

धोनीने जे सारे आयसीसी चषक, २०-२०, ५०-५० चॅप्मियन ट्रॉफी वगैरे आणि ईतर जे मानाच्या स्पर्धा जिंकला आहे, भारत त्याच्या काळात कसोटी क्रमांक १ झाला आहे, या सगळ्यात रैनाच होता का?.... बरं मग एकट्यानेच जिकंवल्या का ?

https://youtu.be/wHmbU5FPF-U

एकदा वरील लिंक वर जा आणि ऐक जरा सेहवाग काय बोलला... Sehwag in aap ki Adalat सर्च करा...

उत्तर अजुन चांगल्या प्रकारे मिळेल.

मैदानाबाहेर काय राजकारण चालते याचा अंदाज लावायला एक वेगळे ज्ञान लागते, जे पुस्तके वाचून मिळत नाही Happy
कोहली आधी कसोटीत कर्णधार झाला. मग त्यानंतर तो एकाच मालिकेत कसोटीत भारी खेळायचा पण वनडेमध्ये अचानक पाट्या टाकू लागला. अगदी बांग्लादेशसोबतही आपण एकदिवसीय मालिका हरलो. त्या मालिकेचे स्कोअरकार्ड शोधले तरी मुद्दा क्लीअर होईल. आणि मग धोनीने एकदिवसीयचेही कर्णधारपद सोडले आणि तिथेही कोहली आला...
कोहली तर मला स्वतःला पण बिलकुल आवडत नाही पण 'पेराल तेच उगवते' अशी एक म्हण आहे.
2007 च्या वर्ल्डकप ला मग पाट्या टाकल्या का धोनीने ज्या मुळे भारत साखळी सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवली. कारण भारताने त्या वर्ल्डकप च्या आधी 300+ चेस करताना विश्वविक्रम केला होता.
धोनीने कोणाचा कसा गेम केला हे हरभजन, युवी ने एका कार्यक्रमात सांगितले आहेच.

या उपर २०११ विश्वचषक अंतिम सामन्यात धोनी ला युवी आधी पाठवण्याची आयडिया सचिन ची होती आणि हे धोनी व्यतिरिक्त सर्वांनी बोललं आहे. बघं ना त्याच सचिन मुळे तो कर्णधार झाला २००८ T20 विश्वचषक साठी...

अजुन एक कोहली ने धोनी चा गेम केला असं वाटतं तर मग धोनीने किती पद्धतशीर पणे कोहली चा गेम केला ना ऐनवेळी धावबाद झाला नी कोहलीच स्वप्न धुळीस मिळेल याची काळजी घेतली...
कसं आहे ना,
मैदानाबाहेर काय राजकारण चालते याचा अंदाज लावायला एक वेगळे ज्ञान लागते आणि धोनी तर या बाबतीत हुशार आहेच.
कोहली ला हे समजलं म्हणून तर तो धोनीला खेळायला पाठवत नव्हता लवकर आणि क्रिकेट प्रेमी कोहली ला उगाच शिवीगाळ करत होते...

धोनीने कोहली कप्तान झाल्यावर किती सामने जिकंवलेत जरा बघ...
ग्रेटेस्ट फिनिशर... ठेंगा... धोनीने एकट्या च्या बळावर असे किती सामने जिकंवलेत जरा बघा आणि मला पण सांग बाबा... बाकी कोणाला जमत नाही आणि धोनी ने येऊन सामना पलटवला...

अरे त्या ऋन्मेषला प्रत्त्युत्तरे करण्याच्या नादात आपल्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या इंटिग्रिटीवर शंका घेवू नका रे!

ऋन्मेषला प्रत्त्युत्तरे करण्याच्या नादात आपल्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या इंटिग्रिटीवर शंका घेवू नका रे!... त्यांनी पहिले

कोहली आधी कसोटीत कर्णधार झाला. मग त्यानंतर तो एकाच मालिकेत कसोटीत भारी खेळायचा पण वनडेमध्ये अचानक पाट्या टाकू लागला. अगदी बांग्लादेशसोबतही आपण एकदिवसीय मालिका हरलो. त्या मालिकेचे स्कोअरकार्ड शोधले तरी मुद्दा क्लीअर होईल. आणि मग धोनीने एकदिवसीयचेही कर्णधारपद सोडले आणि तिथेही कोहली आला..
कसं असतं ना एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जात नाही तोपर्यंत ते आपलंच खर करता...

अरे त्या ऋन्मेषला प्रत्त्युत्तरे करण्याच्या नादात आपल्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या इंटिग्रिटीवर शंका घेवू नका रे! >> खरय ! त्याच्यात नि आपल्यामधे फरक ठेवूया रे.

आपल्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या इंटिग्रिटीवर शंका घेवू नका रे! >> खरय ! त्याच्यात नि आपल्यामधे फरक ठेवूया रे.
>>>>>>

क्या बात है, भारताला ईतके मानसन्मान मिळवून देणारा धोनी हा ढोंगी आणि स्वार्थी खेळाडू आहे हे चालते ईथे, बाकी कोणाला काही बोलू नका Happy
आणि ते मी अमान्य केले तर मी पालथ्या घड्यावर पाणी Happy

आणि आता लोकं आपल्या आवडत्या खेळाडूंना बोललेले अंगाशी आल्यावर ईतर खेळाडूंनी केलेले राजकारण काढून सेल्फ गोल करू लागलेत तसे खेळाडूंच्या इंटिग्रिटीवर शंका घेवू नका रे असे आवाहन Happy

असो, मस्त ईतर फुल्टॉस आलेत ईथे. उद्या खेळतो. आज झोप आलीय लवकर Happy

आता लोकं आपल्या आवडत्या खेळाडूंना बोललेले अंगाशी आल्यावर ईतर खेळाडूंनी केलेले राजकारण काढून सेल्फ गोल करू लागलेत.........
सुरुवात कोणी केली. तुम्ही सचिन ला स्वार्थी, कोहली ला राजकारणी बोललं तर चालतं आणि धोनी ला काही बोलायला सुरुवात केली तर सेल्फ गोल.
म्हणजे तुम्ही बोललं तर १००% योग्य आणि दुसरं कोणी बोललं तर ?

मी चुक असेल नक्कीच पण तुम्ही स्वतःला किंवा धोनी ला नेहमीच योग्य सिद्ध करण्यासाठी बाकी खेळाडूं वर चुकीचे आरोप तर करु नका.

स्वरुप, असामी

मी फक्त आणि फक्त एक शंका/आरोप केला की धोनी ने असं काही केलं असेल कारण तुम्ही जाणतच आहात. माझ्या साठी प्रत्येक भारतीय खेळाडू हा नक्कीच आदरणीय आहे आणि असेल. कोणालाही माझ्या मुळे ञास झाला असेल तर क्षमस्व.
जेव्हा पासून क्रिकेट पहायला आणि खेळायला चालु केलं तेव्हा पासून सचिन आणि सचिन डोक्यात, मनात आहे. त्या मुळे कदाचित वहावत गेलो आणि धोनी काय नी कोहली काय... असो

>>धोनी हा ढोंगी आणि स्वार्थी खेळाडू आहे

मला तरी मी त्याच्याबद्दल असे कुठे लिहल्याचे ऐकिवात नाही.... उलट त्याच्या आख्ख्या आंतरराष्ट्रीय करिअरभर मला तो सेल्फलेस खेळाडूच वाटत आलाय.... पण ते एक असो!

काल-परवा विक्रम साठेच्या WTD मधला सचिन आणि सेहवागचा एपिसोड बघितला.... काय कमाल खेचाखेची करत होते यार दोघेही एकमेकांची.

What The Duck, Cricket Diaries, Breakfast with Champions कमाल शोज आहेत!

सेहवाग मैदानावर जेव्हढा आवडत होता त्यापेक्षा खुप जास्त या शोजमधला त्याचा वावर बघून आवडायला लागला!

*कमाल शोज आहेत!* - कालच कुठेतरी अशीच वेंकटेश प्रसादची मुलाखत वाचली. त्याला नेहमीचा प्रश्न विचारला गेला, ' अझर, सचिन व सौरव या तीन कर्णधारांच्या संघात खेळलात, तर या तीघात सर्वोत्तम कर्णधार कोण वाटला?' उत्तर- ' अझर. ' कारण - ' अझर मला हवं तसं क्षेत्ररक्षण लावून देत माझ्याकडे विशवासाने चेंडू देई '. मनात आलं, हें तर सर्वच कर्णधार करतात. तर पुढे प्रसाद म्हणतो, अझर हैदराबादचा, मीं कर्नाटकचा व त्यामुळे आमच्या वारंवार भेटी होत, एकत्र खेळणंही . त्यानंतर माहिती होती, प्रसादच्या जास्त विकेटस अझर कर्णधार असताना होत्या.
तात्पर्य- श्रेष्ठ खेळाडूंमधे तुलना करताना 100% वस्तुनिष्ठ( objective) विश्लेषण होणं जवळजवळ अशक्य . त्यात स्वतःच्या आवडीनिवडी, व्यक्तिगत घटक ( subjective elements ) याचा प्रभाव पडणं अनिवार्यच असावं. Wink

सगळ्यात मोठं स्टेडियम
नाव आहे मोदी नरेंद्र
वाद नका घालू विनाकारण
आपलेच आहेत सचिन आणि महेंद्र

>>धोनी हा ढोंगी आणि स्वार्थी खेळाडू आहे
मला तरी मी त्याच्याबद्दल असे कुठे लिहल्याचे ऐकिवात नाही.... उलट त्याच्या आख्ख्या आंतरराष्ट्रीय करिअरभर मला तो सेल्फलेस खेळाडूच वाटत आलाय.... पण ते एक असो!
Submitted by स्वरुप on 10 May, 2021 - 07:46

>>>>>>>>>
सेल्फलेस असायची किंमत मोजावी लागतेच. संघबांधणी करताना ज्या खेळाडूंना डावलले जाते त्यांच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागतेच. चाहत्यांना मात्र संघात ११ जणच खेळू शकतात हे समजावणे अशक्य. असा एकही प्रदीर्घ कारकिर्द असलेला कर्णधार नाही ज्याच्या वाट्याला हि टिका आली नाही. एकवेळ सचिन असेल, कारण सचिनचे दुख वेगळेच होते, त्याला त्याच्या मनासारखा संघ मिळाला नाही असे तो म्हणायचा. पण त्यावरही कांबळीला डावलल्याची टिका कांबळीचे चाहते करतात..

तर ते एक असो,

@ धोनी ढोंगी स्वार्थी वगैरे ...
तर चार सहा पाने मागे फेरफटका म्हणाले होते धोनीला.
त्यावर मी असामी यांनाही विचारून झाले की आता तुम्हाला कुठल्याही पुराव्याशिवाय असे एखाद्या खेळाडूला नाव ठेवणे पटते का?
यावर ते म्हणाले की त्यांना फेरफटका यांनी दिलेले स्पष्टीकरण पटले Happy

काही शब्द ईकडचे तिकडे झाले असतील तर फेरफटका आणि असामी करेक्ट करतील.

बाकी मी सचिनच्या न पटलेल्या एखाद्या गोष्टीवर बोट ठेवताना त्याच्या हजारपट कौतुकच केले आहे. जेव्हा त्याला भारतरत्न मिळाले तेव्हा त्यावर अभिनंदनाचा धागा देखील माझाच होता Happy
सचिन दादा द्रविड हे खरे तर माझ्या पिढीचे खेळाडू आहे. ईतर कोणापेक्षाही आमच्या पिढीला त्यांच्याबद्दल आत्मीयता जास्त आहे. मला आठवतेय की तेव्हा घरी नेट कॉम्प्युटर नव्हते तर मी त्यांचे प्रत्येक सामन्यातील स्कोअर माझ्याकडे एका वहीवर लिहायचो, आणि त्यांचा वाढलेला कमी झालेला एवरेज बघायचो, ईतका वेडेपणा करून झालाय Happy
तर मला माझा भारतीय खेळाडूंप्रती असलेला प्रेम आदर सिद्ध करायची गरज नाही Happy

सचिन निवृत्त होताना आता क्रिकेटच संपलेले अशी भावना माझ्याही मनात आलेली. त्याने शक्य झाल्यास साठ वर्षांपर्यंत खेळावे असे मलाही वाटायचे. पण तटस्थपणे विचार करता त्याने कारकिर्द लांबवली हे मलाही पटते. कोणी सचिन-जळकुट्याने त्याच्यावर तसा आरोप केल्यास तो मी ऊलट वाद न घालता सहज स्विकारतो. हे जमायला हवे.

बाकी सध्या धोनीवर टोकाची टिका आणि टोकाचे कौतुक करायचे एक फॅडच आले आहे सोशलमिडियावर ... आयपीएल काळात याला जास्त चेव येतो Happy

मागे जे मी ईथे लिहिलेले ते आता कुलदीप स्वत: बोलतोय.
आपल्याकडे कप्तान आणि कीपर म्हणून जे धोनीचे योगदान् आहे त्याला लोकं नेहमीच कमी वेटेज देत आलेत. सगळे त्याच्याकडे आधी फिनिशर म्हणूनच बघतात....

https://lokmat.news18.com/sport/cricket-kuldeep-yadav-miss-ms-dhoni-guid...

मी धोनीची मदत मिस करतो', टीम इंडियाच्या बॉलरनं सांगितला 2 वर्षांचा अनुभव

कुलदीपनं गेल्या दोन वर्षात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) मिस करतो असं सांगितलं. " मी काही वेळा धोनीला मिस करतो. त्याच्याकडं (धोनी) मोठा अनुभव आहे. तो नेहमी स्टम्पच्या मागून आम्हाला मदत करत असे. आम्ही तो अनुभव मिस करत आहोत.

टोकाचे कौतुक करायचे एक फॅडच आले आहे सोशलमिडियावर... बरोबर... कुलदीप बोलला ती बातमी समोर आणता पण हरभजन बोलला त्या कडे सोयिस्कर रित्या कानाडोळा करता...

Pages