Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयपीएल, आधीच एखाद्या
आयपीएल, आधीच एखाद्या बाहेरच्या देशात घेतली असती तर बरे झाले असते! >> खरंय ! आधीच्या अनुभवावरून लक्षात यायला हवे होते की बायो बबल तेही भारतामधे ६ शहरांमधे ठेवणे किती कठीण जाऊ शकते. क्रिकईंफो ने अतिशय चांअग्ले आर्टिकल ह्यावर दिलय. वेळ मिळाला तर जरुरु वाचाच .
भरत, स्वरुप, प्रश्न म्हातारी मेल्याचा नाही, काळ सोकावण्याचा आहे हो.
इग्नोर करा उत्तम उपाय
इग्नोर करा
उत्तम उपाय
आयपीएल, आधीच एखाद्या
आयपीएल, आधीच एखाद्या बाहेरच्या देशात घेतली असती तर बरे झाले असते!
>>>>>>>
त्यात कदाचित आर्थिक फायदा कमी असेल.
अर्थात आता बंद पडल्याने तोटा झाला असेल ती गोष्ट वेगळी ..
पण पुन्हा कुठेतरी मॅनेज करून घेतीलच. तसेही सध्या सारेच देश कमीच ईंटरनॅशनल क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे परदेशी प्लेअर अवैलेबल राहतील. साधारण २०-२० वर्ल्डकपच्या आधी वर्ल्डकपचा सराव म्हणत जमेल सारी पलट्ण पुन्हा. एकूणात दरवर्षीच्या तुलनेत फायदा कमी होईल पण नुकसान होऊ देणार नाहीत.
Submitted by निलिमा on 5 May,
Submitted by निलिमा on 5 May, 2021 - 05:47
>>>>>>
तुम्ही युवराजने मारलेले मोजत आहात.
सचिनने डिक्लेरेशनच्या आदल्या ओवरला चार चेंडूत तीन डॉट आणि एक दोनचा फटका तर त्याच्या आदल्या ओवरला तीन चेंडूत दोन डॉट आणि एक सिंगल काढला.
तुम्ही बरोबर म्हणालात, पाकिस्तानी पण धावा काय सहज देत नसणार. कारण त्या जगात कोणीही देत नाहीत. त्या काढाव्या लागतात. पण सचिन म्हणजे द्रविड नाही जे मुळातच संथ खेळ आहे. तो द्विशतकासाठी सावध खेळत होता हे उघड होते. संघहिताचा विचार करता एक्स्ट्रा रिस्क घेणे गरजेचे होते. हा विचार स्वाभाविकच मनात आला पाहिजे फलंदाजाच्या कि आधी मी संघहिताचा विचार करेन, मग त्या प्रोसेसमध्ये जर शतक द्विशतक होतेय ते चांगले. पण वर म्हटल्याप्रमाणे असा विचार आपल्याकडचे बहुतांश क्रिकेटप्रेमीच करत नाहीत तर त्यांचे आदर्श असणारे खेळाडू कश्याला करतील.
आणि, हो. बहुतांश खेळाडू जगात असाच विचार करतात. त्यामुळे मला सचिनवर काही ठपका ठेवायचा नाहीये. मी ईथे फक्त त्या कर्णधारांची बाजू मांडतोय जे बिचारे अश्या खेळाडूंच्या वैयक्तिक हिताचा आड येतात आणि जनतेचा रोष ओढावून घेतात. मग तो या केसमध्ये द्रविड असो वा शॉ च्या केसमध्ये पंत असो
जी गोष्ट तू बघितलेली नाहीस,
जी गोष्ट तू बघितलेली नाहीस, ज्याबद्दल वाचायला तयार नाहीस किंवा ज्यांनी चक्षुर्वे सत्यम पाहिलेली आहे नि अनुभवलेली आहे त्यांचा (खेळाडनाही, माझा नाही) शब्दही अविश्ववसनीय, असे बेधडकपणे ठोकून देतोस, असली कसली रे हि प्रवृत्ती ?
>>>>>>>
पुस्तक वाचण्यात खरेच रस नाही. पुस्तक सचिनले लिहिलेय म्हणजे शब्द न शब्द खरा हे तुमचे मत तुम्हाला लखलाभ
पुस्तकात जे लिहिलेय ते अंतिम सत्य मानणे म्हणजे ऊंदराला मांजराची साक्ष का काय म्हणतात ते त्यातला प्रकार झाला.
उद्या अझरुद्दीनवर निघालेला पिक्चर बघायला सांगाल आणि त्यात जे दाखवलेय तेच अझरबाबत प्रमाण मानायला सांगाल
*दिड-दोन तास शुद्ध हवेत
*दिड-दोन तास शुद्ध हवेत फिरायचे आणि दोन-अडीच तास ईथे येऊन चर्चा*-
तुमचं घोडं इथंच पेंड खातंय ; कोण कां व काय म्हणतंय हें समजून न घेतां, जगांत आपणच एकटे शहाणे आहोत अशी टिमकी वाजवत रहायची ! जगभरातले सर्व डाॅकटर, तज्ञ, शासनकर्ते ओरडून सांगताहेत 'घरातच रहा ' , म्हणून मीं वेळ कसा घालवायचा म्हटलं, तर नेहमीनुसार स्वताला जगातले एकमेव शहाणे समजत तुम्ही बेधडकपणे मला दोन अडीच तास बाहेर फिरायचा सल्ला देताय !
>>>>>>
मी स्वतः रोज सोसायटीच्या गार्डनमध्ये तासभार शुद्ध हवेत फिरतो. त्यामुळे पटकन तसा सल्ला दिला गेला.
अर्थात आमच्याकडे गार्डन आतमध्येच दुसर्या मजल्यावर आहे. प्रत्येक सोसायटीत अशी सोय नसेल हे मान्य करतो. चूक झाली. तरी आपले असे एकदम चिडणे समजू शकतो, क्रिकेटच्या धाग्यावर येत क्रिकेटच्या देवाला काही म्हटले की हा अनुभव येणारच. चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणारच. तर यासाठी मी मनाची तयारी ठेवली आहे
असो, पण गेल्या कडक लॉकडाऊनला जुन्या सोसायटीत असे आतमध्ये गार्डन नव्हते तर आम्ही टेरेसवर शुद्ध हवेसाठी जायचो.
ईथे ते वाचू शकता - https://www.maayboli.com/node/76318
ज्यांना शक्य आहे त्यांनी असे जरूर करा. चारेक महिने घरात कोंडून राहणे देखील स्वास्थ्यासाठी चांगले नाही.
ज्यांना शक्य आहे त्यांनी शुद्ध आणि मोकळी हवा मिळेल तशी जरूर घ्या
ऋन्मेष, तुझ्या एकतर्फी
ऋन्मेष, तुझ्या एकतर्फी अंदाजपंचे दाहोदर्से मारलेल्या सगळ्या देसी घी मधल्या गोष्टी एकत्र केल्या तर अरबी कथांपेक्षाही सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचं पुस्तक तयार होईल. अर्थात तुलाच वाचनात इंटरेस्ट नसल्यामुळे तुला ते वाचता येणार नाही म्हणा
बाकीचे तुझे धागे जाऊ दे पण इथल्या इथे ‘सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो खेळायचा‘, ‘द्रविड द्विशतकाजवळ आल्यावर स्लो खेळायचा‘, ‘ पंत रनरेट वाढवण्यासाठी शॉट्स मारत होता‘, ‘धोनी इतरांच्या व्यावसायिक हितसंबंधांकरता खेळतोय‘, आयपीएल मधल्या मॅचेस फिक्स्ड असतात‘ ..... असली कसलाही पुरावा / तथ्य नसलेली विधानं करण्याचा तुझा कॉन्फिडन्स अचाट आहे.
पुस्तक वाचण्यात खरेच रस नाही.
पुस्तक वाचण्यात खरेच रस नाही. पुस्तक सचिनले लिहिलेय म्हणजे शब्द न शब्द खरा हे तुमचे मत तुम्हाला लखलाभ Happy
पुस्तकात जे लिहिलेय ते अंतिम सत्य मानणे म्हणजे ऊंदराला मांजराची साक्ष का काय म्हणतात ते त्यातला प्रकार झाला. >> जर म्हणींचे अर्थ माहित नसतील तर उगाच वापरू नकोस. पुस्तक वाचण्यात रस नाही ह्याचे एकमेव कारण तुला तुझ्या आर्ग्युमेंट मधे (सचिन द्वीशतकासाठी स्लो खेळला) तथ्य नाही हे जाणवलेय नि ते मान्य करता येणार नाही, कारण तसे मान्य केले कि पंत च्या वागण्याचे जस्टीफिकेशन तोकडे पडत जाणार. (खर तर असे जरुरी नाही) पण म्हणूनच पुस्तक वाचेपर्यंत ह्या विषयावर ठोकून देऊ नकोस.
सचिनने डिक्लेरेशनच्या आदल्या ओवरला चार चेंडूत तीन डॉट आणि एक दोनचा फटका तर त्याच्या आदल्या ओवरला तीन चेंडूत दोन डॉट आणि एक सिंगल काढला.>> पुस्तक वाचलेस तर तुला सचिनच्या खेळाच्या पेसचे क्लीयर स्पष्टीकरण मिळेल. त्यात अजिबात आश्चर्यकारक काही नाही. खर तर आधी लिहिलेही होते पण आधीच ठरवलेला मुद्दा रेटायच्या जोरात तुला ते कळले नसणार हे उघड दिसते आहे.
उद्या अझरुद्दीनवर निघालेला पिक्चर बघायला सांगाल आणि त्यात जे दाखवलेय तेच अझरबाबत प्रमाण मानायला सांगाल > >आता तू नाही शाहरुख खान किंवा गरीबांचा शाहरुख खान स्वप्निल जोशी ह्यांचा तू मर्त्य अवतार आहे असे जिथे तिथे बोलत असतोस. त्यातलेच समज.आधी पुस्तक वाच नि मग बोल. तोवर मॅच न बघता, पुस्तक न वाचता, ज्यांनी चक्षुर्वे सत्यम पाहिलेली आहे नि अनुभवलेली आहे त्यांचा (खेळाड नाही, माझा नाही) शब्द प्रमाण न धरता फक्त तुला वाटले म्हणून बनवलेल्या तुझ्या मताची किम्मत इतरांच्या मतापेक्षा शून्य धरली जाणार.
हा विचार स्वाभाविकच मनात आला पाहिजे फलंदाजाच्या कि आधी मी संघहिताचा विचार करेन, मग त्या प्रोसेसमध्ये जर शतक द्विशतक होतेय ते चांगले.>> भाऊंनी संघहित म्हणजे फक्त रनरेट वाढवणे नाही तर त्यात इतर खेळाडूंचा विचार करणे वगैरे ह्याबद्दल एक सुंदर पोस्ट आधी लिहीली होती. कळकळीची विनंती की एकदा तुझे विचार बाजूला ठेवून ओपन माईंड ठेवून ती परत एकदा वाच. बिनबुडाच्या रनरेट पेक्षा त्याला अधिक वजन आहे. एकून किती वेळा असे प्रकार झाले आहेत हे लक्षात घेतले कि त्या पोस्ट मधल्या मुद्द्याचे मह्त्व काय ते तुला लक्षात येईल (हि व्यर्थ अपेक्षा)
द्रविड आणि पंत तुलना नको...
द्रविड आणि पंत तुलना नको...
*चूक झाली. तरी आपले असे एकदम
*प्रत्येक सोसायटीत अशी सोय नसेल हे मान्य करतो.* - स्वत:ला अतिहुशार समजणारयाला बेधडक घातक सल्ला देतानाच ही साधी गोष्ट लक्षात यायला हवी होती. अगदींच पुळचट पळवाट आहे ही !
*चूक झाली. तरी आपले असे एकदम चिडणे समजू शकतो, क्रिकेटच्या धाग्यावर येत क्रिकेटच्या देवाला काही म्हटले की हा अनुभव येणारच. चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणारच.* - संबंधच काय या दोन गोष्टींचा ? शेवटीं, तुमचं ' गिरे , फिर टांग उपर ' आहेच !! आणि, देव कोण व दगड कोण हे ठरवायची मक्तेदारीही तुम्हीच तर स्वताकडे घेतलीय ना !!
चला. आजचा बकरा आला. आता
चला. आजचा बकरा आला. आता तोंडाला पाणी सुटले असेल. मिटक्या मारत मारत भक्ष्याची बसल्या बसल्या शिकार करताना वाहणार्या लाळेचा लांबलचक प्रतिसाद पसरेल.
मायबोलीवरच्या बऱ्याच
मायबोलीवरच्या बऱ्याच धाग्यांची थिल्लर आयडींनी वाट लावलेली आहे..... क्रिकेटचे चाहते अजूनही या धाग्यांवर येवून खरच चांगले चांगले लिहतात!
सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी पटत नसल्या तरी लिहणाऱ्यांची क्रिकेटबद्दलची आवड आणि त्यांचा अभ्यास त्यांच्या प्रतिक्रियांमधून डोकावत असतो.
अनेक अनोळखी लोक प्रत्यक्ष ओळखीच्या लोकांपेक्षाही या धाग्यांमुळे जास्त ओळखीचे झालेत.
क्रिकेटच्या धाग्यांवरील हे निकोप वातावरण बिघडू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेवूया.... इकडे येवून मनस्ताप व्हायला लागला तर अनेक चांगले लिहते आयडी लिहायचे बंद होतील.
तेंव्हा या विषयावर इथेच थांबूया!
कदाचित १६० पासून त्याने
कदाचित १६० पासून त्याने मारायची गरज असताना तो स्लो झाला असावा.
>>>>>>>>
साहेबांची 3 मे ची पोस्ट. "स्लो झाला असावा" सामना पाहून analysis केला म्हणे यांनी
लोक आपल्याकडचे ज्ञान शस्त्र म्हणून वापरताना पाहिले आहे पण आपले अज्ञान शस्त्रासारखे वापरताना इथे पाहिले. ह्यांचा क्लास लावायला पाहिजे
तेंव्हा या विषयावर इथेच
तेंव्हा या विषयावर इथेच थांबूया! >>
ह्या वॅळच्या आयपील मधून भारतीय संघ निवडायचा झाला तर चक्क कोहली नि रोहित बाहेर बसतील. मुख्य बॅट्समन सगळे वेगवेगळे ओपनर असतील.
शॉ, धवन (कप्तान), सॅमसन, राहुल, मयांक, स्काय , जाडेजा, राहुल चहर, साकरिया, दीपक चहर / आवेश खान, सिराज
बॅक अप : पड्डिकल
* ह्यातले मयांक नि स्काय हे अतिशय कमी कामगिरी वर आले आहेत फक्त ते अधिक फ्लो मधे वाटले नि लोअर मिडल ऑर्डर वर अॅडजस्ट करु शकतील असे वाटते म्हणून.
* दीपक चहर च्या विकेट्स २ सामन्यांमधल्या आहखान्हि एक त्रुटि आहे म्हणून आवेकल्ण्न सजेस्ट केलय.
* नॉन प्लेयिंग कप्तान हा ऑप्शन नाही म्हणून सिनियर खेळाडू न्यायाने धवन कप्तान. ह्या लिस्ट मधला एकही कप्तान मटेरियल नाही असे वाटते.
असामीजी, ' ह्या वेळच्या आयपील
असामीजी, ' ह्या वेळच्या आयपील मधून भारतीय संघ निवडायचा झाला तर...' आपल्या निवडीशी बव्हशी सहमत. पण एक महत्वाचा घटकही लक्षात घेणं अत्यावश्यक - यंदा आयपीएलचा फक्त पूर्वार्धच झाला आणि खेळाडूंची खरी कसोटी तर आयपीएलच्या उत्तरार्धात लागते. उदा., मुंबै तर नेहमीच प्रथम गटांगळ्या खात तळाला जाते व मग मुसंडी मारून प्रथम क्रमांक पटकावते. त्यामुळे, फक्त पूर्वार्धातलया कामगिरीवर आधारित निवड सर्वोत्तम असेलच असं नाहीं.
एकदम मान्य भाऊ. मी फक्त
एकदम मान्य भाऊ. मी फक्त झालेल्या सामन्यांवरच धरून चाललो होतो.
@ फेरफटका,
@ फेरफटका,
आपल्यामते माझी तथ्यहीन विधाने
१) सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो खेळायचा‘ >>> हे विधान माझे एकट्याचे नाही, सचिनभक्त सोडून अख्खे जग हे जाणते आणि मानते.
२) ‘द्रविड द्विशतकाजवळ आल्यावर स्लो खेळायचा‘ >>> हे विधान कुठे केले मी?
३) ‘ पंत रनरेट वाढवण्यासाठी शॉट्स मारत होता‘, >>> अर्थात, नाहीतर काय मी सुद्धा फटकेबाजी करू शकतो हे सिद्ध करायला मारत होता का?
४) ‘धोनी इतरांच्या व्यावसायिक हितसंबंधांकरता खेळतोय‘ >>>> ईतरांच्या आणि स्वतःच्याही. पैश्याचा खेळ आहे हा आयपीएल, उद्या निवृत्त झाल्यावर त्याचे आजच्यासारखे उत्पन्न नसणार आहे. त्याला चेन्नई खेळवायला तयार असेल तर तो अजूनही दोन खेळेल. तसेही जे चेन्नई चेन्नई व्हिसलपोडू म्हणून सोशल मिडीयावर हवा असते ती धोनीपश्चात कल्पनाही करू शकत नाही. त्याला किमान डग आऊटमध्ये कोच मेंटर म्हणून बसवावेच लागणार टीआरपीचे व्यावसायिक गणित साधायला. आज ईंटरनॅशनमधून निवृत्त होऊनही तो सर्वात मोठा ब्रांड आहे भारतीय क्रिकेटमधील.
५) आयपीएल मधल्या मॅचेस फिक्स्ड असतात‘ >>> आयपीएलच काय ईंटरनॅशनलमध्येही फिक्सिंग चालते, लोकं पकडलेही गेले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. आहात कुठे?
@ असामी,
@ असामी,
पुस्तक वाचण्यात रस नाही ह्याचे एकमेव कारण तुला तुझ्या आर्ग्युमेंट मधे (सचिन द्वीशतकासाठी स्लो खेळला) तथ्य नाही हे जाणवलेय नि ते मान्य करता येणार नाही
>>>>>>
आधी तुम्ही माझे मायबोलीवरचे आजवरचे सर्व धागे वाचून काढा. मग मी सचिनचे पुस्तक वाचतो
तुम्हाला कल्पना आहे की मी ते बोअर व्यावसायिक पुस्तक बिलकुल वाचण्यात माझा वेळ खर्ची घालणार नाही म्हणून मुद्दाम पुस्तक वाच पुस्तक वच एकच मुद्दा पकडून आहात. जसे पुस्तकात ब्रह्मदेवानेच सचिनच्या रुपात सत्य लिहिले आहे
..
तोवर मॅच न बघता,
>>>>
अच्छा हे आपण स्वतःच ठरवूनच टाकले का मी मॅच बघितली नाही
संघहित म्हणजे फक्त रनरेट वाढवणे नाही तर त्यात इतर खेळाडूंचा विचार करणे वगैरे
>>>>>>
याचे उत्तरही मी माझ्या आधीच्या पोस्टम्ध्ये दिले आहे. ईतर खेळाडूंचा विचार करणे म्हणजे त्यांना वैयक्तिक शतक करायला देऊन खुश करणे तर मला हे वैयक्तिक शतकाला महत्व देणेच पटत नाही. यापेक्षाही ईतर बरेच मार्ग आहेत एक कर्णधार म्हणून खेळाडूंना प्रोत्साहित करायचे. पण जिथे लारासारखा कर्णधार मॅच अनिर्णित राखत स्वतःचे चारशे धावा करण्याला प्राधान्य देतो आणि जर कोणी त्याचेही कौतुक करत असेल तर अश्यांना ते समजावणे अवघड.
@ च्रप्स,
@ च्रप्स,
द्रविड आणि पंत तुलना नको...
>>>>>
खरे तर तुलना कुठल्याही दोन खेळाडूंची करू नये.
पण या दोघांत एक साम्य आहे.
या दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असे विजय मिळवून दिले आहेत ज्या माझ्या क्रिकेट आठवणींचा एक गोड भाग आहेत
ह्या लिस्ट मधला एकही कप्तान
ह्या लिस्ट मधला एकही कप्तान मटेरियल नाही असे वाटते.
>>>>
अगदी हेच मनात आलेले आपली लिस्ट बघताना
बरेचदा असे संघ अश्याच प्रकारे निवडले जातात. आधी अकरा खेळाडू निवडा आणि मग त्यातील कर्णधार कोण हे निवडा. कर्णधाराच्या भुमिकेला बरेचदा अंडरएस्टीमेट केले जाते, कप्तानीच्या कामगिरीला अश्या संघनिवडीत वेटेज दिले जात नाही.
म्हणून संघ या आयपीएलचा काढा किंवा मागच्या. आधी दहा प्लेअर काढून मग त्यात एक मातब्बर कर्णधार हवाच म्हणून एखादा शर्मा वा धोनी वा जो आपल्यामते चांगला कर्णधार असेल त्या पैकी जो त्या उर्वरीत दहाच्या संघाला सूट होईल तो त्यात टाकायचा
@ भरत,https://www.maayboli
@ भरत,
https://www.maayboli.com/node/78821
सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो
सचिन शतकाजवळ आल्यावर स्लो खेळायचा‘ >>> हे विधान माझे एकट्याचे नाही, सचिनभक्त सोडून अख्खे जग हे जाणते आणि मानते.
>>>
पण सचिनची बॅटिंग बेस्ट होती... जुन्या पिढीचा कोहली होता तो...
जुन्या पिढीचा कोहली होता तो..
जुन्या पिढीचा कोहली होता तो..>> याहून मोठा अपमान नाही सचिनचा. सचिन सचिन होता, बऱ्याचदा न्यूटनचे नियम आणि इकवेशन्स देखील लागू न पडणारे, शब्दांत पकडता न येणारे शॉट्स मारणारा. ते रेकॉर्ड वगैरे कागदी गोष्टी असतात. उत्सुकता असेल तर युट्यूब चाळा हा फुकटचा सल्ला. एकट्या सचिनच्या रिटायरमेंट मुळे निम्म्या पब्लिकने क्रिकेट पाहणं सोडून दिलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बीसीसीआयला सांगा एकदा हा सर्व्हे करून पहाच
"हे विधान माझे एकट्याचे नाही,
"हे विधान माझे एकट्याचे नाही, सचिनभक्त सोडून अख्खे जग हे जाणते आणि मानते." - आता मात्र मला नाथा कामतासारखं 'बाबा रे, तुझं जग निराळं, माझं जग निराळं' असं म्हणावसं वाटतंय. आक्खे मूग, वाल वगैरे ऐकले होते, पण तुझ्या लेबलप्रमाणे सचिनभक्त सोडून उरलेलं जग आक्खं जग कसं होईल? उरलेलं होईल ना?
आता मूळ प्रश्नाकडे. भाऊ म्हणाले तसं ह्या विषयावर इतकं लिहून झालंय की आता कंटाळा आलाय, पण एक शेवटचा प्रयत्न.
Cricinfo commentary is only available from 2001 so the stats of last 20 hundreds of Sachin Tendulkar is :
0-90 runs – 95.94
91-100 runs – 103.60
100+ runs – 138.12
ह्याउप्पर तुला जे म्हणायचं ते म्हण.
"अर्थात, नाहीतर काय मी सुद्धा फटकेबाजी करू शकतो हे सिद्ध करायला मारत होता का? " - हू नोज? उगाच टीव्हीवर मॅच पाहून खेळाडूंच्या मनात काय चाललंय ते अंदाज का बांधायचे? तो त्याचा नैसर्गिक खेळ म्हणूनही तसा खेळत असेल. बॉलिंग सोपी असेल म्हणूनही तसा खेळत असेल. उगाच आपल्या मनाचे श्लोक दुसर्याच्या माथ्यावर का मारायचे?
"आयपीएलच काय ईंटरनॅशनलमध्येही फिक्सिंग चालते, लोकं पकडलेही गेले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. आहात कुठे?" - ते कुणीच नाकारलं नाहीये. पण आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून कुठल्याही पुराव्याअभावी मॅच फिक्स्ड असल्याचा आरोप करण्यात अर्थ नाही.
"आज ईंटरनॅशनमधून निवृत्त होऊनही तो सर्वात मोठा ब्रांड आहे भारतीय क्रिकेटमधील." - तू कधीतरी फॅक्ट्स, डेटा, स्टॅट्स वगैरे चेक करून लिहीत जा रे. हे घे: The 32-year-old Kohli’s brand value in monetary terms based on engagement and followers stood at Rs.3.28 billion, followed by Sachin Tendulkar at Rs.1.67 billion, MS Dhoni at Rs.1.24 billion, and Rohit Sharma at Rs.0.96 billion. Kohli has a brand score of 43.94 and is followed by two players who have retired from international cricket, Yuvraj Singh – 40.40 and Sachin Tendulkar – 37.51
ते वैय्यक्तिक शतकाबद्दलः तो स्कोअर टीम च्याच टोटल मधे धरतात ना? का वेगळा मांडला जातो?
सचिनभक्त सोडून उरलेलं जग
सचिनभक्त सोडून उरलेलं जग आक्खं जग कसं होईल? उरलेलं होईल ना? >> उरलेले म्हणजे तो एकटा नि त्याच्यासाठी तोच जग आहे हे अजून तुला लक्षात आलेले नाही का? त्याने वर म्हटलय ना कि पुस्तक लिहिणारा मह्त्वाचा नाही, त्या प्रसंगात जे सामील होते ते काय म्हणतात ते मह्त्वाचे नाही, गेला बाजार मॅच बघणे ही मह्त्वाचे नाही - फक्त बेलगामपणे वाट्टेल ते मत ठोकून देता आले पाहिजे नि त्यावर पाने भरून सबगोलांकार पोस्टींचे गुर्हाळ घालता आले की झाले. हेच ते जग त्याचे.
बरेचदा असे संघ अश्याच प्रकारे
बरेचदा असे संघ अश्याच प्रकारे निवडले जातात. आधी अकरा खेळाडू निवडा आणि मग त्यातील कर्णधार कोण हे निवडा. कर्णधाराच्या भुमिकेला बरेचदा अंडरएस्टीमेट केले जाते, कप्तानीच्या कामगिरीला अश्या संघनिवडीत वेटेज दिले जात नाही. >> मला नाही हे एव्हढे सोपे आहे. सर्व प्रथम कप्तान एक खेळाडू म्हणून संघामधे बसणे जरुरी आहे तसे नसेल तर तो कितीही हुशार कप्तान असला तरी दहा जणांचा सांघ घेऊन खेळू शकत नाही. (उदा. धोनी जर कीपर नसता तर चेन्नई मधे अडगळ झाला असता त्याचे कप्तान कौशल्य कितीही वादादित असले तरी) त्या मूळे वेटेज देताना आधी प्लेअर म्हणून वेटेज दिले जाऊन मगच किती कौशल्य कर्णधार म्हणूण दाखवणार ह्यावर फोकस केला जाणार.
Submitted by निलिमा on 5 May,
Submitted by निलिमा on 5 May, 2021 - 05:47
>>>>>>
तुम्ही युवराजने मारलेले मोजत आहात.
सचिनने डिक्लेरेशनच्या आदल्या ओवरला चार चेंडूत तीन डॉट आणि एक दोनचा फटका तर त्याच्या आदल्या ओवरला तीन चेंडूत दोन डॉट आणि एक सिंगल काढला.
>>
मी आधिच्या पाच षटकात केलेल्या धावा दिलेल्या आहेत त्यातिल जवळ्जवळ निम्या धावा साधारण निम्या बॉल्स्मध्ये सचिनने केलेल्या आहेत.
लेग बायची बाउन्ड्री पण शॉट खेळतानाच मिळाली आहे आणि रनरेट आठ आहे. त्याआधि काही षटके पण सहाच्या जवळपास आहे.
लक्षाट घ्या ही मॅच १८ वर्षापुर्वीची टेस्ट आहे.
तुम्ही बरोबर म्हणालात, पाकिस्तानी पण धावा काय सहज देत नसणार. कारण त्या जगात कोणीही देत नाहीत. त्या काढाव्या लागतात. पण सचिन म्हणजे द्रविड नाही जे मुळातच संथ खेळ आहे.
>> हेच मला आवडत नाही आता वर साधारण ५/६ च्या रेटने सचिन शतकाजवळ असताना खेळतो आहे ईव्हन चारचा धरा., आता त्याने सेहवाग सारखेच मारले पाहिजे का? (सेहवाग गावसकर खालोखाल सर्वोत्तम ओपनर होता असे माझे मत आहे) १९४ वर असताना ज्याप्रमाणे डिक्लेअर केले तो मुर्खपणा होता. द्विशतकापेक्षा " तो हळु खेळत होता म्हणुन डिक्लेर करावा लागला" हा अपमान कोणाला आवडेल? म्हणुन सचिनने काय झाले हे पुस्तकात सांगितले. द्रविडला चुकीचे वाटले असते तर त्याने ऑब्जेक्षन काढले असतेच ना?
मी त्याकाळात (९६ ते २०००) भारतात सीप्झ्मध्ये काम करत असे. सचिनकडे अत्यंत वाईट अवस्थेत भारताची क्प्तानी आली होती. बरेच चांगले खेळाडु मॅच फिक्सिंगमध्ये गोवले गेले होते. निर्णय झाला नव्हता पण संघाचे मनोबल एकदम खच्ची पडले होते. सचिनकडे या अवस्थेत कप्तानी आली होती. त्याने खुप प्रयत्न केला पण त्सौरव, द्रविड नवोदित होते आणि बोलिंगपण खास नव्हती. शेवटी सचिनवर तो फक्त उत्तम खेळाडु आहे कप्तान नाही असे सांगुन बोळवण झाली. सौरव नक्कीच उत्तम कप्तान होता पण त्या काळात संघाची घसरण अनेक इतर कारणांमुळे झाली हे स्पष्ट दिसत होते.
तुम्ही जर सुपरमॅनशी तुलना केली तर सचिन नक्कीच कमी पडणार ना?
बरेचजण (स्पेसिफिकली नॉन मराठी ) फक्त द्वेषामुळेच सतत कधी तो खेळ्ला नाही की लगेच टीका करायला येत, म्हणुनच आम्हाला असे बोलावे लागे.
शतक प्रत्येकालाच प्रिय असते (https://www.youtube.com/watch?v=oZ3RMVSR5N8) आणि टेस्टमध्ये जास्त बॉल खेळणे आणि रन्स करणे याचा सुवर्णमध्य सचिनने साधला होता. द्रविडसारखे १३००० करायला ३०००० बॉल त्याने घेतले नाही आणि सेहवाग सारखा द्विशतक नाहीतर ५ धावा असेपण केले नाही. (अर्थात द्रविड आणि सेहवागचा रोल वेगळा होता त्यांच्या अॅबिलिटी प्रमाणे) पण सेहवाग व द्रविडवर कोण सतत टीका करत नाही मग सचिन वर टीका करणे हे सचिन द्वेष्टे पण नाही काय?
सचिनच्या आवडणार्या काही गोष्टी.
१) इतके अचिव्ह करुनही तो नेहेमी नम्र राहिला. (मला मायबोली वरच एक गोष्ट आठवते एकाची, ऑस्ट्रेलिया टुर नंतर निघताना सचिन एकदम दमलेला होता. त्याचे सिक्यरीटी त्याला गर्द्दी पासुन दुर नेत होते. आपल्या एका मायबोलीकरानेच त्याला " सचिन ! मराठी माणसाला तु भेटणार नाही का?" अशी हाक मारली. सचिन्ने थांबुन मागे येवुन त्याला सही आणि फोटो दिला. बाकी एकही भरतीय खेळाडु थांबला नाही, मायबोलीवरच ही गोष्ट वाचली होती.)
२) तो कधिही पॅट्रनायझिन्ग वागला नाही. धोनी उत्तम असला तरी हे खुप करत असे, म्हणजे कोणाबद्दल चांगले बोलतय असे दाखवुन त्याचे दोष दाखवायचे पण आपण सपोर्ट करतोय असे दाखवायच सचिनने केलेली खरी मदत धोनी कधी बोलुन दाखवत नसे, सेहवाग, युवराज यांनी वेळोवेळी सचिन कशी मदत करत असे (भांडण मिटवायला, मॅच जिंकायला सल्ल देउन) याबद्दल सांगितले आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीला वरती जाण्याचा सल्ला सचिनचाच होता (हे पण सेहवागने सांगितले म्हणुन कळले). उगाच गंभिर तोंड करुन इतरांच्या खेळाबद्दल जाहिर सल्ले त्याने कधीच दिले नाही. जे सांगायचे तो त्या खेळाडुला सांगे. पत्रकारांना तो इंटरनॅशनल खेळाडु आहे त्याला जाउन काय ते विचारा असे स्पष्ट बोले.
३) कोहली सारखा तो कधीच चिडला नाही. खेळाडु देशासाठी खेळत असला तरी हा खेळ आहे युद्ध नाही याचे भान त्याने नेहेमी ठेवले.
सचिन शतकाजवंळ आला की हळु खेळ म्हनतात कारण त्याने खुप शतके मारली त्यामुळे सर्व जण सचिनचे शतक जवळ आले की इंटेंटली पहायचे. सचिनची विकेट मिळावी म्हणुन बॉलर्स, कप्तान देखिल जास्त प्रयत्न करायचे. द्रविड लक्ष्मण्साठी गेम प्लॅन खुप उशीरा चालु झाले रा॑व!
जर इतरांच्या शतकासाठी एवढी स्क्रुटीनी झाली असती तर आपल्याला कळले असते ना की कंपॅरिझन काय आहे!
अजुन सचिनबद्दल असे म्हटले
अजुन सचिनबद्दल असे म्हटले जाते की ही नेव्ह्रर प्लेड व्हेन टीम नीड्स हिम. (तुम्ही नाही पण बरेच बोलत!)
यात आयर्नी अशी होती की सचिन खेळत असतानी विजय नेहेमी शक्य वाटे त्यामुळे टीम विल ऑल्वेज नीड हिम व्हेन ही इस औट
आयपीएल २०१० मध्ये सचिनने ६३५ धावा १२४ रेटने करत ऑरेंज कॅप मिळवली, तर सर्व म्हणत सचिन कोहली रोहित शर्मा सारखा फास्ट खेळत नाही. सचिन तेव्हा ३६ वर्षाचा होता, हिटींगचा रोल दुसर्या कोणी घ्यायला नको? आता ३१ वर्षाचे होता होता कोहली रोहित किती फास्ट खेळु शकतात
(अक्खी स्पर्धा एखादी मॅच नाही) यालाच अवास्तव अपेक्षा म्हणतात. जर दुसरे कोण हवे असेल तर संघ व्यवस्थापनाने सांगताच सचिन दुर झाला असता, पण प्रत्येक मॅच मध्ये सचिनची तुलना त्यामॅच्मध्ये बेस्ट असलेल्याशी केली गेली हे चुकीचे आहे.
बाहेरचे लोक हे लगेच ऑळखतात!
मी सुद्धा फटकेबाजी करू शकतो
मी सुद्धा फटकेबाजी करू शकतो हे सिद्ध करायला मारत होता का? ... मी आधीही सांगितले की RCB विरुद्ध नाबाद राहुनही पंत ला सामना जिंकवता आला नाही. पाहिलं असेलच. म्हणून सिद्ध करत होता ज्याची गरज नव्हती.
राहता राहिला सचिन... सौरव गांगुली जो पर्यंत सचिन सोबत सलामीला खेळला तो पर्यंत किती यशस्वी झाला बघा त्यामागे अजुन एक कारण होतं की बाकी संघ सचिन च्या मागे लागत आणि दादा एका बाजूने खेळुन जात तेच सेहवाग आणि दादा सलामीला खेळले आणि सचिन नंतर धोकादायक गांगुली होता त्यामुळे विरुद्ध संघानी गांगुली वर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्या मर्यादा उघड्या पडल्या नंतर परत सचिन सलामीला आला पण तोपर्यंत सर्वांना गांगुली शाॅर्ट बाॅल वर फसतो समजलं होतं...
सचिन काय चिज होता हे तुम्हाला कळलंच नाही कारण जेव्हा सचिन खेळायचा तेव्हा तुम्ही अजाणता असाल. आयपील मुळे क्रिकेट पहायला शिकलेल्या लोकांना काय समजणार सचिन. ९० च्या दशकात किती महान गोलंदाज होते आणि आता चे गोलंदाज किती महान आहेत हे वेगळं सांगायला नको.
एवढं धोनी/पंत करत आहात तर बघा... जरा ऑफ साईड च्या बाहेर बाॅल पडायला लागले की कसं चाचपडतात. पंत ची काय हालत केली सिराज ने याच वर्षी जास्त जुनं पण नाही.
सचिन ला ओलंगा ने बाद केल्यावर... काय रामायण घडलं माहीती असेलच नसेल तर You Tube आहेच... सचिन कडे ती कुवत होती ती धोनी, पंत,विराट, रोहित कोणाकडेच नाही...
अजुन खुप काही आहे पण आज वेळ कमी आहे
*खेळाडु देशासाठी खेळत असला
*खेळाडु देशासाठी खेळत असला तरी हा खेळ आहे युद्ध नाही याचे भान त्याने नेहेमी ठेवले.* - 100% सहमत ! बाकी, सचिनची सर्वांगीण महानता माझयापुरती तरी वादातीत आहे !
Pages