Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजही दिल्लीने शेवट रनरेट
आजही दिल्लीने शेवट रनरेट वाढवायचा प्रयत्न करायचा हेच डोक्यात ठेऊन केला.... ६ सामने शिल्लक आहेत आणि त्या पैकी २ सामने जिकंले की बाद फेरी निश्चित आहे. तरीही जर दिल्ली रनरेट... रनरेट करत असेल तर मग धन्य ती दिल्ली आणि पंत पण... या रनरेट च्या नादात २~३ सामने जर हरली ना मग तर झालंच कल्याण...
दिल्ली अशा स्थितीत आहे की केवळ सामने जिकंली तरी पहिल्या दोन मध्ये राहील. असाच जर दबाव घेत राहिली ना तर बाद फेरीत महत्वाच्या सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवेल.
भावा प्रश्न शतकाचाच नाही तर एक कप्तान आपल्या खेळाडू ला कसं खेळवतो/ प्रोत्साहीत करतो याचा आहे. द्रविड ने ती चुक केली ते पण अशा वेळी आणि संघा विरुद्ध की ती घोडचूक ठरली. वर उल्लेख केल्याप्रमाणे...
पंत लहान आहे तो शिकेलच...
गल्ली क्रिकेट बोलशील तर आम्ही जिंकायला सोपी किंवा २~५ धावा हव्या असतील तर आजही लहान मुलांना जा रे जिकंव... कारण गल्ली क्रिकेट मध्ये शतकं नाही करत कोणी... त्या लहान मुलांना प्रोत्साहीत एका सामन्यात केलं ना ते दिवस भर किपर मागे उभे राहून चेंडू आणून देतात. तर विचार कर पंत ने असं काही केलं तर ते खेळाडू काय काय करतील...
मुद्दा फक्त हा की जिकंण्या सोबत तुझे खेळाडू पण समाधानी ठेवने कप्तानाच काम आहे नाहीतर RR / SRH गेला बाजार पाक सारखी अवस्था होते...
*शतकाला ईतके महत्व दिले आहे
*शतकाला ईतके महत्व दिले आहे आणि ते मोजू लागलो आहोत त्यामुळे आपल्याला हा विचार पचनी पडणे अवघड आहे हे मी समजू शकतो.* - सगळयाच क्षेत्रांत ठराविक संख्येला प्रतिकात्मक महत्व असतं. उदा., दर वर्षी वाढदिवस साजरा केला तरी माणसाचे, संस्थांचे, रजत/ सुवर्ण महोत्सव याला खास महत्व दिलं जातच ना. फक्त क्रिकेटमधेच अर्धशतक, शतक याला तसं महत्व देणं ही विकृती समजायची ? कांहींही !!!
तेंव्हा जॉन राईट कोच होता आणि
तेंव्हा जॉन राईट कोच होता आणि गांगुली कर्णधार होता..... द्रवीड बदली कर्णधार होता..... द्रवीडचा एकूण स्वभाव बघता बदली कर्णधार म्हणून तो त्या दोघांना विश्वासात न घेता इतका मोठ्ठा निर्णय घेईल असे वाटत नाही.
पण गांगुली आणि जॉन राईट यांनी तेंडूलकरला आवर्जून भेटून या निर्णयात आपला काही हात नव्हता असे सांगून हात झटकले.... असे का बरे करावेसे वाटले असेल त्यांना? म्हणजे मग तो निर्णय चुकीचा होता असे म्हणायचे होते का त्यांना? मग टीम मॅनेजमेन्टचे महत्वाचे घटक म्हणून याबद्दल त्यांनी द्रवीडचे कान उपटले का?
असो! खरे काय ते त्या चौघांनाच माहित! आणि त्या चौघांनीही आपला स्टॅंड जाहिरपणे जाहिर केलेला आहे.
मला फक्त कधी कधी इतकाच प्रश्न पडतो की तिथे तेंडूलकरच्या जागी दुसरा एखादा फलंदाज असता (उदां लक्ष्मण किंवा अगदी सेहवाग वगैरे) तरी या शिळ्या कढीला इतका उत येत राहिला असता का?
मला फक्त कधी कधी इतकाच प्रश्न
मला फक्त कधी कधी इतकाच प्रश्न पडतो की तिथे तेंडूलकरच्या जागी दुसरा एखादा फलंदाज असता (उदां लक्ष्मण किंवा अगदी सेहवाग वगैरे) तरी या शिळ्या कढीला इतका उत येत राहिला असता का?
>>> नक्कीच आला असता पण हिंदीबोली किंवा तेलगुबोली वर.. सचिन बाबत झाले म्हणून इथे... जनता माफ नाही करेगी...
बटलर फॉर्मात आला, संजू
बटलर फॉर्मात आला, संजू कंसिस्टंसी दाखवतोय, मॉरीस, त्यागी आणि सकारिया चांगली बॉलींग करतायत..... तो तेवटिया तेव्हढा स्पिनर म्हणून कमी पडतोय!
अनुज रावतला बॅटींगची संधी मिळाली नाही तरी त्याचा मैदानावरचा वावर चांगला वाटला.... किपर असूनही फिल्डवर क्लीन कॅचेस घेतले त्याने!
आता उरलेली टुर्नामेंट कशी खेळतायत ते बघू!
विल्यमसन निसंशय वॉर्नरपेक्षा चांगला कर्णधार असला तरी असे स्पर्धेच्या मध्येच कर्णधार बदलणे मला फार पटत नाही (मागच्या वर्षी केकेआरनेही तेच केले होते). या निर्णयामागे वॉर्नरचे मनीष पांडेला बाहेर बसवण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण ही कारणीभूत आहे असे म्हणतात.
पुढच्या वर्षी होणारेय की mega auction तेंव्हा करा की सगळे फेरबदल!
बाय द वे, काल वॉर्नर पण बळेबळे १२वा खेळाडू बनून पळापळी करत होता असे वाटले का कुणाला? म्हणजे जरा अतिच करत होता तो!
मयंक मस्त खेळला काल पण
मयंक मस्त खेळला काल पण पंजाबची टीम राहुलशिवाय अगदीच अपूर्ण वाटली
शिखर धवन काय कंसिस्टंसी दाखवतोयं..... सुपर! ऑरेंज कॅप!
निर्णयामागे ते आणि दादा यांचा
निर्णयामागे ते आणि दादा यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. >>>>
त्याआधी दादाने येऊन तसे द्रविडला खुणावलेलेले. दादाच्या चेहर्यावरचे भाव बोलके होते. याचा उल्लेख गूगलवर या विषयाच्या चर्चेत कुठे सापडणार नाही म्हणा... >>>>>
सचिनने त्याच्या पुस्तकात ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. जॉन राईट, गांगुली दोघांनीही हा निर्णय आपला नव्हता हे सांगितलं होतं. द्रविडने घेतला असेल निर्णय आणि तो चुकला असेल तर ठिक आहे. पण उगीच त्याच्यावर दबाव आला होता, गांगुलीने खुण केली होती वगैरे थिअर्या नको! ह्याबद्दल कुठे सापडणार नाही असे आधीच लिहून पुरावा मागू नये ह्याची तजवीज पोस्टीत आधीच केलेली आहे.
सचिनच्या पुस्तकातलं पान नंबर २४८, २४९ वाचा.
तरी या शिळ्या कढीला इतका उत येत राहिला असता का? >>>> अरे उत्तरं दिली नाही तर काळ सोकावतो ना!
प्रताधिकार भंग.
प्रताधिकार भंग.
हा फोटो मी संदर्भ म्हणून
हा फोटो मी संदर्भ म्हणून दिलेला आहे. जर तो चालणार नसेल तर अॅडमिन उडवतीलच.
नाही चालत. मायबोलीवर
नाही चालत. मायबोलीवर वाङ्मयचौर्याची एक मोठी केस झाली होती. तिथे पुरावा म्हणून अन्यत्र ऑनलाइन उपलब्ध असलेल्या पीडीफचा स्क्रीनशॉट टाकला, तो उडवला होता. अॅडमिन काही क्रिकेटचा धागा वाचत नसतील. पण मायबोलीचं याबद्दलचं धोरण पुरेसं स्पष्ट आहे.
अॅडमिन काही क्रिकेटचा धागा
अॅडमिन काही क्रिकेटचा धागा वाचत नसतील >>>> ते वाचतात. हल्लीचाच अनुभव आहे.
असो, एडीट केलं आहे.
६ सामने शिल्लक आहेत आणि त्या
६ सामने शिल्लक आहेत आणि त्या पैकी २ सामने जिकंले की बाद फेरी निश्चित आहे. तरीही जर दिल्ली रनरेट... रनरेट करत असेल तर मग धन्य ती दिल्ली आणि पंत पण...
>>>>>>>>>>
नुसते बाद फेरीत का यायचे? पहिल्या दोनात येणे गरजेचे आहे जर एक्स्ट्रा चान्स हवा असेल तर. आणि तिथे फार चुरस आहे सध्या.
*काल वॉर्नर पण बळेबळे १२वा
*काल वॉर्नर पण बळेबळे १२वा खेळाडू बनून पळापळी करत होता असे वाटले का कुणाला? म्हणजे जरा अतिच करत होता तो *- खरंच, माझ्याही मनात हें येवून गेलं. कदाचित, आपण संघाचा निर्णय मनापासून स्विकारलाय हें दाखवण्याचा हेतू असावा त्याचा.
*मयंक मस्त खेळला काल पण पंजाबची टीम राहुलशिवाय अगदीच अपूर्ण वाटली* - +1. बहरात येणारी नवोदित प्रतिभावान फलंदाजांची फौज वाढतच चाललीय. त्यात, धवन, राहूल, रोहित हेही फाॅर्मात . निवडसमितीला डोकेदूखीच होणार आहे !
उदा., दर वर्षी वाढदिवस साजरा
उदा., दर वर्षी वाढदिवस साजरा केला तरी माणसाचे, संस्थांचे, रजत/ सुवर्ण महोत्सव याला खास महत्व दिलं जातच ना. फक्त क्रिकेटमधेच अर्धशतक, शतक याला तसं महत्व देणं ही विकृती समजायची ? कांहींही !!!
>>>>
विकृती हा शब्द जरा भारी नाही वाटत. मी कुठे वापरलाय का? मग का ऊगाच माझ्या तोंडी घालत आहात
शतकाला महत्व देण्याबाबत मला तसेही काही हरकत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची आवड.
पण जो कप्तान शतकाला महत्व न देता संघहिताला देत असेल त्याला कोणी चुकीचा ठरवत असेल तर त्यावर मात्र आक्षेप आहे
जॉन राईट, गांगुली दोघांनीही
जॉन राईट, गांगुली दोघांनीही हा निर्णय आपला नव्हता हे सांगितलं होतं. द्रविडने घेतला असेल निर्णय आणि तो चुकला असेल तर ठिक आहे. पण उगीच त्याच्यावर दबाव आला होता, गांगुलीने खुण केली होती वगैरे थिअर्या नको!
>>>>>>>
दादा वा राईट काहीही सांगू दे, मी सामना लाईव्ह पाहिला आहे. दादाने दोन बोटे दाखवून द्रविडजवळ येत ईशारा केलेला. बहुधा दोन ओवर दे आणखी खेळायला वगैरे. आणि त्याचा चेहरा बोलका होता. कधी कुठे मिळाला त्याचा विडिओ तर जरूर बघा. तसेही तो निर्णय कोणाचा होता हे जास्त महत्वाचे नाहीयेच सदर चर्चेत
*पण जो कप्तान शतकाला महत्व न
*पण जो कप्तान शतकाला महत्व न देता संघहिताला देत असेल त्याला कोणी चुकीचा ठरवत असेल तर त्यावर मात्र आक्षेप आहे * - त्यावर चर्चा झाल्यावरही पुन्हा पुन्हा शतकाला महत्व देण्याचा मुद्दाच उगारला व उगाळला जातोय असं नाहीं वाटत ? ठीक आहे, अपवादात्मक स्थितीत शतकाला अवाजवी महतव देवूं नये. पण शतकाचा आनंदच चूकीचा ? प्रचंड मोठी तफावत असावी बहुतेक , तुम्ही व मीं क्रिकेट कशासाठी पहातो यांत ! माझंच चुकत असावं काहीतरी.
दादा वा राईट काहीही सांगू दे,
दादा वा राईट काहीही सांगू दे, मी सामना लाईव्ह पाहिला आहे. >>>>
तसेही तो निर्णय कोणाचा होता हे जास्त महत्वाचे नाहीयेच सदर चर्चेत >>>
बाकी द्रविड बद्दल आदर वाढला की कमी झाला ह्यावरुनच 194 ची चर्चा सुरू झाली ना ! मग निर्णय कोणाचा हा मुद्दा महत्त्वाचा नाही कसा ? असो !
पण शतकाचा आनंदच चूकीचा ?
पण शतकाचा आनंदच चूकीचा ? प्रचंड मोठी तफावत असावी बहुतेक , तुम्ही व मीं क्रिकेट कशासाठी पहातो यांत !
>>>>
पुन्हा तेच, शतकाचा आनंदच चुकीचा असे कोण म्हणाले?
मी सुद्धा लिहिलेय की विजयाच्या प्रोसेसमध्ये येत असेल तर त्याचा आनंद आहे. लढून आलेल्या पराभवात येत असेल तर त्याचाही आनंद आहे. पण संघहिताच्या आड येत असेल तर मात्र बिल्कुल आनंद नाही. मग भले कितीही समर्थन करा की जरासा रनरेट कमी झाला असता तर लगेच काही एवढा फरक पडला नसता वगैरे, पण मुळात हा विचार फलंदाजाच्या स्वतःच्या मनातच आला नाही पाहिजे.
बाकी द्रविड बद्दल आदर वाढला
बाकी द्रविड बद्दल आदर वाढला की कमी झाला ह्यावरुनच 194 ची चर्चा सुरू झाली ना ! मग निर्णय कोणाचा हा मुद्दा महत्त्वाचा नाही कसा ? असो !
>>>>>
कारण तिथे द्रविडच्या जागी कोणाचेही नाव टाकले तरी प्रश्न हाच राहिला असता की सचिनला १९४ वर ज्याने डाव घोषित करून रोखले त्याबद्दलचा आदर कमी झाला की जास्त.
क्लीअर
प्रचंड मोठी तफावत असावी
प्रचंड मोठी तफावत असावी बहुतेक , तुम्ही व मीं क्रिकेट कशासाठी पहातो यांत !
>>>>>>>
आमच्या बिल्डींगमध्ये काही पोरे उघडपणे म्हणायची की सचिनचे शतक झाले पाहिजे, मग भारत हरला तरी चालेल.
मला ती लोकं कधीच कळली नाहीत.
(No subject)
बऱ्याच लोकांचे असे मत आहे की
बऱ्याच लोकांचे असे मत आहे की भारतातील अशा परिस्थितीमध्ये IPL खेळवू नये, स्पर्धा रद्द करावी
बर्याच लोकांचे असेही मत आहे
बर्याच लोकांचे असेही मत आहे की या लॉकडाऊनमध्ये हा विरंगुळा आहे. शक्य झाल्यास आयपीएल रद्द करू नये.
दोन्ही मते आपल्या जागी योग्य आहेत.
*पण संघहिताच्या आड येत असेल
*पण संघहिताच्या आड येत असेल तर मात्र बिल्कुल आनंद नाही. * - जणूं तूम्ही एकटे सोडून इथले इतर सर्व त्या विरूद्ध मताचे आहेत !
जणूं तूम्ही एकटे सोडून इथले
जणूं तूम्ही एकटे सोडून इथले इतर सर्व त्या विरूद्ध मताचे आहेत ! Wink
>>>>
असे मी कुठे म्हणालो नाही, पण शक्य आहे कारण ईथे संघ भारत नसून दिल्लीचा आहे. जर कोणाला दिल्ली क्वालिफाय होतेये की नाही वा जिंकतेय की नाही यापेक्षा शॉ खेळतोय की नाही यात जास्त रस असेल तर तो बिल्कुल आक्षेपार्ह नाही.
पण पंत दिल्लीचा कर्णधार आहे, त्याने जो निर्णय घेतला तो संघहिताचाच आहे. त्यामुळे त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हे मला चुकीचे वाटतेय.
>>त्याने जो निर्णय घेतला तो
>>त्याने जो निर्णय घेतला तो संघहिताचाच आहे.<<
अरे काय तुझी रेकॉर्ड परवा पासुन संघहितावरच अडकलेली आहे. पृथ्वीला स्ट्राइकवर ठेउन त्याला शतक पूर्ण करण्याची संधी देणं, किंवा तेंडल्याला द्विशतक पूर्ण करायला लावुन नंतर डाव घोषीत केल्यामुळे "संघहित खतरेमे" कसं आलं असतं ते सांग. शिवाय दोन्हि प्रसंगात परिस्थिती अगदिच आणिबाणीची न्हवती...
आणि वर तुझ्या म्हणण्या नुसार गांगुलीने दोन बोटं दाखवली ती दोन ओवर्स खेळायला दे या अर्थानेच कशावरुन? तेंडल्याचं द्विशतक पूर्ण करायला दे असं नाहि कशावरुन...
आणि वर तुझ्या म्हणण्या नुसार
आणि वर तुझ्या म्हणण्या नुसार गांगुलीने दोन बोटं दाखवली ती दोन ओवर्स खेळायला दे या अर्थानेच कशावरुन? तेंडल्याचं द्विशतक पूर्ण करायला दे असं नाहि कशावरुन.. >> मी आता हेच लिहायला आलो होतो. राईट नि गांगुली ह्यांनी ऑन त रेकॉर्ड जे सांगितले ते गेले उडत नि तू सामना पाहिला ह्या बळावर किती ढकलायचे राव ते.
विल्यमसन निसंशय वॉर्नरपेक्षा चांगला कर्णधार असला तरी असे स्पर्धेच्या मध्येच कर्णधार बदलणे मला फार पटत नाही >> मला कर्णधार बदलला ह्यापेक्षा त्यांनी वॉर्नरला बाहेर ठेवले ते डोक्यावरून गेले. ते मॅचेस हरत आहेत कारण मिडल ऑर्डर काहीच करत नाहीये, वॉर्नर चा तो एक सामना सोडला तर रेट चांगला आहे नि नेहमीएव्हढा फॉर्म मधे नसला तरढापहिला/दुसरा रन गेटर आहे. त्याच्या जागी नबी म्हणजे अगदीच निरथक चेंज - होल्डर अआणला असता तरी समजू शकलो असतो. खर तर बेअर स्ट्रो, वॉर्नर नि पांडे/विल्यिमसन्स भरपूर मार्जिन देतील धावा काढायला. केवळ पांडेला न घेतल्याबद्दल टीका केली म्हणून हे केल्यासारखे वाटले. उद्या वॉर्नर ला रीलीज केले तर बाकीचे सात संघ आनंदाने घेतील त्याला. अतर्क्य निर्णय !
बऱ्याच लोकांचे असे मत आहे की भारतातील अशा परिस्थितीमध्ये IPL खेळवू नये, स्पर्धा रद्द करावी << मागे पीएसल अशी अर्ध्यात रद्द केली होती त्यामूळे वर वर्ल्ड कप बद्दल शंका येऊ शकते ह्यामूळे आता हा प्रेस्टिज ईश्यू बनू शकतो बीसीसीआय साठी. खर तर आधीच गल्फ मधे हलवायला हवी होती शहाण्यासारखी. टाईम झोन मधे एव्हढा ही फरक नाहीये कि लोक बघू शकत नाहीत.
पृथ्वीला स्ट्राइकवर ठेउन
पृथ्वीला स्ट्राइकवर ठेउन त्याला शतक पूर्ण करण्याची संधी देणं, किंवा तेंडल्याला द्विशतक पूर्ण करायला लावुन नंतर डाव घोषीत केल्यामुळे "संघहित खतरेमे" कसं आलं असतं ते सांग.
>>>>
सांगतो,
१) दोन्ही बाजूने मारून रनरेट वाढवण्यात संघहित होते.
२) सचिनबाबत नुसते त्याचे १९४ बघू नका. कदाचित १६० पासून त्याने मारायची गरज असताना तो स्लो झाला असावा.
गांगुलीने दोन बोटं दाखवली ती दोन ओवर्स खेळायला दे या अर्थानेच कशावरुन? तेंडल्याचं द्विशतक पूर्ण करायला दे असं नाहि कशावरुन... Proud
>>>>>>
बिलकुल शक्य आहे. म्हणून मी म्हटलेय की मी त्याच्या हावभावांवरून बांधलेला तो अंदाज आहे. चुकीचाही असू शकतो. तसेही सध्याच्या चर्चेत कोण त्या डिक्लेअरेशनमागचा मास्टर माईंड आहे हे महत्वाचे नाही. ते योग्य की अयोग्य यावर आपण चर्चा करतोय. एखाद्याला ते अयोग्य वाटू शकते ज्याला द्विशतकाचे कौतुक आहे. पण एखाद्याला ते नसेल तर त्याला त्या डिक्लेअरेशनमागची वा परवाची पंतच्या निर्णयामागची भुमिका नक्की समजू शकेल.
राईट नि गांगुली ह्यांनी ऑन त रेकॉर्ड जे सांगितले ते गेले उडत
>>>>>
अहो असामी, कोर्टात लोकं गीतेवर हात ठेऊन खोट्या शपथा खातात. कोणी म्हटले म्हणजे ते खरे असे कुठे असते का राव?
लारा 400 रन्स साठी किती वेळ
लारा 400 रन्स साठी किती वेळ खेळला माहीत असेलच...
Submitted by pravintherider
>>>>>
छान उदाहरण दिलेत, बिलकुल कौतुक नाही त्या खेळीचे.
लाराने ४०० मारले आणि विंडीजने पहिल्या डावात ७५१ धावा मारत तब्बल २०२ ओवर्स खेळून काढल्या.
यामुळे झाले काय, ईंग्लंड जेव्हा त्यांच्या इनिंगला ९९ ओवर खेळून २८५ ला सर्वबाद झाले तेव्हा त्यांना फॉलोऑन द्यावा लागला.
तेच जर विंडीजने दुसर्या दिवशीच तासभर आधी म्हणजे १७० वगैरे ओवर खेळत ५५० च्या आसपास डिक्लेअर केले असते तर मग ईंग्लंड १०० ओवर खेळून सर्वबाद झाल्यावर त्यांना फॉलोऑना न देता आपल्या १०० ओवर टाकलेल्या बॉलरना विश्रांती देता आली असती. जे शक्य झाले नाही ते लाराच्या ४०० धावांमुळे.
आणि मग दमलेल्या विंडीज गोलंदाजांना ईंग्लंडने दुसर्या इनिंगमध्ये १३७ ओवर खेळत ४२२/५ मारत सामना अनिर्णित राखला.
लारा हिरो झाला. विंडीजचा विजय हुकला.
पण कोणाला तरीही त्या खेळीचे कौतुक असेल तर माझी काहीही हरकत नाही
भाऊ म्हणतात तसे, माझा आणि ईतरांचा या खेळाकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा आहे हे मी मान्य केले आहे
तळटीप - लारा स्वतःच कप्तान होता तेव्हा. स्वतःच्या ४०० धावांसाठी त्याने संघाचा विजय हुकवला. आणि विरोधाभास असा की या त्याच्या कृत्याला सामनावीर देऊन गौरवले गेले. खर्रच, महान खेळ आहे हा
आणि याहून अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ईंग्लंड ती ४ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. हा शेवटचा सामना विंडीजला जिंकायची संधी होती ती सुद्धा या विक्रमी खेळीमुळे हुकली.
अहो असामी, कोर्टात लोकं
अहो असामी, कोर्टात लोकं गीतेवर हात ठेऊन खोट्या शपथा खातात. कोणी म्हटले म्हणजे ते खरे असे कुठे असते का राव? >> बर मग तू इथे लाईव्ह बघितले नि दोन बोटे दाखवली ह्या वर जे इमले बांधलेत ते पण खरे असे आम्ही कशाच्या आधारावर धरू ? तुझा रेकॉर्ड काही फर आदर्श नाहीये ह्याबाबतीमधे - सारखे मॅच फिक्स होती ह्या पालुपदामूळे राव
कदाचित १६० पासून त्याने मारायची गरज असताना तो स्लो झाला असावा. >> तू एकदा सचिनचे पुस्तक ह्याबद्दल वाचच. टी टाईमच्या वेळि त्याला सांगितले गेले कि शेवटच्या पंधरा ओव्हर्स पाकिस्तानला दिल्या जातील. त्याप्रमाणे त्याने इनिंग पेस केली होती. मधे एकदम त्याला सांगितले गेले कि पेस वाढव, तो त्याने वाढवला. त्या नंतर एकदम मेसेज आला कि ह्या ओव्हर मधे दोनशे करून घे. ती ओव्हर युवी नि पार्थीव ने खेळली नि त्यामूळे दोनशे शक्य झाले नाहीत पण पाकिस्तान ला सतरा ओव्हर्स मिळाल्या. थोडक्यात काय एकून जे झाले ते बघता अजून दोन ओव्हर्स नी फरक पडला नसता. सचिन ने त्या आधी ऑस्ट्रेलिया दौर्या मधे राहुल ने अशा परिस्थिती मधे काय केले ह्यावर बोट ठेवले आहे. हा सगळा मजकूर स्वतः वाच नि मग पुढे बोलू. *ह्यातून द्रवीड बद्दल मला असलेला आदर अजिबात दुणावत नाही किंवा संघहित वगळता अजून काही हेतू त्याच्या मनात असेल अशी मला काडिचीही शंका नाही. सचिन ने ही हे असेच स्पष्ट केले आहे. फक्त संघहित जोपासण्याचा एकच एक मार्ग असतो असे जरुरी नाही हे दिसते.
Pages