Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहान असताना wwf बघायचो तेव्हा
लहान असताना wwf बघायचो तेव्हा वाटायचं ते खरोखरच मारतात. नंतर मोठं झाल्यावर समजलं की ती खोटी फाईट असते. आयपीएलचं सत्य काही वर्षांनी असंच समोर येईल की काय अशी भीती वाटायला लागले आता.
" पूर्वीचं क्रिकेट आता राहिलं
" पूर्वीचं क्रिकेट आता राहिलं नाही ...................अवस्था झाले क्रिकेटची."
अनुमोदन!
तसे फिक्स करण्याचे प्रकार पूर्वी टेस्ट मधेहि होत असत म्हणे. अझारुद्दिन आणि क्रोन्ये यांची नावे आठवतात.
Pages