Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो मी नुसते स्कोअरबोर्ड
लोकहो मी नुसते स्कोअरबोर्ड बघून आता बघा कसे मोक्याच्या वेळीच अशी मॅच झाली असे म्हणत नाहीये.
मी बॉल टू बॉल मॅच पाहिली आहे. फलंदाज ज्या पद्धतीने टेस्ट मॅच स्टाईल बॉल तटवत होते. अगदी शेवटच्या बॉललाही दुसरी धाव घ्यायची जराही ईच्छा दाखवली नाही. ते गोलंदाजांनीही धावांची कशी लयलूट होईल हे पाहिले. तो सगळा ड्रामा डोळ्यांनी पाहिला आहे. एवढी वर्षे क्रिकेट बघतोय. ते कसे खेळले जाते हे कळते. बॉल टू बॉलही सोडा. राजस्थान बाद कसे झाले हे हायलाईटस बघितले तरी कळते. कुठलीही मॅच घ्या. स्लो पिचवर बॉल हवेत मारून झेलबाद झालेले दिसतील. या लोकांनी विकेट फेकायच्या नादात रन्स जातील म्हणून तश्याही विकेट फेकल्या नाहीत. एलबीडब्लू, बोल्ड, कॅच बाय कीपर अश्या विकेट टू विकेटच विकेट फेकल्या. कारण पुर्ण खेळच तसा चालू होता.
असो, कोणी कबूल करावे अशी माझी बिलकुल ईच्छा नाही. ईथल्या लोकांना जे क्रिकेटचे ईतके बारकावे कळतात त्यांना स्वत:लाही हे कळत असणारच हे मला माहीत आहे.
पण जर आयपीएलमध्ये काही सेंटींग होतच नाही असे समजल्याने कोणाचा ते सामने बघण्याचा रस कायम राहात असेल तर चांगलेच आहे. मी मात्र असे सामने आले की बघतो आणि सोडून देतो. पुढच्या सामन्याचा आनंद लुटायला सज्ज होतो. कारण मोजकेच सेट असते, सारेच नाही हे मला माहीत आहे. जिथे संशयाला अगदी पुरेपूर वाव असतो ते तेवढे वेचून बाजूला सारतो. उदाहरणार्थ कालच्या सामन्यानंतर मुंबई सपोर्टर म्हणून मला शून्य आनंद झाला आहे हो. थोडा त्रासही होतो. जो अशी प्रामाणिक पोस्ट टाकल्याने हलका होतो.
क्रिकेट हा जितका टॅलेंट चा
क्रिकेट हा जितका टॅलेंट चा खेळ आहे, तितकाच तो टेंपरामेंट चा, अनुभवाचा आणि adaptability चा खेळ आहे. कालच्या मॅच नंतर संगक्काराने सांगितलं की अबु धाबीहून आल्यावर, शारजाह च्या नवीन विकेटला त्यांचे बॅट्समेन अॅडाप्ट नाही होऊ शकले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या चढ-उताराचा अनुभव असलेले, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पीचेस वर क्रिकेट खेळलेले खेळाडू त्या मानानं लवकर अॅडाप्ट होतात. म्हणून आयपीएलमधल्या ज्या टीम्समधे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा जास्त अनुभव असलेले, फीट, सक्रीय आणि फर्स्ट चॉईस आंतरराष्ट्रीय खेळाडू जास्त आहेत, त्यांचे इतके दारूण कोलॅप्सेस होण्याचं प्रमाण त्यामानानं कमी आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थः संजू सॅमसन गेलं वर्षभर भारतीय संघाबरोबर होता. यंदा त्याच्या खेळात जास्त मॅच्युरिटी दिसली. ऋतुराज गायकवाड गेली काही वर्ष इंडिया-ए तर्फे देशात, परदेशात अनेक मॅचेस खेळतोय, मुंबई, चेन्नई टीम्स मधे फर्स्ट चॉईस, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा (आजी-माजी) जास्त भरणा आहे. दिल्ली ने सुद्धा धवन, अश्विन, पंत, अय्यर, रबाडा, नॉर्ट्ये, स्मिथ ला टीममधे घेतलंय.
हा फरक लीग क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय मॅचेस मधे नेहमीच दिसेल - जसा अमेरिकन फूटबॉलमधे, NFL आणि college football मधे जाणवतो तसाच. त्यातून आयपीएल भारताबाहेर असल्यामुळे अनुभवी आणि अननुभवी खेळाडूंच्या खेळातली तफावत जास्त जाणवत असावी.
ह्याउप्पर जर आयपीएलमधले, किंवा कुठल्याही क्रीडाप्रकारातले गैरप्रकार उघडकीस आले तर एक स्पोर्ट्स-फॅन म्हणून दु:ख, चिडचिड होईलच. पण आयपीएलमधे घडणार्या आपल्या सरावाच्या नसणार्या किंवा unusual वाटणार्य प्रत्येक गोष्टीकडे फिक्सिंग म्हणून पहाणं मला over simplification वाटतं.
ऋन्मेषचे हॅमरींग काम करतय असे
ऋन्मेषचे हॅमरींग काम करतय असे दिसतय!! >> म्हतारी मेल्याचे का म्हणत होतो कळले ना स्वरुप
पण आयपीएलमधे घडणार्या आपल्या सरावाच्या नसणार्या किंवा unusual वाटणार्य प्रत्येक गोष्टीकडे फिक्सिंग म्हणून पहाणं मला over simplification वाटतं. >> +१ . सुंदर पोस्ट लिहिलयस फेफे. फूटबॉल चे उदाहर्ण तर एकदमच चपखल आहे. फिक्सिंग म्हणत वरती रात्री बेरात्री मॅचेस बघण्यात अमूल्य वेळ घालवून प्रत्येक पोस्ट मधे तोच तोच कंटाळवाणा रतिब घालणे हा प्रकार तर माझ्या समजूतीच्या कुवतीच्या बाहेर आहे. (माझ्या अल्प बुद्धीचा दोष)
भाऊ, मी स्वतःपुरते इतके सांगू शकतो कि मी ह्या वर्षी बर्याच इतर इंटरनॅशनल लीग मॅचेस बघितल्या . इथल्या लोकल लीग मधल्या मॅचेस पण भरपूर फॉलो केल्या. ज्या लेव्हल चे चढ उतार तिथे मॅच गणीक बघितले त्यावरून आयपील मधे जे दिसते ते मला आश्चर्याचे वाटत नाही. .
"ज्या लेव्हल चे चढ उतार तिथे
"ज्या लेव्हल चे चढ उतार तिथे मॅच गणीक बघितले त्यावरून आयपील मधे जे दिसते ते मला आश्चर्याचे वाटत नाही. ." - खरंय असामी. नुकत्याच संपलेल्या सीपीएलमधे सुद्धा स्लो पिचेस, दुपारी वि. संध्याकाळी सुरू होणार्या मॅचेस ई. प्रकारांत असे बरेच चढ-उतार बघायला मिळाले. इतकंच कशाला, नुकत्याच संपलेल्या न्यूझिलंड - बांग्लादेश सिरीजमधे सुद्धा न्यूझिलंड चे एकाद-दुसरे प्लेयर्स जे अॅडाप्ट झाले, ते वगळता त्यांचेही कोलॅप्सेस कसे झाले, पटेल ने बांग्लादेशच्या बॅट्समेन ना त्यांच्याच औषधाचा डोस कसा दिला हे पहाणं इंटरेस्टींग होतं. इतक्या पॅक्ड टाईमटेबलमधे प्लेयर्स ना acclimatize व्हायला वेळच मिळत नाही.
मीं देखील फिक्सींग नाहीं असं
मीं देखील फिक्सींग नाहीं असं गृहीत धरूनच सामने बघतो पण कधीं कधीं तें कठीण वाटतं, हेही खरं.
मीं इतर लीग सामने बघत नाहीं.
*आपल्या सरावाच्या नसणार्या किंवा unusual वाटणार्य प्रत्येक गोष्टीकडे फिक्सिंग म्हणून पहाणं मला over simplification वाटतं*. - पण अनपेक्षित गोष्टी एका ठराविक अपेक्षित उद्दीष्टाकडेच जाताना दिसल्या , तर शंका मनात येणारच ना. ती चूकीची ठरो.
"ती चूकीची ठरो." - सौ टके की
"ती चूकीची ठरो." - सौ टके की बात हैं!
पण अनपेक्षित गोष्टी एका
पण अनपेक्षित गोष्टी एका ठराविक अपेक्षित उद्दीष्टाकडेच जाताना दिसल्या , तर शंका मनात येणारच ना. ती चूकीची ठरो. >> मागे कोहली बद्दल का गावस्कर बद्दल बोलताना तुम्ही म्हणाला होता ना कि रोल मॉडेल्स वर एक अव्यक्त जबाबदारी असते, ते तुम्हाला पण लागू होते. तुमच्यासारखे प्रामाणिक चाहते जेंव्हा अशा शंका व्यक्त करता तेंव्हा इथल्या शंकेखोर व्यक्तींना अधिकच चेव येतो.
*तुमच्यासारखे प्रामाणिक चाहते
*तुमच्यासारखे प्रामाणिक चाहते जेंव्हा अशा शंका व्यक्त करता,,,,,, * - पक्ष बदलासाठी तुम्ही मला लांच तर देत नाहीं ना, असं कां बरं माझ्या मनात यावं ?
कधी कधी अशक्य वाटणार्या
कधी कधी अशक्य वाटणार्या गोष्टीही घडतातच. क्रिकेटमधे ते अजून जास्तच. टेस्ट टीमचा १०० काय पन्नासच्या आत ऑल आउट होउ शकतोच ना. ३६ ऑल आउट झालेली टीम सिरीज जिंकेल हे कुठल्या एक्स्पर्टच्या बापाने सांगितल होत हो?. पाकिस्तानने किंवा भारताने वर्ल्ड कप जिंकला तेंव्हा कुणाला वाटल होत हे जिंकतील म्हणून.
कितीही अशक्य वाटल तरी. टी-२० मधे किती तरी संघांचा ऑल आउट होतो. मग ९० मधे झाला त्यात आश्चर्य काय?. आणि तेही जिथे सगळ्या टीम्स स्ट्रगल करत आहेत तिथे. आणि फक्त नव्वदच करायचाय तर बॉल हार्ड असताना फटाफट करून टाकण्यात काय अशक्य आणि अतर्क्य.
शिवाय आर आर चा प्रत्येक खेळाडू ठरवून मॅच हरायचा प्रयत्न करत होता अस असण अशक्य आहे. त्यामुळे भाउ निर्धास्त रहा.
पक्ष बदलासाठी तुम्ही मला लांच
पक्ष बदलासाठी तुम्ही मला लांच तर देत नाहीं ना, असं कां बरं माझ्या मनात यावं ? Wink>>>
भाऊ, म्हणजे तुम्ही पक्षांतर केले होते!! मल फक्त तुमच्यात 'आपल्यावर ह्या पक्षात अन्याय होतोय' ही भावना निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी होतोयअसे दृष्य दिसत होते !
पुर्ण पक्षांतर(मतांतर) नव्हते दिसत. अजुनही नाही दिसत किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून.
कृष्णाजी, थिल्लरपणा हा माझा
कृष्णाजी, थिल्लरपणा हा माझा स्थायीभावच आहे. असामीजी खरंच क्रिकेटचे जाणकार आहेत. त्यानी मला टपली मारणयाऐवजी असं काही लिहीलं म्हणून जरा गंमत केली.
कितीही अशक्य वाटल तरी. टी-२०
कितीही अशक्य वाटल तरी. टी-२० मधे किती तरी संघांचा ऑल आउट होतो. मग ९० मधे झाला त्यात आश्चर्य काय?. आणि तेही जिथे सगळ्या टीम्स स्ट्रगल करत आहेत तिथे. आणि फक्त नव्वदच करायचाय तर बॉल हार्ड असताना फटाफट करून टाकण्यात काय अशक्य आणि अतर्क्य.
>>>>
याचे उत्तर मी आधीच दिले आहे. केवळ स्कोअरबोर्ड बघून मी हे म्हटले नाहीये. तर सामना पाहिलाय डोळ्यांनी. खेळ "कसा" चालू होता हे समजत होते
असो, मला कोणाला पटवून द्यायचेच नाहीये मुळात
जे होणार ते होणारच त्यामुळे
जे होणार ते होणारच त्यामुळे असं का झालं तसं का झालं याचा विचार न करता खेळ पहा.आपण रीलमधले कॅरॅक्टर आहोत आपल्या हातात काही नाही.
बोकलत यांचा काही पक्षांना
बोकलत यांचा काही पक्षांना बाहेरून पाठिंबा आहे अस दिसतय.
बाकी आमचा पास. किंवा वेल लेफ्ट. काहिही म्हणा.
*बाकी आमचा पास. किंवा वेल
*बाकी आमचा पास. किंवा वेल लेफ्ट. काहिही म्हणा.* किंवा 'पॅक', ' वाॅक ओव्हर '....
बोकलत मोड ऑन:- पोराला एनसीबी
बोकलत मोड ऑन:- पोराला एनसीबी सोडून देईल फक्त आजची मॅच mi जिंकली पाहिजे
बोकलत मोड ऑन:- पोराला एनसीबी
बोकलत मोड ऑन:- पोराला एनसीबी सोडून देईल फक्त आजची मॅच mi जिंकली पाहिजे >>
फक्त आजची मॅच mi जिंकली
फक्त आजची मॅच mi जिंकली पाहिजे आणि केकेआर हरण्यासाठी शाहरुख मॅनेज झाला पाहिजे
कालची बेंगलोर हैदराबाद मस्त
कालची बेंगलोर हैदराबाद मस्त झाली.
अशी मॅच बघायला मजा येते
येत्या सामन्यात बेंगलोर एबीडीचा वापर जास्त चांगल्या प्रकारे करून घेईल अशी अपेक्षा. किती वेळा त्यांना हेच सांगायचे समजत नाही.
मॅक्सीचा फॉर्म ईतका तुफान असताना हे दोघे एकत्र पेटले तर दोघे मिळून पिचविचच्या पलीकडे स्कोअर टाकू शकतात.
पोराला एनसीबी सोडून देईल फक्त
पोराला एनसीबी सोडून देईल फक्त आजची मॅच mi जिंकली पाहिजे Wink>>>
आज केकेआर हरली तर असे म्हणायचयं काय? एम आय उद्या आहे ना मॅच...
आज धोनी मॅच फिक्स असल्यारारखी कप्तानी करतोय का? त्याचा हुकमी एक्का दिपक चहर देखिल महागडा ठरलायं! कारण १४ षटकात पंजाब जिंकले तर मुंबईच्या वर जातील तक्त्यात आणि केकेआर मोठ्या फरकाने हरले आणि मुंबई उद्या हरली तर पंजाब जाईल पुढे.
सामना फिक्सींग विश्लेषण तज्ञांनी कृपया मत द्यावे!
आणि ढोणीच्या संघाने ४ थ्या
आणि ढोणीच्या संघाने ४ थ्या जागेसाठी रंगत निर्माण करून पंजाबला १३ षटकात विजयी केले! विश्लेषक कृपया आपले मत!
आता फक्त शारुखच्या संघाने मोठ्या फरकाने हरायचे बाकी!
अच्छा, पंजाब तर हिशोबातच
अच्छा, पंजाब तर हिशोबातच नव्हती. असा सामना झाल्यामुळे हे चर्चेत / लक्षात आले..
केकेआरचे टेंशन घेऊ नका. त्यांच्या मालकाचा पोरगा आपल्या ताब्यात आहे हे मेसेज गारा पडाव्यात तसे पडताहेत..
शाहरूखचा मुलगा अडकल्याने आता या मॅचला एक वेगळेच वलय आलेय..
कृष्णाजी, थिल्लरपणा हा माझा
कृष्णाजी, थिल्लरपणा हा माझा स्थायीभावच आहे. असामीजी खरंच क्रिकेटचे जाणकार आहेत. त्यानी मला टपली मारणयाऐवजी असं काही लिहीलं म्हणून जरा गंमत केली >> का टपल्या मारताय भाऊ असे काही बोलून हो.
हैद्राबादला जरा उशिरा फॉर्म सापडला. राहुल आज एकदम तुफानी खेळला. एक हाती सामना खेचलाय त्याने जवळ जवळ.
जावय का खेळतोय एव्हडा? एरवी
जावय का खेळतोय एव्हडा? एरवी कधी खेळत नाही. असं आहे हो. आपली माणसंच आपल्याला खाली खेचतात.
हमे तो अपनोने लुटा गैरो मे
हमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था.
जावय भी ऊस दिन खेला जब nrr कम था.
"राहुल आज एकदम तुफानी खेळला"
"राहुल आज एकदम तुफानी खेळला" - हाच राहुल वर्ल्डकप ला येओ त्याने चहरला ती स्वीपची सिक्स कसली खतरनाक मारली!! चहर आणि धोनी, दोघांच्याही चेहेर्यावर 'केवळ अविश्वसनीय' असे भाव होते.
"पक्ष बदलासाठी तुम्ही मला लांच तर देत नाहीं ना," - भाऊ, पक्ष बदलणं वगैरे काही मनात आलं तर सरळ एखादं व्यंगचित्र काढून मोकळे व्हा, पण 'हा पक्षबदलाचा दुष्ट नाद सोडा'. (एकच प्याला मोड ऑफ)
जावयबापूंनी कमालच केली. एखादा
जावयबापूंनी कमालच केली. एखादा असता तर चार पाच जणांना रन आऊट करून गेला असता. काय अर्थ नाही राहिला दोस्तांनो. चला मी जातो मराठी बिग बॉस बघायला.
हाच राहुल वर्ल्डकप ला येओ >
हाच राहुल वर्ल्डकप ला येओ > >आमेन !
जावयबापूंनी कमालच केली.
जावयबापूंनी कमालच केली.
>>>>
तुम्ही आमचा मुलगा अडकवला
आम्ही तुमचा जावईबापू वापरला
जेव्हा मयंक मारतो आणि राहुल
जेव्हा मयंक मारतो आणि राहुल उभा राहायचे काम करतो तेव्हा तो नीरस वाटतो. पण जेव्हा अश्या टॉप गीअरमध्ये खेळतो तेव्हा त्याच्यासारखे २०-२० मध्ये क्लासिकल फटके मारणारा प्लेअर जगात नाही दुसरा.
भारताची टीम पंजाब नाही. त्यामुळे त्याने स्पर्धेच्या सुरुवातीपासून याच गेअरमध्ये खेळावे. जे तो करतोही.
Pages