आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते बहुतेकांना ईथे कळलेय की आयपीएलमधील सारेच काही सिरीअसली घ्यायचे नसते.
पण हे प्रत्येकाने कबूल करणे गरजेचे नाही Everyone has right to believe their beliefs Happy

मुक्या इज ग्रेट.
Submitted by बोकलत on 8 October, 2021 - 19:58
>>>>>

+७८६
ईशान पाठोपाठ सुर्यालाही फॉर्मला आणले.
ऑफला मागे खुले मैदान दिलेय. आणि तो ऊचलून ऊचलून मारतोय.
होल्डरने त्या कूल्टरनाईलला फुलटॉस दिला. त्याने हातात कॅच दिली. बरे यांनी ती कॅच सोडली. गधड्याने पुन्हा पुढच्या बॉलला कॅच दिली.
मग होल्डरने सुर्याला लेग साईडला फुल्टॉस दिला. एक फोर दिला.
मग यानेही मिड ऑफ मिड ऑन आत ठेवून सुर्याला सरळ सरळ समोर मारायला दिला. ईरफान पठाण कॉमेंटरीला बोलतो आपने जैसी फिल्ड लगायी है ये आपको ऐसे गेंद डालने की अनुमती नही देता. आप एक ईंटरनेशनल कप्तान है, ये क्या कर रहे है.... अरे बाबा तेच चालूय केव्हापासून.. Happy

चला आता मलिक आला. सेम स्ट्रॅटेजी. ऑफचे फिल्डर आत आणि हा राईट आर्म राऊंड द विकेट येउन ऑफला आणखी बाहेर जाणारा बॉल टाकतोय..

मुंबई २३५
सुर्या ४० बॉल ८२ - त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम स्कोअर !

काही म्हणा, मुंबईने दाखवून दिले की आयपीएलचे बॉस तेच आहेत !

काही म्हणा, मुंबईने दाखवून दिले की आयपीएलचे बॉस तेच आहेत !>>> ही चिटिंग आहे ऋनम्या. तू दोन्ही साईडने बोलू नको त्या डबल ढोलकी उत्कर्षसारखा. आपण मुक्याचे गुणगान गात होतो. मग अचानक मुंबई बॉस कशी झाली? की मुक्या बॉस आहे असं म्हणायचं आहे तुला?

आपण मुक्याचे गुणगान गात होतो. मग अचानक मुंबई बॉस कशी झाली? >>> हे काय, समानार्थी शब्द वापरायचे नाहीत का Happy

आता हैदराबादनेही २००+ करावेत. पुढे जेसन रॉय आणि मागे होल्डरने धुरळा उडवावा Happy

अय्यरने मॅक्सवेलची कॅच सोडली.. बोटे आकाशाकडे ठेवून.. कॉमेंटरीला गावस्करही म्हणाला, नका पकडू असे. भारतीयांकडून नाही पकडल्या जात. त्या दिवशीची ईथली चर्चा आठवली.
बाई दवे चॅनेल चेंज करा. पंत-कोहली धमाल चालूय

मुंबई १७१ धावांनी जिंकेल अस म्हणण म्हणजे किती मूर्खपणा होता. आणि मॅच चालू असतान कस ते घडतय याची भलावण करण. शिवाय मुंबई जिंकण्यासाठी मॅचेस फिक्स केल्या जात नाहीत अस त्याच दिवशी म्हणून झालय. कशाचा कशाला काही मेळ आहे का. चला झोपा आता.
आमची टीम आता दिल्ली. यंग बॉईज.

आज दिल्लीच्या फेसबूक पेजवर हिट ठरलेली एक कॉमेंट मायबोली बाहेर च्या जगात काय चालते आणि लोकं काय विचार करतात हे दाखवायला एक उदाहरण म्हणून शेअर करतो.

When they needed 7 runs last ball they gave one extra run through misfield and bowled one wide full toss and Srikar missed that wide full toss than avesh bowled next ball straight full toss. Srikar finished the match..what a fixers..I,m DC fan..from today onwards I hate this team..

अश्या कैक पोस्ट आहेत आणि त्यांना कैक लाईक आहेत.
कारण आयपीएलमध्ये काही सामन्यात मोक्याच्या क्षणी धोक्याच्या गोष्टी कमालीच्या सातत्याने होतात Happy
तरी अश्या संशयाचा फायदा मी नेहमी प्लेअरनाच देतो. कारण अश्या गोष्टी प्रेशरमध्ये होत राहतात. पण जेव्हा डावपेचांवरूनच समजून येते, क्सलेही प्रेशर नसतानाही ईंटेशन समजून येते, अति झाले आणि हसू झाले असे होते, तेव्हाच फक्त मी उल्लेख करतो.
बाकी मॅच मस्त झाली. मुंबईची अगदीच हास्यास्पद आणि रटाळ झाली.

बिहारच्या पूराची बातमी ‘दिब्रूगड धोक्यात आहे असे आमचा बातमीदार म्हणतो‘ अशा टॅगलाईनसकट ‘आधीच’ आपल्या
आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवणार्या होरारत्न आण्णा पावश्यांची आठवण झाल्यावाचून रहात नाही. Happy

आधीच एक सिद्धांत मनाशी पक्का बाळगायचा आणि मग त्या अनुशंगाने समोर दिसणार्या प्रत्येक घटनेतून - त्या घटनेची सत्यासत्यता, साक्षीपुरावे, गेला बाजार तर्कसंगती ह्या कशाचीही तमा न बाळगता - आपण माडलेला सिद्धांत सिद्ध झालाय अशी हाकाटी पिटायची ह्यातलं सातत्य वाखाणण्याजोगं आहे.

कालची दिल्ली -बँगलोर मॅच मस्त झाली. श्रीकर भरत हा गेली काही वर्षं सातत्यानं डोमेस्टीक क्रिकेटमधे चांगली कामगिरी करतोय. पंत, किशन च्या काळात त्याला भारतीय संघाकडून खेळायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे पण आयपीएलच्या माध्यमातून त्याला मोठ्या स्तरावर ओळख मिळाल्याचं बरं वाटलं.

टी-20 चषकाच्या संघात बदल करण्यासाठी आज शेवटची तारिख आहे. हार्दिक पांडया ( फाॅर्म ) , वरूण चक्रवर्ती ( फिटनेस) व राहूल चहर ( फाॅर्म) वगळले जाण्याची शक्यता गुगल'ने वर्तवली आहे.
आजपासून आयपीएलची ' प्ले ऑफ' फेरी सुरू होत असली, तरी ' फिक्सींग आहे कीं नाहीं ' ही स्पर्धा मात्र अखंड पाॅईंटस टेबलवरच खेळवली जाईल ! Wink

युझवेंद्र चहलला आता तरी घेतील का?
खरे तर २०-२० फॉर्मेटचा विचार करता त्याचे नाव आश्विनच्याही आधी हवे होते. फॉर्म पाहता राहुल चहरच्याही तो बराच पुढे आहे. जडेजा असताना अक्षर पटेलचीही पहिली जागा बनत नाही. त्यामुळे युझी चहल या सर्वांच्या आधीच संघात हवा होता. पण बहुधा कोहलीचा दाणापाणी उठायची लक्षणे आहेत त्यात त्याच्या लाडक्या खेळाडूंचेही मरण होतेय.

पण आता तरी वरुण चक्रवर्ती जर फिट नसेल तर तो थेट अकरातच यायला हवा. थोडावेळ राजकारण बाजूला ठेवतील तर बरे होईल.

*..तर तो थेट अकरातच यायला हवा* - +1. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक अस्सल लेग स्पीनर आपल्या संघात असणं (अगदींच अपवादात्मक परिस्थिती नसेल तर ) अपरिहार्यच समजण्याइतकं महत्वाचं मानतो मीं !

होरारत्न आण्णा पावश्यांची आठवण झाल्यावाचून रहात नाही >> काय आठवते रे तुला ! एकदम जबरदस्त रेफरेन्स दिलास बाकी.

पण आता तरी वरुण चक्रवर्ती जर फिट नसेल तर तो थेट अकरातच यायला हवा. >> नसेल तर ?

मलिक ला नेट बॉलर म्हणून ठवणार हे जबरदस्त काम झाले. त्याचा स्पीड नि कांट्रोल पण चांगला आहे.

हार्दीक नकोच. दोन वर्षे घरी बसवला की बरोबर बोलिंग साठी फिट होइल. सध्या शार्दूल काम भागवेल. वेंकी अय्यर चांगला ऑप्शन आहे पुढे.
चहल किंवा एक लेग स्पिनर हवाच.

आजची मॅच पण अनाकलनीय आहे. सगळे खेळाडू फिट आहेत, बॅटने बॉल मारताहेत, हाताने बॉलिंग टाकताहेत, मधूनच फोर सिक्स मारताहेत. आयपीएल फिक्स नसते हे दाखवण्याची किती ती धडपड.

माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है
माही
माही
माही
माही मार रहा है

..

.

.

.
.
.
.
.

असे बॉल मिळतील तर मी सुद्धा मारले असते Lol

कर्णधार, यष्टीरक्षक व ग्रेट फिनीशर या आपल्या रास्त त्रिमित प्रतिमेला उजाळा देत धोनी सीएसकेला अंतिम फेरीत घेवून तर आलाय !!!

रबाडाला त्याचा ह्या मॅच मधला बॉलिंग परफॉर्मन्स बघता तीन ओव्हर देणे घोडचूक ठरली. धोनी वयोमानपरत्वे पेस विरुद्ध झगडतो हे विसरून त्याला कुरान च्या मिडीयम पेस ला आरामात हाताळायला देण्याचा जुगार नडला. स्टोनिस नसणे महागात पडले.

मला वाटतं रबाडा ह्या सेगमेंटमधे टोटली आऊट ऑफ फॉर्म आहे. थोडं आधी (लीग स्टेजमधे) इशांतला ट्राय करून बघता आलं असतं दिल्लीला. टॉम करन कधीच इतका प्रभावी वाटत नाही. असो. दिल्लीला अजून एक संधी आहे.

उद्याची मॅच चांगली होईल असं वाटतंय.

*धोनी वयोमानपरत्वे पेस विरुद्ध झगडतो हे विसरून ...* काल त्याला विश्रांती मिळून शेवटचीच ओव्हर तर खेळायची होती व तीही हाणामारीशिवाय पर्याय नसलेली ! मला वाटतं गोलंदाजीच्या वेगाने त्याच्या खेळात किंवा बाद होण्याच्या शक्यतेत फारसा फरक पडला नसता.
*टॉम करन कधीच इतका प्रभावी वाटत नाही. असो. * - त्याच्या फलंदाजही असणयामुळे त्याला अधिक संधी मिळत असावी.

काल त्याला विश्रांती मिळून शेवटचीच ओव्हर तर खेळायची होती व तीही हाणामारीशिवाय पर्याय नसलेली ! मला वाटतं गोलंदाजीच्या वेगाने त्याच्या खेळात किंवा बाद होण्याच्या शक्यतेत फारसा फरक पडला नसता. >> विश्रांती चा संबंध कुठे आला इथे ? पेस असलेले बॉल खेळताना तो झगडतो कारण त्याचा खेळ हँड आय कॉर्डीनेशन वर पॉवर बेस्ड आहे. वयोमानपरत्वे को ऑर्डीनेशन स कमी झालय नि पेस असेल तर चुकण्यची संधी वाढते असा मुद्दा होता, धोनी पट्टा फिरवणार हे उघडच होते . कुरान सरत्या वयातल्या वेंकटेश प्रसाद सारखा स्लो नि स्लोवर अशा मार्जिन मधे बॉलिंग करतो. काल रबाडा चांगली बोलिंग करत होता म्हणून त्याला वापरायला हवे होते असे म्हटले.

धोनीने वाट लावली आयपीएलची. सगळे बोलत असतील की ज्याला भारतीय टीमने बाहेर काढलाय, ज्याला धड बॅट आणि बॉल कनेक्ट करता नाही येत तो अजूनपर्यंत csk टीम कडून खेळतोय आणि त्या टीमला फायनलपर्यंत पोहचवतोय. म्हणजे थोडक्यात धोनी आयपीएल चा दर्जा किती खालचा आहे हे सिद्ध करतोय. आता कालच्या मॅचच्या जोरावर तो पुढचे सात आठ आयपीएल खेळेल.

*धोनी आयपीएल चा दर्जा किती खालचा आहे हे सिद्ध करतोय.* -धोनी तशी वेळ आलीच तर अजूनही आपला खेळ उंचावू शकतो, असंही म्हणतां येईल ! Wink
आज सुनील नारायणने ( 4-21 ) बेंगलोरला 138वर रोखलंय. ( हा गोलंदाज ' स्थितप्रज्ञ 'च असावा. कसलाही बरा वाईट भाव मीं त्याच्या चेहर्यावर कधींच पाहिला नाहीं!)

Pages