आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Guys..... Choose ur battles >> अरे 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ह्याचा वैताग आहे.

बॉल जुना झाला कि चांगली सुरूवात मिळून सुद्धा बॅटसमन झगडतात टेंपो साठी - अगदी पॉवर हिटरही. वर्ल्ड कप साठी बॉलिंग स्ट्रेटेगी मधे हे मह्त्वाचे ठरेल.

फेरफटका, मायबोलीला दुसरे घरच समजतो याचा अर्थ त्याबाहेरचे जग माझ्यासाठी अस्तित्वात नाही असा होत नाही.
असो, आयपीएलमधील नाट्याबद्दल संशय असणारा जगात मी एकटाच वा आम्ही मूठभरच लोकं नसून कैक आहेत.
खेळात चालणाऱ्या फिक्सिंगबद्दल बोलणे म्हणजे खेळाबद्दल न बोलणे असे माझ्यासाठी तरी होत नाही.
याऊपर आपण काही ते धोनीला ढोंगी वगैरे काहीतरी म्हणाला होतात ते मात्र खेळाबद्दल होते हे लॉजिक महान आहे.
अर्थात रहाणे आवडीचा असल्याने त्याच्या फॉर्मबद्दल काही म्हटले की खटकणार आणि धोनी वा गेला बाजार शर्मा बद्दल म्हटले की ज्यांच्या ते नावडीचे आहे त्यांना ते चालणार वा ते स्वत:ही त्यात बोलणार.
हे सारे मनुष्यस्वभाव आहे. त्यामुळे मला तरी कोणाबद्दल मनात काही राग नाही. उलट मी आवडीने अश्यांना धोनी शर्माचे पराक्रम मोजून मोजून दाखवतो Happy

ऋन्मेष, ही एक बाब तू कदाचित समजावून घ्यायचा प्रयत्न केलास तर बर्याच अनावश्यक पोस्ट्स टळतील. माझ्यासाठी खेळाडूपेक्षा खेळ मोठा आहे. इथे लिहीणारे बरेचजण त्याच भुमिकेतून लिहीतात. रहाणे नि:संशय एक टॅलेंटेड खेळाडू आहे. पण मिळालेल्या संधीची माती केल्याबद्दल मी त्याच्यावर टीका केलेली आहे. रोहित शर्मावर lack of temperament (टेस्ट्मधे) मी टीका केली पण त्याने स्वतःला ज्या पद्धतीनं बदललं त्याबद्दल त्याचं कौतुकही केलं. २०१० मधे त्याचा वनडे मधला अ‍ॅव्हरेज १४ होता तेव्हा त्याला नोहिट सुद्धा म्हटलं होतं पण २०१३ -१४ पासून ओपनर झालेल्या रोहित च्या अनेक खेळींचं कौतुकही केलंय. धोनी ने जिंकून दिलेल्या अनेक मॅचेसबद्दल जसं कौतुक केलंय तसंच क्रिकेटच्या ग्राऊंडवर कॅप्टन कूलची बिरूदावली मिरवणारा धोनी जेव्हा अंपायरचा कॉल न पटल्यामुळे गल्ली क्रिकेटसारखं पॅव्हेलियनमधून अंपायरशी भांडायला आला, मिड-३० मधल्या खेळाडूंना त्यांच्या वयाचं कारण दाखवत टीममधून बाहेर काढणारा धोनी जेव्हा फॉर्म आणि चपळाई (बॅटींगमधली) गेल्यावर जवळजवळ चाळीशी येईपर्यंत खेळत राहिला, पत्रकार परिषदेत स्वतःला डिफेंड करत राहिला तेव्हा त्याचा आवडलेला खेळ बाजूला ठेवून त्याच्यावर टीकासुद्धा केलीय. पण ‘जाओ पहले उस आदमीं का साईन लेके आओ‘ असलं दीवार लॉजिक कधीच नसतं.

तू जे ‘अशा लोकांना’ तुझ्या आवडीच्या खेळाडूंचे पराक्रम दाखवून देतोस, त्यातून काहीच साध्य होत नाही कारण ह्या खेळाडूंचा मैदानातला भीमपराक्रम वादातीत आणि सर्वमान्य आहे.

@ फेरफटका
मिड-३० मधल्या खेळाडूंना त्यांच्या वयाचं कारण दाखवत टीममधून बाहेर काढणारा धोनी जेव्हा फॉर्म आणि चपळाई (बॅटींगमधली) गेल्यावर जवळजवळ चाळीशी येईपर्यंत खेळत राहिला, पत्रकार परिषदेत स्वतःला डिफेंड करत राहिला

>>>>>>>>>>

अशी विधाने करायला पुरावे लागत नाही ना Happy
असामी वाचताय ना.. तुम्हीही उत्तरे देऊ शकता खालील प्रश्नांची ..

१) टीममधून एखाद्याला बाहेर निवडसमिती करते की कर्णधार?

२) धोनीने निवडसमितीला सांगितले अमुकतमुक खेळाडूचे वय जास्त झाले आहे. तर याला काढा संघातून बाहेर. तर हे कारण पुरेसे मानून निवडसमिती काढते का लगेच? कि त्याचा फॉर्म, फिटनेस, संघातील उपयुक्तता बघितली जाते.

३) कुठले मिड थर्टीचे खेळाडू संघातली जागा डिजर्व्ह करत होते त्यांची नावे दिलीत तर बरे होईल. त्यांचा त्यावेळचा फॉर्म परफॉर्मन्स चेक करता येईल मला.

४) धोनीचा फॉर्म चपळाई वगैरे गेली असे कोणाला वाटत असल्यास खुशाल वाटू द्या. ते आकडे नंतर बघूया आणि खोडूया सुद्धा. कारण वयोमानानुसार फिटनेस चपळाई जाणे हे कोणालाच चुकत नाही पण धोनी जोपर्यंत तो खेळला तोपर्यंत त्याची ऊपयुक्तता पाहता संघातील जागा डिझर्व्हच करत होता हे सिद्ध करणे अवघड नाही.

५) सध्या मला फक्त एवढे सांगा की आपला फॉर्म आणि फिटनेस आहे हे एखादा खेळाडू स्वत: ठरवतो की ते निवडसमिती ठरवते.
ईथे तर धोनी स्वत: कर्णधारही नव्हता.
म्हणजे बघा हं, धोनी कर्णधार असताना संघात कोण हवे आणि कोण नको हे धोनी ठरवायचा. विराट कर्णधार असतानाही हे धोनीच ठरवायचा..
मग निवडसमिती गोट्या खेळायला असते का? मजेशीर आहे हे Happy

@ असामी, हे निवडसमितीच्या पक्षपातीपणाबद्दल बोलत आहेत. त्यांच्या ईंटेग्रिटीवर शंका घेत आहेत. पटतेय का? Happy

उत्तर नसल्यास मला इग्नोर करा असे एकमेकांना सांगायचा सोपा मार्ग स्विकारू शकता. माझी काही हरकत नाही Happy

बाकी कॅप्टन कूल म्हणजे न चिडणारा असा अर्थ होत नाही तर अटीतटीच्या सामन्यात निर्णायक क्षणी प्रेशरखाली पॅनिक न होता खेळणारा, डोके शांत ठेवून डावपेच आखणारा आणि थंड डोक्याने निर्णय घेणारा कर्णधार होता तो. जे त्याने स्कोअर चेस करतानाही दाखवलेय आणि टारगेट डिफेंड करतानाही दाखवलेय. ते एक असो. त्यावर वेगळा लेख लिहितो कधीतरी..

स्वरूप, आता पटलं, असामी का म्हणाला, 'काळ सोकावतो' ते.

@ ऋन्मेष, ओके.. परत एकदा चुकलं. लॉजिकल मुद्देसूद चर्चा व्यर्थ आहे हे तू लगेचंच सिद्ध केलंस आणि मला ताळ्यावर आणलंस. मुळात शिळ्या कढीला उत आणण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. तुला वादासाठी वाद घालून मुद्दे भरकटवण्यातच जास्त इंटरेस्ट आहे हे तू ज्या कन्सिस्टंन्सी ने वारंवार दाखवून देतोस त्याबद्दल तुला मानलं पाहीजे. बाकी, आप जो कहे, सत्यवचन!

ता.क. इतके लेख पाडतोस, त्यात जरा रिसर्च करून (हे तुला कुणी सांगायचं म्हणजे डायरेक्ट कृष्णाला गीता वाचून दाखवण्यासारखंच आहे), निवडसमितीचं कार्य कसं चालतं, त्यात कर्णधाराची भुमिका, जवाबदार्या वगैरे गोष्टींवरही लिहून टाक. जॉर्ज वॉशिंग्टनच्या कुर्हाडीसारखी तुझी इ-लेखणी सोशल मिडीयावर चालतेच. त्यामुळे विषयाचं बंधन नसावंच!

@ असामी, हे निवडसमितीच्या पक्षपातीपणाबद्दल बोलत आहेत. त्यांच्या ईंटेग्रिटीवर शंका घेत आहेत > > भाऊ , तू आधी खेळाडूंच्या इंटीग्रिटी वर बिना पुरावा आरोप करणे थांबव मग आपण इतर विषयांवर बोलूयात.

पॉईंट टेबल इंटरेस्टींग झालय > >फिक्स्ड म्हणायचेय का तुला ? Happy हर्शल पटेल दुबई मधे आल्यावर त्युआची मॅजिक कमी झाली.

बिचारी निवडसमिती. त्यांच्या ईंटीग्रिटीची कोणाला काही पडलीच नाही Sad
तरी बरेय, धोनी महादेवासारखे सारे हलाहल पचवत आहे Happy

पण मानला पाहिजे बॉस धोनीला. आजवर कोण खेळणार कोण नाही हे एकहाती ठरवत आलाय. आणि तिथे तो सचिन कर्णधार झालेला तेव्हा निवडसमितीकडून मनासारखा संघ मिळत नाही म्हणून रडत असायचा. धोनीने कोणाच्या लाडक्या खेळाडूंची पर्वा न करता आपला संघ बनवला आणि विश्वचषक जिंकवून दाखवला Happy

पंजाब आणि राजस्थान दोघांसाठीही आजच्या मॅचेस जिंकणे आवश्यक आहे.

राजस्थानसाठी तुलनेने अवघड आव्हान आहे..... रबाडा आणि नॉर्किया समोर राजस्थानचे बॅट्समन कसा टिकाव धरतात ते महत्वाचे ठरेल!!
लोमरोर आणि त्यागीच्या परफॉर्मन्समुळे राजस्थानचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल

राहुल आणि मयांकची शतकी भागिदारी होवू नये म्हणोन पंजाबचे चाहते प्रार्थना करत असतील Wink

राजस्थान ने पहिला हाफ तरी चांगला कंट्रोल केलाय - थँक्स टू मुस्तफिझूर (चार ओव्हर्स मधे एकही बाऊंड्री नाही). पण रबाडा, नॉर्ट्ये, अश्विन समोर त्यांच्या बॅटींगचा कस लागेल. सेकंड हाफ कसा होतोय ते बघू.

राजस्थान ऑलरेडी डळमळीत झालेयत. अजून तर रबाडा यायचाय बॉलिंगला. पहिल्या ५ ओव्हर्समधे एकही बाऊंड्री नाही आणि ३ बॅट्समेन आऊट झाले आहेत.

बॅटचा प्रदीर्घ बॅकलिफट शाॅचा कच्चा दुवा असावा, अशी शंका मीं क्रिकेटच्या धागयावर व्यक्त केली होती. आज पुन्हा मला तें जाणवलं.. शेवटच्या क्षणार्धातली चेंडूची उंची, गती इ.चा नेमका अंदाज घेवून शाॅट ॲडजस्ट करणं त्याच्या बॅकलिफ्टमुळेच त्याला कठीण जातं, असं अजूनही मला वाटत रहातं. ( He fully & irrevocably commits to the shot a fraction of time earlier because of his high backlift )
आजही चेःडूचा वेग व उंची अपेक्षेनुसार नसल्याचं लक्षात येवूनही तो शाॅट त्याला रोखता आला नाही, असं मला जाणवलं.

राहुल आणि मयांकची शतकी भागिदारी होवू नये म्हणोन पंजाबचे चाहते प्रार्थना करत असतील >> घे तुझी इच्छा पूर्ण झाली रे Happy

दीडशे हा अ‍ॅव्हरेज स्कोर दिसत आहे ह्या फेजचा.

पंजाब ने डिफेंड करायला सुरूवात चांगली केलीय. शामी भन्नाट स्पेलमधे आहे. पण १२५ ज….रा कमी वाटतोय. बघू काय होतंय ते. बॅटींग सोपी नाहीये.

*हैद्राबाद ची टीम अत्यंत रटाळ आहे* - पण त्यातही चांगले खेळाडू आहेतच. होल्डर तर अत्युत्तम ऑलराऊंडर्सच्या पंक्तित बसायच्या वाटेवर आहे !

आज सीएसकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धांवा हव्या होत्या. फसवी गोलंदाजी करणारा नैरन गोलंदाज होता. कुरनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारायचा प्रयत्न कां करावा ? तो सीमारेषेवर झेलबाद झाला पण स्थिरावलेल्या व अनुभवी जडेजाने त्याला क्राॅस करून स्वत:कडे सटराईक कां नाहीं घेतला व आणखी एक विकेट काः गमावली ? मग शेवटच्या चेंडूवर सीएसके जिंकले. कृत्रिमपणे सामना रोमहर्षक बनवण्याचा तर हा प्रकार नाहीं ना, अशी शंका मनाला चाटून गेली.

हमम, अंतिम सामन्याला तेच वलय असेल. धोनीला ट्रॉफीसह निरोप मिळणार की पुन्हा शर्मा वा पंत आपल्या पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी उचलणार..

बाकी आजचा लास्ट बॉल फिनिश धमाल होता. मला नीट बघता आला नाही. म्हणून परत हायलाईट्स बघितली.
१० बॉल २४ हवे असताना मस्त लेंथ बॉल आणि ऑफ स्टंप बाहेर कंबरेवरच्या फुलटॉसची लयलूट चालू होती. प्रसिद्ध कृष्णा खरेच ईतका सामान्य गोलंदाज आहे का हा प्रश्न पडला Happy
लास्ट ओवरला ४ हवे असताना विकेट गेली आणि सामना ४ बॉल ४ ला आला.
जडेजाने स्ट्राईक चेंज केला नाही पण शार्दुलच्या फटक्यावर अचानक ३ रन्स येत सामना ३ बॉल १ वर आला.
झाली पंचाईत.
मग जडेजाने एक चेंडू असाच तटवला.
आणि दोन चेंडू १ असताना कमालच केली. पाय पुढे काढून अगदी आंधळेपणाने फिरवल्यासारखी बॅट हवेत फिरवली. आणि स्पर्धेची लाज राखली, सामना लास्ट बॉल फिनिशला आणला ! Happy

चुम्मा ऑन टॉप Happy
>>
हे पण फिक्स्ड च असेल ना तुझ्यामते?

रच्याकने,
द्रविड हा एकाच वेळी इंडिया ए टीमचा कोच अन दिल्ली टीमचा मेंटर असल्यानी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत होता
मग आता चेन्नई टीमचा कर्णधार इंडिया टी२० टीमचा मेंटर असल्यानी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कसा होत नाही हे कुणी मज पामरास समजवून सांगेल का?

>> हे कुणी मज पामरास समजवून सांगेल का?

good question!!
मुद्दलात आयपीएल संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा कर्णधार हा जर conflict of interest होत नसेल तर कोच, मॅंटोर वगैरे लोक तर त्या मुद्द्यावर अडकायलाच नकोत!!

Eager to see Dravid coming back in mentor/coach role for a team like RR Happy

हे पण फिक्स्ड च असेल ना तुझ्यामते?
>>>
नाही. सारे काही फिक्सड नसते. एवढा मुर्खपणा ते करणार नाहीत. त्याची गरजही नसते. बाकी मला जे संशयास्पद वाटते ते बोलून दाखवतो. त्यात माझ्या आवडीचे प्लेअर पंत, शर्मा, धोनी हे जिंकलेले का असेना, वा मुद्दाम हरलेले का असेना.. मी संशय घेताना कधीही आपला तो बाब्या दुसऱ्याचे कार्टे करत नाही. आयपीएलसाठी खेळणे म्हणजे देशासाठी खेळणे नाही. मी आधी याला एक व्यवसाय म्हणून बघतो मग खेळ. त्यामुळे ईथे कोणी खेळाडू एखाद्या स्क्रिप्टेड घडामोडीत भाग घेत असेल तरी ओके. मी त्याला अझर जडेजाच्या पंक्तीत बसवणार नाही.

हे पण फिक्स्ड च असेल ना तुझ्यामते? > >तू कळीचा प्रश्न विचारला नाहीस रे अँकी Happy "अंतिम सामन्याला तेच वलय असेल. धोनीला ट्रॉफीसह निरोप मिळणार की पुन्हा शर्मा वा पंत आपल्या पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी उचलणार." हे फिक्स्ड असणार नाही का ? अर्थात सगळेच काही संशायस्पद नाही वगैरे सारवासारव आधीच करून झाली आहे नि वरती "आपला तो बाब्या " वगैरे नाही हे पण नमुद करण्यात आलेले आहे.

स्काय, इशान, पांड्या ह्या वर्ल्ड कप मधल्या तिघांचा फॉर्म कलेक्टिवली गंडलाय हे चिंतेची बाब आहे भारतच्या दृश्टी ने . रोहित नि कोहली पण थोडे कमी फ्ल्यूयेंट वाटत आहेत . बॉलिंग वरच काय ती मदार असेल असे दिसतेय Sad आयपील नंतर संघात बदल करणे चालणार आहे का बघायला हवे.

तिकडे कमी स्कोअर होत आहेत ही वर्ल्ड कपला आपल्यासाठी बरे आहे. पण बूमरा आणि शमी सोडून संघात अजून शून्य फलंदाजी असणारे परवडणार नाहीत.

काल बिष्णोईने स्कायची काय मस्त दांडी उडवली. मजा आली. पण आपल्या टीम मधल्या बॅटसमनचा फॉर्म काळजी करण्यासारखा आहे हे नक्की. काल तो वी.ऐय्यर चांगली बोलिंग करत होता. हाच बॅटींग करतो का?. तसे असेल तर चांगला ऑलराउंडर आहे.

रडतखडत का होइना मुंबैची गाडी रूळावर येतेय.

संजू सॅमसन फाॅरमात येतोय.
*रडतखडत का होइना मुंबैची गाडी रूळावर येतेय.* - ती वेळेवर स्टेशनही गाठणार ! तसं टाईम टेबलच आहे त्या गाडीचं !! Wink

Pages