आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पॉवरप्लेनंतर एकतर्फी सामना बघायला मिळेल असे वाटलेले पण मस्त मॅच झाली..
गायकवाड क्लास खेळी खेळला. जणू आज दिवसच होता त्याचा. ब्राव्होची दुसऱ्या बाजूने सोबत मिळाल्याने मुंबईने डावपेचच सोडून दिले रोखायचे.
शर्मा हवा होता कप्तानीला.
याऊलट धोनीने मग दाखवून दिले की या खेळपट्टीवर हा स्कोअर कसा डिफेंड करायचा. दिपक चहर हा हुकुमी एक्का सुरुवातीला आणि ब्राव्हो नावाचे ट्रंपकार्ड नंतरच्या फेजला अचूक वापरले. चेन्नई आणि विजयामध्ये जो पोलार्ड होता त्यालाही आधी त्याच्या पट्ट्यात बॉल न देता रोखले आणि मग हेझलवूडचा बॉलिंग चेंज अचूक करत त्यालाही घेतले. अन्यथा हेझलवूडचा पहिला स्पेल फार महाग होता.
बाकी हा सौरभ तिवारी माझ्या अपेक्षांना जागला. अखेरपर्यंत खेळला पण सामना जिंकायला जातोय असे कधी वाटलेच नाही.

काल गायकवाडचा १९ वर कॅच सोडला. बूमराला उगाचच राखून ठेवला. स्पिनर पांड्याने २ ओवर मधे मॅच फिरवली. एकंदरीत फ्लॉप शो.

फा भारी एकदम !

काल गायकवाडचा १९ वर कॅच सोडला. बूमराला उगाचच राखून ठेवला. स्पिनर पांड्याने २ ओवर मधे मॅच फिरवली. >> +१. ब्रेक मधे जयवर्धने , झहीर नि पोलार्ड ने काय डिस्कस केले नक्की देव जाणे. रैना, रायुडु, धोनी अगदीच गंजलेले वाटतात सराव नसल्यामूळे.

रस्टी म्हण रे.... जरा बरे वाटते गंजलेले पेक्षा Wink

पण धोनीची कॅप्टन्सी कम्माल होती काल!

तेच करायला हवे होते पण आता ईतक्या आयत्यावेळी नको. वेळ निघून गेलीय... पुढचा २० वर्ल्डकपही मात्र लगेच येईल ना

आता आयपीएल पहायला कंटाळा यायला लागला!!
मी दोनही सामने पाहिले नाही!! किंबहुना इच्छाच झाली नाही बघायची!!

*आता आयपीएल पहायला कंटाळा यायला लागला!!* +1 . समालोचक व जाहिरातबाजी कृत्रिमपणे त्यांत रस निर्माण करायचा केविलवाणा प्रयत्न करताहेत असं सतत वाटत रहातं. कीं, माझाच यांत दोष आहे .हें कळत नाहीं.

ईंग्लंडच्या कसोटी बघितल्यावर ईतक्या लगेच आयपीएल सुरू झाल्या हे हे होणारच होते. पहिला सामना मी मुंबई धोनीचा म्हणून पाहिला. काल ईच्च्छाच झाली नाही.
ओवरऑलच वातावरण थोडे शांत आहे. आयपीएलपेक्षा जास्त चर्चा कोहलीची चालू आहे. अशीच स्थिती राहिल्यास त्यांना लोकांचा ईंटरेस्ट खेचायला लवकरात लवकर एखादा क्लोज फिनिश, सुपरओवर वगैरे मॅनेज करावी लागणार..

आता आयपीएल पहायला कंटाळा यायला लागला!!!
मी दोनही सामने पाहिले नाही!! किंबहुना इच्छाच झाली नाही बघायची!! >> मी सामने बघितले निबघून कंटाळा आला. प्रामाणिकपणे आयपील ची सुरूवात दणकेबाज फलंदाजीने व्हावी नि मग हळू हळू गोलंदाजआंचे प्रस्थ वाढावे असे माझे मत आहे. अशाच विकेट्स वर्ल्ड कप साठी असतील तोही रटाळ च होईल.

टी-२० चा कॅप्टन वर्ल्ड कप आधीच बदलावा काय? >> माझ्या मते हो. कोहली ने आरसीबी कप्तानपद सोडायचे काहीर केलय म्हणजे त्याचा उत्साह कमीत असणार हे उघड आहे.

यशस्वी जैसवाल मस्त खेळला आज. मागेच म्हटलेले की हा फार लुकडा असल्याने मोठे फटके जमत नाहीयेत. एकदा मसल पॉवर पुरेशी आली की हा या लेव्हलवर खेळणार. आणि अजूनही सुधारणेला बराच वाव आहे. त्याच्या पार्श्वभूमीमुळे एक सॉफ्ट कॉर्नर आहे मनात.

लोकांचा ईंटरेस्ट खेचायला लवकरात लवकर एखादा क्लोज फिनिश, सुपरओवर वगैरे मॅनेज करावी लागणार..
>>>>>

सकाळी बोल्लो आणि संध्याकाळी झाले Happy
१२ बॉल ८ चा सामना.. पूरन आणि मक्रम दोघे सेट बॅट्समन मारून खेळताहेत. दोघे मारणारे आहेत, आतापर्यंत मारत आहेत आणि मग सिंगल डॉट सिंगल डॉट पूरन ३ बॉल ३ ला सामना आणून बाद होतो. आणि त्या तीनही बॉलला एकही रन मिळत नाही.. ब्यूटी ऑफ आयपीएल Happy

बाकी ओवर कडक टाकली त्यागीने Happy

छे, मारतील मला घरचे आणखी क्रिकेट बघितले तर
कसोटी लाऊन बसतो पाच दिवस तेव्हा मला ईतक्या घृणास्पद नजरेने बघितले जाते घरी, चार ओवर मेडन गेल्या की अजून एवढेच आहेत म्हणून हिणवले जाते, सतत मी चॅनेल बदलावे म्हणून प्रेशराईज केले जाते. त्यामानाने आयपीएलचे फोरसिक्स वाले क्रिकेट बघू दिले जाते फारसे आढेवेढे न घेता हा फायदा. तसेच धोनी विरुद्ध पंत विरुद्ध शर्मा विरुद्ध कोहली विरुद्द.... असे आवडीचे नावडीचे प्लेअर घेऊन व्हॉटसप ग्रूपवर मस्त वाद घालता येतो हे फार मनोरंजनात्मक असते. म्हणून थोडेफार स्क्रिप्टेड का असेना, बघतो आयपील आवडीने Happy

आजही सेकंडलास्ट ओवर बघितल्यावर सामना लास्ट ओवरला गेल्यावर मला समजले हा लास्ट बॉल फिनिश आहे. मी लगेच सगळ्यांना हाक मारली. सगळे जमले घरचे टीव्हीसमोर सामना बघायला. आणि नंतर क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही ना वगैरे भाबडे डायलॉग सुरू झाले Lol

राहुलच्याच ३ कॅचेस सुटणे हा हायलाईट होता आजच्या सामन्याचा Happy

असामी, व्हॅलिड पॉइंट… असे ट्विस्ट्स हा बर्याच टी-ट्वेंटीज ची characteristic आहे. कदाचित त्या वेगामुळे असं होत असावं.

फारच जबरदस्त झाली मॅच. कार्तिक त्यागी च्या खांद्यावर शांत डोकं आहे हे बघून बरं वाटलं. जैस्वाल, लोमरोर, राहूल, मयंक, शामी, अर्शदीप, हरप्रीत सगळेच जबरदस्त खेळले.

आयपीएल निकालांना निवडसमितीही सिरीअसली घेत नाही वाटते.
अन्यथा गेली दहा वर्षे एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू न शकणारा कोहली आपल्या भारतीय २०-२० संघाचा कर्णधार आहे आणि ८ पैकी ५ ट्रॉफी जिंकणारा शर्मा मात्र त्यापासून वंचित आहे Happy

"आयपीएल निकालांना निवडसमितीही सिरीअसली घेत नाही वाटते." - Proud Proud मालक, धन्य आहात. एकंदरीतच 'अभ्यासोनि प्रकटावे' ह्या समर्थवचनावरचा आपला अविश्वास आपण ठायी ठायी प्रकट करून आम्हा पामर माबोकरांवर जो वारंवार अवाक होण्याचा प्रसंग आणता, त्याबद्दल आम्ही आपले आजन्म ऋणी आहोत. आशिष नेहरा, राहूल वगैरे खेळाडूंचं पुनरागमन, तसंच, सुर्यकुमार यादव, इशान किशन, टी. नटराजन, वरूण चक्रवर्ती ई. खेळाडूंची भारतीय संघात झालेली निवड ही आयपीएलमधल्या कामगिरीकडे बघून झाली होती अशा आशयाची विधानं खुद्द निवडसमितीने देखील केली असतील. परंतू, निवडसमितीच्या कामकाजाविषयी अधिकारवाणीनं भाष्य करून आपण आमचे डोळे खाडकन उघडले. Wink

तसं तर आपल्या "ईंटरनॅशनलमध्ये हे आढळत नाही फार .. एक निरीक्षण" - ह्या निरीक्षणावर ही चार शब्द लिहावे अशी बालबुद्धी होत होती, पण आपणच वर, "छे, मारतील मला घरचे आणखी क्रिकेट बघितले तर" अशा प्रांजळ शब्दात आपल्या अफाट व्यासंगाची कबुली दिल्यावर शब्दच खुंटले. Happy

फेरफटका,
पुन्हा वाचा माझे वाक्य.
आयपीएल निकालांना निवडसमितीही सिरीअसली घेत नाही वाटते - असे म्हणालो आहे मी
आयपीएल कामगिरीला असे नाही.

आणि ईंटरनॅशन २०-२० मी बघतो. ईतर २०-२० लीग मात्र आयपीएल वगळता दुसरे बघत नाही.
ईंटरनॅशनलमध्ये मला आयपीएलसारखे ट्विस्ट अँड चमत्कार आढळत नाही फारसे कधी. ती आयपीएलचीच स्पेशालिटी आहे Happy

मी काल पंजाबच्या पहील्या दहा ओव्हरनंतर आता पंजाब आरामात जिंकतेय म्हणून मॅच सोडून दिली..... मध्येच एकदा २९ बॉल ३६ असे काहीसे equation बघितलेले!
रात्री उशिरा या धाग्यावर ऋन्मेषची कॉमेंट बघून स्कोअर चेक केला तर जबरा झालेल्या दिसल्या लास्ट २ ओव्हर!
पंजाब लौकिकाला जागले..... मग परत बघितली मॅचची शेवटची ओव्हर cricbuzz वर जाऊन!
फिझ आणि त्यागीने अंडरप्रेशर टाकलेल्या अप्रतिम गोलंदाजीचा आदर राखूनही असे म्हणावेसे वाटते की ही पंजाबची हाराकिरी होती. १२ बॉल ८ रन जिंकायला आणि ८ विकेटस हातात या परिस्थितीतून जर तुम्ही मॅच हारत असाल तर you desreved to be at the bottom half of the table.
मधली फळी हा पंजाबच्या बॅटींगचा मोठा प्रॉब्लेम आहे!! मयांक, राहूल ची बॅटींग आणि शमी, अर्शदीपची बॉलिंग अफलातून होऊनही पंजाब मॅच हारले तर राजस्थान कडून पूर्णतः सांघिक कामगिरी होती..... लुईस आणि लिव्हिंगस्टोन बटलरची कमी जाणवू देणार नाहीत हे नक्की!
मॉरीसचा काल ऑफ डे होता.... पण तो जिंकलेल्या मॅचला आला ही राजस्थानसाठी जमेची बाजू
लोमरोर मस्त खेळला काल.... एकदम सरप्राइज परफॉर्मन्स!
राजस्थान जिंकल्यामुळे मुंबई आणि बंगलोरचे टेंशन वाढले असेल!!

स्वरूप, टोटली अ‍ॅग्रीड. पंजाब पहिल्या सेगमेंट मधे सुद्धा असे हाताशी आलेले विजय घालवून बसले आहेत. राजस्थानने शांत डोकं ठेवलं ही जमेची बाब आहेच. पण पंजाबने दाखवलेलं औदार्य बाकी कुणी दाखवणार नाही. ओव्हरऑल काल राजस्थानचा टीम परफॉर्मन्स चांगला होता.

"पुन्हा वाचा माझे वाक्य." - दादा, तुमचं कधी काही चुकलंय का? का उगा लाजवता आम्हाला? गणिताचं उत्तर आधीच मनात ठरवायचं आणि लगेच LHS = RHS, hence proven! म्हणून ते सोडवून दाखवायचं ह्या कलेत तुमच्या इतका निष्णात खेळाडू आणि पारंगत गुरू आक्ख्या त्रिखंडात शोधून सापडणार नाही.

"ती आयपीएलचीच स्पेशालिटी आहे" - मग झालं तर. ठरलंच म्हणा की.

जिम लेकर चे परफेक्ट १०, ब्रॅडमन चे एका दिवसात मारलेले ३००, ओल्या विकेटवर ११व्या बॅट्समनपासून सुरूवात करून दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्ध जिंकलेली मॅच, जावेद मियांदाद ची सिक्स, ८३ ची वर्ल्डकप फायनल, ८७ च्या सेमी फायनल्स, ९६ मधली भारत वि. ऑस्ट्रेलिया - कुंबळे-श्रीनाथ पार्टनरशिप, कुंबळे चे परफेक्ट १०, इडन गार्डन्स २०००-०१, २०१३ मधली चँपियन्स ट्रॉफी फायनल, २०१४ लॉर्ड्स - भारत वि. इंग्लंड, भारत वि. इंग्लंड - स्त्रीयांची वर्ल्डकप फायनल, सुनिल नरिन ची सीपीएलमधली मेडन सुपर ओव्हर, यंदाच्या सीपीएलमधली सेमीफायनल ई. किरकोळ क्रिकेटींग अपवाद हे काय आयपीएल च्या स्पेशालिटी च्या जवळपास सुद्धा फिरकणारे नाहीत. लोकं उगाच स्पोर्ट्स बघतात. पण सगळ्यांना आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप चं, किंवा गेला बाजार मायबोलीचं सभासदत्व मिळत नसल्यामुळे, ते ह्या ज्ञानामृतापासून वंचित रहातात. Happy

Pages