Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी तुझ्या संघात सॅमसन,
असामी तुझ्या संघात सॅमसन, राहुल, मयंक असे तीन तीन कर्णधार आहेत की आयपीएलमधले
सचिनपुराण अपेक्षेप्रमाणे आले.
सचिनपुराण अपेक्षेप्रमाणे आले. अर्थाते ते कधीच अमान्य नव्हते. म्हणून त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. म्हणून त्याला भारतरत्न दिले.
सचिन ग्रेटच आहे, ओवरऑल फलंदाजी आणि एक खेळाडू एक आयकॉन म्हणून विचार करता विराट कोहलीपेक्षाही चार पावले पुढे आहे.
पण म्हणून त्यात दोष नाहीतच असे नाही, जे आहेत ते स्विकारावे.
पण ज्या गोष्टी स्कोअरकार्डवर दिसत नाहीत त्या सामना प्रत्यक्ष बघताना दिसतात.
जसे की नर्व्हस नाईंटीने एखाद्या खेळाडूचा खेळ बदललाय हे प्रत्यक्ष बघूनच योग्य प्रकारे समजते की फलंदाज स्लो झालाय, वा संधी किंवा गरज असूनही रिस्क घेत नाहीये, शॉट खेळावा की न खेळावा याबाबत डबल माईंड आहे, आतापर्यंत जसे त्याचे पाय हलत होते ते फूटवर्क अचानक लोप पावलेय वगैरे..
गंमत म्हणजे यातून येणारे प्रेशर झिडकारायला म्हणून एखादा खेळाडू सरळ सिक्स मारायलाही बघतो. अश्यावेळी त्याचा नव्वदीतला स्ट्राईकरेट वाढतो आणि आपल्याला वाटते वाह काय बिनधास्त आहे हा, शतकाचा जराही विचार करत नाही. पण खरे तर तो विचार करूनच बरेचदा त्याने एखादा अविधारी वा धाडसी फटका खेळलेला असतो. ज्यात तो बाद होण्याचीही शक्यता असते. ज्यात तो बाद झाल्यास त्याचे वैयक्तिक शतक गेले पाण्यात तर जाऊ द्या, पण सेट बॅटसमन बाद झाल्याने संघाला फटका बसतो. मॅचचा तो टर्निंग पाँईट ठरू शकतो.
सचिनच्या बहुतांश सर्वच खेळी पाहिल्या आहेत. किंबहुना मी शक्य ते सारेच लाईव्ह क्रिकेट बघतो. त्यामुळे आकड्यांच्या पलीकडेच जाऊन विचार करायची सवय आहे. वेगात खेळायचे ईंटेंट आहे की नाही हे बघूनच समजते. ते बघून समजलेय म्हणून मी सामना बघितलाच नाही हे सिद्ध करायची असामी धडपड करत आहेत
सचिनच्या शंभराव्या शतकाला तो संथ खेळल्याने आपण बांग्लादेशशी हरलो यावेळी ते अशीच सचिनच्या समर्थनार्थ धडपड करत होते
सचिनने त्या सामन्यात आधीच्या दोन ओवरमध्ये ७ चेंडू खेळून एक सिंगल आणि एक डबल ईतकेच धावा केल्या. आणि असामी म्हणताहेत त्याने नंतर पेस वाढवलेला. हा तर कमी केलेला जसे जास्त जवळ आलेला द्विशतकाच्या. आणि आधीच्या ओवरमध्येही फार काही मारलेले दिसत नाहीयेत. सेहवाग सारखे मारायला हवेत का हा प्रश्नच चुकीचा आहे. सेहवागचा खेळच तसा आहे तो नेहमी तसाच मारतो. सचिनने नॉर्मल टेस्ट इनिंग तशी बिलकुल खेळू नये. पण जेव्हा ईनिंग डिक्लेअर करायची वेळ आहे तर येस्स तसेच खेळणे अपेक्षित असते एखाद्या सचिनसारखी क्षमता असलेल्या फलंदाजाने. पण जर तुम्ही तो ईंटेंट दाखवत नसाल, आणि स्वतःच्या द्विशतकावर फोकस करत असाल तर कर्णधाराने त्याला जो निर्णय योग्य वाटला त्याक्षणी तो घेतला तर त्यात काही गैर नाही.
जरा कर्णधाराची कॅप डोक्यावर ठेऊन विचार करा, त्याला डाव घोषित करायचा आहे. गोलंदाजांना पुरेश्या ओवर द्यायच्या आहेत. मुळात स्कोअर ईतका झालाय की तो कधीही डिक्लेअर करू शकतोय. ज्या धावा सचिन संघाच्या टोटलमध्ये वाढवणार होत्या त्यांची गरज तशी शून्यच होती. कारण सेहवागच्या तडाखेबाज त्रिशतकाने आधीच वेगात ढिगभर धावा जमा करून ठेवलेल्या. पण निव्वळ सचिनच्या द्विशतकासाठीच खेळ लांबवला जात होता. अश्यात समोरून युवराजनेही ज्या धावा फटकावल्या त्यांचीही तशी गरज नव्हतीच, म्हणजे एखाद्या ओवरला युवराजने दोन चौकार मारत आठदहा धावा जमवल्या तरी सचिनचे द्विशतक तितकेच दूर राहिले असल्याने ती एक ओवर फुकट गेल्यासारखीच. वर निलिमा तुम्ही लेगबाय सुद्धा जोडलेत. संघाच्या चार धावा वाढल्या पण संघाला त्या चार धावांची गरज नव्हतीच, त्यानंतर सचिन द्विशतकापासून तितकाच दूर होता. आणि आपल्या तितक्या ओवर फुकट जात होत्या.
म्हणून म्हणतोय जितके दिसतेय ते बघू नका. मुळातच शेवटच्या सात आठ ओवर आपण अतिरीक्त खेळलो होतो.
वर फेरफटका म्हणतात की वैयक्तिक शतकाचा स्कोअर वेगळा मांडतात का? टीमच्या टोटलमध्ये धरला जात नाही का?
म्हणजे पुन्हा आकड्यांचे क्रिकेट.. एखाद्याचे संथ वैयक्तिक शतक संघाला हरवू शकते हेच मुळात म्हणजे लोकांना वा चाहत्यांना समजत नाही. वा समजून घ्यायचे नसते.
चेस करताना हे चटकन लक्षात येते, पण पहिली फलंदाजी असली की थोडे लपून राहते.
अगदी सचिनने जे तुफान एकदिवसीयमधील पहिले द्विशतक मारले त्यातही त्याने शेवटी वेळ हातात असल्याने सिंगल सिंगल काढूनच शेवटच्या १०-१५-२० धावा केल्या. पण ती परीस्थिती अर्थात वेगळी होती. ते बघताना सचिनचा आणि भारतीय क्रिकेटचा चाहता म्हणून मनोमन माझीही अशीच ईच्छा होती की खूप धावा झाल्यात, समोरून धोनी तुडवतोय, तर सचिनने उगाच आता अतिरीक्त रिस्क न घेता पहिले द्विशतक साकारावे. सचिनने ते केले आणि शास्त्रीचे ते शब्द.. आहाहा.. अजून एक क्रिकेटची अविस्मरणीय आठवण.
सचिनने कारकिर्द लांबवली त्याचा आपल्याला फटका बसला. हे मान्य करणे म्हणजे सचिनचे ग्रेटनेस अमान्य करणे असा अर्थ होत नाही.
धोनी कर्णधार असताना आपण ऑस्ट्रेलिया ईंग्लंडमध्ये व्हाईटवॉश खाल्ले. त्यातील सचिनची कामगिरी बोलकी होती. जर सचिनने तेव्हा निवृत्ती घेतली असती तर नवीन प्लेअर आला असता, भले तो सुद्धा अपयशी ठरला असता. दौर्याचा निकाल तोच असता. पण तरी नवीन संघबांधणीला सुरुवात झाली असती. पुढच्या दौर्यांचा निकाल वेगळा असता. जे लिमिटेडमध्ये वेळीच झाले आणि २०११ चा विश्वचषक आला. ते कसोटीत झाले नाही.
क्रमशः .. कॉल आला
रात्री येतो
एक खेळाडू एक आयकॉन म्हणून
एक खेळाडू एक आयकॉन म्हणून विचार करता विराट कोहलीपेक्षाही चार पावले पुढे आहे.
>>> आयकॉन येस... खेळाडू नोप... कोहली बेटर खेळाडू आहे... फिटनेस, बॅटिंग स्किल्स, फॉर्म ,पॅशन बघता...
तेंडुलकर फेडरर आहे तर कोहली जोकोविच...
https://www.socialnews.xyz
https://www.socialnews.xyz/2021/05/07/bcci-has-a-case-to-answer-on-ipl-d...
संपूर्ण लेखात बरेच कोरडे ओढलेत, बोचकारे काढलेत. इथे त्यातला काहीच भाग आलाय
ते बघून समजलेय म्हणून मी
ते बघून समजलेय म्हणून मी सामना बघितलाच नाही हे सिद्ध करायची असामी धडपड करत आहेत > > धडपड करायची गरजच काय आहे तुझ्या एकापाठोपाठ येणार्या पोस्ट ने तूच सिद्ध केलेले आहेच की तू सामना बघितलेला नाही आहेस. निव्वळ ह्याच कारणाने तू पुस्तक वाचून त्यात सामील असणार्या पार्टी़ चे मत बघायला तयार नाहीस. वरच्या लंब्या चवड्या पोस्ट मधे परत नसलेल्या गोष्टी मांदायचा किती अट्टाहास तो. पुस्तकामधे द्रविड नि सचिन चे बोलणे पण दिले आहे ज्यात द्रविड ची बाजू दिलेली आहे. त्याच्यात नि तू समजतो आहेस त्यात स्वप्निल जोशी नि शाहरुख खान ह्यांच्यामधे इतरांना दिसतो तेव्हढा फरक आहे. परत एकदा - पुस्तक वाच नि मगच बोल. तोवर जे काही लिहितो आहेस ते फक्त खयाली पुलाव आहेत तुझे (मॅच न बघता बघितलेले - तु त्या दोन षटकांवर अडकलेला आहेस त्यावर सगळी गडबड दिसते आहे - अर्थात पुस्तक न वाचल्यामूळे तुला कळणे अशक्य आहे)
आज फेबुवर १९९१ सालच्या एका
आज फेबुवर १९९१ सालच्या एका रणजी फायनलची माहिती वाचली. हरयाणाने चौथ्या डावात २-२.५ तास प्लस २० मॅण्डेटरी ओव्हर्स यात मुंबईला ३५५ धावा करण्याचे टार्गेट दिले होते. ३४/३ वर मुंबई चाचपडत होती. मग आधी वेंगसरकर-तेंडुलकर व नंतर वेंगसरकरने तळाच्या फलंदाजांबरोबर खेळत विजय जवळ आणला पण शेवटी २ का ३ रन्स नी हुकला. त्याचे सुरेख वर्णन वाचले. तेव्हा रणजी फॉलो करणार्यांच्या लक्षात असेल. मला जाम आठवत नाही. मुंबईने अवघड अवस्थेतून खेचलेले विजय लक्षात आहेत पण हे नाही.
भाऊ - तुम्ही बहुधा वानखेडेत पाहिली असेल
स्वतःच्या द्विशतकावर फोकस करत
स्वतःच्या द्विशतकावर फोकस करत असाल तर कर्णधाराने त्याला जो निर्णय योग्य वाटला त्याक्षणी तो घेतला तर त्यात काही गैर नाही.... एक तर भारताचा डाव पहिला होता त्यामुळे एक किंवा दोन ओवर ने किती फरक पडला असता ??? बरं नवीन चेंडू वर स्विंग मिळणार होता का तर ते पण नाही. कारण भारताने ४+ रनरेट ने धावा केल्या होत्या कदाचित तुम्हाला ते हळूहळू वाटतं असेल.
बरं पाक ला फलंदाजी देऊन ही त्याच दिवशी पाक फलंदाज बाद झालं का ? तर नाही... 23 व्या ओवर ला पहिली विकेट आहे...
बरं सचिन चा Strike rate ही 55.74 आहे... तुमच्या हिशोबाने 80 हवा असेल तर...
जे लिमिटेडमध्ये वेळीच झाले आणि २०११ चा विश्वचषक आला... त्या वेळी धोनी ने प्रत्येक सामन्यात शतक केलं होतं... सचिन, सेहवाग, युवी, जहीर,नेहरा वगैरे तुमच्या भाषेत वयस्कर खेळाडूंनी तर काहीच नाही केलं.
निवांत वेळ असेलच एकदा पहा धोनी, विराट पहिल्या 15 मध्ये तरी आहेत का. अरे हो नवीन खेळाडू घेतले असते तर फारफार तर हरलो असतो पण संघ बांधणी झाली असती...
धोनी ने कोणा सोबत खेळत खुप सामने जिकंवले असतील पण एकट्यानेच असे किती सामने जिकंवलेत... त्याच लक्ष नाबाद रहा सोबत चा खेळाडू ट्राय करत जवळ घेऊन जाणार बाद झाला की हा आहेच शेवटचे रन्स काढुन Credit घ्यायला तयार... मग Average पण वाढणार. एकदिवसीय आणि T20 मध्ये बेलामपणे चालुनही गेलं माञ कसोटी मध्ये त्याच्या मर्यादा उघड्या पडल्या. तरी बरं Australia मध्ये अचानक कप्तानी सोडुन दिली हा पळपुटेपणा तुम्ही विसरला आहात. कॅप्टन कूल म्हणे... आयपील मध्ये पंचा सोबत भांडायला बाहेरुन मैदानात गेलेला.
धोनी पुराण पण आहे आपल्या कडे पण लिहीलं तर...
कप्तान हा संघामुळे यशस्वी असतो कप्ताना मुळे संघ नाही.
Aus / SL/Pak संघातील महत्वाचे खेळाडू काय गेले त्यांना कप्तान खराब भेटले की संघ जी त्यांची कामगिरी घसरली...
बरं धोनी गेल्या नंतर भारतीय
बरं धोनी गेल्या नंतर भारतीय संघाची कामगीरी घसरली का तर नाही कारण मुळात संघ च चांगला आहे. धोनी काय विराट काय...
आयपील जिकंला तर धोनी ने अरे तो रैना काय नव्हता मागच्या वर्षी तर चेन्नई शेवटुन पहिल्या दोन मध्ये.
नंतर वेंगसरकरने तळाच्या
नंतर वेंगसरकरने तळाच्या फलंदाजांबरोबर खेळत विजय जवळ आणला पण शेवटी २ का ३ रन्स नी हुकला. त्याचे सुरेख वर्णन वाचले. तेव्हा रणजी फॉलो करणार्यांच्या लक्षात असेल. मला जाम आठवत नाही. मुंबईने अवघड अवस्थेतून खेचलेले विजय लक्षात आहेत पण हे नाही. >> मी पाहिलेली आहे ही मॅच - शेवटचा दिवस मुख्यत्वे ट- दूरदर्शनला चिकटून होतो. हरयाणा विरुद्ध होती. कपिल ने चेतन शर्माला सुपर्ब वापरलेले. मला वाटते ही फायनल अपेक्षेपेक्षा मोठी नि चुरशीची झाली कारण बरेच टेस्ट प्लेयर खेळू शकले होते. वेंगसरकर ने एकहाती काढलेली मॅच जवळजवळ. शेवटि क्रँप आल्यामूळे रनर घेतला होता नि त्यानेच घोळ घातला नि शेवट्चा प्लेअर रन आऊट झाल्यामूळे मुंबई हरली होती. वेंगरसरकर पिचवर बसून पडलेला नि रडला होता. काय इनिंग होती राव ! थेट गावसकरच्या शेवटच्या सामन्याच्या नि तेंडल्याच्या पाकिस्तान विरुद्ध बंगलोर ला - पाठदुखीने बेजार झालेले असताना खेळलेल्या इनिंगच्या लेव्हल ची होती.
२००७ नि २०११ मधले कॉमन खेळाडू
२००७ नि २०११ मधले कॉमन खेळाडू
Sachin Tendulkar
Yuvraj Singh
Virender Sehwag
MS Dhoni
Harbhajan Singh
Zaheer Khan
Munaf Patel
Sreesanth
फक्त २००७ मधले खेळाडू
Rahul Dravid
Ajit Agarkar
Sourav Ganguly
Robin Uthappa
Dinesh Karthik
Anil Kumble
Irfan Pathan
फक्त २०११ मधले खेळाडू
Ravichandran Ashwin
Gautam Gambhir
Ashish Nehra
Kohli
Raina
Piyush Chawla
Yusuf Pathan
ह्यतले किती जण २००३-०४ मधे होते हे मी देत नाही. कोणाचे किती काँट्रिब्युशन होते २०११ जिंकण्यामधे हे ज्याने त्यानेच ठरवलेले उत्तम.
"ज्यात तो बाद होण्याचीही
"ज्यात तो बाद होण्याचीही शक्यता असते. ज्यात तो बाद झाल्यास त्याचे वैयक्तिक शतक गेले पाण्यात तर जाऊ द्या, पण सेट बॅटसमन बाद झाल्याने संघाला फटका बसतो. मॅचचा तो टर्निंग पाँईट ठरू शकतो." - एक पे रहना! या तो चतुर बोल, या घोडा.. यह क्या रे घोडा - चतुर, घोडा - चतुर? एकदा म्हणतो शतकाचा विचार न करता खेळत रहायचं आणि दुसरीकडे म्हणतोस असं करताना विकेट गेली तर संघाला फटका बसतो. नक्की ठरव तुला काय म्हणायचंय ते. का फक्त शब्दाला शब्द वाढवून चर्चेला फाटे फोडायचे आहेत?
निलीमा, सचिनवर मस्त लिहीलंय.
असामी तुझ्या संघात सॅमसन,
असामी तुझ्या संघात सॅमसन, राहुल, मयंक असे तीन तीन कर्णधार आहेत की आयपीएलमधले >> हो रे पण मला खरच तिघेही कर्णधार मटेरियल वाटत नाहीत. कोणीच नाही म्हणून हे असे वाटते त्या त्या संघांसाठी. पंत चीही तीच केस वाटली मला. अर्थात हा पर्सनल टेक आहे.
"आज फेबुवर १९९१ सालच्या एका
"आज फेबुवर १९९१ सालच्या एका रणजी फायनलची माहिती वाचली. " - ह्या मॅच चं रोजचं वर्णन पेपरमधे वाचलं होतं. शेवटच्या दिवशी अगदी थोडक्यात विजय हुकल्यावर (अॅबी कुरूविल्ला रन-आऊट झाला होता बहुदा) वेंगसरकर पीचवर बसून रडला होता असा फोटो पेपरमधे आला होता.
'भाऊ - तुम्ही बहुधा वानखेडेत
'भाऊ - तुम्ही बहुधा वानखेडेत पाहिली असे* - नाहीं. त्या दरम्यान मीं कामानिमित्त बरेच दिवस फिरतीवर असे. त्यामुळे बहुधा चुकलं असावं ही मॅच पहाणं. वाचल्याचं मात्र आठवतं.
( कर्नल ' वेंगसरकर हेंही एक अजब रसायन होतं. ' no nonsense' टाईप. त्याला आक्रमक मूडमधे फलंदाजी करताना पहाणं ही एक पर्वणीच ! ग्रेट क्रिकेटर!! )
>>ह्या मॅच चं रोजचं वर्णन
>>ह्या मॅच चं रोजचं वर्णन पेपरमधे वाचलं होतं.
क्रिकइन्फो वगैरे नव्हते त्याकाळी त्यामुळे सगळी भिस्त पेपरवरच.... आधी शेवटचे पान वाचायचे आणि मग हेडलाइन्स!
संपूर्ण धावफलक असायचा.... किती चेंडूत वगैरे कंसात लिहून!
"षटकार" अगदी न चुकता विकत घ्यायचो त्याकाळी!
सही लोकहो! बर्याच जणांच्या
सही लोकहो! बर्याच जणांच्या लक्षात दिसत आहे ती मॅच.
(अॅबी कुरूविल्ला रन-आऊट झाला होता बहुदा) वेंगसरकर पीचवर बसून रडला होता >> हो हेच वाचले.
सही लोकहो! बर्याच जणांच्या
सही लोकहो! बर्याच जणांच्या लक्षात दिसत आहे ती मॅच. >> अरे ज्याने पाहिली आहे तो कधीच विसरणार नाही ती मॅच. कुर्व्हिल्लाचा डेब्यु होता बहुतेक तो आआणि त्याने विकेट्स पण घेतलेल्या मला वाटते. राजू कुलकर्णीचा वारसदार मिळाला म्हणून खूश झालेले आठवतात लोक.
रडण्यावरून , ९५ च्या लंका सेमी हरल्यावर रडवेला मांजरेकर नि तेंडूलकर ह्यांचा फोटो आठवतो का ?
९५ च्या लंका सेमी हरल्यावर
९५ च्या लंका सेमी हरल्यावर रडवेला मांजरेकर नि तेंडूलकर ह्यांचा फोटो आठवतो का ? >>>> ९५ ची कुठली लंका सेमी ? ९६ च्या वर्ल्डकपची का ? ती असेल तर तेव्हा कांबळीचा रडका फोटो पेपरमध्ये आला होता.
रणजीच्या मॅचचं वर्णन पेप्रात वाचल्याचं आठवतय. नंतर एक दोन वर्षांनी भारती वीज नावाच्या बॉलरने पंजाबला महाराष्ट्राविरुद्ध रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती ते ही आठवतय.
९५ च्या लंका सेमी हरल्यावर
९५ च्या लंका सेमी हरल्यावर रडवेला मांजरेकर नि तेंडूलकर ह्यांचा फोटो आठवतो का ? >> आणि २००७ ला वर्ल्ड कप मधून आपण बाहेर पडतोय हे लक्षात आल्यावर पॅव्हिलियनमधे बसलले सचिन, द्रविड व इतर.
डोमेस्टीक च्या च आठवणी
डोमेस्टीक च्या च आठवणी निघाल्या त्यावरून आठवलं:
युसूफ पठाण ने दुलीप ट्रॉफी च्या दुसर्या इनिंगमधे १००+ च्या स्ट्राईक रेट ने २०० रन्स करून वेस्ट झोन ला साऊथ झोन च्या विरूद्ध शेवटच्या दिवशी जिंकवलं होतं. टारगेट ५००+ होतं आणि त्याने शेवटच्या दिवशी अक्षरशः अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
"९५ च्या लंका सेमी हरल्यावर
"९५ च्या लंका सेमी हरल्यावर रडवेला मांजरेकर नि तेंडूलकर ह्यांचा फोटो आठवतो का ?" - ९६ च्या त्या सेमी फायनल च्या ठळक आठवणी म्हणजे श्रीनाथ ने पहिल्या ओव्हर ला थर्डमॅन ला कॅच उडवून काढलेल्या जयसूर्या आणि कालुविथरणा च्या विकेट्स (मांजरेकर आणि प्रसाद होते बहुतेक फिल्डर्स), अरविंदा ची हाफ सेंच्यूरी, २ आऊट ९० का ९८ वर असताना सचिन ची स्टंपिंगवर पडलेली विकेट (जयसूर्या च्या बॉलिंगवर) ..... मग एकदम ८/१२०, स्टँड्स मधली जाळपोळ आणि रडत रडत बाहेर जाणारा कांबळी. हार्टब्रेक!!
९६ च्या त्या सेमी फायनल च्या
९६ च्या त्या सेमी फायनल च्या ठळक आठवणी >> टोटली, फेफ. अजून लक्षात आहे.
आणि हे ही लक्षात आहे की या मॅच च्या आधी ४-५ दिवसांपूर्वीच पाकला दणदणीत हरवल्यावर "आता वर्ल्ड कप नाही जिंकला तरी चालेल" म्हणणारे आम्ही तोपर्यंत ते विसरून पुन्हा टीमला शिव्या घालत होतो
आज इंग्लंड दौर्यासाठी भारतीय
आज इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला. २४ जणांचं स्क्वाड असल्यामुळे तसे फारसे सरप्राईझेस नाहीयेत.
"या मॅच च्या आधी ४-५
"या मॅच च्या आधी ४-५ दिवसांपूर्वीच पाकला दणदणीत हरवल्याव" - अरे!! काय जबरदस्त झाली होती ती मॅच बँगलोर ला. जडेजा -वकार, प्रसाद-सोहेल - व्वा!!
कांबळी होता का ? मला का कोण
कांबळी होता का ? मला का कोण जाणे मांजरेकर नि तेंडुलकर आठवत होते. माझ्याकडे कापून थेवलेला होता तो फोटो तेंव्हा . पेपर नि सचिन होता तोवर वाटलेले कि होउ शकतील चेस. त्याने एक - दोन फोर मारले जयसूर्याला नि मग तो आधीच कमीत करत क्रीजबाहेर आला नि जयसूर्याने ऑलमोस्त वाईड बॉल टाकत त्याल स्टंप करवले नि मॅच खर्या अर्थाने तिथेच संपली. बाकीच्यआंनी होणरे नव्हते पुढचे. अरविंदा त्या नि फायनल मधे पझेस झाल्यासारखा खेळला होता. खर तर जयसूर्या लवकर बाद झाला तेंव्हा एकदम मॅच जिंकणार असे वाटलेले पण डिसिल्व्हा च्या खणखणीत ड्राईव्ह्स्ज नी हवाच काढली बॉलिंग ची. श्रीनाथ नेहमीसारखा खांदे पाडून बॉलिंग करायला लागलेला.
कांबळी त्याच कप मधे अँबोर्ज ला सणसणित सिक्स नि फोर मारत विंडिज विरुद्ध मॅच जिंकून दिली होती.
आज इंग्लंड दौर्यासाठी भारतीय
आज इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला. २४ जणांचं स्क्वाड असल्यामुळे तसे फारसे सरप्राईझेस नाहीयेत. >> भुवी नाही म्हटल्यावर चहरला न्यायला हवे होते असे वाटले. स्विंग बॉलिंग चा राजा आहे तो. डोमेस्टीक पण खेळतो त्यामूळे फिटनेस चा प्रश्न नाही. इंग्लंड मधे आपण जडेजा नि अश्विन पलीकडे स्पिनर खेळवू असे वआटत नाही त्यामूळे अक्षर पटेल ला का नेतायेत ते पण नाही कळले.
कांबळी त्याच कप मधे अँबोर्ज
कांबळी त्याच कप मधे अँबोर्ज ला सणसणित सिक्स नि फोर मारत विंडिज विरुद्ध मॅच जिंकून दिली होती. >>>>> कांबळीला त्या वर्ल्डकप नंतर उगीच बळीचा बकरा बनवून वगळलं होतं. तो धावा करण्यात तिसरा होता आणि सचिन वगळता सेंच्युरी मारणारा एकटाच होता!
तो शतकाजवळ आल्यावर स्लो
तो शतकाजवळ आल्यावर स्लो खेळला असणार - स्सॉरी आपलं स्लोव खेळला म्हणून त्याला काढले असणार पराग
https://youtu.be/B0vydNeWjgA
https://youtu.be/B0vydNeWjgA
प्रसाद आणि सोहेल रिऊनियन
*प्रसाद आणि सोहेल रिऊनियन* -
*प्रसाद आणि सोहेल रिऊनियन* -
इथल्याही क्रिकेटच्या धाग्यांवर अशीं कांहीं 'दुश्मनां'ची रिटायरमेंट नंतरचीं 'रियुनियन' पहायला मजा आली असती. पण...... इथं रिटायरमेंटच नाहीं ना !! उलट, माझ्यासारखा खुळा बाहेर रिटायर केलं गेलं कीं इथे येवून करिअर करायला बघतो !!!
Pages