तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कृषी विद्यपीठात मामाबरोबर खूप हिंडलो आहे लहानपणी...राहूरीलाही राहिलो आहे..
उत्कुष्ठ ग्रामजीवन अनुभवले आहे.
सकाळी माळावर नेट लाऊन बँडमिंटन, मग गुळाचा च्या ..
संध्याकाळी सरकारी दवाखाच्या मागील मैदानात क्रिकेट.. नदीच्या वाळवंटात मस्ती.. पाराजवळच्या मंदिरात ली तिन्ही सांजेच्या आरतीचा रव..।

@हर्षल वैद्य, माफ करा, मी पण ओळखू शकले नाहीये तुम्हाला.
Submitted by गायतरी on 30 September, 2020 - 14:44

'हर्षल वैद्य' यांच्याबाबतचा माझा जो अंदाज आहे तो जर खरा असेल तर तुम्ही त्यांना ओळखणे अ ग दी च अशक्य आहे.

रच्याक, तुमची २००८ ची batch म्हणजे, संकेत पटलेकर, अनुज वालझाडे यांचीच batch ना???

रच्याक, तुमची २००८ ची batch म्हणजे, संकेत पटलेकर, अनुज वालझाडे यांचीच batch ना???>>>
@विमु: करेक्ट. अनुज, संकेत दोघंही माझ्या वर्गात होते..

मी ्कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूल, कल्याण.
अकरावी-बारावी बांदोडकर कॉलेज, ठाणे
नंतर रचना संसदचे अॅकॅडमी अॉफ आर्किटेक्चर
पदव्युत्तर शिक्षण बी.एन्.सी.ए. पुणे

एवढे प्रतिसाद येऊनही माझ्या शाळेतला एकही मनुष्य प्राणी इथे अवतरला नाही हे अजबच म्हणायचे की
कदाचित आपण "द वन" आहोत.

हिम्सकुल , संशोधक >> तो मनुष्य-प्राणी होण्याचा मान तुम्हाला लाभलेला आहे Wink

माझी शाळा - प्राथमिक - शंकरवाडी म्युनिसिपल शाळा - जोगेश्वरी
माध्यमिक - पार्ले टिळक विद्यालय - विले पार्ले

>>एवढे प्रतिसाद येऊनही माझ्या शाळेतला एकही मनुष्य प्राणी इथे अवतरला नाही हे अजबच म्हणायचे की

माझ्या शाळेतले आहेत काहीजण.... अगदी वर्गातलेही आहेत एकदोघे.... पण सध्या फारसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत किंवा ह्या धाग्यावर फिरकलेले नसावेत!
पण माहिती नसलेले कुणी भेटले तर जास्त मजा!

अरे वा.
अजून माझ्या शाळेतलं आत्तापर्यंत कोणीही नाही.
पण याच पानावर अचानक माझ्या दोन्ही काॅलेजेसची नावं आली.
आणि ते ही एकाच आय डी च्या.. Happy

बनवडा खाल्लेला कोणी आहे का? >>> बी एम सी सी???

Submitted by अदित्य सिंग on 1 October, 2020 - 18:02

मी म्हणतेय ते त्याच्या शेजारचं .

Bmcc वाले पडीक असायचे आमच्या इकडेच>> अजिबातच नाही. आम्हाला एवढा चांगला कॅम्पस आणि कॅन्टीन असताना दुसरीकडे कुठे जायची गरज नव्हती आणि नाही..फर्गी चा वापर फक्त कॉलेजला पोचायला शॉर्टकट म्हणून. कॉमर्स असोसिएशनचे व सांस्कृतीकचे खम्डीभर कार्यक्रम असताना कोण कशाला जाईल इतर ठिकाणी .. 'स्पेशल' कारण अपवाद Happy आणि बनवडा ही बी एम ची फर्गसनने केलेली ढापाढापी आहे.

कटप्पा फक्त धागा उघडून देतात.. अधून मधून प्रतिसाद किती झाले चेक करायला येत असतील...
कटप्पा ची शाळा महिश्मती मध्ये असेल ना?

Pages