आठवणीतील 'शाळा'

तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 

आठवणीतील 'शाळा' :- 5

Submitted by Cuty on 24 February, 2020 - 05:43

आम्ही प्राथमिक शाळेत आलो अन एक नवलाईची गोष्ट घडली. यापूर्वी अगदी बालवाडीत असेतोवर लोक आम्हाला आमच्या आईवडिलांच्या नावे ओळखत. आता आम्ही मोठे झालो. शाळेतली, वर्गातली मुले, शिक्षक, शेजारीपाजारी असे सर्वजण आम्हाला नावाने ओळखू लागले, बोलावू लागले आणि आईवडिलांना, 'अमक्याची आई', 'तमक्याचे बाबा' असे म्हणू लागले. याशिवाय शाळेत वर्तणुकीवरून, अभ्यासातील प्रगतीवरून अशी हळूहळू प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख बनली होती. कुणी खोडकर, व्रात्य, कुणी हुशार, कुणी ढ, कुणी चलाख तर कुणी मंद होते. त्यानुसार शाळेत बसण्याच्या जागादेखील आपसूकच ठरून गेल्या.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आठवणीतील 'शाळा'