तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंतल, तुम्ही तर शेजारीच शिकलात आमच्या... शाळेचा फोटो बघितला की जुन्या आठवणी जाग्या होतात.

आचार्य सरांची कारकिर्द मोठी आहे, एक ठळक घटना सांगतो, RJCB मधे एक मुलगी सलग तीन वर्ष ८ ते १० पंतप्रधान होती. >> नाव सांगू शकाल का त्या मुलीचं?
विनिता, आम्ही आहोत की नाशिकचे अर्थात ना रोड चे...

आचार्य सरांची कारकिर्द मोठी आहे, एक ठळक घटना सांगतो, RJCB मधे एक मुलगी सलग तीन वर्ष ८ ते १० पंतप्रधान होती. >> नाव सांगू शकाल का त्या मुलीचं?

Submitted by सान्वी on 16 September, 2020 - 23:34
>>>>>>
१९९८ ते २०००

माझ्या शाळेतील कोणीही येथे असण्याचा प्रश्नच नाही. जनता विद्यालय घोटी. माञ आम्हाला मुख्याध्यापक म्हणून रमेश महाले सर होते. आमच्या शाळेत रिटायर झाले. त्यांनी लिहिलेला 'डाॅल्फीन' हा धडा बालभारती च्या पुस्तकात होता.

हाय तुरु Happy
हाय सान्वी Happy

नासिकरोड पण चालेल गं Lol

शेजारी पण आहेत की शाळेचे. छान. या प्रायव्हेट हायस्कूल शी माझी ओळख मजेशीर झालेली. मी नवविपर्यंत मुलं मुली मिक्स शाळेत होते. एकदम दहावीत पेणला बदली झाल्याने मुलींच्या शाळेत ऍडमिशन झालेली. पहिल्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर बाबांनी विचारलं - कशी काय वाटली शाळा? मी छान आहे वगैरे म्हणून म्हणलं की सगळीकडे नुसत्या मुलीचं मुली होत्या. तिथे नुकतीच ओळख झालेलं शेजारचं कुटुंब घरी आलेलं , त्यातला मुलगा म्हणलेला मग आमच्या प्रायव्हेट हायस्कूल ला ये, भरपूर मुलं आहेत . Lol :

मी पण गर्ल्स स्कूल मधेच होते..एकाच बिल्डिंगमध्ये एक विंग गर्ल्स स्कूल आणि दुसरी विंग बोईस स्कूल ..कधी काळी स्पोर्ट्स .. सायन्स एक्सिबिशन वगैरे ला एकत्र जावे लागले तर बुजायला व्ह्याचे..
बाकी बऱ्याच जणांचे..लागेबांधे होते.. ..आदेश बांदेकर आणि नम्रता संभेराव आमच्याच शाळेत होते..

अरे उत्तर महाराष्ट्रातल कुणी नाही का इकडे??
माझ्या शाळेतील तर कुणीसुद्धा नसेल इकडे.
भगिनी मंडळ - बालवाडी
सानेगुरुजी शाळा- 4 थी पर्यंत
पाचवी ते दहावी - द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्याशाळा, अमळनेर

Pages