Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44
मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.
माझ्यापासून सुरुवात
किंग जॉर्ज - भांडुप
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी शाळा :सिताबाई संगई कन्या
माझी शाळा :सिताबाई संगई कन्या शाळा, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती
कॉलेज : Govt college of engg. Amravati
कोणी असेल माझ्या शाळा किंवा कॉलेज मधील मायबोलीवर तर खूप आनंद होईल..
माझ्या शाळेचे कुणी नसणार
माझ्या शाळेचे कुणी नसणार बहुतेक, तरी मिळालं कुणी तर मस्तच वाटेल
रा के चितळे माध्यमिक विद्यालय , देवपूर धुळे.
मोक्षु, मी पण Govt College of
मोक्षु, मी पण Govt College of Engg. Amravati.
मी चिन्मयी, रत्नागिरीतली
मी चिन्मयी, रत्नागिरीतली तुमची शाळा कोणती?>>>> माझेमन, माझी शाळा जागुष्टे हायस्कूल, कुवारबांव.
अनया, भिडे म्हणून कुणी नाही
अनया, भिडे म्हणून कुणी नाही आठवत आहे. आम्हाला करोडी , रानडे madam होत्या.
गुज्जि, good to know :). मी मुरबाड रोड लाच रहायाचे. लहान भाउ होता रेलचाईल्ड मध्ये ४ थी पर्यन्त.
मोक्षु, मी पण Govt College of
मोक्षु, मी पण Govt College of Engg. Amravati.>>अरे वा....कोणत्या वर्षीचे पास out?
मी 2012 pass out..
मग तुम तो बच्ची हो. मी ८९.
मग तुम तो बच्ची हो. मी ८९.
२०१३ मध्ये आमची सिल्व्हर ज्युबिली झाली तेव्हा गेलो होतो कॉलेजात. सगळे कॉलेज, हॉस्टेल फिरून छान वाटले.
मॅडम, गुज्जि, good to know
मॅडम, गुज्जि, good to know
आनंद वाटला आपल्या आजूबाजूचे मित्र सवंगडी अचानक भेटतात किंवा एका समान प्लॅटफॉर्म वर असतात, कल्याण ची ओढ आजही आहे, आणि आठवतात त्या शिक्षक लताताई घारपुरे सरस्वती मंदिर मध्ये शिकवत असत, अत्यंत सुंदर मराठी अक्षर होते त्यांचे, आमचे अक्षर चांगले यावे म्हणून त्यांनी खूप कष्ट त्यांनी घेतले, त्यामुळे आज मराठी अक्षर सुंदर आहे, त्या आम्हाला म्हणत असत की तोंड चामड्याचे आहे म्हणून ठीक आहे नाहीतर तुम्हा मुलांपुढे शिकवताना कधीच फुटून तोंडचे तुकडे तुकडे झाले असते तुम्हाला शिकवताना. . असे जरी होते तरीही अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवले, म्हणूनच आज ही अनेक वर्षांनी सुद्धा त्यांची आठवण येते...आणि डोळे पाणावतात... असे शिक्षक मिळाले हे माझे भाग्य... त्यांना मुलांचा विकास व्हावा अशी कळकळ होती... आणि गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करताना शिकवणारे शिक्षक अम्हलांमिकले.... आज शाळा धागा वाचला तेव्हा सर्व जुन्या आठवणी आल्या....
गिरीकंद, २००८/२००९.
गिरीकंद, २००८/२००९.
११ वी, १२ वी दोन वर्षे होतो वा.नगरला.
काही काही जण कित्ती
काही काही जण कित्ती वेगवेगळ्या ठीकाणी शिकलेत.
माझी शाळा एकच शिशुवर्ग ते दहावी, कविनने लिहीली ती आणि कॉलेजही एकच अकरावी ते पंधरावी, पेंढारकर कॉलेज डोंबिवली. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीतून बाहेरुन करत होते कारण जॉब करत होते पण कंम्प्लिट करु शकले नाही, ती रुखरुख आजही आहे.
माझी शाळा सवित्रीदेवी थिराणी
माझी शाळा सवित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर, ठाणे
अजूनतरी कोणी दिसले नाही इथे, माझ्या शाळेतले
चौथी पर्यंत विद्या विकास
चौथी पर्यंत विद्या विकास विद्यालय, सहकारनगर पुणे.
त्यानंतर - ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे!
चला प्राथमिक शाळेतले का होईना.. इथे आहेत ब्वा कुणी तरी..☺️☺️
Government college of
Government college of Engineering, Amravati नवऱ्याचे कॉलेज आहे.
आज एका मित्राबरोबर जो एके
आज एका मित्राबरोबर जो एके काळी कॉमर्स च्या विद्यार्थी होता त्याच्याबरोबर बनवडा त्याच्या कॉलेज चा भारी कि माझ्या अशी दीर्घ चर्चा झाली....
ज्यांना कॉलेजची नावे कळली त्यांचे अभिनंदन !!!
सन्मित्रचे स्पर्धक असणाऱ्या
सन्मित्रचे स्पर्धक असणाऱ्या 'नंदादीप विद्यालय' मधील कोणीच नाही का माबोवर??? > मी नंदादीपीय ! नंदादीप विद्यलय, गोरेगांव -पूर्व
सन्मित्रचे स्पर्धक असणाऱ्या
सन्मित्रचे स्पर्धक असणाऱ्या 'नंदादीप विद्यालय'...
Yes, correct!!!
सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात आमच्या शाळेने बाजी मारली होती. शैक्षणिक वर्ष 2004-05 पासून इयत्ता आठवी पासून सेमी इंग्रजी माध्यम सुरु आहे!!!
Btw भ्रमर, तुमची 10 वी ची कोणती batch???
कोणी सेंट मेरी स्कूलचे आहे का
कोणी सेंट मेरी स्कूलचे आहे का इथे?
मी आता तिथेच एका बेंचवर बसून हे पोस्ट करत आहे..
भ्रमर, तुमची 10 वी ची कोणती
भ्रमर, तुमची 10 वी ची कोणती batch??? > डायनॉसॉर होता तेव्हा !
वि_मु, सध्या रहायला गोरेगांवातच का?
मी पीईएस मॉडर्न हायस्कूल .
आमच्या शाळेच्या चौकातला नटराज समोसा फेमस होता.
मधल्या सुट्टीत जर घंटा व्हायच्या आत मिळाला तर नथिंग लाईक दॅट.
वि_मु, सध्या रहायला
वि_मु, सध्या रहायला गोरेगांवातच का? - नाही, शाळेत असताना सुद्धा मी गोरेगावकर नव्हतो. इ. ८ वी ते १० वी वाकडे क्लासला होतो आणि संस्कृत साठी स्वाती ताईकडे
तुमची 10 वी ची कोणती batch??? > डायनॉसॉर होता तेव्हा ! - पेपर कोण तपासायचे? डायनॉसोर???
मी हुजूरपागेची..
मी हुजूरपागेची..
माझ्यावेळेस अलका काळे बाई होत्या मुख्याधपिका..
पेपर कोण तपासायचे? ## डोडो
पेपर कोण तपासायचे? ## डोडो
माधवराव भाग्वत हाय्स्कूल
माधवराव भाग्वत हाय्स्कूल विलेपार्ले पू. मुंबई
Pages