तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (माझ्या शाळेचं कुणी असण्याची सुतराम शक्यता नाही इथे).
सी.एच.एम. कॉलेज, उल्हासनगर.
व्हि.पी.एम. लॉ कॉलेज, ठाणे (बेडेकर कॉलेजच.. पण लॉ कॉलेजचे नाव वेगळे होते).
शाहू लॉ कॉलेज, पुणे
Institute of Company Secretaries of India (यातले आहेत बरेच Happy )

अन्जू ,ती सेंच्युरी रेऑन कंपनी आणि त्याची कॉलनी. ती शहाड ला आहे. आमची नॅशनल रेऑन कॉर्पोरेशन, हि खुप मोठ्ठी कॉलनी, कंपनी पण मोठी. ती आंबिवली स्टेशन, मोहोने गाव इथे आहे.

माधवी देसाईंच्या पुस्तकात उल्लेख आमच्याच कॉलनीचा आहे. त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांची सेंडऑफ पार्टी लक्षात आहे. मी ४थीत होते त्या कॉलनी सोडून गेल्या तेव्हा ( कविटकर बाई)

माझा मामा दादरच्या किंग जॉर्जचा १९८३ च्या बॅचचा.
आणि वडील कराडच्या टिळक हायस्कूल च्या १९७५ च्या बॅचचे.

अस होय धनुडी, मी दोन्ही सेम समजत होते. Thank u.

माधवी देसाईंच्या पुस्तकात उल्लेख आमच्याच कॉलनीचा आहे. त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांची सेंडऑफ पार्टी लक्षात आहे. मी ४थीत होते त्या कॉलनी सोडून गेल्या तेव्हा ( कविटकर बाई) >>> हो त्या शिक्षिका होत्या त्या शाळेत, त्यांचे पहिले पती तिथे जॉब करत होते.

चला पुस्तकातला गेस तरी खरा ठरला.

NRC टिटवाळा जाताना ट्रेन मधून दिसायची ..एक लांबलचक रस्ता पण आहे.. NRC ला जायला .. एक छोटीशी टाउनशिप आहे..मला नेहमीच आवडायचे ते बघायला.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहेत..

Mandard <<< माझे आजोबा उपमुख्याध्यापक पण होते टिळक हायसकूलचे आणि इतिहास भूगोल पण शिकवायचे. ते 1983 - 85 साली रिटायर झाले. पियू यांच्या वडिलांना शिकवायला असतील बहुतेक.
माऊमैय्या , मी 1995 च्या बॅचची ( श्रवू ,तुझ्यासकट बऱ्याच जणांनी माझं वय अचूक ओळखलय त्या धाग्यावर/ तो धागा जन्माला यायच्या आधीच Lol : ) तू/ तुम्ही कोणत्या बॅच च्या? वाळके मॅडम पण होत्या. भट मॅडम सायन्स आणि नाडकर्णी मॅडम गणित ला होत्या. भट मॅडमची मुलगी पण आमच्या बरोबर होती. बोर्डाच्या परीक्षेला तर माझ्या पुढच्याच बेंचवर होती.

@ ए_श्रद्धा - अरे वा!!
बॅच सान्गत नाही,नाहीतर वयाच्या धाग्यावर कळायचे.. पण मी १० वी पास आउट झाले, तेव्हा सरदेसाई बाई होत्या मुख्याधापिका

Submitted by अथेना on 16 September, 2020 - 00:51 >>

भा. पो. Happy मी ५वी मध्ये शाळेत आले त्याच वर्षी सरदेसाई बाई निवृत्त झाल्या , त्या खूपच प्रेमळ होत्या म्हणे. आम्हाला घारे बाई होत्या त्या तुझ्या वेळेस उपमुख्याध्यापिका असतील ना .

मी पण नू म वीय . माझ्या शाळेच्या दोन जण आहेत की इथे . माझ्या नंतरच्या batch च्या बहुतेक . माझ्या वेळी आगाशे बाई होत्या मुख्यध्यापिका.

मी 1995 च्या बॅचची>>>>> म्हणजे मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा
मी २००२ ची बॅच

रा हि सावे विद्यालय — तारापुर (माझ्याही शाळेतलं इथे कुणी असेल असं वाटत नाही)

नवीन Submitted by कविता१९७८ on 16 September, 2020 - 15:15
>>>
mi_anu तारापूरकर आहेत बहूतेक.

सेंट विमलिज....
बरेच जण आहेत ईथे ह्या शाळेचे.. हर्पेन नक्की.... फारएण्ड बहुतेक....

सेंट विमलिज ">>>हे हे.
माझे दोन फ्रेंड्स आहेत या शाळेचे आणी त्यांंना अगदी अभिमान वगैरे आहे.

माझ्या गावचा एकजण सापडला होता माबोवर, एका धाग्यावर मी गावाचे नाव लिहीले बघून मला विपु करून गेला, परत दिसला नाही माबोवर.

राजिप धोकवडे - अलिबाग
राजिप सुगवे - कर्जत
आदिजन विद्या मंदिर कशेळे - कर्जत
अभिनव विद्या मंदिर कर्जत - कर्जत
नेमिनाथ जैन ब्र्ह्मचारी आश्रम चांदवड - चांदवड
एस पी डी एम कॉलेज शिरपुर - शिरपुर
पी ओ नहाटा कॉलेज भुसावळ - भुसावळ

शिक्षणासाठी फिरलेलो..... पहिलं शाळा गाव नांव - तालुका नाव.

@ ए_श्रद्धा - करेक्ट..घारे बाई उपमुख्याध्यापिका होत्या तेव्हा.
@ अश्विनी११ - Good to see one more नूमवीय (नुसत्या मवाली विद्यार्थिनी) तेव्हा जाम राग यायचा..हेहेह्ही

Pages