तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yes

माझी शाळा अभि . आहेत इथे जुने माबोकर. भुंगा वगैरे
Submitted by जाई. on 6 October, 2020 - 22:46

अभि म्हणजे अ. भि. गोरेगावकर???

Ho

अभि गोरेगावकर तीच ना .. जी अंबामाता देवळाच्या बाजूला आहे.
Submitted by श्रवु् on 6 October, 2020 - 23:31

हो, आणि सन्मित्र आणि अभि चा गणवेशही सारखाच आहे!

जी अंबामाता देवळाच्या बाजूला आहे. >>> हे मला बघायचं आहे एकदा. माझ्या आईचं लाडके देऊळ आणि पुजारी ओळखीचे झालेले. दोघे नवराबायको आईचे लाड करायचे. फार फार वर्षापूर्वी, आजोबांनी बडोद्याची नोकरी सोडल्यावर एक वर्ष गोरेगावला होते नोकरीसाठी तेव्हा आई मदतीला आलेली, मावशी आणि आजी बडोद्यात होत्या. त्यामुळे आईला गोरेगाव आणि त्या परीसराबद्दल जाम जिव्हाळा आहे.

हे खरं गोरेगाव गप्पा असतील तर तिथे लिहायला हवं पण अंबामाता देऊळ वाचून इथे लिहिलं Happy .

अंजु देऊळ बंद आहे अजून ..देऊळ चालू झालेच तर नवरात्रीत या..देवी ला रोज नवीन नऊ रंगाच्या साड्या नेसवतात.. मंगळागौर. भोंडला प्रोग्राम असतात..

मस्तच. बघू पुढे कधीतरी. यंदा इथून नमस्कार. आता लांब आहोत आम्ही, पूर्वी नालासोपारा इथे होतो तिथून गोरेगाव जवळ होतं. आई बाबा एकदा तिथे जाऊन मग माझ्याकडे आलेले. माझं राहिलंच.

माझी शाळा अभि . आहेत इथे जुने माबोकर. भुंगा वगैरे>>
@जाई: मी सातवीपर्यंत अ. भि. ला होते.माझे वडील, बहीणभाऊ वगैरे सगळे अ. भि. कर...

शाळेचे नाव काढले की शाळेतील मित्र मैत्रिणी आणि केलेली धमाल मैदानी खेळ, कब्बडी बोरे चिंचा, खिडकी वडा आठवते, असे सुंदर दिवस आणि वर्गातील मित्र मैत्रिणी शिक्षक शिशु विहार शाळेमधील कपाटात असलेला फुलं साईझ स्कलेटण, रसायन शास्त्र प्रयोगशाळा, गावंडे मॅडम बापट मॅडम, चावरे मॅडम, बर्वे मॅडम, भोसले मॅडम, कारेकर सर लढे सर यांची आठवण येते, तर सरस्वती मंदिर मधील सुमनताई दामले, भोळे बाई, आजही आठवतात खरोखर ही माणसे वंदनीय, अत्यंत जिव्हाळ्याचे त्यांनी आम्हाला विषय समजे पर्यंत न कंटाळता शिकवले.......

मयुरी तुम्ही नांदेड च्या का?
महात्मा फुले शाळेच्या बाजूची शाळा ना, तिथल्या ground वर आम्ही ice गोळा खायला यायचो Happy>>> हो किल्ली , माझं माहेर नांदेड Happy
माझीपण पहिली ते चौथी शाळा प्रतिभा निकेतन ... पण होळी वरची Happy Happy

प्रज्ञा निकेतन Happy
होळी वरचे गल्ली बोळ आणि वाड्यातले नृसिंह मंदिर आठवले

माझ्या शाळेचे कुणी इथे असण्याची सुतराम शक्यता नाही.
श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी, ता. इंदापूर , जि. पुणे
ज्यु. कॉलेजचे कुणी कदाचित असेल:
वर्धमान विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर
कॉलेजचे मात्र असतील बरेच:
शासकिय अभियांत्रिकि महाविद्यालय, कराड

ज्यु. कॉलेजचे कुणी कदाचित असेल:
वर्धमान विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर >>>>>>मी आहे.
पुम्बा,कोणती बॅच?

Anagha_gokhale मी तुमच्या शाळेत चौथी, सातवीच्या स्कॉलरशीप परीक्षांना आणि एकदा खोखोच्या आंतरशालेय स्पर्धांना आलेली आहे.
तुम्हाला शकुंतला भिडे नावाच्या शिक्षिका होत्या का?

Gujji.. तुम्ही कल्याण चे का? शिशु विहार आणि सरस्वती मंदिर म्हणजे?
होय, चौथी पर्यंत, मुरबाड रोड, पोस्ट ऑफिस मागे सरस्वती मंदिर ज्याला रेलचाईल्ड म्हणून पूर्वी ओळखत होते, व नंतर १० वी पर्यंत सोय नसल्यामुळे शिशुविहार रामबाग मधील शाळेत होतो, खूप छान दिवस होते, शाळा खेळ मैदान आणि थोडासा अभ्यास यात दिवस संपून कधी संध्याकाळ होत असे ते सुद्धा लक्षात येत नसे .....

Pages