निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पाकोळीबाबत माझा जरा गोंधळ झाला आहे. खड पाकोळी (Dusky Crag Martin) आणि घर पाकोळी (House Swift) या दिसायला अगदी सारख्या दिसतात. मी आजवर या दोन्ही पाकोळ्या पाहिल्या नव्हत्या त्यामुळे समजेना. पण मला वाटते ही खड पाकोळीच असावी. स्विफ्ट घरटे बांधताना गवताच्या काड्या व स्वतःची लाळ वापरते. मार्टिन मात्र चिखलाचे लहान लहान गोळे लाळ मिसळून विटांप्रमाणे रचुन घर बांधते. आमच्या पार्किंगला मला जे घरटे सापडले आहे ते मातीचे आहे म्हणजे ही नक्की मार्टिनच असणार. या पाकोळ्या नेहमी पुलाखाली, जुनी बांधकामे वगैरे अंधाऱ्या ठिकाणी घरटी बांधतात त्यामुळे अगदी जवळ असुनही यांचे फोटो व्यवस्थित येत नाही. आमच्या पार्किंगमधे एक घरटे मला अचानक दिसले. वापरात नसलेला व अंधारा भाग आहे हा. जरा वेळ तेथे बसल्यानंतर दोन मार्टिन आले आणि घरट्यातुन दोन तिन तोंडे एकदम बाहेर आली. म्हणजे घरट्यात पिल्लेही आहेत. आता सावकाश यांचे व्यवस्थित फोटो काढेन. पिल्ले जरा मोठी झाली की घरट्याच्या तोंडावर येऊन बसतील तेंव्हा त्यांचेही फोटो मिळतील.

हे मातीचे घरटे आहे. आत पांढऱ्या पिसांची गादी असणार.

श्रद्धा +१००००
इवलासा जीव पण किती करतात आपल्या पिल्लासाठी.

वर मी ज्या खड पाकोळीबद्दल लिहिलेय तिचे काही बऱ्यापैकी फोटो मिळाले. तिला तिनच बोटे असतात. अंगठा नसतो. त्यामुळे ती जमिनिवर पटकन उड्या मारु शकत नाही. म्हणून ती कदाचीत माणसांपासुन जास्त सावध रहात असावी. अर्थात हा माझा अंदाज.

.

वेळ असेल तर (मला आणि तिलाही) मी हिच्याकडे कितीही वेळ पहात बसू शकतो. Happy>>>>>>>> बराच वेळ फोटो दिसला नाही........☺️

काय गं बाई एकेक गोंडुले फोटो आहेत. शाली!!! खूपच दांडगा अभ्यास आहे तुमचा . फार सुरेख छंद. तुम्ही पक्षीनिरीक्षक आहात का? म्हणजे सलीम अली यांजसारखे ऑफिशिअल.
नसल्यास आपण ती डिग्री (अशी असते का?) घेउ शकाल का? तुमचा खूपच व्यासंग आहे.

कसले जबरदस्त फोटो आहेत एकसेएक.

तो ब्लू जे क्युट आहे. मार्टिन घरटे भारीच. खारुताई मला खूप आवडते, कसली गोड असते, तुरुतुरु पळत राहते.

ऋतूराज फोटो दिसायला हवा लगेच. मी साईज खुप कमी केली आहे त्याची. 80 kb च्या आसपास असेल.

नाही हो सामो, मी पक्ष्याचा पहिला फोटो काढला त्याला फारतर महिना झाला असेल. मला काहीएक कळत नाही. येथील शशांकदा बरीच माहिती पुरवतात. जागूताईने फुलांचे आणि वावे यांनी पक्ष्याचे वेड लावले. दोन्हीतले काहीही कळत नाही मला.

शाली तुमचे फोटो एकदम मस्त असतात. मला वाटते कि तुम्हाला एडिटिंगचे खूप चांगले ज्ञान आहे. तुमचे फोटो हे सदा पर्वणी असतात पाहणाऱ्यासाठी

उनाडटप्पू सही पकडे है. अर्थात मला एडीटींगमधलेही फारसे काही कळत नाही.
हा ग्रेट हेरॉन आहे का? याला शेंडी असते ना? फोटो बाकी मस्तच आला आहे.

आजचे मानकरी
कमळ कुटुंब
IMG_20191011_121624.JPG

हिरवा चाफ़ा (पिवळा झालेला)
IMG_20191011_121519.JPG

ही माझी एक नंबरची रायव्हल आहे. तिचही माझ्याविषयी तेच मत असावं. तीही पक्ष्यांसाठी येते आणि मी देखील पक्ष्यासाठी बागेत येतो. रोज सकाळी साडेसहा वाजता आम्ही एकाच जागी बसलेले असतो. मी या बाजूला आणि ती त्या बाजूला. मी तिला मनातून शिव्या घालत असतो आणि तीही मला पाहून नक्की शिव्या देत असणार. मला राग आहे कारण तिला पाहून पक्षी येत नाही. आणि तिला राग आहे कारण ती असताना पक्षी आले की मी ते उडवून लावतो. दिवसभरातसुध्दा कधी दिसली तरी रागाने पहाते. असो. कशीही असली तरी देखनी आहे म्हणून मी माफ करतो तिला. Happy

मनिम्याऊ कमळ मस्तच आहे.
कमळाची पाने अशी देठांवर वर येतात का? आणि भिंतीलगत आहे म्हणजे पाण्यात नाहीए का कमळ?

Indian Robin (Female)
ही आपल्या रॉबीनची वाट पहात असेल का दारात उभी राहून? Happy

Pages