निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिम्याऊ कमळ मस्तच आहे.
कमळाची पाने अशी देठांवर वर येतात का? आणि भिंतीलगत आहे म्हणजे पाण्यात नाहीए का कमळ?
नवीन Submitted by शाली on 14 October, 2019 ->>>
नाही हो शालीदा, प्रत्येक पान स्वतंत्रपणे पाण्यातून वर येतं. ते फोटोच्या अँगलमुळे तसं दिसतयं. कमळ पाण्यातच आहे. ते टाकं 6 फूट खोल आहे. आणि पानांचे देठ पाण्यापासून 3 ते 6 फूट उंच असतात. म्हणजे मुळापासून पूर्ण उंची जवळ जवळ 10 फूट असते. फूलाचा व्यास पण 1 फ़ूट आणि तितकेच खोल असते.

धन्यवाद मनिम्याऊ.
प्रत्येक पान स्वतंत्र असते ते लक्षात आले. मला म्हणायचे होते की आळूची पाने असतात तशी पाने पाण्याच्या बाहेर कशी? मला वाटायचे की कमळाची पाने ही फक्त पाण्यावर तरंगतात. बाहेर आलेली पाहीली नव्हती कधी. आणि मुळापासुन दहा फुट म्हणजे खुपच उंच आहेत की. भारी!

कमळाची पाने ही फक्त पाण्यावर तरंगतात... त्या कमलिनी.. water lily.
IMG_20190818_155128_0.JPG
कमलिनी ची पाने पाण्यावर पसरलेली असतात तर कमळाची पाने lotus पाण्या बाहेर असतात. तसेच कमळाच्या पानावर पाणी अजिबात रहात नाही. शिवाय गाभा कमलिनी आणि कमळाचा गाभा फ़ार फ़ार वेगला असतो

ओह हे माहित नव्हते.
आणि हे काय सुंदर आहे. मला याचा आकार चौकोनी दिसतोय. मस्तच.

ही माझी एक नंबरची रायव्हल आहे. >>>> तुमची रायव्हल खरंच देखणी आहे.मिसेस रॉबिनपण क्यूट!

मंया. कमळांची माहिती,फोटो मस्तच.

वाह ऋतुराज मस्त फोटो.
शालीदा, ते एकच फूल चौकोनी आले होते. म्हणून फोटो काढून ठेवला होता.

आणि एक मो ssss ठा फरक्,... कमळाचा प्रत्येक भाग 100% edible आहे तर कमलिनीच्या काही जाती चक्क विषारी.

ऋतूराज फोटो सुंदर आहेत. शेवटच्या फोटोतील Elephant Hawkmoth आहे असे गुगल म्हणतेय. बरेचसे तसेच दिसतेय. मुन मॉथ तर खरच मस्तच दिसतेय. त्या शेंदरी पट्यांमुळे आणखीच छान दिसतय.

मनिम्याऊ कमळातही इतके प्रकार आहेत हे नव्यानेच कळतेय. Happy

निलीमा (Tickell's Blue Flycatcher)
आज मला यांची जोडी पाषाण तलावाजवळ दिसली. दोघेही पिसे साफ करण्यात मग्न होते. (Preening) त्यामुळे असा अवतार दिसतोय त्यांचा. एऱ्हवी अगदी भांग पाडल्यासारखे निटनेटका असते ही निलीमा. (आकार: साधारण १२ सेंटीमिटर. नर हा मादीपेक्षा जास्त उठावदार रंगाचा असतो. उडतानाच हवेतले किडे पकडून खातो)
मेल
2019-10-15 17.45.11.jpg
फिमेल
2019-10-15 17.45.07.jpg

वर्षा फोटो मस्तच. मी आज सकाळी Asian Brown Flycatcher पाहीला. (मराठी नाव: तपकिरी लिटकुरी)
अगदी mockingbird सारखाच दिसतो तोही. रंग थोडा यलोईश असतो. मी फोटो डकवतो सवडीने. तुमचे दोन्ही फोटो सुरेखच आले आहेत.

ऋतूराज असं असेल तर अवघड आहे या सारस पक्ष्यांचे. यांचा अधिवास असलेल्या भागाचे कृत्रीम मॉडेल करुन तेथे यांचे तज्ञांच्या नियंत्रणाखाली ब्रिडिंग का करत नाही? ते शक्य नाहीए का? आपल्याला गरज असलेल्या प्राण्यांचे बेसुमार प्रजनन करतोच ना माणूस? घातक पध्दतीने कोंबडीचे मांस वाढवतो, गाई-म्हशींचे दुध वाढवतो मग हे चांगले काम करायला काय हरकत आहे?

धन्यवाद शाली. हा टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर मला जाम आवडतो. मला एकंदरीत निळे पक्षी जास्त आवडतात. Proud
हिमालयात एक ग्रॅन्डाला नावाचा निळाजर्द पक्षी दिसतो. बर्डींग कम्युनिटीवर इतके देखणे फोटो पाहिलेत त्याचे. थव्याने असतात बहुतेक.
तो बघणं हे माझं ड्रीम आहे.

मी सर्च केला ग्रॅन्डाला. खरच सुंदर पक्षी आहे. यांचा पुर्ण थवा बर्फ किंवा आकाशाच्या पार्श्वभुमीवर कसा दिसेल? वाह!

छोटा खंड्या, धिंदळा. संस्कृतमधे छान नाव आहे याला. मीनरंक.>>>> पहिल्यांदा पाहतेय.

खुप दिवसांनी आले. १२२ पोस्ट होत्या त्यमुळे फक्त फोटोच पाहिले. फार सुंदर आहेतसगळेच फोटो.

माझ्या घरापासुन पाच सहा किमीवर खुप मोठा भाग आहे जेथे शेती होते. तेथे एका मुनियाला मी ती घरटे करत असतानापासुन फॉलो करतोय. तिने अंडी दिलेलीही मी पाहीली होती. नंतर ती सहा पिल्लांबरोबर दिसायला लागली. आठ दिवसात सगळे घरटे सोडून शेतात आईच्या मागे फिरायला लागले. चार दिवासापुर्वी मी येथे ससाणा पाहीला होता त्यामुळे जरा काळजी वाटत होती. आज सकाळी मी गेलो तेंव्हा मला त्याच झाडाच्या फांदीवर पिल्ले दिसली. चार दिवसातच खुप मोठी आणि चमकदार झाली होती. पण चारच होती. बहूतेक दोन पिल्ले ससाण्याने उचलली असावीत. कारण त्या संपुर्ण परिसरात दुसरा शिकारी पक्षी नाहीए. पिल्ले आईची वाट पहात असावीत. नाहीतर ती अशी चुपचाप बसली नसती. माझा अंदाज खरा ठरला. जरा वेळाने आई आली आणि तिने त्या चौघांना अगदी पाळीपाळीने रांगेत भरवले. पिल्ले जवळ जवळ आईच्याच आकाराची झाली असल्याने जास्त दंगा करत होती. एकदा तर आई धक्काबुक्कीत खाली पडली व पुन्हा उडून त्यांच्यात जाऊन उरलेला खाऊ तिने भरवला.

हा इतरांना सांगत असावा की "दंगा करु नका. शांत बसा. आई आली की सगळ्यांना खाऊ मिळेल"

रांगेत खाऊवाटप.

Pages