" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
याचे नाव माहित नाही पण माझी
याचे नाव माहित नाही पण माझी लेक याला फ़ुलपाखरूचं झाड म्हणते.
बर्याच दिवसांनी फिरकली इथ..
बर्याच दिवसांनी फिरकली इथ.. डोळे निवले.. मस्त चर्चा आणि फोटोज म्हण़जे चेरी ऑन टॉप..
Oxalis सारखं दिसतय पण ते तीन पानी असत. आणि छोटुस असत. हे तुलनेनं मोठय.
मनिम्याऊ खरंच की
मनिम्याऊ खरंच की फुलपाखरांसारखी पानं आहेत.
>> आपल्या इथे देखील आता हिवाळ्यात स्ट्राइप्ड टायगर चे स्थलांतर चालू होते.
हो काय. कुठे जातात ती?
उनाडटप्पू , फोटो भारी.
वर्षा काय सुरेख फोटो आहेत.
वर्षा काय सुरेख फोटो आहेत. मस्तच. आणि मोनार्क ज्या फुलांवर बसले आहे ती फुलेही भारी आहेत.
उनाडटप्पू तुमचे फोटो म्हणजे काय बोलायचेच नाही. भारीच.
रॅट स्नेक खतरनाक. मला सापांची फार भिती वाटते. काहीजण म्हणतात की आहा हा काय सळसळतं सौंदर्य आहे तेंव्हा मला आश्चर्य वाटते. कसले सौंदर्य, काटा येतो अंगावर.
मनिम्याऊ खरच फुलपाखरे दिसत आहेत. या पानांचा नक्की आकार कसा आहे?
काल सासवडला गेलो होतो. येताना
काल सासवडला गेलो होतो. येताना हा फुलटोच्या दिसला. भारतात आढळणारा सगळ्यात लहान पक्षी. गम्मत म्हणजे त्याने मला मनसोक्त फोटो काढू दिले. कंटाळा आल्यावर व्हिडिओ शुट केला. मग नंतर उडून गेला. काय समजुतदार पक्षी आहे हा. मी खुश आहे त्याच्यावर.
Tickell's Flowerpecker
सासवडला दिसलेला अॅशी क्राऊन्ड
सासवडला दिसलेला अॅशी क्राऊन्ड स्पॅरो. मराठीत याला डोंबारी किंवा चंडोल म्हणतात. हा शक्यतो जमीनीवरच फिरताना दिसला मला. मधे तारेवर व एका झाडावर बसलेला दिसला. पण बहुतेक वेळ हा जमीनीवरच होता. सासवडवरुन येताना मला हा थेऊरला नदीच्या किनाऱ्यावर खडकात फिरताना दिसला. दोन्ही वेळेस नर आणि मादी सोबत होते. निव्वळ देखणा आणि अटकर बांध्याचा पक्षी आहे हा. याला चंडोल किंवा डोंबारी असं अरसीक नाव का ठेवले असेल मराठीने?
हा थेऊरचा फोटो. येथे रमाबाई पेशव्यांची समाधी आहे. खुप पक्षी दिसतात तेथे.
हा तेथेच शेजारी एका सुकलेल्या
हा तेथेच शेजारी एका सुकलेल्या झाडावर बसला होता. बराच वेळ गात होता. मराठीत आरुणी किंवा लाल पंखाचा चंडोल म्हणतात याला.
Indian Bush Lark
हे देखील काल सासवडला काढलेले
हे देखील काल सासवडला काढलेले फोटो आहेत. हे पाहून एक जुनी आठवण आठवली. नुकतेच लग्न झाले होते माझे. घरी जायची घाई होती. एक मित्र म्हणाला की सिंहगडाच्या पायथ्याला एक चक्कर मारुन येऊ. मग निघालो. जाताना मेंढपाळ दिसले. त्याला विचारले आज कुठे मुक्काम? उद्या कुठे जाणार वगैरे. मेंढपाळ गप्पीष्ट निघाला. त्याच्याबरोबर गप्पा मारत बसलो. शेवटी मित्राला जायला सांगितले आणि मी दोन दिवस त्या मेंढपाळाबरोबरच राहीलो. काय सुंदर अनुभव होता. घरी मी सापडत नाही म्हणून पोलीसात तक्रार करायची तयारी सुरु होती. मी येताना त्या मेंढपाळाला माझा फोन नंबर दिला होता शेजारचा. महिनाभराने तो मेंढपाळ पुण्यात आला. प्रभातला बनगरवाडी लागला होता. त्याला घेवून मी बनगरवाडी पहायला गेलो. मध्यंतरात त्याच्याभोवती खुप लोक गोळा झाले होते. हातात काठी, डोक्याला मोठे मुंडासे, पैरण वगैरे. जणू काय चित्रपटातील एक पात्रच बाहेर आले आहे. ते वारले चार वर्षांपुर्वी. पण मी अजुनही त्यांच्या घरी जातो व एक दिवस राहून येतो. मेंढीचे दुध व गरम ज्वारीची भाकरी खातो पोटभर. त्यांचा मुलगा आणि सुन आता हा मेंढरांचा व लोकरीचा व्यवसाय सांभाळतात. फार गोड माणसे.
.
.
सासवडजवळ वाघापुर नावाचे गाव
सासवडजवळ वाघापुर नावाचे गाव आहे. तेथील एक तळे पांढऱ्या कमळांनी काठोकाठ भरले होते.
कमळे असलेल्या पाण्यापासुन दुर रहावे असे आजोबा म्हणायचे. त्यामुळे मी कधी अशा तळ्यात उतरायचे धाडस करत नाही. दुरुनच फुले पहायची.
हे महाशय अगदी बोटीच्या जवळ
हे महाशय अगदी बोटीच्या जवळ येऊन पाहणी करत होते ...
पावसात भिजलेली लिलीची फुले
पावसात भिजलेली लिलीची फुले
कसले एकेक सॉलिड फोटो, अप्रतिम
कसले एकेक सॉलिड फोटो, अप्रतिम सर्वच. फुलपाखरे झाड तर भारीच.
उनाडटप्पू हा लिलीचा रंग पहिल्यांदाच बघतेय, मस्त आहे.
हाय टीना, कशी आहेस.
उनाडटप्पू मस्तच फोटो.
उनाडटप्पू मस्तच फोटो.
राखी बलाक (ग्रे हेरॉन)
मनिम्याऊ खरच फुलपाखरे दिसत
मनिम्याऊ खरच फुलपाखरे दिसत आहेत. या पानांचा नक्की आकार कसा आहे?
Submitted by शाली on 2 October, 2019>>>
शालीदा, हि अशी पाने आहेत
.
पिचू पोपट, भुंडा पोपट (Indian
पिचू पोपट, भुंडा पोपट (Indian Lorikeet)
या पोपटाची मला फारशी माहित नाही. हा मला सासवडला दिसला. माझ्या घराच्या आजुबाजूला रोझ रिंग पॅराकीट दिसतात खुप पण या पिचू पोपटाला कधी पाहीले नाही. सुंदर पक्षी आहे हा. आकारही अगदी पिटूकला आहे.
अरे खरेच की. अगदी
अरे खरेच की. अगदी फुलपाखरांसारखी दिसत आहेत पाने. रंगही सुंदर आहे.
फोटोसाठी थँक्यू मनिम्याऊ.
काय समजुतदार पक्षी आहे हा>>>>
काय समजुतदार पक्षी आहे हा>>>>> किती गरीब्,गोड दिसतोय.तसाच तो भुंडा पोपट्पण गोजिरवाणा दिसतोय.
बा़ई डॉल्फिनची तपासणी,फुलपाखरांचे झाड मस्तच.
देवकी येथे फुलटोच्याचा लहान
देवकी येथे फुलटोच्याची लहान क्लिप पहायला मिळेल.
(No subject)
Shali, dhanyavad clipbaddal
Shali, dhanyavad clipbaddal.maßta ahe.lahan mulachya oradnyabarobar darek veli tyachi man mast halate.
एक से बढकर एक
एक से बढकर एक कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत इथे!
शाली, सासवड, थेऊर ह्या जागा लक्षात ठेवते.
चंडोल नाव कित्ती दिवसांनी ऐकलं. कुठे लहानपणी कधीतरी वाचलं असणार.
देवकी तो लहान मुलाचा आवाज
देवकी तो लहान मुलाचा आवाज नाही. लालबुड्या बुलबूलचा आवाज आहे. Red vented bulbul. आम्ही तिथे गेल्यामुळे नवराबायको अस्वस्थ झाले होते.
आई ग्ग!!! पिंपळपान काय गोड
आई ग्ग!!! पिंपळपान काय गोड आहे.
मनिम्याऊ खरंच फुलपाखरांसारखी
मनिम्याऊ खरंच फुलपाखरांसारखी पानं आहेत.
शालीदा, फुलटोच्या आणि चंडोल मस्तचं . मेंढपाळ, बनगरवाडी, भुंडा पोपट फोटो सगळंच भारीये. भुंडा पोपट पहिल्यांदाच पाहतोय ...Lifer
उनाडटप्पू मस्तच फोटो..
बुलबुलाच्या आवाजावर चर्चा चालली आहे त्या अनुषंगाने...... आजच्या लोकप्रभेतील लेख - पाखरांची किलबिल, रानबोली समजून घेताना..
http://epaper.lokprabha.com/2356059/Lokprabha/11-10-2019#dual/40/2
तो लहान मुलाचा आवाज नाही>>>>>
तो लहान मुलाचा आवाज नाही>>>>>> ओह! फुलटोच्या उडून जायच्या आधी जो आवाज आहे तो थेट मला लहान मुलासारखा वाटला.अजूनही वाटतोय.
चंडोल नाव कित्ती दिवसांनी ऐकलं. कुठे लहानपणी कधीतरी वाचलं असणार.>>>+१.
ऋतुराज., लिंकबद्दल धन्यवाद!त्यामुळे दुसरे लेखही चाळले.
कोकणातील तुंबाड परिसरातील
कोकणातील तुंबाड परिसरातील निसर्ग भटकंती व तुंबाडचे खोत याची जन्मकथा यावर वाचावा असा विनया जंगले यांचा हा लेख...
http://epaper.lokprabha.com/2356059/Lokprabha/11-10-2019#dual/46/2
(No subject)
(No subject)
काय सुंदर आहे हा. कोण आहे हा
काय सुंदर आहे हा. कोण आहे हा उनाडटप्पू? रंग तर मस्तच.
उनाडटप्पू हा चक्क ब्लु जे
उनाडटप्पू हा चक्क ब्लु जे सारखा आहे पण ब्लु जे नसावा.
Pages