" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
ऋतूराज मी आयपॅडवर जे
ऋतूराज मी आयपॅडवर जे बॅकग्राऊंड हवेय ती ईमेज ओपन करतो व त्यावर अॉबजेक्ट ठेऊन फोटो काढतो जरा चेंज म्हणून. खाली दोन्ही फोटो तसेच काढले आहेत.
.
पण ओरीजनलची मजा नाही.
(हे सिक्रेट तुला म्हणून सांगीतलय. कुणाला सांगू नकोस. )
सातभाई (Jungle Babbler)
सातभाई (Jungle Babbler)
खुप भांडकुदळ पक्षी असावा हा. ते भांडण करतात की प्रेम माहीत नाही पण फार जोरजोरात भांडतात. शक्यतो थव्याने राहणारा पक्षी आहे हा.
गावी जाताना लागणारी नदी.
गावी जाताना लागणारी नदी.
.
मेंढरे चरायला नेणे, नदीच्या थंड पाण्यात डुंबणे, तापलेल्या खडकावर मित्रासोबत निर्वस्त्र लोळणे, फडक्यात बांधलेली भाकरी खाणे. आहा हा! बालपणीचा काळ सुखाचा.
(आता असे सुख भोगायला नदीवर गेलो तर लोक दगड मारतील. )
धन्यवाद शाली!
धन्यवाद शाली!
सातभाई (Jungle Babbler)
खुप भांडकुदळ पक्षी असावा हा.>>> फोटोत डोळे अगदी अँग्री बर्ड सारखे दिसताहेत!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
आता असे सुख भोगायला नदीवर गेलो तर लोक दगड मारतील>>>>>
सर्व फोटो सुरेख.
सर्व फोटो सुरेख.
(हे सिक्रेट तुला म्हणून
(हे सिक्रेट तुला म्हणून सांगीतलय. कुणाला सांगू नकोस. )>>>>open secret
आम्हाला पण कळलं.
सगळे फोटो सुंदर (नेहमी प्रमाणे च)
(हे सिक्रेट तुला म्हणून
(हे सिक्रेट तुला म्हणून सांगीतलय. कुणाला सांगू नकोस. Wink )>>>>>>> थँक यू . मी कुण्णा कुण्णाला सांगणार नाही.
आजचा पहिला स्नॅप. माळमुनिया,
आजचा पहिला स्नॅप.
माळमुनिया, पांढऱ्या कंठाची मनोली, फिकी मुनिया
(Indian Silverbill)
vt220 ॲंग्री बर्डवरुन ही
vt220 ॲंग्री बर्डवरुन ही मुनिया आठवली. माझ्या धाग्यात हे फोटो दिले आहेत. येथेही देतोय.
.
.
भारीच
भारीच
ही एवढी अँग्री नाहीय पण, फक्त
ही एवढी अँग्री नाहीय पण, फक्त लालच दिसतेय...
ब्राम्हणी मैना, भांगपाडी मैना
ब्राम्हणी मैना, भांगपाडी मैना, शंकरा
(Brahminy Starling)
कवड्या खंड्या, भादुर, क्षत्रक
कवड्या खंड्या, भादुर, क्षत्रक (वाघोली, पुणे)
पाणथळीच्या जागी आढळणारा पक्षी. अनेक जाती आढळतात. नावेही अनेक आहेत. खंड्या, बंड्या, बंडू वगैरे. कोकणात भादुर या नावानेही ओळखतात. अनेक नावे असल्याने पक्षी तज्ञांनी याचे धिवर हे नाव नक्की केले आहे. मी मात्र खंड्या या नावानेच ओळखतो.
(बर्ड फोटोग्राफी नुकतीच सुरु केली असल्याने पक्ष्यांची सगळी माहिती मित्रांकडून मिळवतो. क्वचित माझी निरिक्षणेही असतात. )
(Pied Kingfisher)
.
चितबलाक म्हणजेच रंगीत करकोचा.
चित्रबलाक म्हणजेच रंगीत करकोचा. संस्कृतमधे पिंगलाक्ष किंवा काचाक्ष. (वाघोली, पुणे)
पाणथळीच्या जागी आढळणारा पक्षी. आकार साधारण गिधाडाएवढा. हा स्थलांतर करत नाही. थव्याने रहाणे पसंद करतो.
(Painted Stork)
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
मी खुप फोटो टाकून धागा कंटाळवाणा करत नाही ना?
पुन्हा माळमुनिया. हिचा फोटो
पुन्हा माळमुनिया. हिचा फोटो काढल्याशिवाय दिवस सुरु होत नाही. कारण आजकाल या मला अजिबात घाबरत नाहीत.
भन्नाट फोटो सर्व.
भन्नाट फोटो सर्व.
मी खुप फोटो टाकून धागा कंटाळवाणा करत नाही ना? >>> नाही, नाही.
फोटो मस्तच
फोटो मस्तच
कवड्या खंड्या ची एक विशिष्ट शीळ असते
मी खुप फोटो टाकून धागा कंटाळवाणा करत नाही ना? >>> अजिबात नाही
शालीदा, तुम्ही धागा कंटाळवाणा
शालीदा, तुम्ही धागा कंटाळवाणा नाही पण इंटरेस्टींग करत आहात. किती नवनवीन प्रकारचे पक्षी कळत आहेत.
चांदवा, वारकरी (Common Coot)
चांदवा, वारकरी (Common Coot)
तळ्याजवळ आढळते. पाण्याच्या कडेला किंवा पाण्यात असलेल्या झाडावर घरटे बांधते. जास्त उडत नाही. दुरवर प्रवास करायचा असेल तर रात्री उडते. विणीच्या हंगामात दोनवेळा अंडी देते. पिल्लांच्या बाबत क्रुर असते. जास्त दंगा करणाऱ्या पिल्लाला खुप जोरात चावते. (पिल्लू तरीही शांत बसले नाही तर चावे घेऊन मारुन टाकते)
आकार १७-१८ ईंच. गोल मटोल शरीर. मजबूत पाय.
चांदवाचे घरटे व अंडी उबवणारी चांदवा.
(लोणीकंद, पुणे)
व्वा शालीदा फोटो आणि अमिता
व्वा शालीदा फोटो आणि अमिता मस्तच.
प्लावा बदकाची पिल्ले. आज
प्लावा बदकाची पिल्ले. आज अचानक समोर आल्याने मिळेल तसा फोटो काढला आहे. नंतर चांगला फोटो टाकेन. दिवसभर या ९ पिल्लांची आईच्या मागे मागे झुक झुक गाडी सुरु असते.
.
खूपच गो S ड फोटो आहे
खूपच गो S ड फोटो आहे
मस्त टीपी करताहेत पोरे,
मस्त टीपी करताहेत पोरे, आईच्या मागून.
कुठे आहे हे पाणी?
माझ्या घराजवळच एक तलाव आहे.
माझ्या घराजवळच एक तलाव आहे. माणसांचा वावर नाही . तेथे खुप पक्षी दिसतात.
आज पुन्हा भिंगरी दिसली. दिसते
आज पुन्हा भिंगरी दिसली. दिसते नेहमीच पण बसलेली दिसत नाही शक्यतो.
(Wire-tailed swallow)
एका तळ्यात आहेत बदके पिले
एका तळ्यात आहेत बदके पिले सुरेख
कसली गोड आहेत ती पिल्लं खरंच!
माझ्या घराजवळच एक तलाव आहे.
माझ्या घराजवळच एक तलाव आहे.
माझ्या घराजवळच एक देवराई आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हे घर नक्की आहे तरी कुठे?
ओह तो बदकांच्या पिलांचा फोटो
ओह तो बदकांच्या पिलांचा फोटो कस्सला गोड आहे!
कॉमन वाँडरर
Common wanderer
Pages