" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
मस्त फोटो वर्षा. बॅकग्राऊंड
मस्त फोटो वर्षा. बॅकग्राऊंड भारी दिसतेय.
ऋतूराज तू गमतीत विचारलेय तरी
ऋतूराज तू गमतीत विचारलेय तरी सांगतोच. मी जेथे राहतो तो भाग अजुन मनपाच्या हद्दीत आलेला नाही. त्यामुळे येथे शेते, तळी, चराईची राने वगैरे अजून अस्पर्श आहेत. परिसरात विमानतळ, आयटी कंपनीज वगैरे असल्याने डेव्हलपमेंट खुप झाली आहे. मी ज्या तळ्याचा उल्लेख केलाय तो खरे तर ओढा आहे पण बिल्डर्समुळे तो अडवला गेलाय व त्याला आता मोठ्या तळ्याचे रुप आलेय. करकोचा, खंड्या, वेगवेगळी बदके, भिंगऱ्यांसारखे लहान पक्षी, पाणकावळे, पाणकोंबड्या, बगळे यासारखे अनेक पक्षी येथे कधीही पहायला मिळतात. एकाच झाडावर सुखेनैव नांदतात.
बगळा आणि पाणकावळा. या झाडावर संध्याकाळी करकोचे असतात खुप.
हे आहे ओढ्याचे झालेले तळे.
भिंती ग्रामपंचायतीने बांधल्या आहेत. कशासाठी ते माहित नाही.
लाजरी पाणकोंबडी, कोकारी
लाजरी पाणकोंबडी, कोकारी (White-breasted Waterhen)
ही नावाप्रमाणे खुप लाजाळू असते. थोडी चाहूल लागली तरी पळून जाते. हिला पहायचे असेल तर एका जागी किमान एक तास तरी बसायला हवे किंवा ठरावीक वेळी रोज तळ्यावर फिरायला जावे लागते. एकदा तिला सवय झाली की मग ती फारशी लाजत नाही. पाय मोठे असतात. पायाची बोटेही खुप मोठी असतात. ओढ्यांच्या, तळ्यांच्या जवळपास आढळते. मला गेले काही दिवस दिसते ती जोडी आहे. नेहमी एकत्र फिरतात. आज सकाळी फिरायला गेलो तेंव्हा तिची पाच-सहा पिल्ले दिसली. काळ्या कापसाच्या चेंडूला दोन काड्या लावाव्यात तशी दिसत होती. एकदम चळवळी होती. सारखी आई-बाबांना सोडून जात होती. दोघांपैकी एक सगळ्या पिल्लांना मोठ्या प्रयत्नांनी एकत्र ठेवत होते. नर मादीत फरक नसावा कारण दोन्ही अॅडल्ट अगदी सारखे दिसतात. दिसायला अत्यंत देखना आहे हा पक्षी. पण माय मात्र बेढब आहेत. 'कुव्वा कुवा क्रोकर कोक्क' असा काहीसा आवाज काढतात.
.
आई आणि पिल्ले
आई-बाबांच्या मागे तळ्याची पहिली सफर
पुढे बाबा (असणार) मागे आई आणि त्यामागे पिल्ले. काही मागेच खेळत बसली होती त्यामुळे कॅमेऱ्यात आली नाहीत. सर्व पिल्लांना जमीनीवर नेण्यासाठी दोघांना पंधरा विस मिनिटे लागली. कारण कुणी ना कुणी नजर चुकवून पाण्यात उतरायचे.
वर्षाताई फोटो मस्तच
वर्षाताई फोटो मस्तच
शालीदा, खूप सुंदर आहेत पाणकोंबडीची पिल्ले
करकोचा, खंड्या, वेगवेगळी बदके, भिंगऱ्यांसारखे लहान पक्षी, पाणकावळे, पाणकोंबड्या, बगळे यासारखे अनेक पक्षी येथे कधीही पहायला मिळतात. एकाच झाडावर सुखेनैव नांदतात.>>>>>>>हे सर्व असेच राहोत
आणि त्यांच्या सुखी संसाराची चित्रे तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळोत
थोरला धोबी, परिट, मामुला
थोरला धोबी, परिट, मामुला (White-browed Wagtail, Large pied Wagtail)
वावर: ओढे, तलावाचे व नदीचे काठ
खाद्य: लहान किडे, अळया, चतूर, नाकतोडे.
ओळख: नावातच आहे. Pied म्हणजेच दुरंगी किंवा बांडा रंगाचा. काळा-पांढरा. डोळ्यांच्या वर भुवईचा भास होईल असा पांढरा पट्टा (White-Browed) थंडीच्या दिवसात स्थलांतर करतो. पण मला हा पावसाळ्यातच जास्त वेळा दिसला आहे. बहुतेक हा हिवाळ्यात येथून जात असावा, येत नसावा. याचे घरटे अजुन पहाण्यात नाही. तसेच याची पिल्लेही मी अजुन पाहिली नाहीत. नेटवरच्या माहितीत हा एकटा फिरतो असा उल्लेख आहे पण मी नेहमी परिटांची जोडी पाहीली आहे.
या फोटोत त्याची पांढरी भुवई स्पष्ट दिसते आहे.
पितांबरी, हळदी (Common grass
पितांबरी, हळदी (Common grass yellow)
.
पितांबरी>>>> सुंदर नाव आहे
पितांबरी>>>> सुंदर नाव आहे
सर्व नि ग करांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
कोकणात गणपतीच्या छताला किंवा
कोकणात गणपतीच्या छताला किंवा सजावटीसाठी कौंडळ, मालकांगोनी वापरतात, याविषयी अधिक काही माहिती आहे का?
आहाहा, आहाहा सर्वच फोटो.
आहाहा, आहाहा सर्वच फोटो.
चिरक किंवा काळोखी.
चिरक किंवा काळोखी.
नर काळा तर मादी तपकीरी असते. नराच्या पंखावर पांढरा ठिपका असतो. नर आणि मादी यांच्यात फक्त आकाराचा फरक असतो असे मला वाटायचे त्यामुळे याची मादी दिसूनही मला ती ओळखता येत नसे. उलट आश्चर्य वाटे की याच्या सोबत तपकीरी पक्षी का असतो. गुगलबाबामुळे नर मादीतला फरक समजला. नरामधेही चिरक की गप्पीदास असा गोंधळ व्हायची शक्यता असते. गप्पीदास व चिरक हे दोघेही एकाच प्रजातीचे पक्षी आहेत. दयाळ हा पक्षीही यांच्याच प्रजातीचा आहे. शास्त्रीय नाव लक्षात (रहात) नाही. या पक्षांना शेपटी उडवत चालायची सवय असते. शांत उभे असले तरी शेपटी नेहमी झेंड्यासारखी उभी केलेली असते.
हा पक्षी स्वतःच्या जागेबाबत दक्ष असावा कारण आमच्या सोसायटी मी यांच्या चार पाच जोड्या पहातो. त्या त्यांच्याच जागेत आढळतात. देवराईसमोर एक जोडी रहाते. मी तेथे गाडी लावली की नर हक्काने माझ्या गाडीवर येवून बसतो. नंतर लिंबाच्या झाडाखाली बसुन मी फुलांचे वगैरे फोटो काढत असतो व हा चिरकही माझ्या आजुबाजूला शेपटी उडवत फिरत असतो, किडे टिपत असतो. गम्मत म्हणजे मी निघालो की तोही उडून जातो. जणूकाही तो माझ्या सोबतीसाठीच थांबलेला असतो.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
मादी चिरक
माझ्या गाडीवर बसलेला चिरक.
प्रचि ४
मी तेथे गाडी लावली की नर
मी तेथे गाडी लावली की नर हक्काने माझ्या गाडीवर येवून बसतो....... किती क्यूट!तो सर्व प्रतिसाद झकास आहे.किती पक्षी माहित नव्हते,ते त्यांच्या फोटोसहित दिसले.धन्यवाद शाली!
वा अभिनंदन शाली तुम्ही
वा अभिनंदन शाली तुम्ही पक्ष्यांचा विश्वास संपादन केला आहे..
शिंपी-टेलर बर्ड
शाली मस्त माहिती. आमच्या
शाली मस्त माहिती. आमच्या टेकडीवर चिरक नर-माद्या भरपूर आहेत. मला नाव माहीत नव्हते.
चायनीज ओक सिल्क-मॉथ. (Chinese
चायनीज ओक सिल्क-मॉथ. (Chinese Oak Silk-moth)
याचा आकार १० इंच असतो. (गुगल) माझ्या घरात आलेले मी मोजले. ते ८.५ इंच होते. त्याला हात लावायला भिती वाटली म्हणून तसेच राहू दिले. सकाळी पाहीले तर त्याने अंडी घालायला सुरवात केली होती. मग त्याला एका बॉक्समधे टाकले आणि देवराईतल्या झाडाखाली नेवून सोडले. पण माझ्या एक लक्षातच आले नाही की त्या झाडावर कोकीळ, बुलबूल आणि कोतवाल असतात दिवसभर. दोन कोतवालांनी त्याच्यावर हल्ला केला पण ते वाचले. पण पंख बरेच डॅमेज झाले होते. मग त्याला झुडपांमधे खुप आतमधे ठेवले. आता वाचले तर वाचले.
त्याच्या पंखावरची मलमल. पंखावरचे ठिपके पारदर्शक होते. जणूकाही काचाच मढवल्या आहेत.
या काचांना आधार द्यायला धागा लावावा तसा एक धागाही होता. पदरावरचे आरसेकाम यापुढे फिके वाटावे.
हा क्लोजप.
त्याने तासाभरात घरात बरीच अंडी घातली. बायको म्हणत होती अंडी आपोआप हॅच होणार असतील तर राहूदे. खुप मॉथ पहायला मिळतील. तिला जेंव्हा आठवण करुन दिली की अंड्यांमधून फुलपाखरे किंवा मॉथ निघत नाही अळया किंवा सुरवंट निघतात तेंव्हा तिने सगळी अंडी साफ केली.
मॉथ अंडी घालतानाचा फोटो.
चायनीज टसर मॉथची अंडी. आकार लक्षात यावा म्हणून शेजारी गहू ठेवला आहे.
वर्षा मस्तच आलाय फोटो.
वर्षा मस्तच आलाय फोटो. शिंपीने पोझही छान दिली आहे. रंगही सुरेख आहे याचा. मी अजुन शिंपी पाहीला नाही. हा चिरक, दयाळ आणि गप्पीदास यांच्याच प्रजातिचा पक्षी आहे ना?
साधनाताई मलाही ही नावे आत्ता
साधनाताई मलाही ही नावे आत्ता आत्ता माहित व्हायला लागली आहेत. नाहीतर काळी चिमणी, हिरवा पक्षी, बुटका पक्षी अशाच नावांनी ओळखायचो मी सगळ्यांना.
(नेट आणि शशांकदांच्या पक्षीतज्ञ मित्राकडून नावे समजतात.)
वर्षाताई सुंदर फोटो.
वर्षाताई सुंदर फोटो.
शालीदा, पतंगाचे फोटो सुंदर, अंड्यांचे अतिसुंदर. हे सगळं पाहून दुर्गाबाईंच्या ऋतुचक्रातील पाकोळीचे वर्णन आठवले.
पतंगाच्या माद्या अंडी घातल्याबरोबर मरतात.
जननाचा देखावा नेहमीच करूण, भयावह आणि विस्मयजनक असतो - ऋतुचक्र.
शालीदा, पतंगाचे फोटो सुंदर,
शालीदा, पतंगाचे फोटो सुंदर, अंड्यांचे अतिसुंदर. >>> +१. किती झकास फोटो आहेत.
जननाचा देखावा नेहमीच करूण, भयावह आणि विस्मयजनक असतो - ऋतुचक्र. >>> किती खरं आहे.ऋतुराज, धन्यवाद!
शप्पथ काय फोटो आहेत शाली
शप्पथ काय फोटो आहेत शाली चायनीज मॉथचे! ती मखमल अगदी जाणवते आहे. ८.५ म्हणजे खरच भिती वाटेल हात लावायची आणि ते पारदर्शक गोल! कमाल आहे निसर्गाची. एक छान रेकॉर्ड झाले तुमचे.
>>हा चिरक, दयाळ आणि गप्पीदास यांच्याच प्रजातिचा पक्षी आहे ना?
हे मला माहिती नाही खरोखर. शिंपी जाम चंचल असतो पण. मला मुश्किलीने एखाददोन फोटो मिळालेत आजपर्यंत
सुप्रभात
सुप्रभात
आजच्या लोकप्रभात आलेला विनया जंगले यांचा "रघुवीर घाटाच्या जंगलात" हा सुंदर लेख
http://epaper.lokprabha.com/2314938/Lokprabha/13-09-2019#dual/46/1
ऋतूराज लेख न दिसता लेखावरचा
ऋतूराज लेख न दिसता लेखावरचा प्रतिसाद दिसतोय फक्त. मुळ लेखाची लिंक हवी आहे.
सज्जनगडावरची एक दुपार. (पोटभर
सज्जनगडावरची एक दुपार. (पोटभर गव्हाची खिर [लापशी] खाल्यानंतर जरा जास्तच सुंदर वाटत होती दुपारची कलती उन्हे.
वेडा राघू (Green Bee Eater)
वेडा राघू (Green Bee Eater)
काहीजण याला बहीरा पोपट या नावानेही ओळखतात. मी चतूरचा फोटो काढत असताना याने झडप घालून त्याला पकडले. मला वाटले होते हा फक्त मधमाशीच्या आकाराचेच किडे पकडतो. तारेवर बसून याने काळजीपुर्वक चतूरचे तुकडे केले. पक्षी प्राणी निरीक्षण करताना तटस्थ राहून फोटो काढता आले तर ठिक नाहीतर त्रास होतो.
आता वेडा राघूला ‘गोडूला पक्षी’ म्हणनार नाही ब्वॉ.
(No subject)
बगळा (Pond Heron)
पतंग (Moth)
पतंग (Moth)
एक शेर आठवला या पतंगावरुन.
आग को खेल पतंगो ने बना रखा है
सब को अंजाम का डर हो ये जरुरी तो नही।
ऋतूराज लेख न दिसता लेखावरचा
ऋतूराज लेख न दिसता लेखावरचा प्रतिसाद दिसतोय फक्त. मुळ लेखाची लिंक हवी आहे.>>>>>>>> मूळ लेखाचीच लिंक आहे, मला तर लेख दिसतोय पूर्ण. काहीतरी गंडलंय का?
वेडा राघू (Green Bee Eater)>>>>>>>>> फोटो सार्थक करणारा, मस्तच
आग को खेल पतंगो ने बना रखा है
सब को अंजाम का डर हो ये जरुरी तो नही।>>>>>>>>>>>>>>क्या बात है
पतंगाच्या स्पृशा कंगव्यासारख्या असतात.
नकल्या खाटीकचे पिल्लू.
नकल्या खाटीकचे पिल्लू. (Juvenile long tailed shrike)
हे सारखे आईकडे खायला मागत होते. नाही दिले की दंगा करत होते. आकाराने आईपेक्षा जरा मोठे वाटत होते.
“अजून दे” असेच काही म्हणत असावे.
याला खाटीक का म्हणतात ते ऋतूराजने सांगीतले होते. आज मी त्याला भक्ष्य काट्याला टोचून ठेवताना व लचके तोडून खाताना पाहिले. येथे व्हिडिओ देता येत नाही त्यामुळे फोटो देतो आहे.
.
नकल्या खाटीक (पिल्लू)
नकल्या खाटीक (पिल्लू)
Juvenile long tailed shrike
नकल्या खाटीक
(Adult)
फारच गोडुले पक्षी.....
फारच गोडुले पक्षी.....
पाकोळी (राईस स्विफ्ट)
पाकोळी (राईस स्विफ्ट)
‘आपण निसर्गाकडून महत्वाची डिझाईन कशी उचलली आहेत’ हे सांगताना मित्राने एकदा राईस स्विफ्टवरुन फायटर विमानांचे डिझाईन घेतले असल्याचे सांगीतले होत. स्विफ्ट नावावरुन ते खरे असावे असे वाटले होते पण प्रत्यक्षात ही स्विफ्ट कधी पाहिली नव्हती. काल अचानक ही एका पानावर बसलेली दिसली. अगदी फायटर विमानासारखेच पंख आणि डिझाईन होते तिचे. कुणाला या पाकोळी विषयी जास्त माहिती असेल तर सांगा.
Pages