Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सिरियल बंद झालेली नाही, अजुन
सिरियल बंद झालेली नाही, अजुन चालु आहे , पुढचे भाग व्यवस्थित आहे बहुदा सगळ्यांचे पेमेंट झाल्याने सग्ले जण मन लावून काम करताहेत , मंगल ची मुलगी म्हणून एक नविन एंट्री झालीय पण चेहरा झाकलेला दाखवत आहेत..सस्पेंस ... पण कालच्या ईपोसोड मध्ये त्या इंस्पेक्टर ला उगाचच मारले>>>>>>>>>>>>>> ओ कुठे बघतात तुम्ही हे?
संपलेय ही शिरेल , झी च्या अँप
संपलेय ही शिरेल , झी च्या अँप मध्ये पण 14ला शेवटचा भाग दिसतोय
नाय हो...आज चंद्रग्रहण आहे
नाय हो...आज चंद्रग्रहण आहे त्यामुळे आज शेवटचा भाग आहे...
चंद्री आज चंद्राबरोबर जाणार आणि त्यामुळे चंद्राला ग्रहण लागले असा शेवट करणार आहेत असे आतल्या गोटातून कळले.
कालचा भाग जरा इंटरेस्टिंग
कालचा भाग जरा इंटरेस्टिंग वाटला. इन्स्पेक्टरचा तोतया हा तोतया नसून तो त्या जगातला प्राणी आहे. तो डॉक्टरला ओळखत नाही. आता रमा ज्या घरी गेली आहे ते पण पूर्वीच्याच ट्रॅपमधे अडकले आहेत. रमा डॉक्टर सिद्धार्थला ओळखायला तयार नाही. त्या शहरात तेच एक हॉस्पिटल असल्याने पुन्हा तिला तिथेच आणले गेले आहे. सध्याचे यजमान गोखले जरा तिरसट आहेत. पण असेच गोखले तिच्या आठवणीत आहेत. गोखलेंना रमा अजिबात आठवत नाही. वसुधाही आठवत नाही आणि चंदीही. पण त्यांना शारंगपाणी आठवतात. अर्थात ते इतिहास संशोधक होते. चंदीचे वडील प्रोफेसर. हा सगळा घोळ आहे.
पुढचा भाग जास्त इंटरेस्टींग
पुढचा भाग जास्त इंटरेस्टींग असणार असे वाटते...
त्या सिद्धार्थच्या होणार्या बायकोला आता निरूबाबा दिसत आहेत असे दाखवले आहे. जो गच्चीवर पडून गेला तो निरूबाबा नसून मंगलच्या आत्म्याची ती खेळी होती असे बहूतेक दाखवणार आहेत. निरूबाबाचाच हा प्लान असावा. तो अंडरकव्हर गुप्तहेर असून दुसर्या जगातील प्राण्यांवर नजर ठेवायचे काम करतो. त्याला वठणीवर आणण्यासाठी रमाची नियूक्ती केली होती पण तिला चकवा देण्यासाठी निरूबाबाने मंगलच्या आत्म्याबरोबर मिळून स्वतःच्या मरणाचा प्लान केला असावा.
(No subject)
ग्रहण सोडवायचा प्रयत्न करताय की परत लावताय. तसही झी ला सोडवता आलं नसेल.
चंद्री आज चंद्राबरोबर जाणार
चंद्री आज चंद्राबरोबर जाणार आणि त्यामुळे चंद्राला ग्रहण लागले असा शेवट करणार आहेत असे आतल्या गोटातून कळले.
झी मराठी ने माबोकरान्ना त्यान्च्या मालिकान्च्या स्टोर्या लिहिण्यासाठी योग्य मोबदला देऊन नियुक्त कराव. एकेक भन्नाट सिरियल्स बघायला मिळतील मग झीमवर.
आता मला गरगरतंय...
आता मला भिरभिरतंय...
ऑ??? काय चाल्लंय काय??
ऑ??? काय चाल्लंय काय??

शिरेल नक्की चालूये का संपली??
अर्ध्यांना दिसती नि अर्ध्यांना दिसत नाय... माबोवरचे लोकं पण वेगवेगळ्या समांतर जगातून माबोवर पोस्ट करत असतात की काय???
एका जगात संपली नि दुसऱ्या जगात अजून चालूय.
आता मी रात्री 10:30 ला टीव्ही चालू करुन बघणार मी कोणत्या जगात आहे ते.

टाटा स्काय वर साडेधा ला
टाटा स्काय वर साडेधा ला नाममात्र नावाचं कायतरी दिसतंय
>>टाटा स्काय वर साडेधा ला
>>टाटा स्काय वर साडेधा ला नाममात्र नावाचं कायतरी दिसतंय<< आँ.... कस्संकेब्रे....?? तुम्ही कोण्त्या बाजुला रहता..??? ईस्ट का वेश्ट...??? आम्च्या तर टाटा स्काय वर रोज रात्री १०.३० ला 'ग्रहण'च दिसतंय.. आता ती रमा दुसर्या निरंजन सोबत लपाछपि खेळातेय.. सुदैवाने हा दुसरा निरंजन बिना आईचा आणि बिना बायकोचा असल्याने घरुन काहीही विरोध होत नाही आपल्या रमेला.. आता लवकरच ती दोघं लग्न करणार आहेत असं दाखवलं कालच्या भागात...
आम्च्या तर टाटा स्काय वर रोज
आम्च्या तर टाटा स्काय वर रोज रात्री १०.३० ला 'ग्रहण'च दिसतंय. >>>> कस शक्य आहे हे?
१०.३० ला तर बाजी लागते ना?
बादवे, हा दुसरा निरंजन कोण?
(No subject)
>>आम्च्या तर टाटा स्काय वर
>>आम्च्या तर टाटा स्काय वर रोज रात्री १०.३० ला 'ग्रहण'च दिसतंय. >>>> कस शक्य आहे हे? Uhoh १०.३० ला तर बाजी लागते ना?<< बाजी या जगातल्या टाटा स्काय वर लागते.. मात्र त्या जगातल्या टाटा स्काय वर 'ग्रहण' अजुनही १०.३० लाच लागते..
>>बादवे, हा दुसरा निरंजन कोण?<< तो नाहि का तो सिधार्थ च्या घरुन पळुन गेल्यानन्तर रमेने ज्याच्या दारावर थाप मारलि.. तोच..! तुम्च्या जगात तिथेच सिरीयल संपली असे दाखवले ना...??
बोला.... येताय का आम्च्या जगात...??
Btw बाजी बघतं का कोणी??? मला
Btw बाजी बघतं का कोणी??? मला तर प्रोमो नि कॅरेक्टर बघूनच कधी बघाविशी वाटत नाही.
DJ ज्याच्या घरावर थाप मारली
DJ ज्याच्या घरावर थाप मारली शेवटी तो गेला स्टार प्रवाहच्या ललित 205 मध्ये, मी प्रोमोत बघितलं त्याला. काय chara आहे नाही माहिती. नायकाचा भाऊ असावा.
ह्म्म.... मि पण नाहि पहात ति
ह्म्म.... मि पण नाहि पहात ति 'बाजी'.. प्रोमोच एवढा वाइट्ट आहे की धाडसच होत नाहि बघण्याचे... बकवास 'बाजी' पाहुन 'ग्रहण' ची चव बिघडु नये असच वाटतं मला..
Btw बाजी बघतं का कोणी??? मला
Btw बाजी बघतं का कोणी??? मला तर प्रोमो नि कॅरेक्टर बघूनच कधी बघाविशी वाटत नाही.>>>+१११११११११११
लायब्ररीत ग्रहण कादंबरी दिसली
लायब्ररीत ग्रहण कादंबरी दिसली म्हणुन आणलीय वाचायला.
मालिका चालू असताना पुस्तकाबद्दल या धाग्यावर लिहिलं गेलं होतं, पण मी ते प्रतिसाद स्पॉयलर नकोत म्हणून वाचले नव्हते.
बाबांनी झपाटल्यासारखी झोपतहानभूकपाठदुखीडोळेदुखी विसरून वाचून संपवली पण. (त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची संख्या हातांच्या बोटांवर मोजता येईल). मी २४ पैकी आठव्या प्रकरणात आहे. मालिकेशी ताडून पाहता यावं म्हणूनच केवळ हे पुस्तक मी वाचतोय. अन्यथा हा genre माझ्या आवडीचा नाही.
मालिका कादंबरीच्या मानाने अगदीच संथ होती. कादंबरीतली बहुतेक पात्र गोड गोड आणि स्नेहा पोतदारच्या गळ्यात पडणारी आहेत. मालिकेत उलट होतं. शिवाय सारंगचा निरंजन झालाय आणि त्याची आणि त्याच्या मावसभावाची स्टोरी, फॅमिली आणि वयंही बदललीत.
धारपांनी पहिल्या प्रकरणात स्नेहाच्या मुलांची नावं ठेवली नव्हती. ती पुढे तिला हिप्नोटाइझ केल्यावर ठेवलीत.
जाउद्या.. काय करायचं आता
जाउद्या.. काय करायचं आता शिळ्या कढीला ऊत आणुन.
सिरियल छान होती.. अगदी काहीही अतिरंजीत दाखवलं तरी मी आणि माझ्या मुलाने ते हसण्यावारी नेउन प्रसंगी घरच्यांची बोलणी खाउन रोज न चुकता पाहिली.
भरत कादंबरी सुंदर आहे, नक्की
भरत कादंबरी सुंदर आहे, नक्की पुर्ण वाचा. सिरियल पेक्षा कितीतरी पटिने सरस आणि इंटरेस्टिंग आहे.
आताच ग्रहण कादंबरी वाचून
आताच ग्रहण कादंबरी वाचून संपवली.... खरं आहे..सिरीयल पेक्षा कितीतरी सरस आणि इंटरेस्टिंग आहे..वसुधेच्या भूमिकेत प जो कुठल्याच अँगल ने फिट बसत नाही...तिशीची आसपास वगैरे असेल मुख्य पात्रं... बाकी कुठल्याच पात्राच्या भूमिकेत मालिकेतली पात्र बसत नाहीत... मंगल चा फक्त ओघवता उल्लेख आहे कादंबरीत.. आणि इथे मालिकेत भूत बित वगैरे दाखवून पाणी वाढवणं चालू होतं.. भुताचा तर दूर दूर संबंध नाहीये आणि मालिकेचं टायटल सॉंग पण विचित्र दाखवलंय.. अरविंद पोतदार चा पण पुस्तकात दोन वेळा उल्लेख आहे...त्याच्या फॅमिलीचे वगैरे फार डिटेल पण नाहीत इतके.. मालिका वल्यानी कसला भयंकर घोळ घालून काय ती भेळ बनवली होती अस आता इथे मालिकेचा धागा वाचल्यावर कळतंय...त्या पेक्षा आहे तशी दाखवली असती तर जास्त भावली असती...आणि खून,मृत्यू वगैरे पण नाही आहेत पुस्तकात(मी मालिका पहिली नाही,1 किंवा 2 भाग ओघवते पाहिले आणि इथे धागे वाचलेत थोडे थोडे)... पार विचका केलाय ह्या झी वाल्यांनी... असो पण त्या निमित्ताने 1 चांगलं पुस्तक वाचायला मिळालं.. हेही नसे थोडके!!!
अवान्तर - कुणी मला सान्गाल का
अवान्तर - कुणी मला सान्गाल का, 'अवन्तिका' मालिका ज्या कथेवरुन (स्नेहलता दसनूरकर यान्ची मूळ कथा ) बेतलेली होती, ती कथा असलेल्या कथासन्ग्रहाच नाव काय? वाचायची आहे. मूळ कथा मालिकेपेक्षा वेगळी आहे असे ऐकले होते.
"अवंतिका" ही स्नेहलता
"अवंतिका" ही स्नेहलता दसनूरकरांची 15 पानी गोष्ट होती.
अवंतिका" ही स्नेहलता
अवंतिका" ही स्नेहलता दसनूरकरांची 15 पानी गोष्ट होती. >>>>>> पुर्ण पुस्तकच होत का ते?
(No subject)
http://friendslibrary.in
http://friendslibrary.in/books/detailedinfo/16994/Avantika%20(अवंतिका%20)
ह्याच नावाचा कथासंग्रह आहे.
ह्याच नावाचा कथासंग्रह आहे.
धन्स, भगवती.
धन्स, भगवती.
ग्रहण कादंबरी वाचून संपवली.
ग्रहण कादंबरी वाचून संपवली.
समांतर विश्व , त्यात बदलेल्या घटना, एका विश्वातल्या वसुधाला सगळे ओळखतात पण ती कोणालाच ओळखत नाही ; तर दुसर्या विश्वातली स्नेहा अनेकांना ओळखते पण तिला ओळखणारं कोणीच नाही. तिचं अस्तित्वच तिथे नाही. (म्हणजे ती आणखी तिसर्याच विश्वातून आलीय की काय? ) ही मध्यवर्ती कल्पना कळली.
मलपृष्ठावर हृषिकेश गुप्तेंनी धारपांच्या साहित्याचं आणि भाषेचं जे वर्णन केलं त्यातलं काहीही जाणवलं नाही. एकच पुस्तक वाचून काही निष्कर्ष काढणं योग्य नाही, याची कल्पना आहे.
अनेक संवाद वाचकांना स्पष्टीकरण मिळावं या हेतूने आणले आहेत, हे सहज कळतं. लक्ष्मण लोंढेंच्या कथेत सुरुवातीला अगदी एक दोन वाक्य किंवा कवितेच्या ओळी असत, किंवा एक चीनी म्हण आहे असं म्हणून ते कथेची मध्यवर्ती कल्पना मांडत. इथे जरा स्पून फीडिंग, खरं तर स्ट्रॉ फीडिंग वाटलं.
पोलीस नावाची संस्था /यंत्रणा अस्तित्वातच नाही,(हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी उचलायची पावलं डॉक्टरच घेतोय) असं म्हणावं तर स्नेहाचा भाऊ पोलिसात आहे आणि स्नेहाबद्दलचा रिपोर्ट त्याच्यापर्यंत बर्यापैकी लवकर पोचलाय. वसुधा आत्महत्येचा प्रयत्न करते, त्याची पोलीस केस होत नाही. गर्भपात करावा लागतो, तेव्हा कोणीतरी फसवल्याचीही नाही.
वसुधाचा भूतकाळ काय, तिला नातलग आहेत की नाही, याचं कोणालाच काही पडलेलं नाही.
एका विश्वातून दुसरीकडे जाताना तिचे कपडे बदलले आणि मंगळसूत्रही आलं.
स्नेहाच्या आयुष्यातले तिघे जण नवरा, मुलगा ,मुलगी हे तीन वेगवेगळ्या विश्वांत असावेत. उंची साडी नेसणारी बाई मुलांना बेबी आणि मुन्ना म्हणेल हेही ऑड वाटलं. मुलांची नावं खूप उशिरा, तीही एकदाच आलीत.
बँकेत नोकरी लागलेल्यांना प्रशिक्षण बाहेरच्या संस्था त्याही परस्पर देतात आणि अमुक व्यक्ती ट्रेन झाली की नाही, हे तोंडी परीक्षा घेऊन ठरवतात, हे वाचून हे कोणत्या काळातलं कथानक असा प्रश्न पडला. कथानकात बँकांत कॉम्प्युटरचा वापर वाढलाय आणि ते शिकवणारे क्लासेसही निघालेत .
पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या निघाल्यात पण प्रकाशक/लेखकांपैकी कोणाला हे पुढचं तपासावंसं वाटलेलं नाही.
प्रकरण ६. सारंगची आई स्नेहाला शेखरच्या हॉस्पिटलमधून घरी न्यायला येते, तिथे शेखर सारंगशी बोलताना दाखवलाय. पण सारंगच्या घरी संध्याकाळी तो ऑफिसातून परत येताच स्नेहाला केव्हा आलात असं विचारतो. (गूढकथा आहे, तेव्हा नीट लक्ष देऊन वाचावं म्हटल्यावर हे दिसलं पटकन).
वसुधाचा फोटो पाहून सुरेखा खरे प्रथम डॉक्टर शेखरना त्यांच्या नर्सिंग होममध्ये भेटते, ते तिच्या घरी येऊन जातात, तरीही वसुधा जेव्हा तिच्या घरी राहायला येते तेव्हा डॉक्टर कोण असा प्रश्न तिला पडलाय.
वसुधा नेवरेकर प्रकरणाबद्दल आणि ताज्या प्रसंगाबद्दल सारंगला एकट्याला सांगते. तुमच्या आईसमोर कसं सांगणार म्हणते. तरीही पुढे सारंग तो प्रकार आईला माहीत झाला म्हणतो.
र्अरविंदचं प्रकट होणं तिच्यापासून प्रोअॅक्टिव्हली दूर जाणं हे कथानक संपवण्यासाठी मुद्दाम केल्यासारखं वाटतं. स्वतःचा भूतकाळ, नातेसंबंध, ओळख हरवलेली बाई दहा दिवसांत दुसर्या माणसाशी लग्न करते हा गोड शेवट अपरिहार्य वाटला नाही. भावाचं लग्न जुळवण्याचा प्रकार म्हणजे पाकात घातलेल्या जिलबीवर पिठीसाखर आणि मध.
femme fatale = फेमी फाटाले deja vu - देया व्ह्यु
ब्लर्बमध्ये कमीत कमी संवाद म्हटलंय, पण इथे एकीकडे घडलेला प्रसंग दुसर्याला पुन्हा सविस्तर वर्णन करत सांगणारे संवाद आहेत, हे सहज टाळता आले असते.
कादंबरीवरून मालिकेकडे जाताना त्याला भूत, अमानवी शक्तींचा अँगल दिला होता, तो शेवटपर्यंत टिकवायला हवा होता. शेवटी अनंत भावेंनी रंगवलेल्या व्यक्तीकरवी दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे फसलेली सारवासारव आणि असं काही नसतं, असं सांगायचा प्रयत्न वाटला.
Pages