ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मधुरांबे मी वाचतेय. फक्त माझा थोडा गोंधळ होतोय पुन्हा नीट वाचेन
तुम्ही प्लिज लि हित रहा, इथे नसेल तर माझ्या विपुत. प्लिज.

दक्षे, विपु का ग?

आमी पन वाचतुयं न्हवं, मदी मदी बडाडा करू लिवणार्‍याची लिन्क का तोडा म्हुन गपलोय.

मधुरांबे, रमाकांत नाही अरविंद ना?
का ह्या रमाचा (सिरीयलीतल्या) नवरा म्हणून रमाकांत Lol
माझी आताशी ३० पानं वाचुन झालीयेत पुस्तकातली.

पुस्तकात पान दोन पाने स्पष्टीकरणे आहेत. ती गाळून फक्त कथाबीज दिल्याने गोंधळ होऊ शकतो.

अहो म्हणजे इथे कुणी विनंती केलीये का कथा वाचुन रोज इथे लिहा म्हणुन? तसे असेल तर ठीके नैतर एकदम शेवटी थोडक्यात लिहा असं मला म्हणायचंय.

अहो पानाच्या. Lol
मोबाईल वरून मराठी जमत नाही म्हणून..

एक नंबर आहे की हे स्टोरी... आय मीन पुस्तकातील, झी ने आपल्या सवयीप्रमाणे बेक्क्कार पाणी ओतलय शिरेलीत. Sad

ए मुलामुलींनो मी वाचतेय ग्रहणची वर्जीनल कथा. तुकड्या तुकड्यात पण चालेल मधुरांबेंना त्रास होणार नसेल तर.

म्हात्रे ब्रीज जवळ मॅजेस्टिक बुक गॅलरी आहे. त् त्यांच्याकडे आहे ग्रहण. 20 दिवसात पुस्तक परत केले तर 70%रक्कम परत अशी स्कीम आहे

स्नेहा दुस-या कि तिस-या वेळी जेव्हां सारंगच्या घरी आली होती तेव्हां दोघे गच्चीवर गेले होते. तेव्हां तिला वरून तिचा वाडा तिथे दिसला होता. ती उडी मारण्याच्या बेतात असताना सारंगने तिला मागून खेचली होती आणि भानावर आणले. मग ते दोघे खाली गेले तेव्हां वाडा नव्हता पण दोन झाडं होती. ती तिच्या ओळखीची होती.

सारंगने त्याचे अनेक अर्थ लावले. पण शेवटी त्याने दोन समांतर जगाची थिअरी मांडली होती. काही कारणने ते छेदत होते तेव्हां वाडा तिला दिसला. तो म्हणाला की तू त्यांना अधांतरी दिसली असतीस आणि जर तू तशीच गेली असतीस तर त्यांच्यासमोर पडून मृत्यू झाला असता. तर मग उपयोग काय ?
आणि जर ही शक्यता नसेल तर हा भ्रम असावा आणि ही दोन झाडे तू पाहिलीस तेव्हां तुझे विचार वेगाने पुढे जात असल्याने झाडांची प्रतिमा छापली केव्हां गेली हे तुझ्या लक्षात आले नाही. तुला ती ओळखीची वाटली असावीत.

या प्रसंगामुळे सारंगला अशी धास्ती वाटत होती की एखादे दिवस तो आणि स्नेहा कुठेतरी हिरवळीत गप्पा मारत बसले असतील. काही कारणाने सारंग मागे वळून पाहतो आणि पुन्हा पाहतो तो स्नेहा गायब. हे स्वप्न त्याला अनेकदा पडत होतं.

स्नेहाने आता वसुधा गोखले नावाने रहायला सुरूवात केली होती. तिच्या खोलीत वसुधा चा फोटो सापडला. हुबेहुब तिचाच होता. म्हणजे या जगात ती वसुधा होती. पण वसुधाला जे ओळखतात त्यांना स्नेहा ओळखत नव्हती पण ते तिला ओळखत होती आणि स्नेहा ज्यांना ओळखते त्यांना ते ओळखत नव्हती. ता सगळ्या मधे सदाशिव शारंगपाणी हाच एकमेव दुवा होता जो स्नेहाच्या कहाणीला वास्तव परिमाण देत होता. ते ही त्याला हे सर्व प्रसंग स्वप्नात पाहिल्यासारखे वाटत असल्याने.

शारदाचे स्नेहाने केलेले वर्णन अगदी अचूक होते. मात्र त्या दोघांचे वास्तवात लग्न झालेले नव्हते.
अरविंदला सुखात पाहून स्नेहाचं मन हलकं झालं. आता ती निर्णय घ्यायला मोकळी होती.
लग्नाची तारीख ठरली होती.
एक दिवस सारंग तिला घ्यायला आला होता. मोटरसायकलवरून ते त्याच्या घरी आले.
अचानक स्नेहाच्या मनात विचार चमकला.

या जगाचे पडसाद तिथे उमटत नसतील ना ?
ती सारंगला म्हणाली "मोटरसायकल झाडांच्या बाजूला घे "
त्याने फाटकातून ती तिकडे वळवली.

त्याची वाट न पाहता ती उतरली. तिला कसल्या तरी जाणिवा होत होत्या. झाडांच्या दिशेने ती गेली तेव्हां....
तिचा अंदाज खरा ठरला होता.
तिचा वाडा तिथे होता.

बाल्कनीत अरविंद उभा होता. त्याच्या बाजूला मुन्ना आणि बेबी होते.
आणि
ती स्वतः तिथे होती. कुटुंब पूर्ण होते. चौकोनी होते. सुखात होते.
तिने पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले. कारण अरविंद बरोबर उभी असलेली ती आता या जगातल्या तिला पाहत होती.
तिने हलकेच हात हलवला. सगळे ठीक आहे अशा अर्थाने इशारा केला आणि निरोप घेतला.

तिने जड अंतःकरणाने पाऊल मागे घेतले.
मागे सारंग उभा होता.
त्याने सगळे पाहिले होते. तो म्हणाला माझा तुझ्यावर कधीच अविश्वास नव्हता.
आणि त्यांनी या जगातल्या एकत्र प्रवासाला सुरूवात केली.
आता ती पुन्हा कधीही त्या जगात जाणार नव्हती. तिकडे सगळे ठीक होते

समाप्त

खरे तर शेवट पटला नाही.
तिच्या जागी जी कुणी होती ती कदाचित वसुधा गोखले असू शकेल किंवा आणखी अन्य जगातून आलेली "ती" असेल. ही थिअरी मान्य केली तरी स्त्री तिच्या मुलांना कशी विसरू शकेल ? नवरा एकवेळ जाऊ द्या. पण मुलांना सोडून सारंग बरोबर ती खूष होईल का ? ते ही अगदी समोर तिचं जग असताना ? शेवटी ती तडजोड होती.

जर अरविंद बरोबर वसुधा असेल तर तिला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. कारण इकडे तिला नेवरेकरची भीती होती. ती असुरक्षित होती. तिला अचानक आधार मिळाला. कदाचित ती मुलांना आपलेसे करेलही. पण आई नाही होऊ शकणार.

पण मालिकेत निरंजनला मारून टाकलंय ना. मग मालिकेचा शेवट कसा होणार. प्रियांका आणि तिची मैत्रिण पुस्तकात नाही आहेत का. सगळी झीची भेसळ आहे.

हो जाई मला तसे वाटले, पाहिल्यावर कळेल. पण आजच्या भागात ती प्रियंका खूप रडतंना दाखवलीय, ते पण रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसुन. काल दाखवले की तिला २ मुले सांगतात की लोकल ट्रेन थांबलीय कारण एक माणुस रेल्वेतुन खाली पडला. जेव्हा डॉ सिद्धार्थ ट्रेनच्या दारात उभा असतो, तेव्हा रमा बै गुढ विचीत्र हसतात.

काल बर्‍याच दिवसांनी लावले तर हे पहायला मिळाले.

ती मुलं किती स्टीरीओटाईप बोलताना दाखवलि होती. हसायलाच आलं Proud

सिद्धू टपकला तर मग रमाबै कोणाच्या मागे लागणार आता? काय करणार?

<<मधुरांबे मी ७५% देते, मला पाठवून द्या, वाचून २० दिवसात.>> @ जाईजुई. >> मी ५० % देते तुमचं वाचून झाले की मला पाठवा. Wink

पण वसुधाला जे ओळखतात त्यांना स्नेहा ओळखत नव्हती पण ते तिला ओळखत होती आणि स्नेहा ज्यांना ओळखते त्यांना ते ओळखत नव्हती. >>> अच्छा,अस्स आहे होय! तरीच म्हटल, स्नेहाची आई आणि भाऊ स्नेहाला का ओळखत नाही.

आय थिंक ही इज नॉट गचक्ड.>>>> Rofl

Pages