Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
म्हणजे? असं काही लिहुन येत
म्हणजे? असं काही लिहुन येत नाही का सिरीयल सुरु होताना?
पण निरंजन , जो खोल उडी चँपियन
पण निरंजन , जो खोल उडी चँपियन आहे त्याच्या आग्रहाला घाबरून पळाले. निरंजनला गोल्ड मेडल मिळाले म्हणून त्याने आपल्या आईला पण उडी मारायला लावली. आता मालिका संपल्यावर क्लासेस काढेल बहुतेक. >>>>
शेवट लिहीला आहे. पाठीमागे पहा. >>>> मधुर, तुम्ही शेवट लिहलाय सिरियलचा? कधी? हे मी मिसल की काय?
सिरीयलचा नाही. पुस्तकाचा
सिरीयलचा नाही. पुस्तकाचा लिहीला आहे.
शेवटी श्वेतांबरा केली
शेवटी श्वेतांबरा केली मालिकेची.
अजून कालचा भाग पाहिला नाहीए. पण परवाचा भाग पाहून..
शेवटी श्वेतांबरा केलीच मालिकेची.
शेवटी श्वेतांबराच केली मालिकेची.
सगळं काही संपतने केलंय , रमाने काहीच केलं नाही, मंगल बिंगल दंगल करत नाही, असं सांगून मालिका संपवताहेत.
पण हे सगळं कसं केलं ते सांगत नाहीत.
:रागः
या मालिकेसाठी परत झी मराठी सबस्क्राइब केलं होतं. शेवटचा भाग पाहून पुन्हा अनसब्स्क्राइब करणार.
झी कडून (एकंदरितच मराठी/भारतीय वाहिन्यां) कडून चांगल्या मालिकेची अपेक्षा ठेवणंच फोल आहे, हा साक्षात्कार पुन्हा झाला.
मायबोलीवर अशा पकाऊ मालिकांच्या मार्केटिंगसाठी धागे काढणार्यांचा निषेध.
शेवटी श्वेतांबरा केलीच
शेवटी श्वेतांबरा केलीच मालिकेची. >>>> श्वेतांबरा छान मालिका होती. लहानपणी पाहिलेली आठवते. डबलरोल होता नायिकेचा. शेवट काय झाला ते नीटस आठवत नाहीये.
सिरीयलचा नाही. पुस्तकाचा
सिरीयलचा नाही. पुस्तकाचा लिहीला आहे. >>> ओह, मला वाटल सिरियलचा.
श्वेतांबरात शेवटी जुळ्या
श्वेतांबरात शेवटी जुळ्या बहिणी असतात, असा रहस्यस्फोट केलेला. त्यामुळे फुगव फुगव फुगवलेल्या रहस्याला टाचणी लागली की.
एका लेखात "शी! शी! डोक्याची श्वेतांबरा झालीय नुसती!" असं वाचल्याचं आठवतं.
शनिवारचा भाग काल पाहिला. थोडं थोडं स्पष्टीकरण दिलंय, पण ते लंगडं आणि पांगळं आहे.
संपत म्हणे मेट्रनच्या मदतीने हॉस्पिटलमधली नवजात मुलं पळवतो. पण तो एकच मूल पळवून थांबला? कारण त्याआधी आणि नंतरही त्या हॉस्पिटलमधून मूल गायब झालं नाही. शिवाय तो तेवढ्यापुरता सीसीटीव्ही बिघडवेल इतक्या वकुबाचा वाटत नाही.
अमात्यांनी "रमाने काहीही केलेलं नाही" असं सर्टिफिकेट दिलंय, ते डोळे मिटून घ्यायचं.
वर त्यांचा भुतांवरही विश्वास नाही. म्हणजे मंगलही काही करू शकत नाही. मग इतक्या लोकांना त्या त्या वेळी भासच होत होते. त्या मोनूने स्वतःच स्वतः:ला कपाटात बंद करून घेतलं. (की तिथेही संपत होता?)
आता आज आणखी एक नवं पात्र येणार आहे आणि ते सोडावॉटर स्क्वेअर इतकं हायपर दाखवलंय. रमाचं आणखी एकदा बारसं होणार आहे.
श्वेतांबरात शेवटी जुळ्या
श्वेतांबरात शेवटी जुळ्या बहिणी असतात, असा रहस्यस्फोट केलेला. त्यामुळे फुगव फुगव फुगवलेल्या रहस्याला टाचणी लागली की. >>> पण श्वेतांबरा ग्रहणपेक्षा कितीतरी पटीने बेस्ट होती.
मग इतक्या लोकांना त्या त्या वेळी भासच होत होते. >>>> प्रेक्षकान्ना सुद्दा भास होत असतील.
आता आज आणखी एक नवं पात्र येणार आहे आणि ते सोडावॉटर स्क्वेअर इतकं हायपर दाखवलंय. >>> शनिवारी शेवटचा भाग होता ना?
रमाचं आणखी एकदा बारसं होणार आहे. >>>>
इथे नविन पोस्त्स आलेली पाहून
इथे नविन पोस्त्स आलेली पाहून मागच्या आठवड्यातले २-३ भाग पाहिले. काहीच्या काही एक्सप्लेनेशन्स आहेत! त्या मोनू आणि ती दुसरी मुलगी यांच्या बाबतीत भुताटकी की जादू टोणा दाखवलेला होता की. मोनू घरात असताना बाहेरून बॉल ग्रॅविटी डीफायिंग पद्धतीने आत येणे, दरवाजे आपोआप उघड बंद होणे, पुरलेली बाहुली वगैरे परत होती तशी होऊन परत येणे.
अजुन किती भाग राहीले असावेत..
अजुन किती भाग राहीले असावेत...शेवटचे दोन भाग बघावे म्हणतो...!!
हा हजारावा प्रतिसाद...!!
३ महीने चालू आहे. ९० दिवसातून
३ महीने चालू आहे. ९० दिवसातून १२ वजा अधिक १० = २२ दिवस. म्हणजे १०० भाग पूर्ण होतील.
साठे काका आणि मोनूच्या आईने
साठे काका आणि मोनूच्या आईने मंगलला कसा त्रास दिला, हे अमात्य अणांना दिव्यचक्षूंनी दिसलं.
वसुधाची मैत्रीण महाभयानक आहे. तिच्यापुढे प्रियंका सहणेबल वाटू लागलीय.
जाहिरातीत पत्ता डॉ वझेंचा दिला, पण फोन नंबर पोलिस स्टेशनचा. हा फोन नंबर आपल्या होणार्या नवर्याचा नाही, हे हुशार प्रियंकाला कळलं नाही.
(ही आयडिया या लोकांनी कॅसलमधून चोरली असणार. कॅसल काही महिने गायब झालेला असतो आणि परत येतो, तेव्हा त्याला त्या काळातलं काही आठवत नसतं, तेव्हा तो अशीच जाहिरात देतो आणि फोन नंबर NYPD चा म्हणजे बेकेटच्या ऑफिसचा देतो.
या दोघांनाही ईमेल माहीत नसणार.
बरं, पत्ता एकाचा आणि फोन नंबर दुसर्याचा दिला तरी वसुधाची ती भयाण मैत्रीण पोचते पोलिस स्टेशनला. मज्जा मजा.
साठे काका आणि मोनूच्या आईने
साठे काका आणि मोनूच्या आईने मंगलला कसा त्रास दिला, हे अमात्य अणांना दिव्यचक्षूंनी दिसलं.>> तेच मला कळत नव्हतं शनिवारच्या भागात; म्हंटलं यांना कसं काय साठे काका आणि मोनूची आई आणि हे सगळं माहिती ..
आता किती भरभर गुंडाळतायत सगळंच . .
माझी मदत एकुलता एक बाप
माझी मदत
एकुलता एक बाप
>>माझी मदत.. एकुलता एक बाप
>>माझी मदत.. एकुलता एक बाप
भारी होतं ते..!
चला थोडेच दिवस राहिलेत.. आकडे लावा पटापट नक्की काय असेल रमा/वसुधा चं रहस्य?
मला वाटते अभय पोतदार वर तीचं एकतर्फी प्रेम असावं... तीला अपेक्षित संसार सुख वगैरे तो पुरवणार या आशेवर ती असावी. तीच्या गृह कर्ज विभागाचा तो कस्ट्मर असावा.. मेहता बिलडर कडे त्याला घर घ्यायचे असेल.. त्यात तीने मदत केली असेल...वगैरे..
ती 'त्या' दिवशी ती वाड्यातून नव्हे तर बँकेतून निघाली काहितरी आणायला.. आईस्क्रीम नक्कीच नाही..
[रच्याकने ती बँक च्या बाहेरील झाडे व बॅम्केचे प्रवेशद्वार, व आतल्या खोल्या रमा च्या आधीच्या भागात दाखवलेल्या वाड्या प्रमाणे कुणाला वाटल्या का?]
तिची स्मृती कशी गेली, कुठल्या धक्याने, तेव्हडेच कळायचे बाकी आहे.
बाकी दाखवलेल्या घटना व थोर अण्णा यांनी काढलेले निश्कर्ष यात लूप होल्स तर ईतके आहेत की सलमान च्या हीट अँड रन केस मध्ये पण नसतील. अनेक गूढ दृष्यांतून रमा आली की ते दिव्यांची ये जा.. (ईलेक्ट्रिकल ट्रिप) याचे रहस्य अण्णांच्या दिव्य दृष्टिला कळले असेल तर आम्हा पामरांनाही समजावून सांगा.
या कहणीच्या पटकथा लेखकाला व दिग्दर्श्काला ढोपरापासून दंडवत! गट्स आहेत बुवा.
काल मुलीने एकच प्रश्ण विचारून हैराण केलं: या लोकांनी पहिल्याच दिवशी ती हरवल्याची जाहिरात पेपरात का नाही दिली म्हणे?
आज अभय येणार आहे हॉस्पिटलात.
आज अभय येणार आहे हॉस्पिटलात.
सुनिल बर्वे एकदम गुटगुटीत
सुनिल बर्वे एकदम गुटगुटीत बालक झाला आहे
काहीच टोटल लागत नाहीये आता.
परेश रावल मोड ऑन ने बरेच प्रश्न पडलेत. पण आता टायपायचा कंटाळा आला. जाऊदे.
काल सुनिल बर्वे ओळखू नाही आला
काल सुनिल बर्वे ओळखू नाही आला. पन्नाशीचा गृहस्थ वाटला (असेलच).
सुनिल बर्वे एकदम गुटगुटीत
सुनिल बर्वे एकदम गुटगुटीत बालक झाला आहे >>> झाली का reentry त्याची. ती मंगल राहते का त्याच्या घरात आता. संपायला आली बहुतेक सिरीयल आता.
काल सुनिल बर्वे ओळखू नाही आला
काल सुनिल बर्वे ओळखू नाही आला. पन्नाशीचा गृहस्थ वाटला (असेलच).--------- 51 ....
काल ते मानसोपचार तज्ज्ञ काही
काल ते मानसोपचार तज्ज्ञ काही लोक एखादं काल्पनिक व्यक्तिमत्व धारण करतात, असं काहीतरी सांगत होते. मला तरी काही कळलं नाही.
पण कसं शक्य आहे? म्हणजे स्वतःचं नाव, कुतुंब, घर, नोकरी इतक्या सगळ्या काल्पनिक गोष्टी रचायच्या आणि स्वतःच्या मनाला पटवायच्या.
वसुधा ती वडगावची मुलगी निघाली. चंगी का काहीतरी नाव होतं ना?
कालचा भाग अजून पाहायचाय.
पुढील पाच भागात सुटणार बहुतेक
पुढील पाच भागात सुटणार बहुतेक ग्रहण.
आता फक्त चंदी ची रमा व्हाया वसुधा कधी व कशी झाली हेच रहस्य बाकी आहे. त्या अनुशंगाने ऊर्वरीत घटना व पात्रे अवतरतील.. आणि प्रेक्षकंबद्दल थोडीशी सहानुभूती वगैरे असलीच तर काही गूढ प्रसंग घटना याचे स्पष्टीकरण देतील बहुतेक.
नाहीतर ऊगाच राडा करू नये.. आहे हे असे आहे!
आणि त्या मंगल च्या फोटोला
आणि त्या मंगल च्या फोटोला वाळवी का लागत होती ? का तो एक योगायोगच ?
आणि त्या संपत च काय झालं ?
कालचा भाग अर्धवट पाहिला .. १ -२ आठवडे उरलेत आता या ग्रहणाचे
नवीन १०० दिवसांची " बाजी " नावाची मालिका चालू होणारे असं वाचलं
शेवटच्या भागात पोलीस निरीक्षक
शेवटच्या भागात पोलीस निरीक्षक निर्माता आणि दिग्दर्शक यांना पकडून नेताना दाखवावेच.
(No subject)
शेवटच्या भाग नंतर निर्माते,
शेवटच्या भाग नंतर निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांना लोकांनी जाऊन मारले नाही म्हणजे मिळवले
काल ते अभय पोतदारच्या घरी
काल ते अभय पोतदारच्या घरी निघालेले असतात तेव्हां गाडीच्या बाहेर डोंगर, द-या, मोकळे जंगल, झाडे असे दिसत होते. मुंबईत अशी सीनसिनेरी आहे हे ठाऊकच नव्हतं.
मुंबईत अशी सीनसिनेरी आहे हे
मुंबईत अशी सीनसिनेरी आहे हे ठाऊकच नव्हतं.>>> मला पण हाच प्रश्न पडला .. अर्थातच मी तो सोडून दिला
काल सिद्धार्थ च्या घरी अजून एक बाई आलीये(शर्वाणी पिल्ले ) तिने आपली ओळख "रमा अभय पोतदार " अशी करून दिलीये :अ ओ:
अजून किती दिवस आहे मालिका हि ??
उद्या शेवटचा असावा भाग असे
उद्या शेवटचा असावा भाग असे दिसतेय. आता आलेली खरी असावी. आज सगळा सावळा गोंधळ निस्तरण्यात जाईल. उद्या कदाचित सर्वांचे चावे..
निरूमाता आणि पजो मैतरणी
निरूमाता आणि पजो मैतरणी झाल्या काय?
मग आधीचे ते प्रकार काय होते? चहा ओतला की परत येणे, सिंक मधे केसांचा गुंतवळ, बिन चेहेर्याची रमा, दारं लागणे, रमाचे विचित्र पद्धतीने खाली बसून शिरा खाणे ... कायच कळत नाय
Pages