ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रमाच्या रूम मध्ये सर्व भुतांची मीटिंग सुरु होती आज !
सर्व गोंधळ आहे>>>>> आँ! Surprise

ठरलेला रोल मधेच कापल्याने ते सर्व पैसे मागायला आले होते. तर दिग्दर्शकाने त्यांना खोलीत थांबायला सांगितले आणि त्याचा पण एपिसोड केला.>>>>>Rolling laughter

रमाच्या रूम मध्ये सर्व भुतांची मीटिंग सुरु होती आज !ठरलेला रोल मधेच कापल्याने ते सर्व पैसे मागायला आले होते. तर दिग्दर्शकाने त्यांना खोलीत थांबायला सांगितले आणि त्याचा पण एपिसोड केला.>>>>> Rofl Rofl

ठरलेला रोल मधेच कापल्याने ते सर्व पैसे मागायला आले होते. तर दिग्दर्शकाने त्यांना खोलीत थांबायला सांगितले आणि त्याचा पण एपिसोड केला.>>>>> Biggrin Biggrin Biggrin

या सगळ्या कथा जंजाळात ती ओरिजिनल रमा ,तिची फॅमिली, आणि तिच्या टाइम ट्रॅवल (?) चा गुंता सोडवणार का आणि कसा याचीच काय ती किंचित उत्सुकता आहे. लॉजिकली ते जमण्याची शक्यता कमीच आहे.

चांगल्या गोष्टीची वाट लावली हि फालतू सिरीयल बनवून।
ते पुस्तकाच्या हेडिंग वर कशाचं चित्र आहे। icecrem आहे का?

कालचा भाग अधूनमधून पाहिला. ती प्रियांका कोणाशी बोलते फोनवर. दाढीवाला कोणे तो?
बादवे इथे स्लिंग वर पाहते झी मराठी. दुसर्‍या सिरीअलच्या ब्रेक टाईम मधे मेकींग ऑफ ग्रहण चं अख्खं टायटल साँग दाखवतात. त्यात या पुस्तकावर दाखवलंय तसंच चित्र दिसतं पसरत जाणार्‍या काळ्या रंगातून.

शेवट खरंच सांगू का ? नको वाटतं.
पुस्तक आत्ता घेतलंय वाचायला. दोन तीन तासात पूर्ण होईल वाचून. शिरेल संपल्यावर मूळ पुस्तकाबाबत लिहीन. कुणी वेगळा धागा काढला तर बरंच.

शेवट खरंच सांगू का ? नको वाटतं.>> सांगून टाका, मालिका अशी पण स्वतंत्र पणे पुढे सरकत (का रेंगाळत) आहे, त्यामुळे शेवट सांगून किंवा कादंबरी मध्ये काय घडले हे सांगून फार काही फरक पडणार आहे असे वाटत नाही. मालिका लेखकाने असे ही प्रेक्षकांना असंयमी, लगेच सगळे उलगडले पाहिजे असे म्हटले आहे. आता 3 महिन्यानंतर पण जर मालिकेचा शेंडा बुडखा दिसत नसेल तर अजून काय अपेक्षा ठेवावी.
सध्या 10 ला टीव्ही बंद करतो त्यामुळे ही मालिका कधी संपत आहे हे पाहण्याकरिता इथे चक्कर होत असते.

कादंबरी वाचायला सुरूवात केली आहे. मालिका आणि कादंबरीत थोडे थोडे साम्य आहे. सुरूवातीचा आईस्क्रीम आणायला जाण्याचा प्रसंग दोन्हीकडे आहे. कादंबरीत बस दोन इंचावरून गेली असा उल्लेख आहे. त्यानंतर तिच्या जाणिवा, स्मृती परत यायला थोडासा वेळ लागला. तिचे नाव स्नेहा पोतदार आहे. मालिकेत ती रमा आहे.

परत येते तेव्हां तिथे वाड्याच्या जागी इमारत असणे हे कादंबरीतच आहे. पण तिथे ती एक रात्र सुद्धा राहत नाही. सारंग (मालिकेत निरंजन) देशपांडे तिला कॉफी देतो आणि मावसाभावाला फोन करतो. त्याचे नाव शेखर. तो वर्णाने सावळा , उंचापुरा आणि लग्न झालेला आहे. त्याच्या बायकोचे नाव वैजयंती. शेखरचे घर हॉस्पिटलच्याच ब्लॉक मधे आहे. कॉफी झाल्यावर तो तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तिथे तिची सोय लावतो. सकाळी वैजयंती तिला भेटून जाते. तिच्या घरी फोन त्याच दिवशी लावला जातो.

मालिकेत तिने निरंजनच्या घरी एक महिना काढला (मालिका सुरू झाल्यापासून ). असे काहीही नाही मूळ कथेत.

त्या शहाण्यांनी असेच सांगीतलेले आहे, की नारायण धारपांच्या कादंबरीवर आधारीत. म्हणजे हे ठोकळे कथेत काही पण घालायला तयार.

पुढे हॉसिप्टलमधून ती पुन्हा सारंग देशपांडेच्या घरी आली. त्याचे बाबा , आई घरात आहेत. तिने एक ओळख सांगितली आहे की तिचा तळेगावला बंगला आहे. बाबा आहेत. आई कॅन्सरने मृत्यू पावलेली आहे. एक अनाथ मुलगा बाबांनी सांभाळला आहे. त्याचे नाव सदा. घरचे नाव शारंपाणी म्हणून त्यानेही तेच नाव लावलेले आहे. हा सदा तिचा आधार आहे. कारण बाबा नियमित संशोधनात गर्क असतात. त्याला मुंबईला नोकरी मिळाल्याने तो तिकडे गेला. लग्न तळेगावातच झाले. पण दर शनिवारी तळेगावात येतो.

डॉक्टर शेखर कुलकर्णीने वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या होत्या. प्रत्येक हॉस्पिटलला स्नेहाचा फोटो पाठवला आणि कुणी चौकशी करत आले की क्कळवा असा निरोप पण दिलेला. एका हॉस्पिटलमधे गेलेल्या सविता खरे यांना शेखरचा नंबर मिळाला. त्या बाई शेखर कडे आल्या. त्यांनी शेखरला माहीती दिली त्यावरून स्नेहाचे खरे नाव वसुधा गोखले आहे. ती त्यांच्या बंगल्याच्या आउट हाऊस मधे राहतेय. बँकेत नोकरीला आहे. स्वभावाने भोळी असल्याने अनेकांनी तिची आर्थिक फसवणूक केली आहे. एका नेवरेकर नावाच्या , जो बदमाष आहे पाहताक्षणीच कळते, स्नेहाला फसवले. तिला दिवस गेले. मग या खरे बाईंनी तिला मदत केली. ओळख वापरून तिचा गर्भपात केला. याचा परिणाम तिचायवर झाला. मग तिला ट्रीटमेंट चालू होती. ती आता बरी झाली असे समजून खरे बाई आणि कुटुंबीय एका कार्यक्रमाला गेले. तो दिवस शनिवार होता. घरी येऊन पाहतात तोच स्नेहा उर्फ वसुधा घरात नाही.

त्याच दिवशी स्नेहा सारंग देशपांडेला घराच्या खाली भेटली होती. तिने खरे बाईंना अजिबात ओळखले नाही. तिची कहाणी तिला ओळखीची नाही. पण तिने आपली कहाणी फसवी असू शकते हे मान्य केलेले आहे. आता तळेगावला जाणे बाकी आहे. शेखरने सर्व शक्यता समजावून सांगितल्या. कदाचित सर्व आशा धुळीस मिळू शकतात.

त्याप्रमाणे सारंग आणि स्नेहा तळेगावला गेले. तिने रस्ता बरोबर सांगितला. तिने सांगितले त्याच ठिकाणी शारंगपाणी नावाची पाटी होती. पण इकडे घोळ होता. सदाशिव शारंगपाणी तळेगावलाच पोलीस इन्स्पेक्टर होता. शारंगपाणी (बाबा) दहा वर्षांपूर्वीच गेले होते आणि आई जिवंत होती. स्नेहाने आईला हाक मारली तर तिने ओळखले नाही. चंदी नावाची मुलगी माझी नाही. मला अपत्य नाही असे आईने सांगितले. त्या हाकलून देत होत्या. त्यांनी टायगर कुत्र्याला हाक मारली तर स्नेहा त्याच्या गळ्यात पडली. कुत्रा गोंधळला. त्याने तिला काहीही इजा केली नाही. हे पाहून नोकराने इन्स्पेक्टर सदाशिवला बोलावून घेतले.

सदाशिवला स्नेहाने असे काही प्रसंग सांगितले की त्याला ते नाकारणे अशक्य झाले. पण त्याला चंदी आठवत नव्हती. त्याने मग तिला आशिर्वाद दिला आणि अशीच बहीण मला मिळावी असे म्हटले. त्याने एकही प्रसंग नाकारला नाही.

सारंग म्हणाला काही काल्पनिक काही सत्य निघाले. या प्रवासात मंगलचे नाव निघाले. मंगल सारंगची मैत्रीण. ती सहलीला गेली असता अपघात झाला . त्यात सगळे वाचले पण ही एकटीच गेली.
सारंगच्या तोंडी लेखकाने पर्यायी जगाचे सूतोवाच केले आहे. एक असे जग जे पर्यायी आहे. ज्यात हिटलरचा विजय झाला. नेपोलियन वॉर्टल्रूला विजयी झाला. ते समांतर आहे. त्यात क्रम उलटापुलटा आहे. चुकून त्या जगातला मनुष्य या जगात आला तर त्याला काही गोष्टी ओळखीच्या तर काही अपरिचित दिसतील.

थोडक्यात स्नेहा पोतदार ही एका जगातली तर त्याच वेळी वसुधा गोखले ही पर्यायी जगातली.
स्नेहा पोतदारचा जन्म १९८८ सालातला आहे (पुस्तक २००१ चे आहे). तसेच तिला वर्तमानपत्रातल्या बातम्या ओळखीच्या आहेत. थोडक्यात ती शंभर एक वर्षांपूर्वीच्या काळातली किंवा पुढच्या काळातली नाही. ती समांतर काळातलीच आहे.
इथपर्यंत आली आहे कथा.

पुस्तक पुर्वी वाचलेलंय पण कथानक जवळ जवळ विस्मरणात गेलेलं. धन्यवाद इथे टाकल्या बद्दल. मालिकेत शेवट कसा करतील देव जाणे.....

मालिका आणि कादंबरीत थोडे थोडे साम्य आहे. >>>+++१११ मन्गल, चन्दी, सदा हि नावे तर कादंबरीतूनच घेतली आहेत.

स्नेहाने आईला हाक मारली तर तिने ओळखले नाही. चंदी नावाची मुलगी माझी नाही. मला अपत्य नाही असे आईने सांगितले. त्या हाकलून देत होत्या. त्यांनी टायगर कुत्र्याला हाक मारली तर स्नेहा त्याच्या गळ्यात पडली. कुत्रा गोंधळला. त्याने तिला काहीही इजा केली नाही. हे पाहून नोकराने इन्स्पेक्टर सदाशिवला बोलावून घेतले.

सदाशिवला स्नेहाने असे काही प्रसंग सांगितले की त्याला ते नाकारणे अशक्य झाले. पण त्याला चंदी आठवत नव्हती. त्याने मग तिला आशिर्वाद दिला आणि अशीच बहीण मला मिळावी असे म्हटले. त्याने एकही प्रसंग नाकारला नाही. >>>> स्नेहाची आई आणि सदा स्नेहाला का ओळखत नाही? ती तर त्यान्ना ओ़ळखते.

अरे काय हे?
स्पॉयलर अलर्ट द्या
हे सगळं त्या नारायण धारप कथांच्या धाग्यावर लिहा.

मालिका आता कथेच्या संदर्भात कुठवर पोचली आहे? यावरून अंदाज येईल की अजून किती दिवस चालणार आहे ही मालिका. कथे मध्ये देखील अशीच लोक गायब होतात का?

आत्ता मनसोपचार तज्ञ अण्णा यांची एन्त्री झाली आहे.
ते म्हणतात, भुत नसते पण भूतकाळ असतो.
मग प्रियंका एका बालवाडी शिक्षिकेला भेट ते. जी मंगल बरोबर काम करत असते. तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या फोटोत तिला मंगल आणि रमा एकच फोटोत दिस्तात.

त्यावरुन ती रमाला आता विचरयला गेलीय की ती कुठे ओळखत होती मंगल ला? मग मंगल ला कोथिंबीर वड्या आवडायच्या हे तिला कसे कळाले

हु श

आले चहा आणि कोथिंबीर वडी खावुन!

तर मूळ कथा..

स्नेहाने आता भूतकाळ विसरायचा ठरवल आणि ती वसुधा गोखले बनायला तयार झाली. डॉक्टर शेखरने वसुधाच्या बँकेत जाऊन तिच्यासाठी दीर्घ रजेची किंवा स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली. रजा मिळाली तर तिला बँकेचे व्यवहार कळतील.

वसुधाच्या खोलीत स्नेहा रहायला गेली. तिला एकटीला पाहून नेवरेकरने तिच्यावर हल्ला केला. त्याच्याकडे वसुधाचे अश्लील फोटो होते आणि त्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल करीत होता. नेवरेकर काही करणार इतक्यात स्नेहाने मदतीसाठी आरडाओरडा केला. इतक्यात तिथे पोहोचलेल्या सदाशिवने नेवरेकरला पोलिसी हिसका दाखवला आणि फोटोज व निगेटीव्हज काढून घेतल्या.

सदाशिव शारंगपाणी आता तिचा भाऊ बनला. त्यांच्या भेटी सुरू झाल्या. तिने त्याची मैत्रीण शारदा शोधून काढली. इकडे सारंगने तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले. तिनेही होकार दिला.

स्नेहा नव्या शाखेत रुजू झाली आणि तिला रमाकांत दिसला. रमाकांत पोतदार. तिचा नवरा. त्याची अवस्था चमत्कारीक झाली. त्याने नाव विचारले. लग्न झालेय क विचारले. पुन्हा बाहेर घुटमळत थांबला. पण आजवरच्या अनुभवांमुळे तिने सावधगिरी बाळगण्याचे ठरवले. तो निघून गेला. ती त्याची वाट बघत होती.

एका रात्री वीज चमकली. तिच्या हाताला स्पर्श झाला. तर मुन्ना उभा होता. तिचा छोटा मुलगा. त्याला वीजेची भीती वाटत होती. तो तिला बिलगून झोपला. सकाळी तो नव्हता. हा अनुभव खरा होता. भास नाही याची तिला खात्री होती. तिने हे कुणालाच न सांगण्याचे ठरवले.

ती रमाकांतच्या घरी गेली. तो तिला पाहून अस्वस्थ झाला. त्याने सांगितले तुम्हाला भेटल्यापासून खूप अस्वस्थ वाटते म्हणून मी खाते बंद केले. त्याच्या घरी त्याची बाओको व मुलगी होती. तिने पाहिले रमाकांत खूष होता. तिच्या मनावरचे ओझे उतरले.

@मधुरांबे,
धाग्याला ग्रहण लागले आहे. Biggrin

Pages