Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Submitted by मधुरांबे on 21
Submitted by मधुरांबे on 21 June, 2018 - 21:56>>>>+११११
मलाही शेवट इतकासा पटला नाही, खरेतर संपूर्ण कथाच खुप वेगवान आहे.
पण जास्त विचार न करता एक काल्पनिक कथा म्हणून वाचली तर छाने
किट्टू मला मिळू दे आधी! मग
किट्टू मला मिळू दे आधी! मग देते... आपण 'एकमेकांना छेदणार्या विश्वात भेटू' तेंव्हा!
आज बहुतेक संथ निरंजन बाबा ची
आज बहुतेक संथ निरंजन बाबा ची आई मरणार आहे आणि तेही घरातल्या घरात त्या जिन्याच्या कठड्यावरून उडी मारून !! एवढ्या सहजासहजी का मारलं काय माहित
(ती मेली आहे का नाही ते आज कळेल .. काल फक्त उडी मारायच्या तयारीत आहे असं दाखवलं )
आणि 'पुढील भागात' मध्ये आई खाली पडून डोक्यातून रक्त येतंय असं दाखवलंय ..
मारली उडी कालच. आज मेडल असणार
मारली उडी कालच. आज मेडल असणार
मारली उडी कालच>> अच्छा!!
मारली उडी कालच>> अच्छा!!
आज मेडल असणार>> मेडल कसलं ??
आज मेडल असणार>> मेडल कसलं ??
कोमात गेलेली. आली परत.
कोमात गेलेली. आली परत.
मालिका गुंडाळायला लागलेत.
दाढीवाल्याला धरलं पोलिसांनी.
मेडल कसलं ? >> उडी
मेडल कसलं ? >> उडी मारल्याबद्दल
दाढीवाल्याला धरलं पोलिसांनी.>
दाढीवाल्याला धरलं पोलिसांनी.>> हे कोण ? ते अमात्य कि अमान्य नाव आहे ,ते का ?
हो बाकी मालिका म्हणजे आनंद च आहे सगळा !
उडी मारल्याबद्दल >>
उडी मारल्याबद्दल >>
नही. तो मेट्रनचा मित्र. लंगडत
नही. तो मेट्रनचा मित्र. लंगडत चालणारा.
त्याने सोडावॉटरला kidnap केलेलं.
अमात्य आणि त्याच्या
अमात्य आणि त्याच्या सेक्रेटरीच्या रोलमधले दोघे ओळखीचे वाटताहेत.
त्याला दाढी ए होय !? कुणास
त्याला दाढी ए होय !? कुणास ठाऊक .. संपत असं नाव ए त्याच
सेक्रेटरी च्या रोल मधल्याच
सेक्रेटरी च्या रोल मधल्याच नाव आणि याना कुठे पाहिलंय ते मला हि जाम आठवत नाहीये
मला सेक्रेटरी स ई
मला सेक्रेटरी स ई परांजपेंच्या मालिका ंंत पाहिल्यासारखं वाठतंय. भुतकर बहुतेक.
शाम?
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे वाटतात.
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे वाटतात.>> हो अगदी अगदी..
बाकी ते अमात्य, शिकागो कनेक्शन, भूत पळवणारा तज्ञ डॉ वगैरे पाहून भूलभुलैया ची आठवण येतेय...
पुढे काय झालं का? काल
पुढे काय झालं का? काल निरूमाता शुद्धीत येते तेव्हा पजो बसलेली असते तिकडे तेवढे पाहिले. नंतरचा भाग लागलाच नाहि आपलीमराठीवर.
आणि त्या दाढिवाल्याने प्रियांकाला बांधून का ठेवलेय?
अभा च आहेत अमात्य. त्यांचा
अभा च आहेत अमात्य. त्यांचा सेक्रेटरी चानावाव या सई परांजपेंच्या मालिकेत चोर होता.
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे वाटतात - तेच आहेत
सेक्रेटरी च्या रोल मधल्याच
सेक्रेटरी च्या रोल मधल्याच नाव आणि याना कुठे पाहिलंय ते मला हि जाम आठवत नाहीये>>
तुझं माझं Breakup मधे?
अरे तो दाढीवाला संपत दिल
अरे तो दाढीवाला संपत दिल दोस्ती मध्ये श्याम होता आणी हम तो तेरे आशिक मध्ये एक संमोहन करणारा. जाम मजा आली त्या भागात. आता झिपर्या सिनेमात आहे बहुतेक व्हिलनच.
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे
अमात्य थोडे अऩत भावेंसारखे वाटतात - तेच आहेत>>>> ओह! धन्यवाद MPA.
अण्णा म्हणजे अनंत भावे
अण्णा म्हणजे अनंत भावे
त्यांचा सेक्रेटरी म्हणजे अरुण होरणेकर
सई परांजपे ह्यांचा असिस्टंट. कायम त्यांच्या सिनेमात , नाटकात असायचा
मालिका कशी गुंडाळावी याचे
मालिका कशी गुंडाळावी याचे प्रात्यक्षिक कालच्या भागात सुरू झाले आहे. ते आज संपेल बहुधा. प्रेक्षकांना लागलेले ग्रहण सुटणार आज. कलाकार दुस-यांदा पैसे मागायला आले होते. पण निरंजन , जो खोल उडी चँपियन आहे त्याच्या आग्रहाला घाबरून पळाले. निरंजनला गोल्ड मेडल मिळाले म्हणून त्याने आपल्या आईला पण उडी मारायला लावली. आता मालिका संपल्यावर क्लासेस काढेल बहुतेक.
मंगलला खांदे मागे करून डोळे वटारून पाहण्याचा व्यायाम संपल्याने हायसे वाटले असणार. कारण काल ती हसून निघून गेली. अनंत भावे सर्वांशी ते त्यांची नातवंडे असल्याप्रमाणे बोलतात. त्यामुळे सर्वांनाच शिशूवर्गात गेल्यासारखे वाटत असणार. हे जरा लवकर आले असते तर बालपण देगा देवा चा फील आला असता असे सर्वांनाच वाटत असणार. पण त्यांचा पायगुणच असा कि मालिका संपत आली.
इस्पेक्टर साहेबांना हॉस्पिटलमधल्या घटनांचा शोध घेता आला नाही पण प्रियंकाला वाचवायला ते घटनास्थळी हजर झाले. हॉस्पिटलमधल्या घटनांबद्दल डॉक्टरांकडे कसून चौकशी न करण्यासाठी बहुधा त्यांच्यावर वरून दबाव आलेला असणार. कारण डॉक्टरला कस्टडीत घ्यायचा दम सुद्धा ते देऊ शकले नाहीत. उलट डॉक्टरच त्यांना डाफरत असतो सदा न कदा. बहुतेक त्यांचा पगार हॉस्पिटलकडून घ्या असा जीआर असणार. पोलीस इन्स्पेक्टर आहे की भजनीबुवा ? तपासाची प्रगती मात्र साहेबांना रिपोर्ट केल्याप्रमाणे डॉक्टरला जागेवर येऊन करत असतात. असे पोलीस अधिकारी सर्वत्र हवेत.
रमाचं कौतुक केलं पाहीजे,. आपलं दु:ख विसरून ज्याच्या घरात जाईल त्याची आस्थेने चौकशी करणे, कुटुंबप्रमुखावर माया करणे, त्याची दु:खे प्रेमाच्या पखरणीखाली विसरायला लावणे हे सर्व पाहता तिला माऊलीच म्हणायला हवे. डबा देण्यापासून ते कामावरून आल्यानंतर का रे दमलास वगैरे चौकशी करत असल्याने होणा-या किंवा असलेल्या बायकांना सुद्धा काहीच काम राहणार नाही. त्यामुळे त्यांना स्वतःची स्पेस मिळू शकते. त्या मालिका विनाव्यत्यय पाहू शकतात, करीअर वर लक्ष केंद्रीत करू शकतात इत्यादी अनेक फायदे आहेत. रमा प्रमाणे जर मेड मिळू शकल्या तर सर्वांचेच भले होईल. नवरे पण आनंंदी आणि बायका पण सुखी !
लेखक दिग्दर्शकाला मात्र विस्मरणाचा आजार झालेला आहे त्याबद्दल वाईट वाटते. अनेक दृश्यात रमा आणि मंगलचे कनेक्शन दिसले आहे. रमा अनेकांना संपवण्यात सहभागी असल्याचे दाखवलेले आहे. कदाचित ते लेखक दिग्दर्शकाचे भ्रम असावेत. आता अनंत भावे त्यांच्यावर उपचार करतीलच. मालिका संपल्यानंतर अनेकांना अनेक कामे करावी लागणार आहेत.
प्रेक्षकांनी मात्र उतारा म्हणून ग्रहण संपल्यावर उड्या मारायचा मोह टाळणे लांबचा विचार करून इष्ट राहील. प्रचंड आशावादी राहून आता तरी एखादी लॉजिकल मालिका सुरू होईल असा सकारात्मक विचार करावा.
अरुण होर्णेकर, हं.
अरुण होर्णेकर, हं.
धन्यवाद मोहन की मीरा.
अपडेट बद्दल धन्स मधुरताई,
अपडेट बद्दल धन्स मधुरताई, शेवटच्या भागाबद्दलही लिहा इथे. पुस्तक वाचल्यामुळे, सिरेलचा शेवट जाणून घ्यायची उत्सुकता आहे
शेवट लिहीला आहे. पाठीमागे पहा
शेवट लिहीला आहे. पाठीमागे पहा.
( इतरांच्या तुलनेत तुम्ही नाव नीट लिहील्याबद्दल आभार. पण....... आता मला सवय करून घ्यावी लागेल असं दिसतंय )
कालच पुस्तक वाचुन संपलं.
कालच पुस्तक वाचुन संपलं.
कथा ह्या पकाव सिरीयलपेक्षा खुपच वेगळी आहे. कुणीही मरत नाही. कुणाचाही खुन होत नाही.
सिरीयलच्या सुरुवातीला धारपांच्या कादंबरीवर बेतलेली आहे अशा आशयाचं काही लिहित असतील तर ताबडतोब बंद केलं पाहिजे.
सिरीयलच्या सुरुवातीला
सिरीयलच्या सुरुवातीला धारपांच्या कादंबरीवर बेतलेली आहे >> आरोप आहे हा.
दाढीवाला संपत अनिल कपूरच्या
दाढीवाला संपत अनिल कपूरच्या २४ मधे कैदी होता आणि अस्मिता मधे भिकारी (मागच्या पानावर पण लिहीलेय ).
Pages