ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अभिनय काय असतो, ते सुनील बर्वेने दोन भागांत दाखवून दिले. इतके दिवस एक पल्लवी जोशी आणि थोडीफार निरुमाता यांच्यावरच डोलारा होता.
सुनील असलेला भागही जरा नीट लिहिलेला इ. वाटला. नाहीतर त्या सदाने रमा आणि प्रियांकाला सुरा दाखवून धमकवायचा आणि त्या आधी सिद्धार्थचा गळा आवळायचा सीन धन्यच होते. गळा आवळला जात असताना सिद्धार्थ विचारतोय, "अरे, तू काय करतो आहेस?"

आपले डॉक्टर साहेब, ढसाढसा रडणार्‍या, किडनॅप झालेल्या किंवा अगदी हॉस्पिटलच्या बेडवर पहिल्यांदा दिसलेल्या व्यक्तीलासुद्धा "आर यु फाईन?" (त्यांचा ई दीर्घच आहे) असं विचारतात, ते यापुढे पाहायला मिळणार नाही.

गळा आवळला जात असताना सिद्धार्थ विचारतोय, "अरे, तू काय करतो आहेस?">> Rofl

मी ही सिरियल बघणे फार पूर्वी सोडलं. नंतर एकदोनदा बघायचा प्रयत्न केला पण 10 मिनीटं पण बघणं शक्य झालं नाही. आता पण शेवट जवळ आलेला असून पण बघायची इच्छा नाही. Happy

संपली का ?
सगळं गौडबंगाल काय होतं कोणी थोडक्यात सांगेल का ???

कालचा भाग अजून पाहायचाय.

अभय पोतदारला रमा नावाची बायको आणि दोन मुलं आहेत.
हाउसिंग लोन घेण्यासाठी तो वसुधा नेवरेकरच्या बँकेत जातो. तिथे ते दोघे एकमेकांना आवडू लागतात.
वसुधाला तर तो इतका आवडतो, की त्याचं हाउसिंग लोन अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट झाल्यावर ती स्वतः लोन काढते आणि त्याला देते. त्याचं घर होतं.
आता घर झालं, तिला लग्न हवं असतं. एका संध्याकाळी, बागेत की कुठे, तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. झालं लग्न.
मग मालिका सुरू झाली त्यादिवशी वसुधा अभयच्या घरी येते. त्यांचा रमाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा सरप्राइज प्लान चाललेला असतो.
तिला कळतं, की अभयचं लग्न झालंय आणि दोन मुलंही आहेत. त्याची बायकोही तिच्यासमोर येते.

हा सगळा फ्लॅशबॅक अभयने सिद्धार्थ आणि कंपनीला सांगितलाय.

महत्त्वाचं म्हणजे अभयचा आणि निरंजनचा पत्ता सारखाच असतो. सावरकर नगर, अमकी गल्ली, तमकं घर. फक्त एकाचं विक्रोळीला आणि दुसर्‍याचं ठाण्याला.

हे सगळं गेल्या ३-४ महिन्यांतच झालंय' वसुधा वेगळ्या काळात गेलेली नाही, तर तिला मोबाइल फोन माहीत असायला हवा, जो माहीत नाही असं सुरुवातीला दाखवलं. अभयचा मोबाइल नंबरही तिच्याकडे नव्हता.

प्रियांकाने अभयला फेसबुकवर शोधलं, तसं निरंजन किंवा सिद्धार्थने आधी केलं नाही.

शिवाय अभयच्या मुलांनी वसुधाला आधी पाहिलंय, तरीही ती तिला ओळखत नाहीत. किंवा तिला आधी पाहिल्याचं त्यांना आठवत नाही.

कालच्या भागात वसुधाच्या डोक्यात रमाची पर्सनॅलिटी आणि हिस्टरी कशी फिट झाली हे दाखवलं असणार.

मंगलला त्या अमात्यांनी क्लीन चिट दिलीय.
अमात्य = प्रियांकाने शोधलेले एक्स्पर्ट.
सगळ्यांच्या मनातल्या मंगलबद्दलच्या अपराधी भावनेमुळेच त्यांना मंगल दिसत होती. आणि काही काही ठिकाणी संपतचा (मेट्रनचा बॉयफ्रेंड्/पार्टनर)
हात होता.

संपली एकदाची सिरीयल...काल शेवटचा भाग होता....

सुनिल बर्वेला पजो एकच कानाखाली मारते. जाड्या पोलिस सुनिल बर्वेची स्टोरी ऐकायला का नव्हता कोणास ठाऊक.

डॉ. सिद्दार्थ आणि त्याची पुरूषी गर्लफ्रेंड हे सगळे कसे झाले ते एकमेकांशी सांगत असतात आणि रमा परत घर सोडून निघून जाते. ती दुसर्‍याच कोणाच्यातरी घरी जाऊन माझे घर हरवले हो असे रडते. येथे सिरीयल संपवली असे दाखवले आहे. जर एकता कपूर निर्माती (निरूमाता नव्हे निर्माती) तर या पुढे वेगळीच कथा पुढे आणली असती. (आत्ता पर्यंत झाले हे स्वप्न होते असे दाखवून..)

बाकी सावरकर नगर ठाणे आणि विक्रोळी असे रमा (की वसूधा? (की चंदी?( की पजो?))) का जी कोण होती तिला आधी पोलिसांनी का नाही विचारले? तसेच फेसबूकवरून अभय पोतदार याला आधी का नाही शोधले? जरी त्या नावाचे फेबूवर ५०० प्रोफाईल असतील तरी रोज ५० प्रोफाईलचे फोटो दाखवून याला शोधता आले असते ना? अर्थात सिरीयल मग तेथेच संपली असती. आपला जीव कोण घेणार मग? बाकी बिग बॉस मुळे प्राईम टाईमचा बराचसा प्रेक्षक तिकडे वळला असल्याने ह्या सिरीयल आणि चला हवा येऊ द्या चा टिआर्पी जरा घसरलाच होता. त्यातला एका सिरीयलला तिलांजली दिली. आता नवीन काही चांगली मालिका येईल ही अपेक्षा...!!

ही सीरियल १०० भागांची असणार हे आधीच जाहीर केलेलं, त्यामुळे बिग बॉसचा संबंध नाही.
दुसरी 'बाजी' मालिका येतेय (बहुतेक ३० तारखेपासून) पेशवेकाळाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक कथा. तीही ए१०० भागांची आहे.
पण मी पाहणार नाही. उद्याच आमच्या डिशला लागलेलं झी टीव्हीचं ग्रहण सोडवणार.

@ मुग्धानंद - आहो आख्या सिरीयल मध्ये कधीच कुठली टोटल लागली नाही तुम्ही काय गणिताचे घेऊन बसलात ... तिकडे दिग्दर्शक अजून बसलाय विचार करत

मी या मालिकेचा एकही भाग पाहिला नाही, पण परवा लायब्ररीत हे पुस्तकं दिसलं. उत्सुकता वाटून आणलं. हॉरर हा माझा जॉनर नाही. कधीच आवडलं नाही, त्यामुळे अशा प्रकारची फार कमी पुस्तकं वाचली/ सिनेमे पाहिले आहेत. पण हे पुस्तक उत्सुकता ताणणारं आहे. एकदम सरधोपट लिहिलं आहे, तरीही एक तणावाचा अंडरकरंट आहे. दोन समांतर विश्व असू शकतात- तेच लोक आपल्या आयुष्यात वेगळ्याच संदर्भाने येऊ शकतात, ही दोन विश्व कधीच एक होत नाहीत. अपघातानेच एखादी व्यक्ती इकडून तिकडे जाऊ शकते- असा धागा आहे. मला पुस्तक ओके वाटलं. तसंच्या तसं घेऊन सिरियल दाखवली असती तरी मजा आली असती पाहताना, कारण पुस्तकात काही वॉव मोमेन्ट्स आहेत नक्की.

तसंच्या तसं घेऊन सिरियल दाखवली असती तरी मजा आली असती पाहताना>>>>>>>>>>>>> +१००
पण आपली जास्त चालवायच्या नादात माती करतात.

सिरियल बंद झालेली नाही, अजुन चालु आहे , पुढचे भाग व्यवस्थित आहे बहुदा सगळ्यांचे पेमेंट झाल्याने सग्ले जण मन लावून काम करताहेत , मंगल ची मुलगी म्हणून एक नविन एंट्री झालीय पण चेहरा झाकलेला दाखवत आहेत..सस्पेंस ... पण कालच्या ईपोसोड मध्ये त्या इंस्पेक्टर ला उगाचच मारले (गळफास म्हणे .. लै च्या कै तो इंस्पेक्टर केव्ह्ढा ती दोरी केव्हढी !)

ओह शिट...
मला वाटले सिरीयल संपली..!! मला कसे दिसत नाहीत भाग ते...?

आपलीमराठी वर १४ जुलौ नंतर भागच अपलोड केले नाहीयेत. मला पन अ‍ॅबरप्ट संपल्यासारखी वाटली>>> अगदी अगदी. मी पण तिथेच पाहिलं. पुढचे भाग नाहियेत त्यावर...पण मला वाटलं त्या १४ तारखेच्या भागात डॉ ने फळ्यावर मांडून सगळी कोडी सोडवून दाखवली त्या सोडा वॉटरला म्हणजे संपली असेल शिरेल Wink
चालूच आहे होय अजून दळण!

अजून सुरू आहे? Uhoh
मराठी बिगबॉस सुरू होण्यापुर्वीच मी पहायची बंद केली.
त्या निरूला ती मंगल दिसायची, तो गजरे माळायचा, हातात हात घेऊन फिरायचा. एकदा तो आणि ती त्याच्या बसक्या बुट्क्य गाडीवरून जात होते, तेव्हा तो त्याचा भाऊ (डॉक्टर त्यांना पाहतो) त्याला मात्र निर्या एकटाच हातवारे करत बोलतोय असं दिसत होतं.
मला पण ५ मिन्टापुर्वी मंगी दिसलेली मागं बसलेली... मग एकदम कुठं गेली?:अओ:
मला वाटलं माझ्या डोस्क्याव परि णाम झाला, मग मि शिरेल बघायची सोडली आणि ममांचं झाड धरलं.

मला पण ५ मिन्टापुर्वी मंगी दिसलेली मागं बसलेली... मग एकदम कुठं गेली?:अओ:
मला वाटलं माझ्या डोस्क्याव परि णाम झाला, मग मि शिरेल बघायची सोडली आणि ममांचं झाड धरलं.>>>>>> Rofl

ह्या! कुठं सुरु आहे ही सिरीयल? झीवाल्यांनी बंद केली की. आता ३० जुलै पासुन ती बाजी ( काल्पनीक कथानक ) सुरु होतीय.

ह्या! कुठं सुरु आहे ही सिरीयल? >>>>> तुमच्या टीव्हीचं ग्रहण सुटलं का ? सिरीयल सध्या आकाशवाणीवर चालू आहे.

Pages